श्राध्द

Submitted by ashokkabade67@g... on 28 September, 2018 - 13:14

श्राध्द . अनंत काळापासून पासुन आपले पुर्वज आणि आता आपण पितरांना वर्षातुन एकदा जेवायला बोलवतो आणि तेही कावळा बनुन जेवायला येतात ही आपली श्रद्धा,पण खरंच आपले पिता माता काक बनुन जेवायला येणार आहेत काॽ का फक्त प्रथा. म्हणून आपण हा खर्च करीत असतो.तेच पैसे खर्च करून आपण अनाथ बालकांना जेवायला घातले तरॽ पाप होईल का पुण्य मला माहित नाही पण त्या अनाथ बालकांना एक वेळ का होईना पण गोडधोड जेवण मिळते आणि त्यांच्या मुखावरील आनंद पाहुन मला समाधान.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

का फक्त प्रथा. म्हणून आपण हा खर्च करीत असतो.>>> खरेच एव्हढा खर्च होतो का? एक ताट काय ते गच्चीत ठेवायचे असते. वाया जातच नाही कारण तेही कावळे संपवतात. रोजच्या जेवणापेक्षा २-३ भाज्या जास्त, त्याही भरपूर केल्या जात नाहीत. आधी घरी पाहुणे जेवायला येत. आता कोणाला यायला आणि कोणाकडे जायला वेळ नसतो. त्यामुळे आमच्याकडे मोठ्याप्रमाणात स्वयंपाक केला जात नाही. परंतु देवळात आणि आश्रमात शिधा दिली जाते.

अनाथ बालकांना जर जेवण द्यायचे असेल तर चांगलेच आहे. पण मग पित्रुपक्षच का? इतर वेळीही द्यावे.

लेखातलं मत पटलं, इअतर कोणी प्रथा पाळो वा न पाळो, ज्याला पटतंय त्याने करा

सोनाली यांचं <अनाथ बालकांना जर जेवण द्यायचे असेल तर चांगलेच आहे. पण मग पित्रुपक्षच का? इतर वेळीही द्यावे.> हे मत पटलं.

सोनाली, बहुदा श्राद्धात केलं तर आवर्जुन केलं जाईल म्हणून पित्रुपक्षात करावेच, इतर वेळेल केलेले चांगले असं मला वाटतं. आणि एक ताट असलं तरी अन्नाला किंमत आहेच की. ते कावळ्यांना देण्यापेक्षा भुकेल्या माणसांना द्यावं ते जास्त चांगलं.

हेच सेम गोग्रासाला पण लागू पडतं.

The moment you got this question in mind , I think you are on right track. It is time to stop these rituals.
ज्यांचै पोट्पानी यावर चालु आहे, ते तुम्हाला यातुन कधीच बाहैर यैऊ दैनार नाहीत.

ज्यांचै पोट्पानी यावर चालु आहे, ते तुम्हाला यातुन कधीच बाहैर यैऊ दैनार नाहीत.
>>
म्हणजे कावळे का? कारण तेच खातात श्रद्धाचं ताट

म्हणजे ब्राह्मण! बरोबर ना?
पण ब्राह्मण कुणाच्या खनपटीला बसुन काही सांगत नाहीत. ब्राह्मण द्वेष दुकान चालविणारे मात्र अशा हाळ्या वारंवार देताना दिसतात.
श्राद्ध करू नये शी सहमत. डोळसपणे करू नये, याचं दुकान बंद करायला ते करु म्हणून न्हवे.

श्राद्ध म्हणजे केवळ जेवणच नव्हे. आपल्या पितरांचे स्मरण. ते सुद्धा वाटले तर करा - मनाच्या समाधानासाठी. मनाच्या समाधानापायी किती पैसे खर्च करायचे नि ते कुठे याबद्दल कुणि दुसरे काय बोलणार?

मुळात देव, कर्मकांडे हे सगळे मनात विश्वास, श्रद्धा असेल तर.

श्राद्धाचेच जेवण का डोळ्यावर येते? एरवी दारूच्या पार्ट्या नि वाट्टेल तसे खाणे, मुद्दाम महागड्या हॉटेलात जेवायला जाणे, यात जे पैसे खर्च होतात, त्या वेळी नाही का आठवण होत अनाथ मुलांची?
मा़ह्या मते जेवणापेक्षा मुळात श्राद्ध हेच डोळ्यात सलते - कारण मनाला पटत नाही, पण उगाच समाजाचा दबाव म्हणून करावे लागते.
तर श्राद्ध म्हणजे पितरांचे स्मरण हे मुख्य लक्षात ठेवले तर जेवण वगैरे मुद्दे गौण आहेत.

<<ज्यांचै पोट्पानी यावर चालु आहे, ते तुम्हाला यातुन कधीच बाहैर यैऊ दैनार नाहीत.>>
त्यांची चिंता करू नका. कुठलेहि आरक्षण नसताना त्यांनी भरपूर प्रगति केली आहे. ती सगळी काही दक्षिणेवर नाही.
तुम्हाला त्यांना न बोलावता सुद्धा पूजा श्राद्ध वगैरे सगळे करता येईल. फक्त तुमच्या मनात श्रद्धा, विश्वास पाहिजे.
थोडीशी अक्कल लागते. तोच प्रॉब्लेम असेल तर मग घ्या त्यांची मदत!

माझ्या मते श्राद्ध म्हणजे नुसते स्मरण हे तितकेसे पूर्ण वाटत नाही.नुसत्या एक दिवसाच्या स्मरणाने आपल्या जीवनात असा काय मोठा फरक पडणार आहे ? त्या ऐवजी ज्यांचे मी स्मरण करीत आहे, त्यांच्या अंगी असलेल्या कोणकोणत्या सद्गुणांचा, मी अंगिकार करू शकतो,माझ्यात असलेल्या दुर्गुणांचा मी किती लवकर नाश करु शकतो, ह्याचे पदोपदी स्मरण करून, त्याप्रमाणे कार्य करणे म्हणजे श्राद्ध करणे होय.
आपण सध्याच्या रुढीनुसार जे करीत असतो, त्यात ज्यांना दररोज दोन वेळेला पोटभर आणि उत्तम खावयास मिळते ,त्यांनाच जेवावयास बोलवितो.हे तर अजिबात चुकीचे वाटते. त्या ऐवजी खरोखर ज्यांना एकवेळ वा अर्धवेळ खावयास मिळते, अशांना बोलावून, किमान वर्षातून एकदा तरी पोटभर सुग्रास अन्न खावयाला मिळू द्या.

आपल्या मनातला भाव दॄढ हवा.
असे सांगतात की संत एकनाथांवर ग्रामस्थांनी बहिष्कार घातला असता त्यांनी श्राद्धाला गावाबाहेरच्या लोकांना जेऊ घातले होते त्यावेळी नाथांची फजिती पहायला ग्रामस्थ आले असता त्यांना गावाबाहेरच्या लोकांच्या जागी खरोखरच नाथांचे पुर्वज जेवायला बसलेले दिसले.
सांगायचा मुद्दा हा की आपापल्या निष्ठेनुसार वागण्याची ताकद हवी स्वतःमधे

कुणाला अनाथ मुलांमधे पितर दिसतील तर काहींना कावळ्यामधेही

मुळात श्राद्ध हां विषय समजून घेण्यात काहीतरी गल्लत केलीय लेखात असे वाटते.
श्राद्ध व तर्पण ह्याविषयी जरूर माहिती करुन घ्यावी म्हणजे असे प्रश्न पडणार नाहीत.

राहिला विषय लेखातील शेवटच्या वाक्याबाबत / अनाथ बालक वगैरे.... तर ह्यासाठी मुहूर्त का हवाय. आपली ऐपत असेल अन् समोर कोण उपाशी दिसला तर घाला की पोटभर जेवायला Wink फक्त अश्या कृतिने समोरच्याला उपकृत करतोय ही भावना नसावी म्हणजे अहंकार बळावणार नाही आणि उलटपक्षी पुण्य कमवताना कोणाला एकाच व्यक्तीला असे रोजरोज खायला देवून ऐदी सुद्धा बनवू नये.
समतोल साधता येणे ही तारेवरची कसरत असली तरी आवश्यक आहे हे नक्की Happy

श्राद्ध वा इतर विधी यांच्यात काळानुरूप बदल, अथवा ते मुळात करावेत की नाही, हा वेगळा विषय
आणि अनाथालयातील मुलांना (अथवा इतर गरजूंना) मदत हा वेगळा विषय आहे. दोन्ही एकत्र केल्याने गोंधळ उडू शकतो.
दोन्ही विषयावर ज्याने त्याने स्वतंत्रपणे ठरवावे.

कुणी पूर्ण विधीवत श्राद्ध करून अनाथालयातील मुलांनाही जेऊ घातले तर?

त्यांची चिंता करू नका. कुठलेहि आरक्षण नसताना त्यांनी भरपूर प्रगति केली आहे. ती सगळी काही दक्षिणेवर नाही.
तुम्हाला त्यांना न बोलावता सुद्धा पूजा श्राद्ध वगैरे सगळे करता येईल. फक्त तुमच्या मनात श्रद्धा, विश्वास पाहिजे.
थोडीशी अक्कल लागते. तोच प्रॉब्लेम असेल तर मग घ्या त्यांची मदत!>>> नंद्या तुमच्या संपुर्ण पोस्ट ला अनुमोदन.
मनी नाही भाव, अन देवा मला पाव
देव पावत नाही, म्ह्णून एखाद्या समाजाला ठेव नाव...
बाकी लेखकाने वॅलेंटाईने डे, mother's day, friendsip day, स्वतःचा वाढदिवस इत्यादी मुहूर्तावर वर देखील अनाथ मुलांचा विचार करावा...

31st December आणि गटारी वगैरेच्या दिवशी कुणाला
अनाथालय, वृद्धाश्रम इ आठवत नाही.

THERE IS ALWAYS THE QUESTION, “AM I THE RIGHT PERSON to tell this story?” I think about that a lot. It came up most viscerally when I was writing Small Great Things , which is about racism and has a black character as one of the narrators. I firmly believe that cultural appropriation is real, and I completely understand why writers of color get upset when white people tell stories that they feel are not theirs. I get it. It goes beyond the fact that white writers haven’t lived that experience, and it comes down to the fact that, sadly, in our country, if you have two books about the same topic and one is by a white writer and one is by a black writer, the white writer’s book is going to get more shelf space. So as a white writer, you’re literally taking away a voice that should be on that bookshelf.
BEFORE I WROTE SMALL GREAT THINGS , I had not acknowledged all the privileges that I had as a white person. I never had to. That in itself is racism, and I had never really talked about racism before. Now, honestly, I talk about it so often that my family’s like, “Stop.” This is a country where being white gives you power and privilege, and if you do not acknowledge that some of the good fortune you have received is because of the color of your skin in America, then you’re lying to yourself. It took me 50 years to figure that out, but now that I know, I can’t un-see it. And I’m going to do my damnedest to make sure that I do my part to undo the systemic and institutional racism in this country. It’s okay to be late to the game as long as you get there.

ज्योडी पिकॉल्टच्या मुलाखतीमधून
https://mmlafleur.com/mdash/jodi-picoult-interview

इतका असा काय खर्च होतो श्राद्ध करण्याने ? आणि खरंच छातीठोक पणे सांगा कि मी बाकी सर्व दिवशी म्हणजे दसरा दिवाळी वाढदिवस या दिवशी सुद्धा दान करतो. उगाच कशालाही उठ सूट विरोध करायचा ? निदान चांगला मुद्दा तरी मांडायचा. खर्च म्हणे

त्यांची चिंता करू नका. कुठलेहि आरक्षण नसताना त्यांनी भरपूर प्रगति केली आहे. ती सगळी काही दक्षिणेवर नाही. +१०००००

>>नन्द्या४३
पोस्त आवडली... करावे की करु नये ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणी येउन विचारत नाही कि तुम्ही श्राध्ह करताय का? आणि पक्श आहे म्हनुन पुर्वज आठवतात, एरव्ही आठवतात का?

अमितव-->>>>म्हणजे ब्राह्मण! बरोबर ना?--- अजिबात नाही. You got it wrong.
ते म्हनजै पुरोहीत. All Brahmins are not Purohit. पुरोहीन्ताचे दुकान चालु आहै. हिन्दु धर्म फक्त पुरोहीतान्ची मक्तैदारी आहै का?

श्राद्ध वा इतर विधी यांच्यात काळानुरूप बदल, अथवा ते मुळात करावेत की नाही, हा वेगळा विषय
आणि अनाथालयातील मुलांना (अथवा इतर गरजूंना) मदत हा वेगळा विषय आहे. दोन्ही एकत्र केल्याने गोंधळ उडू शकतो.
दोन्ही विषयावर ज्याने त्याने स्वतंत्रपणे ठरवावे.
>>>>
हे मत पटले.

अनाथालयात मुलांना खाऊ घालण्यासंदर्भातः मी एका अनाथालयाशी संबंधित आहे. जे कुटुंब ते चालवते त्यांची आता तिसरी पिढी आहे. एक मोठे स्थित्यंतर त्यांनी पाहिले आहे. आजकाल अनेक लोकं विविध कारणानिमित्त अनाथालयातील मुलांना जेवण घालतात. आणि हे असे जेवण आता अनेक वेळा असते. त्यामागची भावना चांगलीच असते. मात्र याचा एक परिणाम असा झाला आहे की ज्या दिवशी अनाथालयातले साधे जेवण असते ते मुलांना आवडेनासे झाले आहे.

तेव्हा समाजोपयोगी दान नक्की करा. पण त्यासंदर्भात संबंधित संस्था/कार्यकर्ते यांच्याशी बोलून मग निर्णय घ्या.

अनाथ मुलांची मदत करू नका असा मुळीच हेतू नाहिये या पोस्टचा. श्राद्ध करा असाही नाहिये. पण एक प्रथा बंद करण्याच्या मागे दुसरी सुरू करू नका इतकेच लिहायचे आहे.

सहज विचार करता प्रश्न पडला:
हिंदू धर्म पुनर्जन्म मानतो. व्यक्ती मेल्यावर कपडे बदलावे तसा आत्मा दुसरे शरीर धारण करतो बरोबर? मग श्राद्धाला नक्की कोण जेवायला येतं? तो आत्मा तर येणं शक्य नाही कारण तो दुसर्‍या शरीरात आहे. त्याने यायचं असेल तर त्या दुसर्‍या शरिरातुन यावं लागेल पण यायला आणि कावळ्यात शिरायला त्याने ते शरीर त्याने टाकलं तर ती व्यक्ती गचकेल!
यच्चयावर सगळ्यांना सद्गती प्रात्प होणे शक्य नाही. आणि झालीच तर एकदा ती प्राप्त झाल्यावर ते नक्कीच परत पृथ्वीवर दर्वर्षी जेवायला कॅलेंडर मार्क करुन येणार नाहीत. ट्रांझिशन फेज फ्रॉम वन बॉडी टू अनदर येतात का फक्त?
या कॅलेंडर मार्क करण्यावरुन, पंचांगकर्ते अधिक मास, तिथीचा क्षय, वियोग असलं काय काय गणित करतात ते इहलोकीचं गणित परलोकी कोण आणि कसं पोहोचवतं?
जेन्युईन प्रश्न आहेत. खिल्ली म्हणून वाटले तरी ते तसे नाहीत.

काळानुसार चालणारी वट्सावित्री पोर्नीमा "थोतान्ड" आहे हे आज मान्य करतात. करतात की नाही?
तसे whole the year घाणीत राहनारा " कावळा" अचानक आपला पुरर्वज कसा होतो.. हे "थोतान्ड" नाही का?...हे मान्य करायला अजुन थोडा काळ जावा लागैल अस वाट्तय.
तोपर्यन्त मात्र तुमच्या मनात श्रद्धा नाही, विश्वास नाही...असे ऐकावे लागनार.

जेऊ घालणारे जेऊ घालतात, खाणारे खातात, मग नक्की समस्या काय आहे?

@अ‍ॅमी
तुमचा प्रतिसाद चुकून या चुकीच्या धाग्यावर पडला आहे का? तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे, ते सोप्या शब्दात सांगू शकाल का?

अवांतर:
ज्यांची श्राद्ध विधी करण्याची श्रद्धा आणि प्रथा आहे त्यांच्यासाठी लोकमत मध्ये 4 लेख वाली सिरीज आहे कोणीतरी अयाचित गुरुजींनी लिहिलेली.
एकंदर सूर 'तुम्ही ज्या भौगोलिक आणि आर्थिक परिस्थितीत आहात त्यात तुम्हाला जमेल तसं करा, प्रेमाने आणि श्रद्धेने करा.काहीच न जमल्यास दर्भाचे ब्राह्मण करून नंतर पिंडदान करा किंवा वाहत्या नदीत विसर्जित करा.जे जमतं, पटतं ते करा, तो एक दिवस श्रद्धेने गेलेल्याची आठवण काढा.' असा आहे.
मी स्वतः या द्विधेत गेली काही वर्षं आहे.आमच्या कुटुंबात एका व्यक्तीचं श्राद्ध आम्ही बिबवेवाडीत असताना पूर्ण विधीवत करायचो.इथे सौदागर ला आल्यापासून हिरण्य करू लागलो.सध्या फक्त दान करतो.कदाचित याचे पाप/दोष लागेलही.मनातली त्या व्यक्तीबद्दलची आठवण, श्रद्धा आहे तशी आहे. पण लॉजीस्टिक मुळे काही गोष्टी कमी केल्या.
होपफुली ते समजून घेतील. सॉरी ---.

>> अमितव>>
साधारणपणे देह सोडल्यावर लगेच दुसरा जन्म किंवा देह नाहि मिळत, म्हनुन श्राध्ध करतात.
या संदर्भात बर्याच गोष्ती आहेत वाचलेल्या, महभारतातील पण आहेत. शोधुन जरूर वाचा.

Pages