देव, महिला आणि मंदिरप्रवेश वगैरे ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 October, 2018 - 01:27

देशातल्या कुठल्यातरी मंदिरात स्त्रियांच्या प्रवेशावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. एका मित्राच्या फेसबूक वॉलवर या संदर्भात पोस्ट वाचली. तो या प्रवेशाच्या विरोधात होता. मी त्याच्या विचारांच्या विरोधात भलामोठा प्रतिसाद दिला. प्रतिसादाचा आशय साधारण असा होता - तुम्ही लोकांनी मुलींना शिक्षण घ्यायची आणि त्यानंतर कमवायला बाहेर पडायची, स्वत:च्या पायावर उभे राहायची परवानगी दिलीत ईथेच तुम्ही चुकलात. आता त्यांना जिथे जायचेय तिथे त्या जाणारच. भोगा आपल्या कर्माची फळे.
या प्रतिसादाला मूळ पोस्टपेक्षाही जास्त लाईक्स आले. मूळ पोस्टशी सहमत असलेल्यांनी सुद्धा लाईक केले. ज्यांन उपरोध कळत नाही अश्यांचे खरेच अवघड असते. पण गंमत म्हणजे त्यांच्यातील एकही जण असे नाही म्हणाला की येस्स मी आता माझ्या मुलींचे शिक्षणच थांबवतो!

पण मग त्याच दिवशी हाच विषय मी व्हॉटसपग्रूपवर पाहिला. तिथेही मी स्त्रीव्यक्तीस्वातंत्र्याचा आणि हक्काचा मुद्दा काढताच एका धार्मिक स्वभावाच्या मुलाने माहीती पुरवली की लहान मुलींना आणि वृद्ध महिलांना परवानगी आहे. फक्त मासिक पाळी चालू असणारया महिलांना परवानगी नाही. यामागचे शास्त्र विचारल्यास ते अपवित्र समजले जाते ईतकेच उत्तर आले. त्यावर मी म्हणालो, मग हस्तमैथुन करणारया पुरुषांना परवानगी का आहे? मासिक पाळी अपवित्र समजली जाते, तर वीर्य पवित्र का समजले जावे? ते गाळणारया पुरुषांना कश्याच्या आधारावर परवानगी आहे? शेवटी ते पुरुष आहेत म्हणूनच हा वेगळा न्याय ना...
यावर कोणाचेच काहीच उत्तर नाही आले. दोनचार टवाळांनी दात काढले पण मला ते अपेक्षित नव्हते.

असो, पुढल्याच दिवशी हा विषय ऑफिसमध्ये लंचब्रेकला निघाला. तिथे स्त्रिया आणि बहुसंख्य पुरुष सहकर्मचारी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतच करत होते. स्त्रियांच्या प्रवेशाच्या हक्काचीच बाजू घेत होते.

आता प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. आणि दोन्ही बाजू कमीजास्त प्रमाणात योग्य असू शकतात. आपल्याला जी बाजू जास्त योग्य वाटते आपण तिची बाजू घेतो. अश्यात मला खोड आहे की बहुमताची विरुद्ध बाजू घेऊन विचार करायची. साहजिकच मी ईथे त्यांना विरोध केला,

मी नास्तिक आहे, धार्मिक जराही नाही. मी देव मानत नाही. त्यामुळे मी तुमच्या देवांच्या पौराणिक कथांची आणि तुम्ही मानत असलेल्या देवाची सहज टिंगल उडवू शकतो. आणि माझे म्हणने खोडून काढायला तुम्हाला देव असल्याचा एकही पुरावा देता येणार नाही. पण तरीही याने तुमच्या धार्मिक भावना मात्र दुखावतील.

हे देखील तसेच आहे.

एकदा तुम्ही देव आहे असे मानले की काही गोष्टी ओघाने मानाव्याच लागतात. अगदी साध्या साध्या गोष्टी जसे की सणाच्या दिवशी मांसाहार करू नये, आंघोळ केल्याशिवाय देवाची पूजा करू नये, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण खाऊ नये.. वगैरे वगैरे.. ईथे मग प्रत्येकवेळी लॉजिक शोधायचा वा व्यक्तीस्वातंत्र्य जपायचा हट्ट धरू नये.
एकवेळ माझी गोष्ट वेगळी आहे, धार्मिक भावना दुखावल्या जातात म्हणजे नेमके काय होते याचा मला अनुभव नाही, पण तुम्हाला त्या भावना समजू शकतात. तर समजून घ्या ना.. मंदिरात प्रवेश हवाच हा हट्ट का धरत आहात?

ईथेही पुढे मग कोणी वाद वाढवला नाही..

नंतर घरी आल्यावर वाटले की हा वादच व्यर्थ आहे. ज्या महिला त्या देवाला आणि त्यासोबत चालून येणारया प्रथांना मानतात त्या मंदिराचे पावित्र्य जपायला स्वत:च तिथे जाणार नाहीत. आणि ज्या देवधर्माच्या कल्पना मानत नाहीत त्या मूळातच त्या मंदिरात जाणार नाहीत ... हट्टाने एकदोनदा काय जातील तेवढेच!

त्यामुळे अस्पृश्य समजले जाणारयांना एखादी पाण्याची विहीर उघडी केले आहे या धर्तीवर धार्मिक समज विरुद्ध व्यक्तीस्वातंत्र्य अशी लढाई उभारण्यात काही अर्थ नाही.

या विषयावर कोणाशी काहीही बोललो तरी मी नास्तिक आहे हे समोरच्या सगळ्यांना माहीत असल्याने आणि हा पटकन आपल्याच भावना दुखावून जायचा या भितीने या विषयावर माझ्याशी सहसा कोणी वाद घालत नाही. त्यामुळे कोणाशी तरी बोलावेसे वाटले ईतकेच Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिमबा - गुवाहाटी मधले कामाख्या मंदिर बंद असते देवीला पाळी येते तेव्हा. आणि कहर म्हणजे तेव्हाही फक्त पुरुष पुजारी जाऊ शकतात.
तिथेही स्त्रियांना प्रवेश नाही.

ऋन्मेशने मांडलेला मुद्दा बऱ्याच अंशी पटतो. स्त्रियांना मंदिरात प्रवेश असावा का नसावा आणि धर्मात स्त्रियांचे स्थान काय असावे यांच्यावर वाद घालणारा बहुसंख्य वर्ग हा नास्तिक किंवा स्वतः:ला निधर्मि म्हणवणारा आहे. इथेच स्त्री स्वातंत्र्य आणि धर्म किंवा कुटुंब यामध्ये खरा प्रश्न आहे... म्हणजे मी एकत्र कुटुंब मानले नाही तरी शेजारच्यांची एकत्र कुटुंबातली कर्तव्य काय यावर मत असण्याचा हा पुणेकरी प्रकार आहे.

या सगळ्यामध्ये खरी समस्या अशी आहे कि भारतीय समाज प्रामुख्याने स्त्रीमुक्तीच्या बाबतीत एका वळणावरून जात आहे. आजही ज्यामध्ये जुन्या गोष्टी सोडल्या जाणार आहेत गोष्टी मिळणार आहेत आणि नक्की काय जुने सोडायचे आणि कोणत्या किमतीला या बाबतीत निश्चितता आलेली नाही कारण हा समतोल सांभाळणे ही गोष्ट प्रत्येक काळात अवघड होती आणि आज पण आहे. उदाहरण द्यायचे झाले तर स्त्रियांना आपला जोडीदार निवडायचा हक्क हवा आहे त्यामुळे नैसर्गिक पणे अरेंज्ड मॅरेज ला अनेक तरुणींचा विरोध आहे.. जो नैसर्गिक पण आहे.. पण पाश्चात्य जगात, जी मुलगी आपल्या बॉय फ्रेंड ला पुरेसे शरीरसुख देत नाही तिचे लग्न होत नाही.. या टोकालासुद्धा अनेक स्त्रियांना जायचे नाही आहे. मग चांगला सुवर्णमध्य कोणता? याच निश्चित किंवा सर्वसमावेशक उत्तर कोणाकडेच नाही आहे. आणि त्यातून पुरुष वर्गाला मान्य होणारे याचे उत्तर तर अजुनच दुर आहे.

तसेच, स्त्रीवादाच्या काही मूलभूत धारणा अशा प्रकारच्या आहेत कि, स्त्री ही परिपूर्णच असते, स्त्री ला धर्माच्या चोकटीत बांधणे किंवा इतर बंधनात बांधणे हे पुरुषी अहंकार आणि कामवासना यातून निर्माण होते. याच स्त्रीवादाच्या धारणांना धरून - स्त्रीचे परिपूर्णत्व मान्य करून, आणि पुरुषांना आपला अहंकार आणि कामवासना नियंत्रित कारण्यासाठी एखादी अशी जागा असावी जेथे प्रजननशील स्त्रीयांमुळे त्यांचे लक्ष विचलीत होणार नाही असं वाटत असेल तर त्यामध्ये चूक किंवा अनैतिक किंवा स्त्रीमुक्तीच्या धारणांना विरोधी असं काय आहे?

जसे शबरीमला सारखी मंदिरे फक्त प्रजननशील वयातील स्त्रियांवर मंदिर प्रवेशा साठी बंधने घालत आहेत त्याच प्रमाणे आजच्या बहुसंख्य स्त्रीमुक्ती संघटना या फक्त प्रजननशील वयातील स्त्रियांच्या हक्कानं विषयी बोलत आहेत. एकही स्त्री मुक्ती संघटना किंवा विचारवंत स्त्रीचे तिच्या आई, आजी किंवा सासू विषयी कर्तव्ये काय (जी स्त्री आहे, शारीरिक दृष्ट्या थकलेली आहे आणि सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मदतीची गरज असलेली आहे)? याविषयी बोलत नाही. त्यामुळे न्याय्य भूमिका घ्यायची असेल तर प्रजननशील वयातील स्त्रियांवर बंधने लादणारा समाज आणि त्यांची सर्व कर्तव्य बाजूला सारून बेछूट स्वैरता मान्य करणारा समाज या दोघांच्या भूमिकांवर चिंतन झाले पाहिजे. आज या दोन्ही धरणांचा समन्वय साधणारी विचारधारा किंवा समाजधारा समाजात नाही आणि असल्यास त्यांच्याकडे फारसे आर्थिक, सामाजिक पाठबळ नाही.

त्यामुळे शबरीमला सारखे वाद हे फक्त या सगळ्या वैचारिक गोंधळाचे किंवा अपरिपक्वतेचे द्योतक आहेत. जो पर्यंत हा वैचारिक गोंधळ दूर होत नाही तो पर्यंत शबरीमला नाही तर इतर क्षेत्रात, मद्निरात हा वाद निर्माण होणारच आहे.

अननस, तुमच्या पोस्टमधला बाकीचा फापटपसारा जाऊ द्या पण मंदिरात सगळ्यांना एकसमान वागवण्यात प्रॉब्लेम का?

वीर्य पवित्र मानले जाते आणि मासिक पाळी अपवित्र मानली जाते याचे कारण ज्या काळी हे धर्माचे नियम बनवले गेले त्याकाळात म्रुत्युदर खूप जास्त होता आणि त्यामुळे ज्यामुळे मानविय प्रजनन होइल त्या गोष्टी चान्गल्या मानल्या गेल्या (मासिक पाळीच्या काळात आणि विर्याशिवाय प्रजनन होऊ शकत नाही). अर्थात आतचा काळ वेगळा आहे. त्यामुळे या वादात मला फारसे शिरायचे नाही कारण त्यातून फारसे निश्पन्न आहे अस मला वाटत नाही.. मुख्य विचारत घेण्यासारखे मुद्दे वर लिहिले आहेत.

सायो, तुम्हाला तो फापट पसारा वाटत आहे, ती एक मुलभूत समस्या आहे हे तुम्हाला जेव्हा कळेल त्यानन्तर आपण यावर सविस्तर चर्चा करू..

त्यामुळे ज्यामुळे मानविय प्रजनन होइल त्या गोष्टी चान्गल्या मानल्या गेल्या << अरे वा. मला तर प्रवेश बन्दि हे जनसंख्या कंट्रोल करण्याचा चांगला उपाय वाटतो आहे. काही वेळ पुरुषांना प्रवेश बंद करा..

अननस, तुम्ही तुम्हांला सोयीची गृहीतकं निवडलीत.
“It started in 2006. There were news reports and an article by Barkha Dutt, about a south Indian actor named Jayamala who went to the temple of Lord Ayyappa in 1987. But this confession came out in 2006 from her side. She said she visited the temple 20 years ago, and after that there was a lot of hue and cry that the temple became “impure”, and a purification ceremony was held because a woman went into the temple! This was very undignified. I felt it was hurting the dignity of women at large,” Bhakti says.
“This case struck me both as a Hindu woman and as a lawyer, because I myself am a devotee. I go to a temple everyday. May be because I was a lawyer I could analyse it from a Constitutional standpoint,” she says.

जनननक्षम वयाची स्त्री मंदिरात गेल्याने मंदिर अपवित्र होते, हे तुम्हांला मान्य आहे का?

<पुरुषांना आपला अहंकार आणि कामवासना नियंत्रित कारण्यासाठी एखादी अशी जागा असावी जेथे प्रजननशील स्त्रीयांमुळे त्यांचे लक्ष विचलीत होणार नाही असं वाटत असेल > प्रजननशील स्त्रियांच्या सहवासात असतानाच अहंकार आणि कामवासना नियंत्रित करता आली, तरच त्याचे काही महत्त्व (कामवासना नियंत्रित करावी की नाही , ती कशी पुरवावी, हा वेगळा मुद्दा).

कुठली तरी टिनपाट कार्डिओलॉजिस्ट का कोण काय म्हणते याचा ह्या प्रश्नाशी काय संबंध? का न्यूयॉर्कची आहे म्हणून फारीनचं गोमय भारतीयांना भारी वाटतं त्यातला प्रकार!!!कोर्टाने निर्णय दिला विषय संपला. नसेल मान्य तर पुनर्विचार याचिका करा. अंमलबजावणीत आडकाठी केली तर कडक कारवाई करा.

!कोर्टाने निर्णय दिला विषय संपला. नसेल मान्य तर पुनर्विचार याचिका करा. अंमलबजावणीत आडकाठी केली तर कडक कारवाई करा.>>>>>
सुपर... +1

मंदिर प्रवेश ला विरोध करणाऱ्या सगळ्यांनो,
याच सिच्युएशन मध्ये मंदिर प्रवेश ऐवजी ट्रिपल तलाक घालून पहा बरे, कोर्ट काहीही म्हणो आम्ही ट्रिपल तलाक देणारच असा स्टॅन्ड मुस्लिम संघटनांनी घेतला असता तर? तुमचि काय रिऍक्शन झाली असती?

असो...
एकंदरीत कोर्टाच्या निर्णयाला आक्षेप घेणे वगैरे प्रकार इतके मूर्ख आहेत की त्याबद्दल मत प्रदर्शन करावे असे वाटत नाही.

आणि कोर्टाच्या निर्णयाला आक्षेप घेण्यासाठी जी कारणे पुढे केली जात आहेत, दुष्ट शक्ती, निगेटिव्ह एनर्जी, पुरुषांचे लक्ष विचलित होणे वगैरे ती उल्लेख करायच्या लायकीची सुद्धा नाहीत,
या धाग्यावर मी केवळ संतापजनक मनोरंजन करून घेण्यासाठी येणार.

मूळात स्त्रियांना (त्या काळात) मंदिरात प्रवेशबंदी योग्य की अयोग्य हा लेखाचा विषय नाही. (मंदिरात सर्वांना एकसमान वागणूक असावी हे लेखकाला मान्यच आहे.)

तर

नंतर घरी आल्यावर वाटले की हा वादच व्यर्थ आहे. ज्या महिला त्या देवाला आणि त्यासोबत चालून येणारया प्रथांना मानतात त्या मंदिराचे पावित्र्य जपायला स्वत:च तिथे जाणार नाहीत. आणि ज्या देवधर्माच्या कल्पना मानत नाहीत त्या मूळातच त्या मंदिरात जाणार नाहीत ... हट्टाने एकदोनदा काय जातील तेवढेच! >>>
हा लेखाचा विषय आहे. निदान मी तरी केवळ हाच विषय आहे असे समजलो.

बोल्ड केलेल्या भागाला उत्तर म्हणून मी आधीच कॉपी केलेलं पिटिशनरचं म्हणणं वाचा.
देव मानला म्हणून प्रथा मानल्याच पाहिजेत , हे कुठलं लॉजिक. मग ते आणखी कुठे कुठे लावलेलं चालेल?

बोल्ड केलेल्या भागाला उत्तर म्हणून मी आधीच कॉपी केलेलं पिटिशनरचं म्हणणं वाचा.
देव मानला म्हणून प्रथा मानल्याच पाहिजेत , हे कुठलं लॉजिक.

>> Exactly.

देव मानला म्हणून प्रथा मानल्याच पाहिजेत , हे कुठलं लॉजिक.
>>>>>>

देव मानला म्हणजे प्रथा मानल्याच पाहिजेत असे नाहीये ते...
जर तुम्ही न दिसणारा, आणि दुसरयाला दाखवू न शकणारा देव मानता तर कोणी एखादा फारसे लॉजिक नसलेल्या प्रथाही मानू शकतोच.. असे आहे ते.
जर देव मानणारयांच्या भावनांचा आदर ईतर देव न मानणारयांनी करावा अशी त्यांची अपेक्षा असेल तर त्यांनीही देवाच्या नावासोबत जोडलेल्या ईतर प्रथा मानणारयांच्या भावनांचा आदर केला पाहिजे..
आपली ती श्रद्धा आणि दुसरयांची अंधश्रद्धा हे चूक आहे..
अर्थात ती प्रथा जाचक, घातक, समाजाला त्रासदायक वा समाजाच्या एका विशिष्ट घटकाला अपमानकारक वगैरे आहे की नाही यावर ते अवलंबून... ईथे तसे वाटत असेल तर आवर्जून विरोध करा !

ज्या स्त्रियांना ती प्रथा पटतेय , त्यांनी मानावी.. त्यांच्यावर देवळात जाण्याची सक्ती नाही.
तसंच विशिष्ट प्रथा मानण्याची सक्ती ही असू नये. ज्यांना ती मानायची नाही, देवळात जायचंय, त्यांना जाऊ द्यावं.

या प्रथेमागचं कारण समाजातल्या विशिष्ट घटकासाठी अपमानास्पद आहे की नाही, याबाबत आपलं मत मांडा.
हा प्रश्न प्रथेच अप्रत्यक्ष समर्थन करणाऱ्यांना वेगवेगळ्या शब्दांत विचारून झालाय. उत्तर आलेलं नाही.

ज्या स्त्रियांना ती प्रथा पटतेय , त्यांनी मानावी.. त्यांच्यावर देवळात जाण्याची सक्ती नाही. >>>
नेमके!

1. इतर देवळांसारखे शबरीमाला वर्षाचे बाराही महिने भक्तांसाठी उघडे नसते. प्रत्येक मल्याळी महिन्याचे पहिले 5 दिवस, डिसेंबरातील 20 दिवसांचा 1 उत्सव, मकर संक्रांती व अजून एक संक्रांत इतकेच दिवस मंदिर उघडे असते.

2. स्त्रिया पूर्वापार काळापासून मंदिर उघडे असतानाच्या काळात मंदिरात जात होत्या. दुर्गम भागात असल्याने व जायचा रस्ता खूप कठिण असल्याने स्त्रियांची संख्या मर्यादित होती. बहुतेक जणी बाळांचे पहिले अन्न प्राशनविधीसाठी बाळांना घेऊन जायच्या. म्हणजे प्रजननक्षम स्त्रिया जात होत्या. उत्सवांच्या दिवशी गर्भगृहात स्त्रियांना प्रवेश नव्हता.

3. 1991 मध्ये केरळ कोर्टाने 10 ते 50 वयोगटातील स्त्रियांनी मंदिरात जाऊ नये असा नियम सुरू केला.
हे त्यांनी का केले हे मला समजले नाही. अगदी जुन्या काळापासून चालत आलेला नियम लक्षात घेऊन ही बंदी घातलीय असे निकालात वाचले. मग आधीपासून स्त्रिया जात होत्या कशाच्या आधारे?
मी तो निकाल पूर्ण वाचला नाही अजून.

हे निकालपत्र.

https://indiankanoon.org/doc/1915943/

4.2018 मध्ये सुप्रेम कोर्टाने ही बंदी उठवली.

मला एकच प्रश्न आहे की सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यावर निदर्शने करणारे लोक आधी कुठे होते? त्यांची जी काय बाजू होती ती कोर्टात मांडायला हवी होती. उपलब्ध पुरावे व भारतीय राज्यघटना समोर ठेऊन कोर्टाने निर्णय दिला. तो मान्य करायला हवा. जे काय करायचे होते ते आधीच करायला हवे होते.

मला वाटले होते इथली चर्चा या सगळ्या विषयांवर होत असेल. पण इथली चर्चा फक्त पाळीसंबंधित होताना दिसतेय. आणि बऱ्याच जणांनी पाळी सुरू असताना मंदिरात जायला बंदी आहे असे समजून प्रतिसाद दिलेत.

1991 मध्ये केरळ कोर्टाने 10 ते 50 वयोगटातील स्त्रियांनी मंदिरात जाऊ नये असा नियम सुरू केला.
>>>>>
या वयोगटातल्या स्त्रिया म्हणजेच पाळी येणारया ना?

प्रत्येक मल्याळी महिन्याचे पहिले 5 दिवस, डिसेंबरातील 20 दिवसांचा 1 उत्सव, मकर संक्रांती व अजून एक संक्रांत इतकेच दिवस मंदिर उघडे असते.
>>>>>
नवीन आणि ईण्टरेस्टींग माहिती आहे. एवढे दिवस देवाला कडीकुलुपात बंदिस्त करायची या प्रथेविरुद्ध खरे तर देवांनीच कोर्टाचा दरवाजा ठोठवायला हवा Happy

मी बऱ्याच प्रतिक्रिया वाचल्या अनेक चांगले मुद्दे आहेत. मला काही मुद्दे मांडावेसे वाटतात

१) भरत ने शबरीमला मंदिराच्या प्रश्नाच्या इतिहासा विषयी थोडी लिहिले आहे.मला याची बरीच माहिती नव्हती. एकूण त्या विशिष्ट मंदिरात स्त्रियांना प्रवेश असावा कि नाही या विषयी माझं काही मत नाही आहे.. सर्वोच्च न्यायालय आणि मंदिराचे कामकाज पाहणारे मिळून काय तो निर्णय घेतील. माझे मुद्दे जास्त त्या सगळ्या समाजधारणांशी निगडीत आहेत ज्यामुळे असे प्रश्न निर्माण होतात.

२) एक प्रश्न असा होता, कि प्रजननशील वयातील स्त्रीने किंवा मासिक पाळीच्या काळात मंदिरात स्त्रियांनी प्रवेश केल्याने ते अपवित्र होते का? जर योग्य शुचितेची काळजी घेतली असेल (आणि या सगळ्या प्रश्नाला
किंवा प्रश्नातल्या शब्दांना प्रचलित अर्थ सोडून कोणताही श्लेष नसेल ) तर त्याने मंदिर अपवित्र होत नाही. अर्थात हे माझे वैयक्तिक मत झाले असेच असेल किंवा असलेच पाहिजे असा अट्टाहास करण्यात अर्थ नाही. जस डोकं किंवा केस न झाकता मशिदीत किंवा गुरुद्वारा मध्ये प्रवेश केल्याने ते अपवित्र किंवा अवमानकारक होते का? मक्का, मदिना मध्ये मुस्लिम धर्म न स्वीकारलेल्यानी गेले तर काय अधर्म होतो? या सगळ्या प्रश्नांना शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहायचे का? जस मासिक पाळीच्या वेळी मंदिर प्रवेशावर माझे मत मांडले तस या पण मुद्द्यांवर माझं मत असं आहे कि त्या धर्माच्या धारणांचा आदर करावा.

स्त्रियांती पडदा घ्यायची प्रथा असो, किंवा डोकं झाकायची प्रथा असो या सगळ्या बाबतीत सगळे सुधारणावादी मूग गिळून का बसलेले असतात? यावरही माझं वैयक्तिक मत कि सुधारणावाद्यांच्या ज्या काही धारणा असतील त्या असोत आपण धर्मात सुचवलेल्या सुधारणांचा निश्चित विचार करावा.

३) भरतने अजून एक मुद्दा मांडला होता कि सर्व प्रलोभन आहेत अशा परिस्थितीत आत्म सय्यामाला महत्व आहे. हे योग्यच आहे फक्त एक गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते ते म्हणजे थोड्याफार फरकाने सर्व व्यक्तींचं आचरण हे परिस्थितीनुरूप बदलते. उदाहरण द्यायचे झाले तर एखादी व्यक्ती चर्च मध्ये किंवा देवळात गेली जिथे सगळे शांत प्रार्थना करीत आहेत तर त्या व्यक्ती ला शांत बसावं असं वाटायची शक्यता जास्त आहे (अर्थात थोड्या प्रमाणात समाजविरोधी वागणारे ही असतात) तीच व्यक्ती बार मध्ये गेली तर त्या व्यक्तीला सर्वांबरोबर आपण पण एखाद ड्रिंक घ्यावं असं वाटायची शक्यता जास्त आहे. त्यामुळे प्रलोभन असलेल्या प्ररीस्थितीत व्यक्ती कशी वागते याच परीक्षण सुद्धा किंवा हा निकष सुद्धा तारतम्याने लावायला हवा.

थोडं आजच्या काळातले उदाहरण द्यायचे झाले तर, ड्रायव्हिंग स्कूल मध्ये चालकाच्या शेजारी असलेल्या शिक्षकाच्या पायात क्लच आणि ब्रेक चे नियंत्रण असणारी गाडी असते. जरी प्रत्यक्षात एकटा चालक चालवत असताना गाडी वेळीच थांबवता येणे याला अपघात टाळण्याच्या दृष्टीने महत्व आहे तरी याचा अर्थ असा नाही कि शिकाऊ चालकांसाठी ड्रायव्हिंग स्कूल मध्ये शिक्षकाच्या पायात ब्रेक असलेली गाडी असू नये.

ज्यावेळी विवेकानंदांनी बेलूर मठ स्थापन केला तेव्हा त्या मठाचेही नियम खूप कडक होते, याचा अर्थ विवेकानंद स्त्री विरोधी होते असं नाही. परंतु त्या एका विशिष्ट काळात त्या कडक नियमांची आवश्यकता होती. अशा प्रत्येक प्रार्थना स्थळांना स्वघोषित सुधारणावादी विरोध करणार का?

जस ऑफिस मध्ये परफॉर्मन्स रेव्हिव्यु झाल्यावर दारू पीत बॉस ला शिव्या द्यायला एकत्र जमाव असं अनेकांना वाटते तिथे बॉस, बायको, मुलं अजिबात येऊ नये असं वाटते... कधी बायकांना आपल्या नवऱ्याला सोडून फक्त मत्रिणींबरोबर खरेदीला जावं असं वाटते, जसे अमेरिकेमध्ये फक्त पुरुशांसाठी, किंवा फक्त स्त्रियांसाठी बार किंवा क्लब आहेत तस फक्त पुरुशांसाठी किंवा फक्त स्त्रियांसाठी वेगळं प्रार्थना स्थळ असावं असं वाटत असेल तर त्यात चूक, अनैतिक किंवा अन्याय्य काही नाही.

४) सिम्बाने मुद्दा मांडला आहे कि मंदिर प्रवेशा ऐवजी ट्रिपल तलाक चा मुद्दा असता तर सर्वांच्या काय प्रतिक्रिया झालेल्या असत्या? हे दोन वेगळे मुद्दे आहेत एका मध्ये माणूस आणि प्रार्थनास्थळ यामधला संबंध आहे आणि दुसर्यामध्ये दोन माणसांमधल्या संबंधांचा मुद्दा आहे.

५) असाही एक मुद्दा आला आहे कि सर्व व्यक्ती सारख्याच - जैविक पातळीवर सर्व व्यक्ती सारख्या असल्या तरीही प्रवृत्ती पातळीवर सगळ्या व्यक्ती सारख्या नसतात. देवळात काही लोक सासू/गर्ल फ्रेंड चे बाबा यांना इंप्रेस करायला येतात, काही बायकोने ऐकावे, नोकरी मिळावी, गर्लफ्रेंड ने ' हो ' म्हणावे, मला माझी मैत्रीण सोडून गेली तिला तिचा बॉयफ्रेंड पण सोडून जावा मग कळेल इत्यादी प्रार्थना करायला जातात, काही आत्मसय्यमासाठी, शांतीसाठी जातात. मंदिर प्रवेशावरील बंदीने किती तरी वयस्कर बायकांना बर पण वाटत असेल -'तिथे कार्टा जातो म्हणजे गावभरच्या भवान्याना घेऊन जात नाही आहे हे नक्की', किंवा 'आमचे हे देऊळातच गेलेत ना मग हरकत नाही.. अजून कोणाबरोबर नाहीत'

६) भरत ने हा पण चांगला मुद्दा मांडला कि कामवासना नियंत्रित करावी का नाही या विषयात आत्ता शिरायला नको. ते खरंच आहे. फक्त एक लिहावेसे वाटते ते म्हणजे जस नैतिक न्याय शरीरसुख हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे तसाच एखाद्या व्यक्तीने ठरवल्यास त्यापासून दूर राहण्याचा हक्क किंवा तशा प्रकारचे मत समाजात मांडणे हा पण व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे.कारण सुखभोग घ्यायला सांगणे म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याला मर्यादा घालायला सांगणे म्हणजे प्रतिगामित्व असा एक गैरसमज आहे.

असो एकूण अशा सर्वांची मत प्रजननशील वयातील स्त्रियांना फक्त डोळ्यासमोर ठेवून केलेल्या स्वघोषित सुधारणावादी काही मंदिर प्रवेशाचे मुद्दे उचलून सर्व समस्या समजून घेऊन किंवा त्यावर सर्व समावेशक समस्या निवारणाचे काम नक्की करत नाही आहेत. जसा या सगळ्याच मुद्द्यान चा नीट विचार होईल तसे अशा समस्याच निर्माण होणे कमी होत जाईल.

बरं.

आता मला एक सांगा,

आपल्या पुण्याच्या पर्वतीवर एक कार्तिकस्वामीचं देऊळ आहे. तिथेही बायकांना अलौड नैय्ये म्हणे.

फुर्रोगामी लोक्स आंदोलन कधी कर्णारेत त्यासाठी?

>>>. देवळात काही लोक सासू/गर्ल फ्रेंड चे बाबा यांना इंप्रेस करायला येतात, काही बायकोने ऐकावे, नोकरी मिळावी, गर्लफ्रेंड ने ' हो ' म्हणावे, मला माझी मैत्रीण सोडून गेली तिला तिचा बॉयफ्रेंड पण सोडून जावा मग कळेल इत्यादी प्रार्थना करायला जातात, काही आत्मसय्यमासाठी, शांतीसाठी जातात. मंदिर प्रवेशावरील बंदीने किती तरी वयस्कर बायकांना बर पण वाटत असेल -'तिथे कार्टा जातो म्हणजे गावभरच्या भवान्याना घेऊन जात नाही आहे हे नक्की', किंवा 'आमचे हे देऊळातच गेलेत ना मग हरकत नाही.. अजून कोणाबरोबर नाहीत' >>> Rofl
अहो इतर देवळे म्हणजे काय दारुचा गुत्ता आहे की तिकडे गेलेत म्हणजे तोंड काळे करायलाच गेले असणार असं त्या लग्नाच्या भवान्यांना वाटत असेल!
पण लिहित रहा. मजा येते वाचायला.

स्त्री-पुरुष समानता म्हणून निरनिराळ्या मंदिरात स्त्रियांच्या प्रवेशासाठी आंदोलने, याचिका दाखल होत आहेत.

मग याच स्त्री-पुरुष समानतेच्या न्यायाने....
१. बसमध्ये महिलांसाठी जितकी आसने राखीव तितकीच पुरुषांसाठी राखीव
२. रेल्वेमध्ये महिलांसाठी जितके डबे राखीव तितकेच पुरुषांसाठी राखीव
३. 'लेडीज स्पेशल' प्रमाणेच 'जेन्ट्स स्पेशल' बस - ट्रेन
४. मुंबई मेट्रोमध्ये वर्सोव्याच्या दिशेचा अर्धा डबा महिलांसाठी राखीव आहे त्याचप्रमाणे घाटकोपर दिशेचा अर्धा डबा पुरुषांसाठी राखीव
याकरिता का आंदोलने होत नाहीत???

अननस, मंदिरात नार्को अ‍ॅनालिसिस किट लावावं का? लोक कोणत्या उद्देशाने तिथे येतात ते समजून घेण्यासाठी?
माझ्या माहितीतले एक आजोबा देवळात संध्याकाळच्या कीर्तनाच्या वेळी सौंदर्यस्थळे न्याहाळायचे. (हे त्यांनी स्वतःच सांगितलेलं.)
तसंच तुमचा देवावर विश्वास आहे की नाही? देवाला हे सगळं कळत असेलच ना? मग तो काय ती अ‍ॅक्शन घेईल का नाही?

< प्रजननशील वयातील स्त्रियांना फक्त डोळ्यासमोर ठेवून केलेल्या स्वघोषित सुधारणावादी काही मंदिर प्रवेशाचे मुद्दे उचलून सर्व समस्या समजून घेऊन किंवा त्यावर सर्व समावेशक समस्या निवारणाचे काम नक्की करत नाही आहेत. > सर्टफुकटबद्दल सगळ्यांच्या वतीने आभार.

पण अजूनही तुम्ही प्रजननशील वयातल्या स्त्रियांच्या मंदिरप्रवेशाला आक्षेप असण्याचे नेमके कारण सांगत नाही आहात. मंदिरप्रवेशाच्या बाजूने असलेली लॉजिकल कारणं, तुम्हाला मान्या आहेत. काही परंपरा/धारणांचा मान राखायचा, तर आतापर्यंत ज्या परंपरा मोडल्या गेल्या त्यांचं काय? घड्याळाचे काटे उलट फिरवावेत का? संस्कृती प्रवाही बिवाही असते, त्याचं काय? "'डोईचा पदर आला खांद्यावरी । भरल्या बाजारी जाईन मी " असं संत जनाबाई म्हणाल्या. तिथून मागे जायचं का?

दलितांच्या मंदिरप्रवेशाबद्दल आपलं अमूल्य मत काय?

अमितव म्हणाले, तसं तुम्ही लिहीत रहा, मजा येतेय वाचायला.
--------------
साधना, तुम्ही दिलेली माहिती माझ्यासाठी नवीन आहे. धन्यवाद. पण मंदिरप्रवेशाला विरोध असणार्‍यांचं मुख्य कारण पाळी हेच आहे. मंदिर व्यवस्थापनाचं २०१५ मधलं म्हणणं पहा Prayar Gopalakrishnan, head of the Devaswom Board that manages the temple, reportedly told media: “There will be a day when a machine is invented to scan if it is the 'right time' (not menstruating) for a woman to enter the temple. “When that machine is invented we will talk about letting women inside.”
-----
बाकी फ्रेंडच्या घरी घेउन (न) जायच्या रक्ताळलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सवरचं स्पष्टीकरण वाचलंत का?
As far as those who jump the gun regarding women visiting friend’s place with a sanitary napkin dipped in menstrual blood — I am yet to find a person who ‘takes’ a blood soaked napkin to ‘offer’ to any one let alone a friend
मंदिरात जाऊन नक्की काय ऑफर करायचं असतं?

"मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव" किंवा "नाही शुद्ध मन काय करील साबण" यांचा व्यत्यास बरोबर असतो की नाही? म्हणजे मन निर्मळ असलं, त्यात योग्य ते भाव असले की झालं. बाकी काही कसंही असो.

खूप काय च्या काय चालू आहे सगळ्यांचंच. सकाळ वर 'चड्डीत शी झाली तर तसाच देवळात जाणार आहेस का' अशी तुलना करणार्‍या कमेंटस आहेत.
एखादी गोष्ट काय किंमतीत मिळवावी आणि मिळाली तर इतकं त्याचं महत्च/फायदा आहे का हा प्रश्न पडतोच.

Pages