भुरळ .... Love and Lust

Submitted by अनाहुत on 26 September, 2018 - 10:37

त्याने त्याचे फेसबुक अकाउंट open केलं . एक friend request होती त्याने ती check केली . sweet sneha या नावाने friend request होती . या fake accounts च काय करायचं आणि कशाला कोण उगाचच मुलीच account बनवून बसतात काय माहित आणि त्यातून वर आणखी friend request टाकत बसतात काय माहित . पण जाऊदे आपण तरी एव्हढा कशाला विचार करायचा . करूया आपणही accept . काय फरक पडतो . त्याने accept वर click केलं आणि तो स्वतःची timeline check करू लागला. तेच ते नेहमीच , बस दोघाचे नवीन pic आणि त्याच त्या नेहमीच्या शेकडॊवेळा repeat झालेल्या posts .... त्याने pics वर comments टाकल्या अगदी टाकायच्या म्हणून आता त्याला त्यात फारसा काही interest वाटत नव्हता . आजकाल त्याला फार bore व्हायला लागलं होत fb वर. परत एकदा स्वातीची timeline check केली काही विशेष असं नव्हतं मग त्याने logout केलं आणि तो कामाला लागला .

आजतर काहीच नवीन नाहीये यार इथं छे काय करावं चला online कोण आहे यार कोणीच नाही का आज hmm ही आहे का online, sweet sneha . चला fake तर fake बघू तर काय म्हणते . त्याने hi टाकलं . आजकाल असं सहजच अशी कुणालाही हाय लागते . परत आपल्या fb वरच्या दैनंदिन कामाचा भाग असलेल्या स्वातीच्या अकाउंटकडे वळला . तिनं status change केलं होत , Single , आता त्याला फार अस्वस्थ वाटू लागलं होत . याला आपण replay म्हणून काहीतरी करायला हवच ना . पण चूक झाली आपली . याला reply देण्यापेक्षा आपणच आधी single झालो असतो तर तिला चांगलं तोंडावर पाडता आलं असत पण आपण ती संधी हातची दवडली . आता हिला काहीतरी solid उत्तर द्यायला पाहिजे त्याशिवाय बर नाही वाटणार . काही करायला fb वर फारस काही होतही नव्हतं . मग काय करावं काही सुचत नव्हतं तेव्हड्यात message दिसला त्याने तो check केला . hlo . यार इथं काय चाललंय माझं आणि हि fake account पण ना हद्द करतात . जाऊदे आता डोकं उठलय बोलूया हिच्याशीच आपलं ह्याच्याशीच .

hey sweet sneha how r u
i m good
so whatsup
nothing special, u say
well there is something something
whats that
hmm aahe kahitari
sang tari
are kay sangu yaar aajkal jam tension madhe challoy

समोरून नो रिप्लाय . काय राव हि fake accounts पण अगदी खरी मुलगी असल्यासारखी भाव खातात राव . आता म्हटलं इथं timepass करावा तर इथं तर फारच भाव खातात राव . जाऊदे कोण आहे हा एकदा शोधूच याला . चला पम्याला बरोबर घेऊन याला बघू . लगेच कॉल लावला पम्याला ...
" पम्या, कुठं आहेस ... "
" आहे इथंच काय रे काय म्हणतोय "
" अरे fb वर कुणीतरी शहाणा fake account ने त्रास देतोय चल घेऊया त्याला कोणीतरी ओळखीचाच असणार . "
" अरे त्यांचं काही नसत कुणीही असत ओळखीचाच असेल असं नाही . timepass करायचा म्हणून टेपा लावत बसतात . तू जाऊदे लक्ष नको देऊ त्याच्याकडे . "
" अरे आधी पाहू तरी आहे का कोण ओळखीचा ... असला ना मग बघु त्याला चांगलाच . "
" अरे तुला काम नाही का दुसरं जे त्याच्यात अडकून बसलाय ? "
" तुला यायचं का नाय ते सांग ? "
" हे बघ आता स्वातीसोबत आहे नंतर बघू ना "
" काय पम्या पोरगी भेटली कि मित्राला विसरलास काय "
" तस नाही भावा आमचं तुमच्यासारखं नाही कधीतरी कोण भेटलीय . आणि आज दोघंच आहे प्लीज समजून घे ना "
" ठीक आहे ठीक आहे चालूदे तुझं "

--------

परत try सुरू होता त्याचा .

Hi there...
Hi
hows u
i m good
hey tell me one think whether u know me
no
mag tu mala request kashi send kelis
chukun zali
ohh
mag mala unfriend kar
no no
kahi tari karnane aapan bhetloy tar asu de
okk
tu kay kartes
.....
are mala jara kam aahe mi bolte tuzyashi parat
ok
bye

--------

मधून मधून ही chat सुरू होती .

Hey
Hi
कशी आहेस ?
marathit ? nice
आपली भाषा मराठी भाषा , फक्त मराठी
खूप छान
ohh तू पण
हो का नाही
भारीच कि
अग पण सांग तरी तू काय करते
chat
ohh same here
ohh so nice
मग आणि काय विशेष ?
नाही काही
तू काय करतेस जॉब कि कॉलेज ?
hmmmm
काय हे , असं काय करतेय ?
कुठं काय करतेय, काहीच तर नाही
अग काय हे ?
काय नाही
मग असं का
बर चल बाय
अग काय
काम आहे थोडं

यार काय चालय हीच फारच भाव खातेय हि . जाऊ दे आता लक्ष द्यायला नको हिच्याकडे ... बघूया काय करतेय .

--------

" काही हॅकिंग ट्रिक आहे का कुणाचं अकाउंट आहे का ते शोधायला ? "
" आहेत ट्रिक पण उगाच सापडला तर वाईट बांबू लागेल . त्यापेक्षा एक काम कर आपण रेगुलर टेक्निक वापरून पटवं तिला . "
" अरे ती आहे का तो ते नाही माहित . "
" ती आहे असं समजून कर तर चॅट . आणि विडिओ चॅट ला तयार कर किंवा भेटायला बोलावं "
" आणि नाही आली तर ? "
" भाई ट्राय तर कर . काय माहित अंधारात तिर निशाण्यावर लागेल आणि स्वातीचा विषय पूर्णपणे क्लोज झालाय ना . "

शेवटी एखाद्या मुलीशी बोलताना भावना बाजूला ठेवली आणि डोकं वापरून विचार केला कि संपली ती . खूप झालं जिच्यासोबत इमोशनली अटॅच होतो तिला त्याच काहीच नव्हतं . आता ओन्ली ट्रिक . नाऊ नो स्वाती ओन्ली स्नेहा... sweet sneha. त्यानं सुरुवात केली तिच्या कलान घ्यायला सुरुवात करून तिला गुंतवू लागला . यार हे सोपं आहे स्वतः न गुंतता राहील कि पोरींना सहज गंडवता येत . तो हळूहळू एक्सपर्ट होत चालला होता आणि ती पुरती गुंतली होती , इतकी की ती मागे लागली होती त्याच्या भेटण्यासाठी पण तो तयार होत नव्हता . बरेच दिवस तिला टाळून एक दिवस तो तयार झाला अगदी तिच्यावर उपकार केल्यासारखा . ती खूप खुश होती त्याला भेटण्यासाठी . शेवटी तो दिवस आला .

" कुठं जायचं "
" बस तरी " त्याने तिला गाडीवर बसायला सांगितलं . ती बसली . त्याने तिथून थोड्याच अंतरावर गाडी थांबवली . एक छोटस हॉटेल होत ते त्याने चहा मागवला आणि बोलायला सुरुवात केली
" हे बघ मी एंगेज आहे तिच्याबरोबर .... म्हणजे होतो ...."
" मीही हेच म्हणतेय आता नाही ती "
" हे बघ मला त्रास होतो याचा मला या विषयावर नाही बोलायचं "
" पण आपण फ्रेंड्स तर राहू शकतो ना ? "
" ते तर आहोत पण दुसरा काही विचार करू नकोस "
" ठीक आहे " म्हणत तिने तिचा हात त्याच्या हातावर ठेवला .
त्याने एकदा तिच्याकडे पहिले तिच्या डोळ्यात तेच होत ...

--------

" अरे एक पोरगी लागलीय मागे . "
" अरे मग काय प्रॉब्लेम आहे ? "
" अरे आपल्या कॅलिबरची नाही "
" त्याला काय होतंय use अँड throw "
" ते ठीक आहे पण त्यालाही इच्छा होत नाही "
" बरा आहेस ना ? " त्याने एकदा त्याला न्याहाळलं आणि म्हणाला
" तुला इंटरेस्ट नसेल तर मला सांग . "
त्याने एकवेळ त्याच्याकडं पाहिलं आणि मनाशी काही ठरवलं

---------

" आपल्यात झालं ते .... "
" हे बघ मी तुला सांगितलं आहे कि माझं फक्त तिच्यावर प्रेम होत आणि आता ती मैत्रीण म्हणून माझ्या सोबत आहे आता मला तिचाच विचार करायचा आहे "
" पण आपल्यात झालं ते "
" हे बघ तो एक क्षण होता त्यात हे सगळं घडलं पण बघ त्याच्या आधी किंवा नंतरही मी तुझ्याशी तस कधी नाही बोललो किंवा तसा विचार नाही केला तुला माहित आहे "
" पण व्हायचं ते झालं ना मग मी आता अशीच कशी राहू "
" हे बघ मी आधीच तुला सांगितलं होत कि मी तुझ्याबद्दल तसा विचार करत नाही आपण दूर राहूया पण तूच बोललीस कि फ्रेंड्स म्हणून आणि मी friend म्हणूनच बोलत होतो तूच तसा interest घेत होतीस नेहमी "
" आणि त्या दिवशीही मी तिचाच विचार करत होतो आणि तिचा विचार करतं जाते झालं "
" पण आता मी काय करू "
" तू काहीही करू नको घरचे मुलगा बघत आहेत तुझ्यासाठी तर त्याच्याशी कर लग्न "
" आणि आपल्यात ..."
" परत परत तेच बोलू नकोस माझ्याजागी जर कोणी दुसरा असता तर त्याने तुला वापरून फेकून दिली असती माझ्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नकोस आणि परत मला कॉन्टॅक्ट करू नकोस " म्हणत तो निघूनही गेला .

--------

" माझीच चूक झाली पण तू बोल ना माझ्याशी . "
" काय बोलायचं आहे तुला आता ? "
" मला काही नको आहे जे झालं ते झालं मला काही म्हणायचं नाही . ती तुझ्या आयुष्यात आहे तर असू दे . तुमचं लग्न झालं तरी मला आनंद होईल पण आपण मित्र म्हणून तर राहू शकतो ना "
" हे बघ मित्र म्हणूनच आणि आता भेटायचं नाही कधीच फक्त चॅट आणि कधीतरी कॉल रोज नाही "
" चालेल मला तू म्हणशील तस "
" ठीक आहे . बर आता काम आहे मला मी ठेवतो फोन "
" बाय "

--------

" अरे माझं लग्न ठरलं आहे तू येशील ना माझ्या लग्नाला ? " तिला अजूनही काहीतरी चमत्कार घडण्याची आशा होती .
" तशी मला काम आहेत आता पण बघतो ..." तो निर्विकारपणे म्हणाला .
तेव्हढ्यात रवीने सल्ला दिला " अरे ऐसा चान्स नको सोडूस . "
" म्हणजे ? "
" म्हणजे एकदा का तू तिच्या लग्नाला गेलास म्हणजे सगळं ऑफिशिअल होत . आधी होत त्याच काही राहत नाही आणि तिच्या नवऱ्याला भेट आणि चांगली ओळख ठेव . "
तो प्रश्नार्थक नजरेने रवीकडे पहात होता .
" कळेल कळेल "

--------

" थँक्स तू आलास माझ्या लग्नाला "
" मग येणारच होतो माझी खास मैत्रीण आहेस तू "
" हा माझा फ्रेंड राहुल " तिने नव-याला त्याची ओळख करून दिली .
दोघांनीही एकमेकांना hi hello केलं आणि चांगलं बोलणं झालं त्यांचं . ते आता जुन्या मित्रासारखे बोलत होते .

--------

" काय मग कसा आहे नवरा ? "
" ठीक आहे " त्याच्या नंतर तो शांत झाला .
" काय झालय फोनवर बोलतानाही तू डिस्टर्ब होता आणि आताही सांग ना काय झालं ते "
त्याच्या डोळ्यात पाणी होत . तो त्याच्या मनातलं सांगत होता आणि फारच हळवा झाला होता ती त्याला आधार देत होती तो तिला बिलगला होता आणि लहान मुलासारखा रडत होता तीही हळवी झाली होती . तिने त्याला घट्ट मिठी मारली . तोही आता व्यक्त होऊ लागला होता . दोघेही वाहवत निघाले होते . अचानक ती भानावर आली आणि म्हणाली " काय करतो आहेस ? काय विचार आहे तुझा ? "
" तुला माहित आहे आणि आता मला अडवू नकोस " म्हणत तो परत तिला जवळ घेऊ पहात होता . तिने त्याला विचारलं
" तेव्हा तर तू तयार नव्हतास आणि आता "
" बाकी सोड एव्हढच बोल तू तयार आहेस का " त्याचा आवाज वेगळा झाला होता
ती एक क्षण थांबली आणि म्हणाली " ओके मी तयार आहे ...."

दोघे एकत्र येत होते . दोघांची कारण मात्र वेगवेगळी होती ..... Love and Lust

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कल्पना चांगली आहे.
पण लिखाणात थोडी सफाई आणता आली तर बघा. reply ऐवजी replay अशा चुका व्हायला नकोत. किंवा सरळ मराठीत उत्तर शब्द वापरायचा.

गोष्ट म्हणून आवडली.हे असं खूप होत असणार सोशल नेटवर्किंग च्या जमान्यात.
फक्त नवी ओळख वाली 'ती' आणि जुनी 'ती' मध्ये अगदी सुरुवातीला कन्फ्युजन होतं.जुन्या 'ती' ला काही वेगळा शब्द/नाव देता येईल तर बरं.

धन्यवाद, आता अंबिग्यूइटी नाहीये.
तुमची कथा ही सध्या इ सकाळ आणि लोकसत्ता मध्ये येणाऱ्या बऱ्याच बातम्यांची प्रातिनिधिक आहे.