हसरा चेहरा

Submitted by इंग्रजी माध्यमच... on 13 October, 2018 - 17:24

माझा मित्र सिद्धेश कदम एका उत्तर भारतीय मुलीच्या प्रमात पडला होता. कसं बसं त्यांचं प्रम प्रकरण जुळलं होतं. त्याला तिचा होकार मिळालं होता. ती इतकी सुंदर अाहे की तिच्या हसर्‍या चेहर्‍यांला बघावं तर बघतच रहावंसं वाटेल. तिच्या हसर्‍या चेहर्‍यांत एक निरागस भोळेपणा अाणि लाजवटपणा अाहे. सिद्धेश मात्र हसर्‍या चेहर्‍यांचा. त्याचा चेहरा नेहमी पहावं तर हसराच असतो. कधी वाटेवर भेटल्यावर त्याचा हसरा चेहरा पाहुण मन खुश होतो, सगळे दुःख विसरुन जातो. तो तिच्या प्रेमात वेडा झाला होता. ती म्हणेल तिथे लगेच धावा-धाव करत भेटायला पोहचायचा. तिचा एक खुप जवळचा मित्र होता. ती त्याच्या सोबत कधी वाढदिवसाची पार्टी किंवा कुठे दुसरीकडे फिरायला जात असे. सिद्धेशला तिच्यावर विश्वास असल्यामुळे त्याला काही हरकत नव्हती. तिचंही सिद्धेशवर प्रेम होतं. एके दिवशी सिद्धेशच्या घरी कोणीच नसल्यामुळे तो तिला त्याच्या घरी बोलावतो. खुप गप्पा गोष्टी रंगतात अाणि हास्य-मस्करी होते. तो तिला स्पर्श देखील करत नाही. तो खुप चांगला अाहे ही तिची खात्री पटते. सिद्धेशचं हे प्रेम प्रकरण त्याच्या मित्राला माहीत असतं. तो मित्र गुलहौशी असतो. मुलींच्या भावना म्हणजे काय जनु त्याच्यासाठी खेळणं. तो सिद्धेशला म्हणाला “काय त्या भैय्यांनीच्या माघे लागतो. तिला खाऊन-पिऊन सोडून टाक”. सिद्धेश म्हणेतो “मी तुझा सारखा नाही अाहे रे. मी प्रेम करतो तिच्यावर”. “प्रेम करतो तर काय तिच्याशी लग्नं करशील काय”. “हो करणार अाहे”. हे वाक्य एेकल्या बरोबर मित्र त्याच्यावर हसतो. त्याला विचार येतो “भैय्यांनीशी कसं हा लग्नं करू शकतो”. तो सिद्धेशची खिल्ली ऊडवतो. त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो. पण कसलं काय सिद्धेश मात्र प्रेमाच्या नादात वेडाखुळा झाला होता. परंतु मित्र त्याला पटवून देतो की लग्नांच्या अगोदर सॅक्स करण्यात काही हरकत नसते. त्यावर सिद्धेश म्हणतो “मला तिच्याशी असं काही बोलायला हिंमतच होत नाही”. त्यावर मित्र म्हणतो “हे बघ तू जायाच्या अगोदर अापण दोघंजण एक कॉटर अाणि एक नाईंटी मारु मग हिंमत नाही झाली तर माझं नाव बदलून टाक”. सिद्धेश तैयार झाला. सिद्धेशच्या मनावर त्याच्या मित्राचस प्रभाव झाला होता. ठरल्या प्रमाणे घरी कोणीही नसल्याची संधी बघून तिला घरी बोलावतो. गप्पा-गोष्टींमधून तिला दारूचा वास येतो. तो दारू पिऊन बसला अाहे, ही तिला खात्री पटल्यावर, ती रागात म्हणते “तुम शराब पिते हो. तुमने तो कहा था के तुम नशा नही करते”. ती रागात त्यांकडे बघत सुद्धा नाही. तो तिची समजूत काडतो. बोलणं परत अनुकूल चाळलेलं होतं. ही मागणी करण्याची योग्य वेळ अाहे असं त्याला वाटलं. त्याने लाडात तिच्या जवळ जाऊ तिच्या खांद्यांवर हात ठेवला. अगोदरचा राग अजून तरी पुर्ण विझला नव्हता. त्याला हे माहीत नव्हतं. त्यावर तो अोठ तिच्या अोठांच्या जवळ नेऊन म्हणाला “एक कीस दो ना”. ती त्याला लांब करत म्हणाली “हटो ! बडे गंदे हो तुम”. त्याने तिला तैयार करण्याचा खूप प्रयत्न केला पण तिचा रागाचा पारा जड असल्यामुळे ती काही तैयार होईना. नशेच्या प्रयत्नात तो मोठ्या अावाजात कडू शब्द बोलला. ते शब्दं तिच्या मनाला लागले. ती दुःखात रडू लागली. तिचा रडवेला अावाज एेकुन त्याचं कालीज फाटल्यासारखं वाटायला लागलं. प्रिय व्यक्तीला रडतांना पाहताना माणसाची काय अवस्था होते. तो तिची माफी मागायला लागला. ती रागाने म्हणाली “मै तुम्हे अच्छा इंसान समजती थी. तुम्हारा असली चेहरा अाज सामने अाया”. ती रडवेला चेहरा घेउन निघून गेली. त्या नंतर तिने कधीच त्याचा कॉल उचलला नाही, मॅसेजचा रिप्लाय दिला नाही अाणि भेटली सुद्धा नाही. मित्राच्या एेकल्याने तो तिला गमावून बसला होता. तो एकटा पडला. अाज ही तो हसरा चेहरा घेउन लोकांसमोर जातो पण त्या हसर्‍या चेहर्‍यांमाघे काय दडलंय ते फक्त त्यालाच माहीत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नशेच्या प्रयत्नात तो मोठ्या अावाजात कडू शब्द बोलला
>>> हीच तर चूक झाली ना राव. मित्राने हे तर सांगितले नव्हते.

बादवे - हे बघ तू जायाच्या अगोदर अापण दोघंजण एक कॉटर अाणि एक नाईंटी मारु -नक्की 90 मारली का कॉटर?

कमाल...
साऊथ पोल च्या आसपास एक चित्रपट तयार होऊ शकतो यावर

इंग्रजी माध्यमाची मुलं, 'मागे' ला चुकून 'माघे' म्हणाली तर लोक मोठ्या मनाने माफ करतात. पण मराठी माध्यमाच्या मुलांनी चुकीचा इंग्लिश उच्चार केला तर सगळे हसतात. आता हेच पहा ना सॅक्सला मराठी माध्यमाच्या मुली सेक्स म्हणतात चक्क. इंग्रजी माध्यमाच्या मुलामुळे चूक कळली. Proud

अरेरे Sad
तिने चूक समजून माफ करायला हवे होते... प्रेमात क्षमाशील असणे फार जरूरी असते.