शी-शु पालन

Submitted by DJ. on 3 October, 2018 - 07:26

गेल्या वीकेन्ड ला गावी गेलो असताना समोरच्या घरात रहणार्‍या प्रा. काकींना महिनाभरापुर्वी नात झाली ही बातमी समजली. प्रा. काकींची एकुलती एक लेक. लग्नानंतर ३ वर्षांनी तिला हे पहिलेच कन्यारत्न. प्रा. काकी पहिल्यांदाच आज्जी झालेल्या. म्हटलं चला त्यांचे आणि दिदीचे अभिनंदन करुन येऊ.. लहान बाळाला पाहुन येऊ.. बाळासाठी गिफ्ट घेउन आम्ही जोड आणि आमची दोन मुले त्यांच्या घरी गेलो. त्यांना सर्वांना भेटुन आणि लहान बाळाचे कोड्कौतुक करुन आम्ही घरी परतलो आणि आमच्या हिने लगोलग आईला एक 'खबर' दिली की : प्रा. काकी, १ महिन्याच्या तान्ह्या बाळाला लंगोट/नॅपी पॅड घालताना त्या लंगोट/नॅपी पॅड मधे एक टिश्यु पेपर ची घडी ठेवतात जेणे करुन बाळाने 'शी' केली फक्त तेवढा टिश्यु पेपर बाजुला काढुन टॉयलेट मधे टाकुन फ्लश करायचा आणि लंगोट धुवायला टाकायचा. Light 1

मला प्रा. काकींनी बाळाच्या शी साठी योजिलेली ही युक्ती एकदम भनाट वाटली.. Proud Proud Proud

हे इथे मांडावयाचे कारण असे की बाळाच्या शी/शु चे मॅनेजमेंट करण्यासाठी प्रा. काकींच्या 'टिश्यु पेपर' सारखे अजुनही काही पर्याय इथे कुणी वापरलेत काय..? आपले मायबोलीकर जगभरात वावरत असताना वेगवेगळ्या देशांत वेगवेगळे पर्याय सापडले असतील तर ते इथे सांगावेत.. जेणेकरुन काही नवपरिणित जोडाप्यांना भविष्यात ते उपयोगी पडतील. Proud Proud Proud

Group content visibility: 
Use group defaults

हो हे खरं.१ तास ताट भार भात भरवण्याच्या आधी बाळाच्या आधी आईने खाऊन घेतलं तरी 'स्वार्थी आप्पलपोटी आई' असते. >>>> +११११

आपल्या भारतीय मानसिकतेत सतत नव्या आईला सल्ले देणं हे फार रुजलेलं असतं. तसंच त्या बाळासाठी खस्ता काढल्या नाहीत (हगरं बाळसं/ मुतरं बाळसं/ रात्र रात्र जागरणं) आणि सरळ पद्धतीने सुटसुटीत बालसंगोपन केले, कष्ट वाचवले तर ते बालसंगोपन बहुतांशी आसपासच्या आम जनतेला रुचत नाही, त्यावर टिकाटिप्पणी होते/ भोचक सल्ले दिले जातात असं फारा वर्षां पासूनचं निरिक्षण आहे.. >> एकदम पते की बात. न विचारता, काही संबंध नसताना सल्ले देणे याचे फार बोचरे किस्से आहेत. भारताबाहेर राहिलेल्या, परदेशात मुलं वाढवणार्‍या बर्‍याच भारतीय बायका / मुली तर अतीच भोचक आणि सल्लेखोर असतात .
डायपरवर वाढलेल्या, फॉर्म्युलावर वाढलेल्या मुलांच्या किती पिढ्या आता मोठ्या झाल्यात किती तरी देशांमधून! जगाची लोकसंख्या, सरासरी आयुर्मर्यादा वाढतच आहेत. पण तरी या गोष्टींवर अगदी इस पार या उस पार टाइप सल्ले देणारे थकत नाहीत.

कारण सगळ्यांनाच वाटत असतं की आपल्याला जास्त कळतं तेव्हा आपल्याला सल्ला द्यायचा हक्कच आहे. संबंध असो वा नसो. अगदी घरातल्या आजी, आई ह्यांच्या काळातल्या गोष्टिही अता आउटडेटेड झालेल्या आहेत आणि काळही बदलला आहे तेव्हा त्यांचे सल्लेही सगळ्याच बाबतीत उपयोगी पडणार नाहीत.

भारतात असलं की बहुधा मदत आणि सल्ले/आग्रह हे पॅकेज डीलच होतं - you can't have one without the other!
भारतातून इथली बाळंतपणं रिमोट कन्ट्रोल कन्ट्रोल करायचा प्रयत्न फार वैतागवाणा होतो.

पण हा धाग्याचा विषय नाही हे खरं आहे. राहावलं नाही, सॉरी. Happy

पेशंटला अक्कल नाही, आणि मी सांगतो तेच करा मला फार अक्कल आहे असं का वाटतं?
<<
"डॉक्टरांना चुकीचे शिकवतात", "डॉक्टरपेक्षा मला माझ्या तब्येतीचं/माझ्या बाळाचं जास्त कळतं", ही मेंट्यालिटी सो कॉल्ड सुशिक्षितांत, खासकरून हुशार मायबोलीकरांत बहुधा नसतेच. तसे वाटणे हा माझ्या बुद्धीचा दोष असावा. (हा ड्यालॉग म्हंजे माझा झक्की होऊ लागल्याचे लक्षण आहे Lol )

दुसरं म्हणजे, या देशात (भारत. अमेरिका नाही) मी गेली ३५+ वर्षे डॉक्टरकी करतो आहे. त्यात पेशंटला पूर्ण वेळ देऊन आजाराची नीट माहीती शक्य तितक्या सोप्या शब्दांत देऊनही, संपूर्ण रामायण ऐकल्यासारखं करून "पण मग डॉक्टर तसं सिरियस काही नाही ना?" असे प्रश्न विचारणारे अपवाद नव्हेत, तर ज्यांना मी काय सांगितले ते समजते ते अपवाद असतात, हे मला ठाऊक आहे.

तेव्हा, माझे डोके शिणवून न घेता, माझी अक्कल जी तुम्ही पैसे देऊन विकत घेता आहात, ती वापरा, हे कडक शब्दांत सांगणे याला नाईलाज असतो.

दुसर्‍या शब्दांत, 'मला फार अक्कल आहे. तुम्हाला नाही, कारण ती तुमच्याकडे असती तर तुम्ही ती विकत घ्यायला पैसे देऊन माझ्या दारी आला नसता.' हे सत्य अती एन्टायटल्ड कस्टमर ऑल्वेज राईटवाल्या अन त्यामुळे सर्विस इंडस्ट्रीला कचरा समजणार्‍या कल्चरला नुकतेच सरावलेल्यांना पचायला जरा जड जाते. capisce ?

आता, ही पैसे घेऊन विकायची अक्कल माबोवर फुकट वाटली तर त्याची किम्मत नसते, अन त्यावर पेटल्यासारखे टिपापी प्रतिसाद कसे येतात, हेही ठाऊक झालंय, वैद्यकिय सल्ले देणे कधीच बंद केलेय, पण अनेकदा जनरल हायजिनिक/अर्बन मिथ मोडणारे सल्ले, राहवत नाही म्हणून लिहिले जातात.

वर सायो यांनी जे म्हटलंय ना? >> "कारण सगळ्यांनाच वाटत असतं की आपल्याला जास्त कळतं तेव्हा आपल्याला सल्ला द्यायचा हक्कच आहे. संबंध असो वा नसो." << त्यात "संबंध" पेक्षा त्या विषयातले आपल्याला फॉर्मल ट्रेनिंग किती? हे देखिल विचारात न घेता वर दिलेले अ‍ॅनेक्डोटल स्पेशल अमेरिकन झटके मनसोक्त वाचून चांगलीच करमणूक झालिय माझी.

महोदय्/महोदया,

तुम्ही पाहिलेल्या ४-६ मुलांचे टॉयलेट ट्रेनिंग अन रोज शे सव्वाशे लहान बाळांची ओपीडी गेली ~३० वर्षे पहाणारा डॉक्टर यांच्यातल्या किमान 'अनुभवाचा' फरकही इथे कुणी लक्षात घ्यायला तयार नाही. त्याचे वैद्यकिय शिक्षण, सध्याच्या कॉन्फरन्सेसमधे मिळालेले नवे ज्ञान वगैरे जाउ द्या उडत.

अर्थात, याने माझे कोणतेच घोडे मरत नाही, हे आजकाल माझ्या ध्यानी येऊ लागल्याने मला त्याचे सोयरसुतकही नाही. शेवटी, तुम्हाला जे बरोबर वाटते तेच तुम्ही करा, मला वाटते ते मी करणार अन सांगणार : अर्थात माझ्या पेडिअ‍ॅट्रिशिअन मित्राचे ऐकणार.

रच्याकने : मी कोणत्या अर्थाने ते वाक्य लिहिले, हे पुढच्या प्रतिसादात स्पष्ट लिहिले असूनही अमितव यांनी "ओह, तुम्ही अशा अर्थाने लिहिले असते तर बरे झाले असते" असा जो प्रतिसाद दिलाय, तो वाचून जरा हसू आले.

वरदा, बाकी सगळं बरोबर आहे. पण बाटलीला विरोध असण्याचं अजून एक ( मी वाचलेलं) कारण म्हणजे बाटलीतून दूध सहजपणे ओढलं जातं आणि ती सवय लागली की तान्ही मुलं आईचं दूध ओढायचा कंटाळा करतात.
पर्यावरणाला हानी हा माझ्यासाठी तरी खूप महत्त्वाचा मुद्दा होता आणि आहे. अर्थात प्रत्येकाचे प्राधान्यक्रम वेगळे. Happy

Submitted by आ.रा.रा. on 12 October, 2018 - 21:17

↑ हा प्रतिसाद, माझ्या बोलण्यानंतर जो काय धागा पेटलाय, त्याचं उत्तर म्हणून लिहिलाय. खासकरून माझी अक्कल काढण्याचा जो उद्योग झालाय त्यासाठी. अन्यथा, सभ्य शब्दांत फाटा वरतीच दाखवला होता. पुन्हा एकदा, I have said what i wanted to say. Have fun guys!

वावे, हे अजुन एक मिथ आहे. जर बाळाच ब्रेस्ट फीडींग व्यवस्थित रुजलेल असेल तर बाळाला बॉटल मधून ओढायला काहीच इशु येत नाही. म्हणुन जर तुम्ही बॉटल फीड आणि ब्रेस्ट फीड दोन्ही करणार असाल तर अगोदर ब्रेस्ट फीड व्यवस्थित एस्टॅबिलिश केले जाते . आणि मग बॉटल इंत्रोड्युस केली जाते. (याला निपल कन्फ्युजन असेही म्हणतात. )

आरारा, तुम्ही डॉक्टर आहात वगैरे ह्या बद्दल आदर आहेच पण प्रत्येकवेळी तुमची पोस्ट पटेलच किंचा पटावीच असं अजिबात नाही. मी इथे ज्या पोस्ट्स लिहिल्या आहेत त्या स्वानुभावातून लिहिल्या आहेत आणि त्यावर ठाम आहे. त्यामुळे इग्नोअर.

बाटली विरुद्ध वाटीचमचा - यात हायजिनचा मुद्दा असल्याने जुन्या पिढीतले लोक आणि डॉक्स बाटली नको म्हणतात हे ठीके. पण आता दीडदोन हजारापासून चांगल्या दर्जाचे स्टरलायजर्स मिळतात की भारतात पण. झटपट आणि खात्रीशीर बाटल्या निर्जंतुक होतात. बालसंगोपनातील इतर खर्च बघता बहुतेक पालकांना आणखी दीडदोन हजार फार जड नसावेत असे वाटते.>>>
वरदा, मला नाही आहे ग प्रॉब्लेम. माझी मुलं फॉर्म्युला वर वाढली आहेत. LOL जस्ट टु बी क्लीअर. Happy
मी बाळ लहान असताना भारतात गेलेले तेव्हा असच तिथल्या डॉक ना उत्सुकता म्हणुन विचारलेल तव्हा डॉकच उत्तर होत ते. स्टरलायझर वगैरे सगळ्यांना परवडत नसतील. पाण्याची पण आपल्याकडे बोंब. तरीपण बाया आळशीपणाने बॉटल वापरत असतील आणि धुत वगैरे व्यवस्थित नसतील म्हणुन सरसकट डॉक सगळ्यांना सांगत असावेत असा माझा अंदाज.
खर तर मला हे खूप जाणवत हल्ली कि इथे खुप दिवस राहिल्यावर भारतात्ल्या लोकांमध्ये आणि आमच्यात विचारांची खुप मोठी दरी पडत चालली आहे. फक्त मुलांच्या संगोपनाबाबतीतच नाही तर अन्य बाबतीत ही.
भारतात अजुनही क्न्व्हिनिअन्स पैसे देवून घेता येतो हे जणु मान्यच नाही. त्या ऐवजी ते पैसे पुढच्या पीढी करता राखून ठेवण्याची टेंडन्सी दिसते. त्यामुळ जीवाला जेव्हढे कष्ट देता येतील तेवढे देणार.
हे आपण एवढ सगळ बडबडतोय पण कुणीही बदलण्याची शक्यता खुप कमी वाटते. सॅनीटरी नॅपकिन्स नेवून दिल्यावरही हे वापरण कसं चुकीचे आहे हेच मला ऐकविण्यात आल. बाळासाठी बाउंन्सर घेवून गेल्यावर पाठ वाकडी होईल म्हणुन वापरला नाही. फ्र्स्ट्रेटिंग. पण आता हे सगळ सतत पाहून आय गेव्ह अप. कधी कधी असले बाफ निघाल्यावर वैताग निघतो एवढच. पोस्ट खुपच जजमेंटल आणि जनरलाईज्ड झाली आहे याची जाणीव आहे. पण पर्सनल अनुभवांवर आधारीत आहे एवढ नक्की.

वर बरेच मुद्दे आलेले दिसतात.
भारतातल्या ३५ वर्षे अनुभव असलेल्या पेडी डॉक्टरांनी मुलीला डायपर वापरू नका असं अजिबात सांगितलं नाही. डायपर वापरताना काय काळजी घ्या हे नक्की सांगितलं (योग्य ते साईज, क्रीम, रॅशकडे लक्ष ठेवणे वगैरे). साधारण दोन वर्षांत पॉटी ट्रेनिंग वगैरे होऊन दिवसा आणि रात्री दोन्ही वेळचं डायपर सुटलं. शिवाय रात्रीची झोप हवी असेल तर मुलं जन्माला घालू नका वगैरे सल्लेही कधी दिले नाही. उलट बाळाची आणि तुमची किमान काही तास तरी सलग झोप व्हावी म्हणून फिडींग कॅलेंडर कसं अ‍ॅडजस्ट करा वगैरे बद्दल योग्य मार्गदर्शनही केलं होतं. भारतात डायपर्स बद्दल घरातल्या व्यक्ती वगळता भांडीवाल्या बायका, बाळाला अंघोळ घालायला येणार्‍या बायका, नातेवाईक वगैरे ह्याच मंडळींना जास्त प्रॉब्लेम असतात. शिवाय "बाळंतपण" ह्या विषयावर अगदी को णी ही सदैव सल्ले द्यायला तयार असतात.
वर टण्याने बाळ असतानाच्या सवयी प्रौढ वयातही सुरूच असण्याचं जे उदाहरण दिलं अगदी तेच आम्हांला डॉक्टरांनी बाटली, तोंडात बोट घालणे, दात उशिरा येणे वगैरे बर्‍याच बाबतीत सांगितलं होतं. Happy
कोणीतरी वर जेवणाबद्दल लिहिलं आहे. आम्ही जेवण भरवताना किंवा हल्लीही जर मुलगी खेळत किंवा इतर काही उद्योग करत बसल्याने जेवायला यायला उशीर लावत असेल तर आधी जेऊन घेतो. आपलं पोट भरलेलं असलं की चिडचिड होत नाही मुलाला भरवताना पेशन्स संपत नाही. (फ्लाईटमध्ये सांगतात तसं "दुसरोकी सहाय्यता करनेसे पहिले खुदका मास्क लगाईये"! )

तुम्ही डॉक्टर आहात वगैरे ह्या बद्दल आदर आहेच पण प्रत्येकवेळी तुमची पोस्ट पटेलच किंचा पटावीच असं अजिबात नाही. >>>> सायोला अनुमोदन. दुसरीकडचं फ्रस्टेशन कुठेतरी बाहेर काढण्याच्या हेतूने लिहिल्यासारख्या प्रत्येक ठिकाणी उगीच तडफफडक पोस्ट लिहील्या की ते नाहीच पटत.

सॅनीटरी नॅपकिन्स नेवून दिल्यावरही हे वापरण कसं चुकीचे आहे हेच मला ऐकविण्यात आल. बाळासाठी बाउंन्सर घेवून गेल्यावर पाठ वाकडी होईल म्हणुन वापरला नाही. फ्र्स्ट्रेटिंग >>>>> हे ही "बाळंतपणातले सल्ले" ह्याच कॅटेगरीतलंच झालं की! तुम्हांला काय करा हे सांगितलेलं आवडत नाही आणि तुम्ही तुम्हांला योग्य वाटेल तसच करता तसच त्यांचंही असेल. तुम्ही सल्ला द्यायचं काय केलतं पण तो ऐकायचा की नाही हे त्यांचं त्यांना ठरवू द्या की. त्यावरून आपण फ्रस्टेट कशाला व्हायचं? जे काय चांगल्या हेतूने करायचं होतं ते करून झालं, आता लोकांना ते नको असेल सोडून द्या.

"फ्लाईटमध्ये सांगतात तसं "दुसरोकी सहाय्यता करनेसे पहिले खुदका मास्क लगाईये"! " - हे प्रिन्सिपल मी बर्याच ठिकाणी वापरतो. स्वतःचं आणी समोरच्याचं, दोघांचं आयुष्य सुखी होतं.

मुळात बालसंगोपन वगैरे विषयात, मेडिकल वगळता, बाकी सल्ले कुणीही कुणालाही देऊ नयेत. प्रयेक बाळ आणी प्रत्येक आइ-बाप युनिक असतात.

परागला अनुमोदन.

>>> तुम्ही डॉक्टर आहात ह्याबद्दल आदर आहेच
पण तुम्ही जरा जास्तच ड्रॅमॅटिक होता सल्ले देताना कधीकधी. Happy

>>> मुळात बालसंगोपन वगैरे विषयात, मेडिकल वगळता, बाकी सल्ले
फेफ, ते 'मी कशाला चिडतोय' असं म्हणत चिडलेत ते मेडिकलवालेच आहेत. Happy

येस, आय नो. ते आपलं आ.रा.रां.ची मस्करी करायला. Happy
ते कळकळ वाटते म्हणूनच चिडतात, हे माहीत आहे, पण ते ड्रॅमॅटिक होतात त्याची जरा गंमत वाटते. Happy

वरदा +१
बाकी बाळाची शी-शू सोक करायला घरगुती कापड वापरणारे लोक (स्त्रीया) या सॅनिटरी नॅपकिन न वापरता असंच कापड वापरतात का? हा rhetorical प्रश्न आहे. उत्तर मनाशी द्या, इथे नको.

मुळात बालसंगोपन वगैरे विषयात, मेडिकल वगळता, बाकी सल्ले कुणीही कुणालाही देऊ नयेत. प्रयेक बाळ आणी प्रत्येक आइ-बाप युनिक असतात.>>>>>
फेफा Happy काय आहे ना लोक सल्ले देवू नका म्हणत इथेच 'सोडून द्या' वगैरे सल्ला देताहेत. जेव्हा कि मी आय गेव्ह अप अस लिहिलय. LOL . कसं होत ना बरेचदा ज्यांच्याविषयी आपल्याला प्रेम माया वाटते त्यांना सल्ले दिले जातात. हे जनरली माझ्या आवडत्या लोकांबाबतीत होतच. इतर जगाला सल्ले कशाला कोण देत बसतय. उद्देश्य मला फायदा होवून मी माझा त्रास कमी केला आता माझ्या आवडत्या माणसांचा त्रास कमी व्हावा हा असतो. सल्ले देणारच नाही वगैरे अस काळ पांढर निदान आपलं प्रेम असणार्‍या माणसांच्या बाबतीत माझं होत नाही. Happy

पण असो. मी दुसरीकडे लिहायला जाते. इथे काय म्हणायच होतं ते म्हणुन झालय.

अमितव, हा प्रश्न इथे विचारला जाईल असं वाटत होतं आणि नव्हतंही Happy उत्तर इथे देणं अर्थातच प्रशस्त नाही. पण सॅनिटरी नॅपकिनलाही चांगले, विनाकटकटीचे पर्यावरणस्नेही पर्याय नक्की उपलब्ध आहेत आणि वापरणार्या स्त्रियाही आहेत.

सीमा +१
गेल्या ट्रीपला मी मत प्रदर्शन केल्यावर अस़ंच जवळंचं कोणीतरी ते तिकडे (अमेरिकेत) चालतं. तिकडंचं इकडे चालणार नाही, हे पूर्ण ऐकून न घेता म्हणालं. आपणही सल्ले देणारी व्यक्ती होतोय असं वाटून गेलं मला.

असंच गंमत म्हणून आठवलं म्हणून सांगते.(त्यांना/मला नावं ठेवू नका.)
आमच्या मावस साबानी बारश्याला 50 घरगुती चांगल्या कापडाच्या शिवून घेतलेल्या नॅपीज चा पॅक देऊन मोठ्ठे डोळे करून(ते गुणसूत्र आनुवंशिक/बहीणवांशिक/मुलगावांशिक आहे ☺️☺️) 'अज्जिबात म्हणजे अज्जिबात घरी डायपर लावायचे नाहीत.100 नॅपीज देते.पाय कायमचे वाकडे होतील' असं सांगितलं होतं.(त्याच्या आधीच दुसऱ्या बऱ्यापैकी समंजस मावस साबानी 'लोक आता भरपूर सल्ले देतील.खूप वैताग येईल.ऐकून कानाडोळा करायचा आणि स्वतःला हवं तेच करायचं' असा सल्ला दिलेला असल्याने इग्नोरास्त्र मारले.

आता आपण ' लहान मुलांच्या बाबतीत सल्ले देणार्‍यांना सल्ले द्यावेत की नाही' या विषयावर बोलू Proud

सल्ले इग्नोर करून आपल्या मनाचे करा हाही एक सल्ला आहे.(यावरून खेळ कल्पनेचा या नाटकातले डॉक्टर चे भूत आठवले जे सर्व जादूचा उलगडा करून 'भूत बित जगात काही नसतं' असं सिद्ध करून लोकांना निश्चिन्त करून मरायला(म्हणजे अलरेडी मेलं असतं ती प्रोसेस पूर्ण करायला) जातं.)

>>> पॅरॅन्थिसिस कोणी पूर्ण केले की टडोपा होतं Lol

'खेळ कल्पनेचा' म्हणजे ते किशोर प्रधान वगैरे होते ते टीव्हीवरचं नाटक की काय? मी कितीतरी दिवस नाव आठवत होते!!

तो शब्द मराठी किंवा इंग्लिश मध्ये लिहिण्यापेक्षा दोन ची जोडी नेहमी क्लोज करत राहणं सोपं आहे. ☺️☺️

स्वाती, हो तेच ते.यात मुलीच्या तोंडात डिंक टाकून दातखीळ बसवलेली असते हे पाहून लहानपणी डिंकाचे लाडू खायची धास्ती बसली होती.

Pages