वेदांमधील अद्भुत विज्ञान

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 3 October, 2018 - 01:56

आपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे ? आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे ?

सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत वापरून सिद्ध करतो हि सगळी तार्किक दृष्टी आहे. आपला हा सुद्धा दावा आहे कि मानवाने ३०० वर्षात अफाट प्रगती केलेली आहे.

सूर्य-चंद्र ग्रहणे, कोणत्या दिवशी, नेमक्या कोणत्या वेळी, जगात कुठे, कशी दिसतील याची अचूक गणिते या सिद्धांताच्या आधारे आपण गेली तीनशे वर्षे करीत आहोत. असा आपला दावा आहे.

ज्या माणसाला वेद म्हणजे काय आहे हे माहित नाही. ज्या माणसाला उपनिषदे म्हणजे काय हे माहित नाही. ज्या माणसाला प्राचीन भारतीय गणिती पद्धत म्हणजे काय हे माहित नाही. ज्या माणसाला प्राचीन भारतीय खगोलशास्त्र, अंतराळशास्त्र काय हे माहित नाही त्या माणसाला हा लेख वाचून विज्ञानाबद्दल प्रेमाचे भरते येणे स्वाभाविक आहे. परंतु हे सगळे अर्ध सत्य आहे. मध्यंतरी एका विद्वानाने अशीच टिप्पणी केली होती सगळे काही वेदात असेल तर तुम्ही पुढचे १० -१५ शोध आजच लावा कि, विज्ञान हे शोध लावण्याची वाट का पहात बसला आहात.
तर विज्ञान विरुद्ध प्राचीन भारतीय ज्ञान / अध्यात्म या विषयावर आपण मुद्देसूद, पुराव्यांच्या सह चर्चा करूया. विज्ञानाचे जे प्रेमी असतील त्यांनी आवर्जून हा लेख वाचावा माझ्या मुद्द्यांच्या बद्दल काही आक्षेप असतील ते नोंदवावे. आणि जर माझे मुद्दे योग्य असतील तर मान्य करण्याचा मोठेपणा सुद्धा दाखवावा.

१) कुतुब मिनार च्या समोर एक लोहस्तंभ आहे. २२ फुट उंच सुमारे ६.५ टन वजन असणारा wrought iron अर्थात ओतीव लोखंडाचा बनलेला स्तंभ. ज्याचे वय कमीत कमी १६०० वर्षे आहे. ज्याच्यावर एक अत्यंत पातळ असे आवरण चढवले आहे ज्यामुळे गेली १६०० वर्षे या खांबाला गंज लागलेला नाही. आय आय टी कानपूर च्या धातू तज्ञांनी अभ्यास करून एका विशिष्ट रासायनिक प्रक्रियेचा उल्लेख केला आहे ज्याचे आवरण फक्त १० micron आहे त्यामुळे हा स्तंभ अजूनही गंज पकडत नाही.

आपल्या महान वैज्ञानिक प्रगती चे मापदंड असणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या कारला सुद्धा मुंबईच्या खाऱ्या वातावरणात ३ ते ५ वर्षात बुडाला भरपूर गंज लागतो आणि मुंबईतील जुनी कार नेहमीच निम्म्या किमतीला विकली जाते. १६०० वर्षांच्या पूर्वी जिवंत असणारी अंधश्रद्धाळू विज्ञान परान्मुख माणसे जे करून गेली आहेत त्याची नक्कल तरी करण्याची आजच्या वैज्ञानिकाची आणि त्यांच्या समर्थकांची तयारी आहे कां ???
२)लेपाक्षी मंदिर आंध्र प्रदेश. या मंदिरात एक दगडाचा स्तंभ ( column ) आहे तो अधांतरी आहे. त्या खांबाच्या खालून आपण एक इंच जाडीची कोणतीही वस्तू फिरवून त्याची खात्री करून घेऊ शकतो. याच पद्धतीचा दीपस्तंभ मी विजयनगर साम्राज्यात सुद्धा पहिला होता. एक मेकानिकल इंजिनियर म्हणून मी तो कसा बनवला असेल हे नक्की सांगू शकतो. सुमारे १० टन वजन असणारा एक २ फुट व्यास असणारा दगड घ्या. त्याच्यावर तुम्हाला हवे तसे नक्षीकाम करा ( सुमारे ५ ते १० वर्षे लागणार हे करायला पारंपारिक हत्यारे वापरून. ) नंतर त्या खांबाच्या एका बाजूला एक मोठे गोल भोक करा त्यात लोहकांत दगड ( चुंबकीय गुणधर्म असणारा दगड ) घट्ट ठोकून बसवा. नंतर जिथे हा स्तंभ उभा करायचा असेल तिथे जमिनीत या दगडाचे वारा, पाउस, उन, वादळ या सगळ्या प्रकारात सुद्धा रक्षण करू शकेल इतका मजबूत पायाचा दगड बसवा त्यात तितकाच मजबूत पायाचा लोहकांत दगड ठोकून बसवा. आता या दोन्ही लोह्कांत दगडांचा असा संयोग हवा कि त्यांनी परस्परांना दूर तर लोटले पाहिजे पण ते स्थिर सुद्धा राहिले पाहिजेत ( १० टन वजनाचा दगड घेऊन आजच्या कोणत्याही वैज्ञानिकाने हे करून दाखवावे ) मग खालील दगडावर हा वरील दगड ढकलत ढकलत आणा दोन्ही दगड एकमेकांच्या चुंबकीय क्षेत्रात आले कि ते स्थिर होतील. आणि नंतर १००० वर्ष तसेच राहतील.. ( अजून किती काळ राहतील ते माहित नाही ) असा अफलातून तंत्रज्ञानाचा वापर करणारी मंडळी निर्बुद्ध होती ? त्यांना विज्ञान तुमच्या न्यूटन पेक्षा कमी समजत होते असे तुमचे मत आहे का ? बर हे करणारी मंडळी कलाकार होती, शिल्पी होती, तुमच्या पुरोगामी भाषेत बहुजन.. ब्राह्मण सुद्धा नव्हती तरी त्यांचे गणित, विज्ञान आणि निसर्गाचा अभ्यास इतका पक्का होता कि ती मंडळी या गोष्टी लीलया करत होती.
३) महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर किरणोत्सव : आदिमाया महालक्ष्मीचे हे मंदिर कमीत कमी १००० वर्ष जुने आहे. या मंदिरात भूगोलाचा अभ्यास करून मुख्य द्वार असे बनवले आहे कि दर वर्षी विशिष्ट नक्षत्र असताना सूर्याचे पहिले किरण हे देवीच्या पायावर पडते आणि जसा सूर्य वर वर जातो ती किरणे तिच्या मुखापर्यंत पोचतात. हा सोहळा किरणोत्सव म्हणून ओळखला जातो. ज्या लोकांनी हे मंदिर बांधले त्यांचा भूगोल अत्यंत पक्का असल्या शिवाय आणि त्यांचे गणितीय ज्ञान अत्यंत चपखल असल्याशिवाय हे शक्य होऊ शकेल ? आज असेच एक मंदिर उभे करायचे ठरले तुमचे शास्त्रज्ञ सध्या ज्ञात असणारी साधने आणि तंत्रज्ञान घेऊन सुद्धा १००० वर्ष टिकेल अशी वस्तू निर्माण करू शकतील ? आणि याच पद्धतीचा किरणोत्सव तुमच्या न्यूटन च्या मूर्तीवर पाडून दाखवू शकतील ?

४) कैलाश मंदिर वेरूळ : वेरूळ येथील लेणीनच्या मध्ये असणारे कैलास मंदिर हे जगातील पहिले आधी कळस मग पाया या पद्धतीने बांधलेले मंदिर आहे. ७व्या शतकात बांधलेले हे मंदिर एकाच शीलाखंडाला पूर्णपणे कोरून बनवले आहे. कमीत कमी तीन पिढ्या या मंदिराच्या निर्मितीसाठी राबल्या आहेत. त्या काळातील लोकांना एकच इतका मोठा दगड कसा ओळखू आला असेल. त्याचे माप कसे कळले असेल कि त्यांनी बरोबर तीन मजली मंदिर उभे केले. आधी कळस मग पाया पद्धती वापरून बनवलेले हे एकमेव मंदिर म्हणजे शिल्पकलेचा आणि तत्कालीन लोकांच्या भूमीच्या गर्भाच्या अभ्यासाचा एक जिवंत नमुना आहे.

५) बाण स्तंभ. सोरटी सोमनाथाचे सुप्रसिद्ध मंदिर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे हे मंदिर गझनीच्या मोहमदने १७ वेळा लुटले होते. या मंदिरात एक बाणस्तंभ आहे. त्या स्तंभावर संस्कृत मध्ये असे कोरले आहे कि या स्तंभापासून अंतर्क्तिका पर्यंत सरळ रेषा मारली तर भूमी लागत नाही. या लेखासोबत त्याच्या लिंक सुद्धा दिल्या आहेत. गुगल map चा फोटो सुद्धा दिला आहे. त्या काळातील लोकांच्याकडे आज असणारी कोणतीही सामुग्री नसताना सुद्धा ते या पद्धतीची घोषणा कशी काय करू शकले असतील ??? आज च्या विज्ञानाकडे याचे उत्तर आहे ??? त्यांनी नक्की कोणती यंत्रे, कोणती तंत्रे वापरली असतील ज्यामुळे त्यांना हे ज्ञान प्राप्त झाले ???

६) मीनाक्षी टेम्पल मदुराई : सुमारे २५०० वर्ष जुने मंदिर. बांधकाम करताना ३० ते ३५ टन वजनाच्या शिळा हत्तींच्या सहाय्याने ढकलत आणून निर्मिती केलेली आहे. या मंदिरात सहस्त्रखंबी मंडप आहे. त्यात ९८५ खांब आहेत आणि त्यातील काही खांबांवर आपण नाणे वाजवले तर सा ते नि असे सप्तसूर ऐकू येतात. मी मध्यंतरी डिस्कव्हरी वर एक कार्यक्रम पाहिला होता ज्यात या मंदिराचे वर्णन आहे. त्यात त्यांना सुद्धा हाच प्रश्न पडला कि २५०० वर्षांच्या पूर्वी ३० टन वजनाचा दगड कसा हलवला असेल. त्या साठी त्यांनी एक दगड आणला सुमारे २५ टन वजनाचा कारण आजच्या वैज्ञानिक दृष्ट्या प्रगत भारतात दगड वाहण्यासाठी असणारा सगळ्यात मोठा ट्रेलर सुद्धा २५ टन वजनच वाहून नेऊ शकतो. आणि जुन्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे त्यांनी लाकडी ओंडके तासून गोल केले त्यावर तो दगड टाकून त्यांनी हत्तींचा वापर करून ढकलून पहिले आणि त्यांना तसे करता आले . ( ज्याला आपण तरफ चे तत्व किंवा लिव्हर आर्म प्रिन्सिपल म्हणतो त्याच तत्वाचा वापर करून हि अत्यंत अवजड वस्तू हत्तींनी लीलया ढकलून दाखवली )

७ ) कोणार्क चे सूर्य मंदिर : संपूर्णपणे लोह्कांत दगड वापरून बनवलेले मंदिर म्हणजे कोणार्क चे सूर्य मंदिर. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे लोह्कांत दगड एकमेकांचे magnetic forces balance करून घट्ट बसवले होते. त्या नंतर त्यावर शिल्पे घडवली. मंदिराचा कळस हा सुद्धा लोह्कांत दर्जाचा होता आणि तो कळस संपूर्ण मंदिराचे magnetic forces control करत असे. या मंदिराच्या आत जे राशी चक्र काढले होते ते या पद्धतीचे होते कि रोज सूर्य उगवताना ज्या राशीत असेल त्या राशीवर बरोबर सूर्याचे पहिले किरण पडणार. अर्थात रोज राशी बदलला अनुसरून किरणांची जागा बदलणार. कल्पना करा याला भूगोल आणि स्थापत्याचा काय दर्जाचा अभ्यास लागला असेल.
या मंदिराची मला माहित असणारी कथा सांगतो. हे मंदिर समुद्र किनाऱ्याच्या जवळ आहे. आणि त्या भागात समुद्र किनारा अत्यंत खडकाळ आहे. या किनाऱ्याजवळ येणारी जहाजे त्यातील लोखंड या magnetic forces ने ओढली जाऊन खडकावर आपटून फुटून जात असत. ज्यावेळी वास्को द गामा भारतात आला त्याच्या दोन पैकी एका जहाजाचा याच पद्धतीने खडकावर आदळून अंत झाला. त्याला यात मंदिराचा काही तरी परिणाम आहे हे लक्षात आले त्याने जहाजावरून तोफा डागल्या. त्यामुळे मंदिराचा कळस निखळला. कळस निघाल्याने सगळे magnetic forces unbalance झाले आणि मंदिर जवळ जवळ उध्वस्त झाले. नंतर ब्रिटीश कालखंडात ब्रीटीशांना कल्पना होती कि आपण हे मंदिर पूर्ववत करू शकत नाही. त्यांनी मंदिराच्या गर्भगृहात चक्क कॉन्क्रीट ठासून भरले.
आजच्या महान विज्ञान आणि वैज्ञानिकांना आवाहन आहे. ते कॉन्क्रीट काढा आणि पुन्हा ते मंदिर पूर्ववत करून दाखवा.

८) हि माझी पोपटपंची नाही. विकिपीडियाच वराह मिहीर चे गणितातील योगदान सांगतो आहे. सदरील ऋषींच्या बद्दल अजून एक ज्ञात बाब म्हणजे ते सूक्ष्म देह धारण करून ( यावर विज्ञानाचा बिलकुल विश्वास नाही ) अंतराळात भ्रमण करत असे. आणि त्यांनी काही श्लोक लिहिले आहेत ज्यात त्यांनी तुम्ही अंतराळात प्रवास करत असला आणि तुम्हाला जिथे आहात तेथून सूर्य अथवा पृथ्वी दोन्ही सुद्धा दिसत नसेल तरीपण आपले लोकेशन ( स्थान ) कसे ओळखावे आणि प्रवास करावा यावर मार्गदर्शन केलेले आहे.

मध्यंतरी डिस्कव्हरीवर मंगलयान सफल झाल्यावर एक कार्यक्रम दाखवला गेला. त्यात नासा पहिली प्रयत्नात का अपयशी झाली याची चर्चा होती. आणि भारत का सफल झाला याचे सुद्धा विवरण होते. मंगलयान मंगल ग्रहाच्या कक्षेत स्थिर करताना एक समस्या वर सांगितल्या प्रमाणेच उद्भवली कि मंगल यान मंगल ग्रहाच्या उलट बाजूला होते. एका बाजूला सूर्य अन दुसऱ्या बाजूला पृथ्वी होती यानाला या पैकी काहीही दिसत नव्हते. या ठिकाणी वराह मिहीर ने सांगितलेली पद्धत वापरून प्रोग्राम बनवला होता आणि तो परफेक्ट होता त्या प्रमाणे मंगल यान सफलपणे मंगळावर उतरले.

आचार्य कणाद ज्यांनी अणु त्याच्या गर्भातील छोटे पार्टिकल यांच्यावर शास्त्रीय भाष्य केलेले आहे. आणि हा लेख वाचा. मी सांगत नाही तज्ञ अश्या पाश्चात्य विद्वानांनी सुद्धा यावर शिक्का मोर्तब केलेलं आहे.

१०) वैदिक गणित, आपले पंचांग आणि त्यावर आधारित पर्जन्य मानाचे अंदाज:
गणित हा भारतीयांनी जगाला दिलेला शोध आहे. शून्यावर आधारित गणमान पद्धती हि भारताची देण आहे. भारतातून हे ज्ञान मध्य पूर्वेला गेले अरब लोकांनी ते युरोपात नेले. त्यामुळे गणिताला युरोपियन लोक अरेबिक म्हणत आणि अरबी लोक हिंदसा म्हणत अर्थात हिंद मधून आलेली गणन पद्धत. यावर आधारित आपले पंचांग हे आज सुद्धा सगळ्यात परफेक्ट आहे. आपल्याकडे पर्जन्यमान दर्शवणारे जितके ग्रंथ आहेत ते नक्षत्रांची स्थिती आणि त्यानुसार पर्जन्य आणि येणारे पिक हा अंदाज वर्तवतात तो अंदाज आपल्या हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा अधिक चांगला असतो.

११) ज्या विज्ञानाच्या यशाच्या आपण गप्पा मारत असतो त्याचा पाया उत्तम गणिती ज्ञान हा आहे आणि त्यात भारतीय खूप आधी पासून तज्ञ आहेत. आज तुम्ही गणिताचे ऑलिम्पियाड जिंकलेल्या कोणत्याही मुलाला विचारा तू काय करणार तो सांगतो मी पाय चे मूल्य अधिकाधिक चांगले मांडणार. पाय हा वर्तुळाचा व्यास मोजण्यासाठी वापरला जाणारा स्थिरांक आहे.
पाय चे मूल्य ३२ अंशापर्यंत या श्लोकातून समजते. पाय चे मूल्य शुल्बसूत्रातून काढले गेले आहे. आधुनिक विज्ञानाने पाय चे मूल्य २२ अंशापर्यंत काढले आहे.

१२) आपण गणन करण्यासाठी जी पद्धत वापरतो त्यात इंग्रजी अक्षरात
trillion च्या पुढे गणना नाही. आपल्या पद्धतीत. पद्म, महापद्म, अर्व, खर्व पर्यंत गणन करण्यासाठी शब्द आहेत.

१३) प्राचीन भारतातील हि सात शिव मंदिरे एकाच अक्षांशाला संदर्भ घेऊन बांधली आहेत. सर्व मंदिरे एकमेकांच्या पासून कमीत कमी काही हजार किलोमीटर दूर आहेत. असे असताना त्यांना ती एका रांगेत बांधता आली याचा अर्थ त्यांचे भूगोलाचे आणि अक्षांश आणि रेखांशाचे ज्ञान किती परिपूर्ण होते याचे द्योतक आहे.
मी इथे दिलेली माहिती म्हणजे सागरातील काही थेंब आहेत. शक्यतो प्रत्येक मुद्याचे स्पष्टीकरण सुद्धा देण्याचा प्रयत्न केला आहे. आधुनिक विज्ञान म्हणजे कचरा आहे असे माझे बिलकुल मत नाही. आधुनिक विज्ञानाची दृष्टी वेगळी आहे. प्राचीन ऋषींची दृष्टी वेगळी होती. त्यांच्या दृष्टीत लोककल्याणाची तळमळ अधिक होती. त्यांची दृष्टी अधिक निसर्गपूरक होती. दुर्दैवाने सध्याचे विज्ञान हे निसर्गाला आव्हान देण्यासाठी विकसित होते आहे. भारतीय ऋषींनी विकसित केलेले विज्ञान हे निसर्ग आणि मानव यांनी शांततापूर्वक सहजीवन व्यतीत करावे असे होते.
याठिकाणी मला चीनमधील एक महान विचारवंत कान्फूशियस याचे एक वाक्य उधृत करायचे आहे. तुम्ही निसर्गाच्या नियमांना बांधील राहून काही निर्माण केले तर निसर्ग ते टिकण्यास मदत करतो. तुम्ही निसर्गाला आव्हान देऊन काही निर्माण केले तर निसर्ग ते उध्वस्त करण्याच्या उद्योगाला लागतो. आपले आजचे विज्ञान असे संहारक होऊ लागले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपण पर्यावरणाच्या बदलांशी झुंजतो आहोत.

मी अध्यात्माच्या मार्गावर चालणारा एक छोटा पांथस्थ आहे. मला स्वतःला प्राचीन विज्ञान आणि अर्वाचीन विज्ञान असा लढा उभा करण्यात काहीही रस नाही.

पण इथे मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते आपल्या देशात चार प्रकारचे लोक आहेत. पहिल्या प्रकारात त्यांना भारतीय आणि त्यातल्यात्यात हिंदू म्हणून जन्माला आलो याची लाज वाटते. त्यांना आपले सगळे जुने ज्ञान म्हणजे कचरा वाटतो आणि ते पाश्चिमात्य ज्ञानाच्या प्रेमात पडलेले असतात. दुसऱ्या प्रकारातील लोक स्वार्थी असतात. त्यांना वेद आणि प्राचीन ज्ञान यातील शून्य माहिती असते परंतु काहीही असले तर ते वेदात आहे म्हणून हि मंडळी ठोकून मोकळी होतात. त्यांचे वेद आणि प्राचीन ज्ञानाच्या बद्दलचे प्रेम बेगडी आणि स्वतःची तुंबडी भरणारे आहे. तिसऱ्या प्रकारातील लोक श्रद्धाळू असतात. लोक म्हणतात म्हणजे वेदात काही तरी भारी असेल असा विचार करून ते गप्प बसतात हि पाप भीरु मंडळी असतात. आणि स्वार्थी लोक यांनाच फसवतात. चौथ्या प्रकारात माझ्या सारखे लोक असतात. जे आपली मती वापरून या प्राचीन ज्ञान सागरातील एक दोन थेंब जरी मिळवता आले तरी त्याची चव कृतज्ञपणे चाखतात...
माझा लेख सर्वत्र प्रसारित करण्यास काहीही हरकत नाही..

वैज्ञानिक विचारसऱणी वर आधारित असलेल्या हिंदू धर्मात माझा जन्म झाला याचा मला अभिमान वाटतो .

*संकलित - साभारः सुन्दर मराठी

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या लेखातले गृहीतक असे आहे की आपण भारतीय आपल्या उपखंडीय पूर्वजांना बुद्दू मानतो, पण ते बुद्दू नव्हते तर खूप बुद्धिवान होते. मी यात एक छोटीशी भर घालीन. " जगाच्या पाठीवर पंचखंडांमध्ये कोठेही कोठल्याही मानवाचे पूर्वज बुद्दू नव्हते." दोन हजार वर्षांपूर्वी रोमन साम्राज्यात सुंदर घडणीचे महाल, शिल्पे, प्रार्थनालये, सभागृहे, क्रीडागृहे, अक्वेडक्ट सारखे पाण्याचे नळ वगैरे बांधले गेले. इजिप्शियन आणि चिनी संस्कृतीतही तेच. एकाच प्रकारचे तंत्रज्ञान अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे, अनुकरण न करता उदयास आले. तेव्हा आम्हीच काय ते हुश्शार होतो आणि तेव्हा जग रानटी टोळ्यांच्या अवस्थेत होते हा गैरसमज आहे.

कुठलाही रिसर्च करायला लागणाऱ्या तीन गोष्टी - वेळ, पैसा आणि चिकाटी. या तिन्ही गोष्टींची भारतात काही कमतरता आहे असे वाटत नाही. मग हे का झाले नसेल>>>
"कमतरता आहे असे वाटत नाही" वेल नॉट अग्री विथ दिस. पैसा आणि चिकाटी नाहिये, फक्त वेळ भरपुर आहे, आणि तो फुकट मिळणार्‍या नेटवर आम्ही घालवतो. पुर्वी चौकात उभे राहुन/बसुन, विड्या फुकत, किंवा फुढार्‍यांच्या पुढे मागे करत घालवत होतो.

एकाच प्रकारचे तंत्रज्ञान अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे, अनुकरण न करता उदयास आले. तेव्हा आम्हीच काय ते हुश्शार होतो आणि >>>>>>

Heera याला आधार देऊ शकाल का?
माझ्या वाचना नुसार मोठ्या होड्यातून आलेल्या लोकांनी इजिप्तशिअन लोकांना पिरॅमिड बांधण्यास मदत केली असे आले आहे,
या होड्यातून आलेल्या लोकांचा मुख्य गौरवर्णी असून हातात नांगर घेतलेला होता, त्याची आठवण म्हणून इजिप्तशिअन राजे आपल्या मुकुटात नाग प्रतिमा ठेवतात (बलराम शेषाचा अवतार मानला जातो)
तसेही महाभारताचा काळ मिरमिडच्या च्या काळाशी जुळतो

तेव्हा कशावरून सगळीकडे हे ज्ञान स्वतंत्र पणे उदयाला आले? कशावरून आपल्याच (वैदिक हिंदू )लोकांनी बाकीच्या जगाला विद्या दिली नाही?

स्वामीजी, आगे बढो हम तुम्हारे साथ है,

तशाही, कँबोडिया पासून दक्षिण अमेरिके पर्यंत हिंदू धर्माच्या खुणा सापडतात, मग तिकडे उदयाला आलेलं ज्ञान आपलेच आहे असे का म्हणू नये?

हो माझ्याशी वाचनात आलेलं की विठठल विठली चा अपभ्रंश होत इटली झाले
आणि व्हॅटिकन हे मूळचे विठुकान्ह होते

वेदांच्या आधीही जे अतीप्राचीन ज्ञान होते त्याबद्दल कुणाला काही माहिती आहे का ? (संधी देतोय. फोडत नाही)
मलाच सांगावे लागेल ही वेळ येऊ नये ही इच्छा.

वेदांच्याही आधी छेद होते. त्याबरोबर किरण्यके, किरण्योपनिषदे स्वामी किरणानंद महाराजांनी लिहीलेली होती. स्वामी किरणानंद म्हणजे ब्रह्माचे निर्माते ज्याने सृष्टी निर्माण केली. सृष्टीआधी वेद होते . त्याआधी छेद होते. म्हणजे स्वामी किरणानंद हेच या विश्वाचे केंद्रक होय. त्यांनी किर्णाद नावाने
अफाट विश्वाचे अंतरंग या नावाचा ग्रंथ लिहीला. तसेच विश्वातील अती सूक्ष्म कणाचे अंतरंह हा ग्रंथ लिहीला जो रुदरफर्डला सापडला. यात किर्णाद यांनी अणुस्फोट कसा केला याची माहिती दिलेली आहे. हीच ती बिग बँग थिअरी. अणू कसे निवडावेत, कुठल्या अणूचा किती स्फोट होतो याचे ज्ञान या ग्रंथात आहे. त्यासाठी एन छैदीक गाळणीही त्यांनी तयार केली होती. असे म्हणतात ती पळवण्यासाठी सीआयए आणि केजीबी मधे युद्ध झाले. छैदीक गाळणी मिळण्यासाठी रशिया कितीही पैसे द्यायला तयार झाला होता. त्या वेळी काही भुरट्यांनी इतकी मोठी रक्कम रशियाकडून वसूल केली कि तो देश कर्जबाजारी झाला आणि त्या बदल्यात शेवटी एक गुजराती चहाची गाळणी पदरात पडली.

किरणानंद स्वामींनी किरणुद्दीन ला जन्म दिला. तो तेजाचा गोळा होता. त्यापासून अनेक किरणुद्दीन बनू शकत व कुठेही त्यांना पाठवता येत असे. किरणुद्दीनचे अपत्य किरणुद्दीनच असे. तसेच अवतारही किरणुद्दीन घेत असे.

इजिप्तचा प्रवासी हब्त ए दिलेखात्मा याच्या प्रवासात एका किरणुद्दीनने दिल्लीतला कुतूबमिनार करंगळीने (हाताच्या) उभा केला याची नोंद आढळते.

तर चीनचा एक प्रवासी शाओ मी ओप्पो याच्या प्रवासवर्णनात तत्कालीन किरणुद्दीनने शिळेतून मंदीर कसे उभे केले आणि वरून खाली कसे खोदले याच्या कहाण्या आहेत. वरून खाली खांब कोरताना त्याने एका खांबाच्या खाली नखाने पोकळी तयार केली. याचा उद्देश जरी समजला नसला तरी काही किरणुद्दीन खोडसाळ असल्याचे उल्लेकही आढळले आहेत. आता ज्याप्रमाणे या फटीवरून लोक स्वर्ग गाठतात ते पाहता हेतू खोडसाळ असला पाहीजे हे समजते.

महाभारतपूर्व कालात केस कापण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे स्त्रीपुरूष सर्वांचेच केस लांबसडक असत. किरणुद्दीनचे केस खूपच वाढले होते. ऋषी मुनींसारखे एकावर एक शंभर बुचडे बांधूनही उपयोग होत नव्हता. तेव्हां किरणुद्दीनने जंगलात एका सिंहीणीला आपले केस तोडून द्यायची विनंती केली. तिने ते केस खांद्यापासून खाली वेगळे केले. त्याचक्षणी वादळ आले आणि केस उडून गेले. ते जिथे जिथे पडले त्यास अक्षांश आणि रेखांश असे म्हटले जाऊ लागले. त्यामुळे पृथ्वीलाही कसे फिरावे याचे ज्ञान झाले. नाहीतर ती कशीही फिरत होती. किरणुद्दीनचा एक केस तेजस्वी होता. तो सोनेरी असून त्यातून प्रकाश बाहेर पडायचा,

असे म्हणतात की त्या रेषेवर काही मंदीरे बांधली गेली.
सध्या इथेच थांबतो. अतीप्राचीन काळाबाबत कुणाला काही शंका असतील तर विपूत विचाराव्यात.

कोणी काही बोलायच्या आत मी स्पष्ट करतो की किरणुद्दीन माझा किंवा मी किरणुद्दीन यांचा डु आयडी नाही.

वास्को द गामा भारतात आला तेव्हां हे मंदीर केरळात होते की ओरीसा सध्याच्या केरळच्या जागी होते ? कदाचित वास्को हाच काळापहाडचा वेष घेऊन आला असेल आणि मुद्दाम फसवायला केरळात गेला असेल. खरे तर ओरिसा पहिल्यांदा येते मग केरळ हे का त्यास ठाऊक नसेल ?

टवणे सर, चांगल्या पोस्ट्स

मागच्या पानावर पशुपत यांनी तळपदेंच्या विमान प्रयोगाबफ्फल लिहिलंय. वेदांतल्या विमानशास्त्राबद्दल कॅप्टन आनंद बोडस यांनी इंडियन सायन्स काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनात त्यांचा पेपर(?) वाचला होता. त्यात त्यांनी महर्षी भारद्वाज यांनी लिहिलेल्या वैमानिक शास्त्र या प्राचीन (वेदकालीन) ग्रंथाचा आणि त्यावर आधारित तळपदे प्रयोगाचा हवाला दिला होता.
पण इंडियन इन्स्टिस्ट्यूट ऑफ सायन्सच्या संशोधकांनी हा वैमानिक शास्त्र किंवा बृहद विमान शास्त्र नामक ग्रंथ वेदकालीन नसून अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच कुणा सुबय्या शास्त्रींकरवई लिहिला गेला असल्याचे दाखवून दिले आहे.

शिवाय तळपदेंच्या प्रयोगाची बातमीही १९५२ मध्ये लिहिली गेली असे मानायला जागा आहे. १८९५-१९०५ दरम्यानच्या केसरीच्या अंकांत अशा कोणत्याही प्रयोगाचा उल्लेख सापडलेला नाही.

कुतुबमिनारजवळचा न गंजणारा लोहस्तंभ : ह्याबद्दल काही शंका.
१. इतके बहुगुणी, न गंजणारे लोखंड आपण बनवू शकत होतो तर त्याचा निव्वळ एक निरुपयोगी स्तंभ बनवण्याऐवजी उपयुक्त वस्तू जसे शस्त्रे, तलवारी, भाले, तोफा वा उपकरणे जसे नांगराचे फाळ, विळे, कोयता, खोरे, कुदळ, साखळदंड, बैलगाडीच्या चाकाच्या धावा, खिळे इत्यादी का नाही बनवले?
२. अशा प्रकारचे गंजनिरोधक थर लावलेले लोखंड कसे बनवायचे ह्याचे तपशील वेद वा अन्य कुठल्या प्राचीन हिंदू ग्रंथात आहे का?
३. हे गंजनिरोधक थर लावलेले लोखंड पहिल्यांदा कुणी बनवले, कधी बनवले ह्याविषयी काही माहिती आहे का?

अशा प्रकारचा लोहस्तंभ जर अख्ख्या जगात नसेल तर तो परग्रहवासियांनी आपली खूण म्हणून दिला नसेल कशावरून.

शेंडे नक्षत्र .. भारी
हा लोहखांब एका मुस्लीम बादशहाने बनवला. ते पण वेद वाचत असतील तर त्यांना धर्मनिरपेक्ष म्हणायला काय हरकत आहे ? आता प्रश्न असा आहे कि मुसलमान, ख्रिश्चन यांनाच वेदातले विज्ञान का बरे कळायचे ? हिंदू राजांची मती गुंग असायची का ? किमान कुतुब असे ज्या मिनारचे नाव आहे त्याचा दाखला वेदातले विज्ञान सांगताना टाळला असता तर ? त्या ऐवजी मल्लखांब घ्यायचा ना.

>>१२) आपण गणन करण्यासाठी जी पद्धत वापरतो त्यात इंग्रजी अक्षरात
trillion च्या पुढे गणना नाही. आपल्या पद्धतीत. पद्म, महापद्म, अर्व, खर्व पर्यंत गणन करण्यासाठी शब्द आहेत
<<
हा दावा अत्यंत हास्यास्पद असून सत्यतेच्या कसोटीवर टिकणारा नाही.
Quadrillion, Quintillion, Sextillion, Septillion, Octillion, Nonillion, Decillion इ.
https://en.wikipedia.org/wiki/Names_of_large_numbers
इंग्रजी भाषेतील विज्ञान व गणित हे अत्यंत विकसनशील आहे. जसे लागेल तसे, वेळप्रसंगी अन्य भाषांतून उसनवारी करुन नवे शब्द निर्माण करुन ते आपलेसे करण्यात इंग्रजी आघाडीवर आहे. त्यातूनच हे महाप्रचंड आकडे जन्माला आले आहेत.

लोहस्तंभ का उभारला गेला असेल, याचे स्पष्टीकरण हवे असेल, तर वेदांचा अभ्यास करणार्‍यांनी सिंधु संस्कृतीच्या संदर्भात जे लेक्चर दिलं आहे, ते पुढील व्हिडिओत पहा. एकूण तीन व्हिडिओ आहेत आणि छोट्या कालावधीचे आहेत. तिन्ही व्हिडिओ सलग पाहिले, की या प्रश्नाचं उत्तर मिळेल.

भाग पहिला - https://youtu.be/jfW4iLBgxg8

भाग दुसरा - https://youtu.be/8GA29oqlCko

भाग तिसरा - https://youtu.be/dqKOtc2gKTs

आधी प्रतिसाद देतो मग व्हिडीओ बघतो वेळ मिळाला की.
आम्हाला दिल्लीतली पर्यटन स्थळे दाखवायला एक सुंदर पंजाबी मुलगी गाईड म्हणून लाभली होती. त्यामुळे दिल्लीची एक वेगळीच इमेज अजून डोक्यात आहे. पण काही काही ठिकाणी तिने आमचं ब्रेनवॉशिंग करायला सुरूवात केली. कुतूब मिनार पांडवांचा असून त्यावर मुसलमानांनी आपली मोहर उमटवली. पुरानी मस्जीद म्हणजे मूळची पांडवांनी बांधलेली मंदीरे हे सांगताना तिने पायामधे अजिंठ्याप्रमाणे कोरीव काम असलेले दगड दाखवले. कुठले तरी मंदीर तोडूनच त्याचा पाया उभारला यात शंकाच नाही. पण कुतूब मिनार आधीपासून असेल तर कुणालाच कसे कळाले नाही ?

तुमचे व्हिडीओज या संबंधातच आहेत का ?

भारतातली प्राचीन मंदिरं उभारतांना कोणत्या प्रकारचं तंत्रज्ञान वापरलं गेलं असावं, ती उभारतांना शिल्पकारांनी काय काय करामती केल्या आहेत, हे खाली दिलेल्या काही व्हिडिओत बघायला मिळेल. यावर अजून संशोधन व्हायला हवं आहे.

व्हिडिओ १ - https://youtu.be/4P18F6LrIVo

व्हिडिओ २ - https://youtu.be/qPn0NsZDtkk

व्हिडिओ ३ - https://youtu.be/_ke5NE8gvcw

हा लोहखांब एका मुस्लीम बादशहाने बनवला>>
हा लोहस्तंभ ३ ऱ्या / चौथ्या शतकात बनवल्या गेला.
कोणत्या मुस्लीम बादशहाने बनवला असेल तेव्हा?

पुढे जे दुवे देत आहे, ते जिज्ञासूंनी उघडून पूर्ण वाचायचे कष्ट घेतले, तर धातुशास्त्राबद्दल आणि झालेल्या काही घडामोडींबद्दल बरंच काही कळेल. दोन्ही दुवे महत्त्वाचे आहेत.

https://www.scribd.com/document/52779310/CSRPrabhu

आणि

https://www.eregnow.com/uploads/fullpaper_1739645311_745.pdf

कुतुबमिनार वेदकालीन वा त्या ज्ञानावर आधारित आहे हे दाखवायला त्याचा निर्मितीकाळही मागे सरकवावा लागतो
युनेस्कोच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार कुतुबमिनार तेराव्या शतकात बांधला गेला.

Pages