तुमचे आवडते सूत्रसंचालक कोण?

Submitted by गजानन on 29 June, 2011 - 04:51

मला हे सूत्रसंचालक आवडतात -

सोनू निगम
मंगला खाडीलकर
नीलेश साबळे
पल्लवी जोशी
रेणुका शहाणे

अमिताभ बच्चन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला सध्या अमेय वाघ, निपुण धर्माधिकारी आणि मिथिला पालकर पण आवडतेय. मोस्टली सेन वाली प्राजक्ता कोळी प्रयत्न करतेय पण तितकी भावली नाहीये अजुन तरी

नव्या पिढीतले सूत्रसंचालक हे पाहुणे विंगेतून मंचावर आल्यावर त्यांची ओळख करून देतात आणि मग पाहुण्यांना चक्क "तुम्ही आता जाऊ शकता" असे सांगतात. निदान 'आपण आता आसनस्थ व्हावे.' असे तरी म्हणावे.
असो! हे तर काहीच ना ऽऽऽऽ य!

फिल्मफेअर पुरस्कार होतात का अजूनही? कोण अस्स्ते तिथे सूत्रसंचालनाला.. अजूनही शाहरूख.. की कपिल शर्मा, करण जोहर वगैरे.. गेले दोन चार वर्षे पाहिले नाही. कोरोनात कदाचित झालेही नसतील.

मराठीमध्ये संकर्षण कऱ्हाडे आवडतो सूत्रसंचालक म्हणून, सद्ध्या सुरू असलेल्या कार्यक्रमांमध्ये.

पाहुण्यांना चक्क "तुम्ही आता जाऊ शकता" असे सांगतात. निदान 'आपण आता आसनस्थ व्हावे.' असे तरी म्हणावे.
असो! हे तर काहीच ना ऽऽऽऽ य!>>>+११११११

Pages