स्पेन मधील friends साठी भारतीय बनावटीची व भारतीय असण्याची ओळख देणारी भेट-वस्तू कृपया सुचवा...

Submitted by यक्ष on 28 October, 2018 - 14:08

एका समिट्साठी स्पेन दौरा नियोजीत आहे. त्यात परदेशी freinds (मित्र व मैत्रिणी) साठी भारतीय बनावटीची व भारतीय ओळख देणारी भेट-वस्तू काय द्यावी हा संभ्रम आहे!
किंमत साधारणतः १०००/- चे आंत. प्लास्टिक व / वा प्रदूषण करणारी नसावी! (Nature friendly असावी). साधारणतः १० वस्तू लागतील. वेगेवेगळे प्रकार असले तरी छान.
कृपया सुचवा...
चांगल्या सुचनेस लाखो धन्यवाद व स्विकृत सुचनेस करोडो धन्यवाद देण्यात येतील (दिवाळीपूर्वीच) ह्याची कृपया नोंद घ्यावी!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

-1000 पर्यंत फॅबइंडिया ला

-1000 पर्यंत फॅबइंडिया ला सुंदर क्लचेस मिळतात.परदेशी लोकांना वापारता येतील असे सोबर रंग, बीज/क्रीम/ब्लॅक वगैरे.
-जयपूर स्टोर्स मध्ये सुंदर सिल्क स्कार्फ मिळतात.यातही प्लेन आणि डिसेंट रंग असतात.किंमत 1000 च्या खाली.
-वुड वर्क वाल्या ठिकाणी कोरीव लाकूड काम केलेले हलके कँडल स्टँड किंवा ऍशट्रे.
-जरी वर्क वाली टी कोस्टर/टेबल मॅट आपल्या इथे अँटिक स्टोर्स मध्ये मिळतात.
-गंमत म्हणून शिव राज मुद्रा वॉलपीस देता येतील कंपनी च्या ध्येयात बसत असेल तर.त्यावरची प्राचीन अक्षरे वगैरे चांगली दिसतात.
-ऑफिस साठी वारली पेन स्टँड, की होल्डर वगैरे स्माईल्स च्या प्रदर्शनात चांगल्या quality चे मिळतात.
-मधूबनी पेंटिंग फ्रेम्स सुंदर मिळतात.
- साधी गिफ्ट शॉप मधली ओम लिहिलेली सुंदर पेंटिंग विथ काळी लाकडी फ्रेम.ओम मेडिटेशन आणि योगा बद्दल असल्याने सर्व धर्माला अलाऊडे ☺️☺️☺️
- एफ सी रोड ला मोठे पर्स चे दुकान आहे.तेथे खास परदेशी गिफ्ट साठी वेत किंवा झावळ्या लावलेल्या पर्स मिळतात.
-बॉम्बे स्टोअर कॅम्प मध्ये भरपूर ऑप्शन मिळतील.
-पुण्यात अनेक बायका सुंदर क्रोशा काम करतात.त्यांच्या कडून टी कोस्टर विणून घेणे.
- अबस्ट्रॅक्ट असल्यास चांगले बुद्धा चे पेंटिंग.
-अमेझॉन वर चांगले वारली मग मिळतात.तसेच साधा मेटल आणि मिनाकारी च्या डिश/बाउल पण.ऑक्सिडाईज घ्या.'ओ काळा पडला ना तुम्ही दिलेला माल' म्हणून ऑर्डर कमी करणार नैत.

(कॉमन आणि लगेच मिळत असल्याने मोह झाला तरी कृपा करून परदेशी माणसांना राजस्थानी गणपती भेट देणे टाळा.ते आपल्याला जिजस किंवा मडोना देत नाहीत.फेंग शुई प्रतीके देणे टाळा.चिनी जगभर पसरले असल्याने तुम्ही दिलेला आयटम त्यांच्या स्पेन च्या कंपनीच्या कोपऱ्यावरच्या दुकानात मिळत असेल ☺️☺️)

मुलींसाठी चांदिचे /बिन चांदीचे आजकाल एकदम सुरेख कानातले आले आहेत. फार आवडले इथे आणल्यावर. क्लच/इव्हिंनिंग बॅग ,ब्रासलेट्स इत्यादी.

-म्हैसूर सँडल च्या दुकानात सँडल वूड ची पेने/ बुक मार्क/पेपर कटर मिळतात ,
- पैठणी च्या पर्सेस.
- बजेट जास्त असले सद्रहरण 4 5 k ज्वेलस ऑ इंडिया, महाराजज ऑफ इंडिया, वाराणसी द ancient सिटी, कुंभमेळा वगैरे विषयांची उत्तम फोटो असणारी कॉफी टेबल बुक्स मिळतात , ती देऊ शकाल
Bargain हट म्हणून एक चेन आहे ,तिकडे बऱ्याचदा 15 20%डिस्काउंट मध्ये मिळतात.
- लाकडी नक्षीकाम केलेले चेस बोर्ड , प्याद्याच्या जागी सैनिक, घोडे, हत्ती वगैरे आकार असणारा
- मारिओ ची गोवा पार्श्वभूमीची चित्रे असलेले, की चेन, मग, tshirt, टाईल्स, मारिओ स्टोर्स ची ऑनलाइन सोया असावी

गणपती बद्दल अनुशी सहमत

लाकडी वस्तू त्यावर आरसे, मोती वगैरे असलेल्या मी दिल्या होत्या त्या आवडल्या होत्या परदेशी लोकांना पण लाकडाच्या वस्तु नेण्यावर काही निर्बंध नाही ना हे चेक करा कारण बर्‍याच देशांमधे आहेत असे नियम.

mi_anu ! अबब!! कित्ती छान यादी दिलीत!लाखो धन्यवाद! आपल्या 'Do & Don'ts' सूचनांबद्दल आभार...त्या मार्गदर्शक आहेत.
तसेच च्रप्स , सीमा, सिम्बा, आभा , पेरुBagz ह्यांन्नाही लाखो धन्यवाद!
आता ह्यासाठी खास २ दिवस वेगळे काढ्तोय (तुम्ही दिलेली यादी बघून) एकदम पटेश! ५ तारखेला प्रयाण करतोय. बार्सिलोना, माद्रिद व दक्षिण स्पेन (अँडोलुशिया प्रांत).
काय आहे की माझ्या अनुभवानुसार परदेशी व्यक्ती सहसा खूप चांगले व उपयुक्त मार्गदर्शन करतात....वेळेवर प्रवासाठी मदत पण करतात. त्याबदलात आपण काहीच देउ शकलो नाही तर ओशाळल्यासारखे वाटते. तेंव्हा अश्या वस्तू देऊन किमानपक्षी शब्देवीण 'धन्यवाद' पोहोचवता येतात. म्हणून ह्या वैयक्तिक भेटी. छोट्याश्या पण वेळेत दिल्यास अमुल्य!!
पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद!

धन्यवाद atuldpatil....तिथे जायला अवकाश आहे अजून! पण तिकडे 'भेट-वस्तू' अलाउड नसतील! Happy

विविध अत्तरे. आता दिवाळी आली आहे तर रंगीत पणत्या, पाण्यात तरंगणारे दिवे/ पणत्या, छोटेसे आकाशकंदील , जमिनीवर नुसतेच ठेवायचे रांगोळी सारखे डिझाइन्स. आजकाल या प्रकारात खूप सुंदर डिझाइन्स मिळतात.

जवळ असेल किंवा शक्य असेल तर सोहराब हॉल ( जहांगीर हॉस्पिटलसमोर) Either Or ला भेट द्या. खूप वस्तू मिळतील, ज्या टिपिकल भारतीय कलाकुसरीच्या असतात. मी युरोपमध्ये जाताना कायम इथूनच नेते आणि त्या गिफ्ट्स सगळ्यांना खूप आवडतात. Either Or ची समोरासमोर दोन दुकाने आहेत, जाणार असाल तर दोन्ही व्हिजिट करा. आता दिवाळीमुळे छान कलेक्शन आलं असेल. या वस्तू भारतातल्या वेगवेगळ्या खेड्या जंगलातल्या कलाकार आणि आदिवासिकडून आणतात ( अस ते म्हणे). पण कुठल्याही असोत, क्लासी कलेक्शन असतं.

काही कमी पडलेच तर गेट ७८/ ७९ च्या तिथे एक मस्त दुकान आहे तिथे लव्हली भारतीय स्ट्फ मिळते. आम्ही तिथून एक चित्रांचे पुस्तक घेउन पूर्ण
प्रवास भर वागवत घरी आणले. चुंबक नावाचा इंडिअन ब्रँड आहे. विवीआना मॉल मध्ये दुकान आहे तिथेही छान स्टफ मिलेल.

स्पेशल भारतीय चहापत्ती
स्कार्फ
इयरींग्ज
ब्रेसलेट
लहान टेबलपीसेस
लोकल कारागरी केलेल्या पर्स/बॅगा, क्लचेस

चुंबक ची साईट ऑन्लाइन बघ्ता येइल.

ओरिएण्टल क्राफ्ट सेण्टर बे बंडगार्डन रोडला पुणे सेंट्रलच्या विरुद्ध बाजूला आहे. एव्हढे मोठे क्राफ्ट आणि गिफ्ट आर्टिकल्स चे दुकान पुण्यात दुसरे नाही. दोन तीन तास सहज मोडतात.
मात्र ही दुकाने उगीचच महाग आहेत. तुम्हाला रविवार पेठेतून (मुळात तुम्ही पुण्यातले आहात असे सर्वांनी गृहीत धरले आहे) घेता येत असतील तर बरेच पैसे वाचतील. पण दहा दुकाने फिरावी लागतील. मुंबईत असाल तर तसे सांगा. नाहीतर पुण्यातल्या लोकांना सगळे लोक पुण्यातच राहतात असे वाटते.

धातूचा पुतळा / मूर्ती नेता येईल का?

शिवाजी महाराजांचा पुतळा (साधारण १० इंच उंचीचा सोयीचा राहील) किंवा त्यांच्यावरील इंग्रजी भाषेतील पुस्तक / सिडी द्या. भारताची ही "सर्वोत्तम" ओळख आहे परदेशातील आणि भारतीय लोकांकरिता देखील.

शक्यतो खाद्यपदार्थ टाळावेत. फूड अ‍ॅलर्जीज हे एक कारण आणी खाद्यपदार्थांची आवड / नावड हे दुसरं. आपल्याला भारतीय खाद्यपदार्थ आवडतात, म्हणून ते बाहेरच्या देशातही तितकेच आवडतील, हे गृहितक बरेच वेळा backfire होतं.

किरणुद्दीन चांदीच्या वस्तू कदाचीत बजेट्च्या बाहेर असतील. पण आपली 'रविवार पेठ' ची सूचना आवडली.
चैत्रगंधा अत्तरांची आवड ही मला वाटते वैयक्तिक असेल..पण पणत्या (Candle Stand) स्वरूपतील वगैरे शोधतोय.
मीरा आपण तर खजिन्याचा रस्ता दाखवलाय. अवश्य जाइन. व ह्यासाठी atuldpatil ह्यांन्नापण लाखो धन्यवाद!
मनीष ऑक्सिडाइज्ड कडे (डिझायनर)यादीत आहे.
अमा मी सध्या पुण्यात शोधतोय. मुंबैत खरेदीस वेळ मिळाला नाही. तिथेपण options भरपूर आहेत.
सस्मित स्पेशल भारतीय चहापत्ती व स्कार्फ यादीत आहे.
बिपीन चन्द्र हर सामानाच्या अडचणीमुळे पुतळा शक्य नाही
फेरफटका चितळे व बेडेकरांचे ह्यापैकी एक हॅम्पर घेणार आहे.
यादी वाढत चाललीय! जरा लवकर विचारावयास हवे होते! Sad
सर्वांन्ना लाखो धन्यवाद!

नाहीतर पुण्यातल्या लोकांना सगळे लोक पुण्यातच राहतात असे वाटते. >>>> असंच काही नाही बरं का किरणूद्दीन. Lol पण पुण्याचे लोक भारी स्मार्ट. आधी प्रोफाइलमध्ये राहण्याचं शहर बघून मगच सल्ले देतात. Wink

अरे हो.आमच्या एका फ्रेंचीणीला फॅबइंडिया चे वाईल्ड रोज साबण खूप आवडायचे.तिला भेट म्हणून 10 रोज+वाईल्ड रोज असा पॅक दिला होता.
गावात चितळे च्या मागे अत्यंत सुंदर ओढण्या दुकाने आहेत.यातल्या केरला आसाऊ सारख्या डिसेंट पांढऱ्या रेशमी आणि अगदी किंचित सोनेरी किनार वाल्या किंवा किनार नसलेल्या सिल्क च्या ओढण्या स्कार्फ म्हणून देता येतात.नीट बारगेन करून 300 ते 400 मध्ये स्पेशल येतात.बांधणी सिल्क च्या ओढण्या हाही खूप मोहक ऑप्शन.त्यातल्या त्यात थोडे डिसेंट कलर बघून.पण त्यांना वॉश इन्स्ट्रक्शन द्याव्या लागतील.आपल्या इथे धर्मग्रंथ ठेवायचा लाकडी कलाकुसर स्टँड असतो तोही मस्त ऑप्शन.अगदीच बायबल नाही वाचले तर बुक केस म्हणून वापरतील.

एकच सल्ला. कटु वाटेल, पण खरा आहे. प्रॉडक्ट च्या दिसण्यापेक्षा, क्वालिटी कडे लक्ष देऊन घ्या. तकलादू बांधणीच्या, उडणार्या रंगाच्या गोष्टी घेऊ नका. लाँग लास्टींग (नको असलेला) परिणाम होतो त्याचा.

-बटर चिकन किंवा तत्सम सोपी रेसिपी शिकवा. सोबत रेसिपी प्रिंटाऊट घेऊन जा. वाह शेफ ची रेसिपी आहे https://www.google.com.sg/amp/s/www.vahrehvah.com/paneer-butter-masala%3...
ह्यात ग्रिल्ड चिकन घेतलं कि झालं. ड्युएल रेसिपी आहे
-रेडी टु ईट करी किंवा लोणची
-आपले पापड सुद्धा छान गिफ्ट होऊ शकतात.

फेरफटका एकदम खरं आहे.(पण थोडे इंडियन एथनिक/बांधणी काही भेट दिले तर ते कितीही चांगलया क्वालिटी चे दिले तरी रंग जातोच.तेच द्यायचे असेल तर त्यातल्या त्यात फिक्या किंवा फक्त पांढरा/मोतीया देणे हे थोडे सुरक्षित)
ताजमहाल द्यायला मला विशेष आवडणार नाही.टेक्निकली त्याचे पार्ट आणि घुमट वेगळे होतात, तुटतात म्हणून आणि इमोशनली ते प्रेमाचे प्रतीक असले तरी बरियल प्लेस आहे म्हणून.

पांढरे रुमाल,
त्यावर तुमच्या किंवा त्याच्या प्रोफेशन, कम्पनी, आवडीच्या एखाद्य गोष्टीचा सिम्बॉल भरतकामाने भरून किंवा रंगवून.

म्हणजे तो विमान इंडस्त्री संबंधित असेल तर कॅप्टन ची टोपी, विमान, हवाई सुंदरी ची आउट लाईन असे काही तरी,

स्वयंपाक बनवायची आवड असेल तर शेफ ची टोपी, प्लेट्स आणि काटे चमचे ची औटलाईन

हे आता उगाच कल्पना विस्तार कॅटेगरी मध्ये चालले आहे ,याची मला कल्पना आहे Wink

प्लास्टिक नको म्हणताय, नाहितर नाशिकची "सुला वाईन" चांगला पर्याय होता.
उदबत्या, धुप शक्यतो देउ नका. काही लोकांना अ‍ॅलर्जी असते त्याची.
चितळेंची बाकरवडी अथवा काजुकतली देउ शकता.

प्लास्टिक नको म्हणताय, नाहितर नाशिकची "सुला वाईन" चांगला पर्याय होता. >> स्पॅनिश लोकांना सुला वाइन्स! कॅरीइंग कोल्स टू न्यू कासल झालं ना ते. शिवाय सुलाच्या वाईन्स इतक्या काही खास पण नाहीत. आपल्या देशातली वाइन म्हणून काय ते आपल्याला त्याचं कौतुक.
त्यापेक्षा बंगळुरुच्या जगदाळे ब्रूअरीज ची अमृत व्हिस्की देणे इज अ बेटर ऑप्शन.

स्पॅनिश लोकांना सुला वाइन्स! कॅरीइंग कोल्स टू न्यू कासल झालं ना ते. शिवाय सुलाच्या वाईन्स इतक्या काही खास पण नाहीत. >> अगदी हेच लिहणार होतो.. 'इतक्या काही खास नाहीत' हे पण बरंच डिप्लोमॅटिक झालं Happy

आज तीन चार ठिकाणी धाडी टाकल्या Happy बर्‍याच वर्षांन्नी 'सिटी एरिया' ठरवला....मनाची तयारी केली!
कुंभारवाड्यात काही टेराकोटा दिसतेय का पहिले...पण ते अजूनही कुंभारयुगातून म्हाणावे तसे बाहेर पडले नाही. असम, ओरिसा, कोलकता इथे अप्रतीम वस्तू पाहण्यात येतात.....तशा वस्तू मिळावयास हव्या! त्या उत्कृष्ट गिफ्टस आहेत.
तेथून रविवार पेठेत (धन्यवाद किरणुद्दीन !) 'धूत' ह्यांच्याकडून चंदन धूप घेतला...माझ्या एका स्पॅनिश मैत्रिणीला हवाय असे तिने कळवले होते. बाळबोध्पणे 'मैसूर चंदन' विषयी विचारले असता ते इथे मिळणार नाही असे उत्तर आले.
इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्याव्यात त्या मुंबैला लोहार चाळीत. इथे नव्हे! मागे मला एक अप्रतीम झुंबराचे छप्पर्फाड बारगेन मिळाले होते. पुण्यात त्यासारख्या झुंबराची किंम्मत ५० ह. चे वरती सांगत होते....गरज नसतांन्नाही मोहात पडून घेतले होते.
दगडूशेठ हलवाई परिसरात गाडी पार्क करण्यात यश मिळवले!! तेथून विनोबा भावे एक्स्प्रेस सुरू केली.
सुरुवात तुळशीबागेपासून (राम मंदिर आतील परिसर) केली! बाहेरुनच रामजींची ख्यालिखुशाली विचारली. (तिथे जिर्णोद्धाराचे काम संथ गतीने सुरू झालेले दिसले. चार वर्षापूर्वी त्यासाठी खारीच्या नखाच्या धुलीकणाएवढा वाटा दिला होता....काम सुरू झाल्याचे समाधान वाटले!) परिसरात ब्रास, ब्राँझ वगैरे च्या वस्तू पाहिल्या....लिमिटेड होत्या...एक टांगा आवडला पण म्हटले पुढे बघू...
मंडई परिसरात तांब्या पितळेंच्या भांड्याच्या दुकानात डोकावलो....चौकात एक 'प्रभू' वगैरे नांव असलेले ठिकाणी थोडे बरे कलेक्शन आहे. पण पुढे सरकलो.
रविवार पेठेत घुसा-घाशी करत गेलो. आदीम जमान्यात आल्यासारखे वाटले. सगळेच रस्त्यावर ठाण मांडून बसले होते...त्यात सामान उतरवणार्‍या ट्रकच्या खालून जाण्याचा काहीजण प्रयत्न करत होते....बघून मजा आली! एवढ्या गर्दीतून कारमध्ये स्थितप्रज्ञ बसून तो गर्दीचा लोंढा पार करणारे योगी पण होते. ह्यांच्यासारखे पेशन्स हवे!! तर तिथे काही मिळते का पाहिले....कचकड्यांचे सामान ढिगाने होते. वरच्या मजल्यावरील मार्केट्मध्ये गेलो. माझ्याकडे कोल्हापूर कडील एका व्यक्तीकडून आधीच तांब्याच्या डिझाइन वस्तू घेउन ठेवलेल्या होत्या त्यासाठी गिफ्ट डब्या शोधल्या....त्या किमतीने ज्यास्त वाटल्या (६० रु. ला एक अश्या १० म्हणजे ६००/- बाबौ!...) मग ६ नग बटवा टाइप छान पिशव्या घेतल्या ...फक्त २४ रुप्यकाणी.....२५/- र. देऊन निघाल्याबर त्या दुकानातल्या बाब्याने 'ओ शेठ' म्हणून मागून पाळत येउन उर्लेला एक रु. परत केला....हर्ष झाला.....बिसेस म्हणजे त्यात माझ्याकडील वस्तू मावल्या!
त्याणंतर पुन्हा मंडई परिसर....इतर दुकाने धुंडाळली....मी जाऊन बराच वेळ वस्तू बघत असल्याने दुकानदार वैतागून बघत होते व मधून मधून छेडत होते. मी शांत!
दुसर्‍या एका तांब्या पितळेंच्या भांड्याच्या दुकानात डोकावलो. तिथे गजलक्ष्मी सदरतील गजराजाची मूर्ती भावली. घासाघीस केली व रु. ६००/- ला पदरात पाडली. वरील दुकानात ती १३५०/- ला होती.
चला बर्‍यापैकी सुरू आहे तर! चितळेंच्या मागे जाण्याचा धीर नव्हता कारण गर्दी आता अंगावर यायला लागली होती! (पूर्वीचे पुणे नाही राहिले आता!!)
तेथून फॅब इंडियाला (धन्यवाद mi_anu!) गेलो...सर्वप्रथम 'वाइल्ड रोज' साबण घेतला.नंतर स्ट्रोल कडे वळलो. किमती बर्‍याच अस्ल्याने महिला वर्गाच्या सल्ल्याने त्यात पडायचे ठरवले व आजचे खरेदी अ‍ॅड-व्हेंचर संपवले.
आता उद्या.....

यक्ष, तुम्हांला भरपूर सजेशन्स, आयडियाज मि ळाल्या आहेत तेव्हा त्या बद्दल न लिहिता एक विनंती करायची आहे. शिर्षकात freinds ऐवजी friends करणार का? डोळ्याला खटकतंय चुकीचं स्पेलिंग. Happy

यक्ष, जोरदार.
दगडूशेठ पाशी गाडी घेऊन जाण्याच्या आणि तांबट आळी व अनेक गर्दीच्या ठिकाणी गेल्याबद्दल तुम्हाला एखादा पितळी रणगाडा भेट म्हणून घ्या ☺️
फॅब चे स्टोल मुद्दाम सांगितले नाहीत.सिल्क चे असतात आणि 2200 पासून चालू होतात.सुंदर असतात.गेली अनेक वर्षे आमची मानसिक औकात फॅब मध्ये जाऊन कुर्ते ट्राय करून शेवटी वाईल्ड रोज आणि नीम तुलसी चे 4-4 साबण घेऊन येण्याइतकीच आहे ☺️☺️☺️

बार्सिलोना आणि माद्रिद दोन्ही शहरे भुरट्या चोर्‍यांकरता प्रसिद्ध आहेत. बस / ट्रेनमधे, स्टेशनवर, दुकानात, रेस्टॉरंट / बार मधे, मोठ्या पंचतारांकित हॉटेलच्या लॉबी मधे - एकंदरीत कुठेही बॅग, कॅमेरा, फोन पळवणे, दागिने लांबवणे हे अतिशय कॉमन आहे.
कुठेही फिरताना अतिशय सावध रहा. अगदी एखाद्या कॉन्फरंस सेंटरमधे देखील लॅपटॉप बॅग चोरीला जाऊ शकते.
*पासपोर्ट / क्रेडीट कार्डे / इतर ओळख पत्रे यांच्या कॉपीज सामानात दोन तीन ठिकाणी असाव्यात. ड्रॉप बॉक्स किंवा वन ड्राइव्ह सारख्या ऑनलाइन सर्व्हिसवर पण असाव्यात ( फोनवर असल्या तरी फोनच चोरीला गेल्यावर काय उपयोग ) . कॅश फार बाळगू नये. जी असेल ती डिव्हाईड करुन ठेवावी. दागिने, वॉच, हेडफोन्स असल्या गोष्टी फ्लाँट करु नयेत. क्रेडिट कार्डांचे फोन नंबर आणि नक्की कुठली नेताय त्याची नोंद असावी. १०-१५ मिनिटात वेगवेगळ्या देशातले कसले कसले चार्जेस दिसायला लागतात कार्डावर. घाबरवायचा उद्देश नाही, पण अतिशय सावध रहा एवढेच .

*एक ओळखीची बाई सांगत होती की बार्सीलोनाच्या अमेरिकन वकिलातीत एक टीम फक्त ज्यांचे पासपोर्ट चोरीला गेले त्यांच्याकरता डुप्लिकेट पासपोर्ट तात्काळ इशू करण्याचे काम करते इतकी ' डिमांड' आहे .

खरं आहे.स्पेन, इटली, पॅरिस हे सर्व भुरट्या चोरांसाठी प्रसिद्ध आहेत.अगदी साधं दिसणं, पासपोर्ट वगैरे अंगावर बाळगणं वगैरे करावं लागतं असं ऐकून आहे.

सायो! माझी चूक.
दुरुस्त केली. निदर्शनास आणून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

mi_anu धन्यवाद! मी तिथे स्वतःला साबुदाणा वडा खाऊ घालून स्वतःचे कौतुक करवून घेतले!! एवढी गर्दी पाहून उत्सुकता वाटली आणी समोर ते गर्र्म गरम वडे पाहून स्वधर्मास जागलो...(मी खानसेन!)समाधान पावलो. आणी हो २२००/- चे स्ट्रोल घेण्याची हिम्मत झाली नाही. साबणच घेतला!

मेधा अगदी बरोबर. त्यासंदर्भात व्हिडिओ पाहिलेत. आणी माझ्या स्पॅनिश मैत्रिणीने पण सांगितले आहे.धन्यवाद! मी लॅपटॉप न नेता आयपॅड नेत आहे व सोबत हार्ड ड्राईव्ह....कारण एका व्हिडिओ त स्पष्ट्पणे सांगितले आहे की जे हरवणं तुम्हाला परवडणार नाही ते आणू नका!आपल्या सुचनांबद्दल धन्यवाद!