हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑडिओबुक्स भारतात -
ऑडिबल सध्या भारतात नाही; पण तुमचं भारतातलं अ‍ॅमेझॉन अकाउंट वापरून, डॉलर्स मध्ये सबस्र्काईब करता येईल. भारतीय क्रेडिट कार्ड चालतं. पहिले ३० दिवस फ्री आणि नंतर १५ डॉलर्स प्रती महिना (१००० रुपये)

दुसरा पर्याय
स्टोरीटेल. ३००/- रुपये प्रतिमहीना सबस्र्किप्शन. यात जिम डेल वाले हॅरी पॉटर ऑडिओ बुक्स तर नाहीत पण बरेच मराठी टायटल्स आहेत. एकदा स्बस्र्काईब केले की पुढे सगळे ऑबु अ‍ॅपवर ऐकायला उपलब्ध होतात.

बाकी टोरंट्स, इतर साईट्स याबद्द्ल काही माहीती नाही. अर्थात अव्हेलेबल असतीलच म्हणा...

भाचा उगाच किती पिसं काढत बसला आहात?

लहान मुलांसाठीची एक सुंदर गोष्ट आहे ती. तुमच्या सगळ्या अ‍ॅक्शन्सना कॉन्सिक्वेन्स आहे, अन चांगली अ‍ॅक्शन निवडण्याचा तुम्हाला नेहेमीच चॉईस आहे, ही बेसिक शिकवण मुलांसाठी चांगली आहे, अन ती त्या पुस्तकातून सहज पोहोचते. भाषाही मुलांना वाचत रहावीशी वाटेल अशी आहे. अद्भुतरम्याच्या माध्यमातून व्हॅल्यू एज्युकेशन या दॄष्टीने मी तरी हॅपॉकडे पाहतो. आय अ‍ॅम अ फॅन.

इबा म्हणाल्या तसे त्यात 'देव' डायरेक्टली कुठेच येत नाही. हे माझ्यासाठी दुसरे प्लस.

शेवटी खोड्याच काढायच्या तर कशातही काढता येतात. उदा. स्टार वॉर्समधली सगळीच 'वर्ल्ड्स' एकाद्या छोट्या शहराच्या एका मोहोल्ल्याइतकीच लहान कशी काय, हा ही प्रश्न मला नेहेमीच पडत रहातो.

लहान मुलांसाठीची एक सुंदर गोष्ट आहे ती. >> सॉरी.. बट यू आर डेड राँग. सिंपल स्टॅट देतो..
हॅरी पॉटर मधे मरणार्‍या लोकांची संख्या गॉडफादर मधे मेलेल्या एकूण लोकांच्या संखेच्या कैक पटीत आहे.

लहान मुले, आई वडिलांचा खून, जन्मतःच अनाथ, कोणी कायमचा आपल्या जीवावर उठलेला असणे, सतत जीवावर बेतणारे प्रसंग घडत राहणे आणि मरण... ह्याचा बालसाहित्याशी दूर दूर पर्यंत काही संबंध नाही. (खोडी नाही फॅक्ट आहे Proud )
केव़ळ जादू आहे आणि रिअ‍ॅलिटी पासून फारकत घेतली आहे म्हणून ते लहान मुलांचे पुस्तक होत नाही..

>>> लहान मुले आणि मरण... ह्याचा दूर दूर पर्यंत काही संबंध नाही
असं काही नाही, हाब. रामायण-महाभारत, पुराणं वगैरेतल्या गोष्टी आपण (आम्ही?) लहानपणीच ऐकल्या - मूल्यशिक्षण म्हणूनच. त्यातलं स्टॅटिस्टिक्स कधी ध्यानी घेतलं का? Happy

>>> लहान मुले, आई वडिलांचा खून, जन्मतःच अनाथ, कोणी कायमचा आपल्या जीवावर उठलेला असणे, सतत जीवावर बेतणारे प्रसंग घडत राहणे आणि मरण.
तुरुंगात जन्म, आधीची सात भावंडं जन्मत:च भिंतीवर आपटून मारली गेलेली असणं, सतत कोणीतरी आपल्याला जिवे मारायला येणं... हे कसं काय आहे?
मोठ्या माणसाने रागाच्या भरात लहान मुलाचं डोकं उडवणं आणि मग त्या जागी हत्तीचं डोकं बसवणं हे काय आहे?
मला आता मुलांना त्या गोष्टी सांगताना त्यात किती हिंसा आहे ते ध्यानात येतं!

कावळा आणि कोल्हा / कोल्हा आणि करकोचा वगैरेंसारख्या इसापनीती/पंचतंत्रातल्या गोष्टीसुद्धा अगदी हिंसा नाही तरी लबाडी, फसवणूक वगैरेचं ज्ञान देतातच की!

ते 'केवळ' मुलांचं पुस्तक नाही हे मान्य - किंबहुना ते ऐकताना माझ्यातलं मूलच खूश झालं होतं असं म्हणेन!

रामायण, महाभारत हे बालसाहित्य आहे असे sweepingly कोणीच म्हणत नाहीत त्यामुळे तिथे काही इश्यू नाही. त्यातल्या संस्कारक्षम selective stories लहान मुलांना "देवाचे काहीतरी" असे समजून सांगणे वेगळे आणि त्याला बालसाहित्य म्हणणे निराळे ना . Happy

अद्भुत साहित्यप्रकारातल्या (fantacy genre) इतर पुस्तकात देव, देवांची भक्ती, चमत्कार हे किती प्रामुख्याने येतात? इथले या प्रकारच्या साहित्याचे वाचक यावर प्रकाश टाकू शकतील का? मी सॉंग ऑफ आईस अँड फायर वगळता इतर कुठले अद्भुत साहित्य वाचलेले नाही. देव, दानव संकल्पना मुळात fantacy असल्याने व ते मुख्य धारेचा एक भाग झाल्याने देव असलेले फँटसी लेखन मुबलक उपलब्ध आणि लोकप्रिय आहे. सामान्य लोकांना चमत्कार करण्याची ताकद दाखवताना जर त्या चमत्काराचा उगम देवाच्या भक्तीत वा अस्तित्वात आहे असे दाखवले तर पुस्तक इतर धार्मिक साहित्याच्या पंक्तीत बसेल. त्यामुळे देवाचे अस्तित्व दाखवणे अद्भुतसाहित्याच्या वेगळेपणाला मारक ठरेल.

सॉंग ऑफ आईस अँड फायर (गेम ऑफ थ्रोन्स) मध्ये देव आहेत - जुने देव, नवे देव, वेगळे देव वगैरे. पण ते करत काही नाहीत. लोकं त्यांची भक्तिभावाने पूजा वगैरे करतात पण देव स्वतः काहीच चमत्कार करत नाहीत. जे काही चमत्कार / अद्भुत दाखवले आहे ते पात्रांनी स्वतः कमावलेले आहे.

Selective नाही, मी वर उल्लेख केलेल्या सगळ्याच कथा ऐकल्या होत्या की लहानपणीच!
तरी मी अजून व्रताबितांच्या कहाण्यांचा उल्लेख नाही केलेला - अगदी फॅमिली अफेअर असायचं की त्या ऐकणं हे! Happy

'देवाचं काहीतरी' आणि 'जादूचं काहीतरी'मध्ये किशोरवयीन वाचकाला कितीसा फरक पडणं अपेक्षित आहे?

असो - यात अ‍ॅड करण्यासारखं काही नाही माझ्याकडे आता. Happy

टवणे सर,
Life of Pi बदल काय मत आहे? God, fantasy, adventure सगळं आहे त्यात.

लॉर्ड ऑफ द रिंग्ज? त्यातही देवा/धर्माचा कुठे उल्लेख आल्याचं आठवत नाही मला.

लहान मुले, आई वडिलांचा खून, जन्मतःच अनाथ, कोणी कायमचा आपल्या जीवावर उठलेला असणे, सतत जीवावर बेतणारे प्रसंग घडत राहणे आणि मरण... ह्याचा बालसाहित्याशी दूर दूर पर्यंत काही संबंध नाही. (खोडी नाही फॅक्ट आहे Proud )
<<
हॅन्स अँडरसन यांच्या परिकथा वाचल्या आहेत का?
किंवा गेला बाजार स्नो व्हाईट, सिंडरेला इत्यादी?

मृत्यू अन मुलांचा संबंध नाही?? लहानपणी तुम्ही घरातल्या आजी आजोबांचे मृत्यू पाहीले नाहियेत का? मी तरी पाहिले आहेत. अगदी ४थी पासून.

अन आजकाल टीव्हीवर जे काय 'मुलांसाठी" म्हणून चालतं, त्यात व्हायोलन्स, सेक्स इत्यादि नसतात??? कम ऑन. वादासाठी वाद घालू नका.

शिवाय, हॅरीपॉटरचा आवाका, एकंदर पात्रसंख्या हिशोबात घेतली, अन गॉडफादरची मोजली, तर पर्सेंटेजमधे (आजकाल भाजप्ये करतात तसं Wink ) काय हिशोब येतोय हो?

***

अगदी नर्सरी र्‍हाइम्स लाइक
Ring-a-ring o' roses,
A pocket full of posies,
A-tishoo! A-tishoo!
We all fall down.
प्लेग/ मिसल्स चे वर्णन असू शकते.

पण जौद्या. बाल की खाल काढत बसणे छान असते. बरा टाईमपास होतो.

या पुस्तकातून एक चांगला मेसेज लहान मुलांना मिळतो, जगभरातली एक पिढी किशोरवयात वाचनास पुन्हा एकदा उद्युक्त झाली, एकदा एक पुस्तक छान 'लागले' की त्यातून वाचण्याची चव लागते अन नंतर इतर जड लिखाण वाचले जाते हे वैयक्तिक निरिक्षण असल्याने, हॅपॉ छानच आहे, असे माझे वैम.

तुम्ही चालू द्या!

स्वाती,
साहित्य "लहान मुलांसाठीच लिहिले आहे" आणि "साहित्य लहानपणी वाचले आहे" हे दोन निराळे मुद्दे आहेत ना?

अननुभवी, नकळत्या वयात मरण, क्रिमिनल गोष्टी ह्याची ओळख मुलांना साहित्यातून होऊ नये असे एक जनरल मत ग्राह्य धरले तर हॅरी पॉटर माझ्या मते बालसाहित्य म्हणुन धरता येणार नाही.
Spider-Man सारखे comics books सुद्धा चांगले वाईट प्रवृत्ती दाखवतात पण थेट जिवानिशी मरणे मारणे दाखवत नाहीत.

हाब, मी वाचले नाहिये या प्रकारातले साहित्य म्हणून तर तुम्हा लोकांना विचारतोय. Happy
मी अद्भुतरम्य साहित्यप्रकार म्हनालो तेव्हा माझ्या डोक्यात जिथे समांतर विश्व व वेगळीच दुनिया उभी केली जाते अश्या प्रकारची पुस्तके डोक्यात होती. लाइफ ऑफ पै हे पृथ्वीतलावरच्या सामान्य दुनियेतच घडते ना? मग बायबल, कुराण, महाभारत, रामायण पासून ते अ‍ॅटलांटिस मानणारे, येहोवावाल्यांची पुस्तके वगैरे सर्व धरले पाहिजे. तुम्ही विचाराल मग हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्युड का नाही.

अननुभवी, नकळत्या वयात मरण, क्रिमिनल गोष्टी ह्याची ओळख मुलांना साहित्यातून होऊ नये असे एक जनरल मत ग्राह्य धरले
<<
हे असे जनरल मत कुठल्या कायद्यात लिहिलेले आहे?

>>
Spider-Man सारखे comics books सुद्धा चांगले वाईट प्रवृत्ती दाखवतात पण थेट जिवानिशी मरणे मारणे दाखवत नाहीत.
<<
किती थापा माराल?
त्या स्पायडीच्या अंकलला मारलं, त्यामुळे तो डू गुडर झाला. इतकं पर्सनल व्हायोलन्सचं चित्रण कॉमिक्स अन सिनेमातही आहे! अन म्हणे थेट जिवानिशी मारणे दाखवत नाहीत.

बॅटमॅनचा जोकर. त्याचा बाप लहान मुलाच्या तोंडात चाकू घालून फाडतो अन तोंड हसरं(?!) करतो!! व्हायोलन्स नाही???

क्विट योर बुल्शिट मॅन!

ता.क.

अरे हो! तो स्पायडरमॅन ऑर्फनही अस्तो बरं का. केवळ इथे अंकल आँट चांगले असतात. हॅपॉ सारखे याचा तिरस्कार करणारे नसतात.

अरारा,
तुमच्या न्यायाने मग कुठले साहित्य बालसाहित्य नाही ते सांगा Proud

हाब,

मी नाही, न्याय तुम्ही करीत आहात. मी त्या पुस्तकातली सो कॉल्ड इम्पर्फेक्शन्स दुर्लक्षित करून चांगल्या बाबी दाखवतोय.

मुलांसाठीची एक छान छान पॉप्युलर गोष्ट तुम्ही सांगा, मग मी बाल की खाल काढून दाखवतो.

>>> अननुभवी, नकळत्या वयात मरण, क्रिमिनल गोष्टी ह्याची ओळख मुलांना साहित्यातून होऊ नये असे एक जनरल मत ग्राह्य धरले तर

जनरल म्हणजे कोणाचं मत?
वर पार स्नोव्हाइट, सिंडरेलापासून हॅन्स ॲन्डरसनपर्यंत ‘बालसाहित्या’तली उदाहरणं दिली की आरारांनी! ग्रिम घे, नार्निया घे, मटिल्डा घे - दुष्टपणा, लोभ, लबाडी, अब्यूज, मृत्यू आहेच की!

तुला ‘बाल’ म्हणायला प्रॉब्लेम वाटतो आहे का? किशोर म्हणून बघ. मला बरोबर आठवत असेल तर ९ वर्षांपुढल्या वाचकांसाठी रेकमेन्डेड आहे हॅपॉ पहिलं पुस्तक. मलातर हॅरी आणि कंपनी मोठी होत जाते तसं नॅरेशनही कसं मच्युअर्ड होत जातं याचंसुद्धा कौतुक वाटलं होतं. असो.

अननुभवी, नकळत्या वयात मरण, क्रिमिनल गोष्टी ह्याची ओळख मुलांना साहित्यातून होऊ नये असे एक जनरल मत ग्राह्य धरले तर हॅरी पॉटर माझ्या मते बालसाहित्य म्हणुन धरता येणार नाही.
Spider-Man सारखे comics books सुद्धा चांगले वाईट प्रवृत्ती दाखवतात पण थेट जिवानिशी मरणे मारणे दाखवत नाहीत.

>> माझ्या मते या जनरल मतात एक गृहीतक असे आहे की मरण वा तत्सम गोष्टींची ओळख मुलांना करून देताना संयत भाषा (शाब्दिक किंवा चित्रांतून) वापरली जाणे अपेक्षित आहे. उदा. स्पायडर मॅनच्या "द नाईट व्हेन ग्वेन स्टेसी डाईड" या कॉमिकमध्ये पीटरची पहिली प्रेयसी ग्वेन मरते आणि तिच्या मृत्युस ग्रीन गॉब्लिन कारणीभूत असतो. दिसताना असे दिसते की गॉब्लिन तिला उंचावरून खाली फेकतो आणि स्पायडरमॅन वेळेत तिला वाचवू शकत नाही व ती मरते. पण अतिशय सटली पॅनेल्समधून कळवले आहे की जेव्हा स्पायडरमॅन तिला झेलतो, तेव्हा त्याच्या स्पायडर रोपच्या रिकॉईलचा झटका त्या दोघांना बसतो. या झटक्याने तिचा मणका तुटतो व ती मरते. म्हणजे अप्रत्यक्षपणे स्पायडरमॅनच तिच्या मृत्युस कारण ठरतो. हे मुलांना थेट सांगणे निश्चितच चुकीचे आहे. पण जेव्हा ते मोठे होतील आणि त्यांना कॉमिकच्या पॅनेल्स नीट वाचता यायला लागतील तेव्हा त्यांना ही माहिती कळण्यासाठी ती लपवणेही गरजेचे आहे. जर असा विचार करून मृत्यु लिहिले जात असतील तर निश्चित ते उत्तम दर्जाचे बालसाहित्य मानावे लागेल.

आरारा...
आपण नैसर्गिक मरणाबद्दल बोलत नसून खुनाबद्दल बोलत आहोत हे तुम्ही साफ विसरलात असे दिसते. Happy
तुम्ही म्हणालात ही लहान मुलांसाठीची गोष्ट आहे. तुमचे वाक्य तुम्ही कसे ईंट्रप्रीट कराल?
ही exclusivelyलहान मुलांची गोष्ट आहे ज्यात खून ... मोठ्यांनी लहान बाळांचा, विद्यार्थांनी शिक्षकांचा... मुलाने वडिलांचा असे सगळे आहे जे लहान मुलांसाठी लिहिलेले आहे.... महान...
आणि ह्याबद्दल तुमचे स्पष्टीकरण काय तर सगळ्याच लहान मुलांच्या पुस्तकात असते.. धन्य. Proud
तुमच्या बालसाहित्यात 'खून करणे (विथ ईंटेंट)' ही 'जादू करण्यासारखी' सामान्य गोष्ट असेल तर आपण फार वेगवेगळ्या बेटांवर ऊभे आहोत.

हॅरी पॉटर, रामायण, महाभारत ह्या बाल साहित्याच्या वाचकांसाठी काही प्रश्न... ज्याची ऊत्तरे तुम्हाला लहान मुलांना द्यायची आहेत.
गंगेने पहिली सात मुले पाण्यात का बुडवली? मग ती मेली का? मग गंगा वाईट होती का?
वॉल्डर्मॉर्टने हॅरीच्या आईवडिलांचा खून का केला?
वॉल्डर्मॉर्‍टला हॅरीसारख्या छोट्या/नवजात मुलाला का मारायचे होते?
कंसाने देवकीच्या लहान मुलांना आपटून का मारले?

पायस म्हणाला तसे
पुस्तके हातात देण्यापूर्वी 'माणसे माणसांचा (लहान मुलांचा सुद्धा) छळ करतात' आणि 'माणसे माणसांचा (लहान मुलांचा सुद्धा) खून करतात'
हे मुलांना पहिल्यांदा ह्या पुस्तकातून कळण्याआधी खर्या जगात पालकांकडून संयत भाषेत कळालेले योग्य असेल.

किशोरवयीन बरोबर आहे... मला वाटते लायब्ररी मधे ते चिल्ड्रेन सेक्शन्मधे नसून यंग अ‍ॅडल्ट सेक्शन मधे असते.

>>> आपण फार वेगवेगळ्या बेटांवर ऊभे आहोत.
याला बाकी कम्प्लीट अनुमोदन! Proud

आपण नैसर्गिक मरणाबद्दल बोलत नसून खुनाबद्दल बोलत आहोत हे तुम्ही साफ विसरलात असे दिसते
<<
स्पायडीचे अंकल = नैसर्गिक मृत्यू?

बरं.

>>
हे मुलांना पहिल्यांदा ह्या पुस्तकातून कळण्याआधी खर्या जगात पालकांकडून संयत भाषेत कळालेले योग्य असेल.
<<
हे म्हणजे जगातील पहले पुस्तक वाचले ते डायरेक्त हॅपॉ असे "जनरल असंपशन" वगैरे. कारण पालक इतर काही कधीच न बोलता डायरेक्त पुस्तक हातात देणार. बाळाला टीव्ही वगैर काही आयुष्यात दिसलेले नाहीच. नैका?

तुम्हाला टाटा.

ही लहान मुलांसाठीची गोष्ट आहे. तुमचे वाक्य तुम्ही कसे ईंट्रप्रीट कराल?

<<

वय हिशोबात घेऊन मी तुम्हालाही लहान मूल म्हणू शकेन असे वाटते Lol

पॉप्युलर स्टोरी अन बाळ कि खाल चं काय झालं?

तुमच्या बालसाहित्यात 'खून करणे (विथ ईंटेंट)' ही 'जादू करण्यासारखी' सामान्य गोष्ट असेल तर

An observation regarding this.

There is very beautiful value lesson about the killing curse "avda kedavra" and there having to be malicious intent behind it. Harry usually at the most uses the expelliarmus curse. Except for the sectum sampra, and then suffers the consequences of using dark magic aka doing bad deed.
And this comes at around age of १६. That is the age Shivaji raje started swarajya after killing sports soldiers and winning a castle btw Happy

जाऊ दे ...शब्दाला शब्द लिहून ऊगाच आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या धाग्यावर वाद नको म्हणून.. आधी लिहिलेले पोस्ट बदलत आहे. Happy
आरारा.. पुन्हा कधी तरी ड्युअल करू... कदाचित डंबलडोर आणि ग्रिंडलवाल्डलला बघितल्यावर. Proud
(भरत - डीबेटचा रेकॉर्ड न मोडायचा प्रयत्न केला बर का?) Proud

अरारा.. जाउन द्या हो... तुम्ही दोघेही एवढे हमरीतुमरीवर येउ नका.. हॅरी पॉटर बाल साहित्य, किशोर साहित्य की प्रौढ साहित्य असा काथ्याकुट करत बसण्यापेक्षा त्याने तुम्हाला किती आनंद दिला हे नमुद करा .. फार तर फार ते का आवडले त्याची कारणे द्या व जे या सिरीजचे जे स्कॉलर्स आहेत त्यांनी आमच्या सारख्या पामरांना पडलेल्या शंकांचे निरसन करा .. पण असे हमरातुमरीवर येउ नका... Happy

वर ट्रायविझ्र्ड टुर्नामेंट च्या शेवटी जे झाले त्यावरुन बरेच विचार मांडले गेले व बार्टी क्राउज ज्युनिअर उर्फ तोतया मुडी नमुद केला गेला. त्यावरुन प्रोफेसर अ‍ॅलिस्टर मुडीबद्दल माझे ऑब्झरव्हेशन...

त्याची चौथ्यापुस्तकाच्या सुरुवातीला एंट्री तर मस्त भारदस्त करुन दिली ..त्याचे ते बॅटल स्कार्स असलेले रुप.. वुड्न लेग..गर गर फिरणारा डोळा... ( म्हणुन मॅड आय मुडी) डेथ इटर्स बरोबर अनेक लढाया जिंकणारा एक ग्रेट्ग्रेट ऑरा ... वगैरे खुप हाइप केली त्याची...

पण झाल काय त्या ग्रेट ऑराचे? शाळेत यायच्या आधीच बार्टी क्राउज जुनिअरने त्याला सात पेट्यांच्या आत बंदिस्त करुन टाकले होते... कसला ग्रेट ऑरा आणी कसल काय..

मग पाचव्या व सहाव्या पुस्तकात तो मला मुळीच कॉन्फिडंस देउ शकला नाही.. हॅरीचा बॉडीगार्ड म्हणुन.. एक कार्टुन कॅरॅक्टर वाटु लागला.. आणी शेवटी सातव्या पुस्तकाच्या सुरुवातीला हॅरी उडत असताना तोच फक्त मरतो... त्यामुळे मुडीच्या कॅरॅक्ट्रचा डाउन्फॉल खुपच प्रेसिपिटस वाटला. तो मेला त्याचे एवढे वाइट नाही वाटले. उलट् त्याच प्रवासात हेडविग मरतो त्याचे जास्त वाइट वाटते.

तसेच निंफेडोरा टाँक्सही एक ग्रेट ऑरा म्हणुन कधीच वाटली नाही... किंबहुना त्या कॅरेक्ट्रचे प्रयोजन मला नीट कळलेच नाही.

आरारा, आय अ‍ॅम ऑल्सो अ फॅन. पण माझ्या बाबतीत तरी आवडलेल्या कलाकृतीवर विचारमंथन जास्त होतं. नावडलेली असते ती "गेली उडत" असं होतं. किंबहुना एखादी गोष्ट आपल्याला का आवडली किंवा त्यातलं काय खटकलं, ह्याचा विचार केला तर स्वतःविषयीच बर्‍याच गोष्टी कळतात. हॅरीने माझ्या वाढत्या वयात मला बराच आनंद दिला, माझे काही विचार घडवलेही असतील, पण म्हणून तो माझ्यासाठी 'होली काऊ' नाही.

बाकी हॅरी पॉटर ही 'लहान मुलांसाठीची सुंदर गोष्ट' आहे, हे अमान्य. ती सुंदर गोष्ट आहे, हे मान्य. Happy

हॅरी पॉटरने आणखी एक गोष्ट सहजपणे सांगितली आहे ती म्हणजे - तुम्हाला खूप जवळचे असे जे आहेत, तुमचं ह्या घडीचं अस्तित्व तुम्ही ज्यांच्या अभावात कल्पनेतही बघू इच्छित नाही, ते काही नेहमीसाठी तुमच्यासोबत राहाणार नाहीत. त्यांचं भौतिक अस्तित्व नष्ट होणं हे कसं स्वीकारावं हे कथेच्या ओघात (लहानांना/मोठ्यांना) फार सुरेख सांगितले आहे, असे मला वाटते.

गजानन, सहमत.

Does it hurt? वाचूनही फार अफाट वाटलं होतं. Happy

हॅरीच्या गोष्टीत हिंसा आहे, खून आहे, मारामारी आहे, चाइल्ड अब्युज आहे हे मान्य आहे, आणि या व्यतिरिक्तही बरंच काही आहे. नकारात्मक भावना कधीही सकारात्मक भावनांना ओव्हरपॉवर करत नाहीत. एक एक पुस्तक संपताना it never leaves a bitter taste in your mouth. पुस्तकं खूप वेळा वाचल्यानंतर मध्ये मध्ये अत्यंत पाचकळ विनोद पेरले आहेत त्याकडे लक्ष जातं, नेव्हिलचा धांदरटपणा, खाण्याचा हावरटपणा, फ्रेड आणि जॉर्जच्या ट्रिक्स, घोस्ट्सचा अतरंगीपणा असे मुद्दाम आहेत जेणेकरून हलकंफुलकं वातावरण तयार होतं. त्यामुळेच मुलांनी, तुम्ही म्हणता त्या यंग अ‍ॅडल्ट्सनी वाचलं तरी त्यांच्या मनात कायमस्वरूपी किंवा दीर्घ काळ राहील अशी नकारात्मक भावना रहात नाही, उलट हॅरी किती शूर आहे, धाडसी आहे अशाच भावना उरतात. त्यामुळे ती यंग अ‍ॅडल्ट-सेफ पुस्तकं आहेत असं मला वाटतं Happy

Does it hurt चा dialogue आलाय, त्यावरून मला माझा फेव्हरेट डायलॉग आठवला:

Dumbledore must've known I'd run out on you.
No, he must've known, you would always want to come back.

This sums it up Happy

Dumbledore must've known I'd run out on you.
No, he must've known, you would always want to come back. >>>> +९९९९९९९९९९९९

Dumbledore must've known I'd run out on you.
No, he must've known, you would always want to come back >>>>>> कुठंच पुस्तक ?

Pages