नेहमी पडणारी स्वप्ने

Submitted by विजय देशमुख on 22 July, 2013 - 23:04

माणसाला नेहमी पडणारी स्वप्ने मुखत्वे खालीलपैकी एक वा अधिक असू शकतात. मानववंशशास्त्राच्या एका व्याख्यानात ऐकलं होतं.

१. धावणे :- यात व्यक्तीला तो स्वतः कोणातरीपासुन बचाव करण्यासाठी धावतोय असं दिसते.
२. पडणे :- बरेचदा हे पडणे बराच वेळ चालू असते, पण जमिन लागत नाही... म्हणजे तो पडतच राहतो...
३. साप :- नुसतेच साप दिसणे किंवा साप खेळताना, मागे धावताना दिसणे. हे भितीदायक स्वरुपातच असते.
४. मारामारी :- कुणालातरी सडकुन मारणे. एक हिरो १०-१५ + गुंड
५. पाण्यात बुडणे :- इथे माधुरीचा १०० डेज आठवला का ?
६. पैसा/ सोने/ खजिना इत्यादी सापडणे.
७. अंधार
८.
९.
१०.

आठवली की लिहितो Happy

यातील बरिचशी स्वप्ने माणसाच्या उत्कांतीशी संबंधीत आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर माणुस आदीमानव व तत्सम काळात होता, तेव्हा तो प्राण्यांची शिकार करण्यासाठी आणि प्रसम्गी बचावासाठी धावायचा. प्राण्यांपासुन बचाव करण्यासाठी झाडावर चढणे आलेच, पण तिथुन घसरुन पडू नये, ही भिती. रात्री अंधाराची भिती, तर सरपटणार्‍या प्राण्यांचीही (उदा. साप). दोन टोळ्यांमधील मारामारी ही कदाचित नेहमीची बाब असावी. (धातू युग). तसेच पाण्यापासुन बचाव करणे आणि पाण्यातील प्राण्यांपासुन (मगर वगैरे) हे मासेमारीसाठी आवश्यक असावे.
पुढे मौल्यवान धातूंबद्दलचं आकर्षण, त्यासाठी सोने/ चांदीचा शोध ओघाने आले असावे.

एकुणच हे वारंवार पडणारि स्वप्ने आपल्या मनात वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या घर करुन बसली आहेत, असं मानववंशशास्त्रज्ञ म्हणतात.

तुम्हाला कोणती स्वप्न वारंवार दिसतात ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनु ,असं वाचलय की स्वप्नात आपला सुक्ष्म देह आपल्या शरीरापासून वेगळा होतो व फिरुन येतो कदाचित तुमच्या बाबतीत होत असावे, अजून तपशील आठवतो का ? पहा. पुढच्या वेळी असेच स्वप्न पडले तर जरा डिटेल मध्ये आठवा.

तपशील जास्त नाही आठवत.मी उडत असते, मध्ये दापोडी च्या नव्या बिल्डिंग लागतात, आणी लोणावळ्याचे धबधबे.
अंगावर काहीतरी लाँग गाऊन असतो आणि खाली जमिनीवर मस्त सीनरी असते, फक्त सगळं सेपिया कलर मध्ये असतं.

मला एक स्वप्नं पडायचं. तेव्हां लक्ष्मीनारायण सिनेमाचा बोलबाला होता. तर आम्ही आशिकी पहायला गेलोय. तिकीट काढून आत खुर्चीवर बसलो. तर समोर एक व्हीसीआर आणि कलर टीव्ही ठेवलेला. त्याच्यावर आशिकी सुरू झाला....

किरणुद्दीन - Rofl
मला मी डबल agent असल्याची स्वप्ने पडायची Happy

मागे असेच पडलेले एक स्वप्न. स्वप्नात मी पुण्यात आहे. दोन का तीन मजली नक्की आठवत नाही मोठी इमारत आहे बहुतेक कुठलं तरी सरकारी कार्यालय त्यात मी एका खोलीच्या बाहेर उभी आहे. त्या दरवाजावर पाटी आहे, वर्ष आहे 1869 . एवढ्यात मला मोठ्या जमावाचा आवाज कानावर येतो, समर्थ आले, समर्थ आले, एशढ्यात लक्षात येतं की आपण येतांना पाहिलय की बाजूच्या इमारतीच्या बाहेर बरीच माणसं जमलेली होती व कसली तरी तयारी चालली होती. एवढ्यात स्वप्नात सुद्धा संदर्भ लक्षात येतो, वर्ष 1869 , स्वामी समर्थ. म्हणजे ते आहेत, आपण त्या काळात आहोत. मग मी कसलाही विचार न करता जिवाच्या आकांताने खाली धावत सुटते. मनात विचार, मला इथे कोणी ओळखत नाही, दर्शनाला बराच जमाव असणार, एवढ्या गर्दीत आपल्याला स्वामी भेटतील का? जमावातील लोकांकडून कळतं स्वामी दुसर्‍या मजल्यावर आहेत. मी कशीबशी लपत, त्या इमारतीत घुसते, रांगा लागलेल्या आहेत. लाकडी जिना आहे मोठा व लाकडी रेलिंग, कशी बशी मी दुसर्‍या मजल्यावर पोहोचते, व रांगेत तिसऱ्या नंबरला उभी चक्क घुसखोरी . मग माझा नंबर येतो, जाताना लक्षात येते की मी येण्याच्या गडबडीत स्वामींसाठी काहीच आणलेले नाही. मी सहज माझ्या पॅन्ट च्या खिशात हात घालते, (माझा अवतार टीशर्ट व जिन्स ) आताच्या काळातला. खिशातून एक शंभरची नोट, एक दहाची नोट , व एक खडीसाखरेची पुडी निघते. खोलीत स्वामी जमिनीवर बैठक होती पांढरी, त्यावर बसलेले होते, त्यांच्या पायावर मी डोके टेकवले व ती खडीसाखरेची पुडी व शंभराची नोट ठेवली. मी काही बाही विचारलं त्यांना व त्यांनी उत्तरं दिली, माझ्या डोक्यावर दोन्ही हात ठेवले. मागच्या पुण्यातील ट्रीपला मी हट्टाने शोधून (स्वप्नात नाही खर्या) दोन गोष्टी घेतल्या होत्या, अगदी कोर्या करकरीत न वापरलेल्या त्या चक्क फेकून द्यायला सांगितल्या. व मला जाग आली. जाग आल्यावर आधी मी त्या दोन वस्तू शोधल्या टाकायचं खरच जिवावर आलं होतं, फक्त स्वामींनी सांगितले म्हणून टाकणार होते, येवढ्यात कामवाल्या बाई म्हणाल्या, हे ईथे का ठेवलयं? नकोय का हे? नको असेल तर मी नेते. म्हटलं तुम्हाला हवं असेल तर न्या, त्या आनंदाने घेऊन गेल्या.

मी जर कुठे धरण किंवा तलाव बघायला गेलो तर त्या रात्री मला हमखास उंच डोंगरावरुन त्या निळसर-हिरवट पाण्याने गच्च भरलेल्या धरणात/तलावात पडत असल्याचं स्वप्न पडतं.. पण पाण्याला टेकण्याआधीच मी दचकुन जोरात ओरडत उठतो..

अवांतर : थोडे दिवसाआधी मी कळासुबाई शिखरावर जाउन आलो आणि तिथुन भंडारदरा जलाशयाचं द्रुश्य पाहिलं.. त्यानंतर जेव्हा घरी येउन झोपलो तेव्हा माझे ओरडणे ऐकुन शेजारच्या, वरच्या आणि खालच्या फ्लॅट मधील सोसायटी शेजार्यांनी इंटरकॉम वर "काय झालं..?" म्हणुन चौकशी केली होती..! Uhoh

मी बर्ञाचदा हा अनुभव घेतलाय. स्वप्नात काहीतरी भितीदायक दिसतं आणि मला ओरडायचं असतं जोरात पण घशातून नुसते विचित्र असे आवाज निघतात आणी मला कळत असतं मी ते ओरडण्याचे आवाज काढतेय पण स्वतःला थांबवू शकत नाही. स्लीप पॅरालिसिस का काय होत असावं का?

नेहमी पडणारी स्वप्ने
ठराविक रस्ते, ठराविक जागा मला वारंवार दिसतात.
माझे बाबा पण खूप वेळा येतात स्वप्नात.
काहीतरी महत्वाचं विसरलंय घरी असंही दिसतं खूपदा.

मला वारंवार सापांची स्वप्ने पडतात, लहानपणापासून.
यात बहुतेकवेळा साप माझ्या पोटावर चढलेला असतो, तर कित्येकवेळा पलंगा खाली कित्येक साप असतात. हे सगळे साप नाग असतात. १९९५ ते २०१७ माझं अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य हॉटेल्समध्ये गेलं प्रवासामुळे. बऱ्याच हॉटेल्समध्ये अंगावर घेण्याच्या ब्लँकेटला बाजूने झालर असते. पोटा / छाती पर्यंत ब्लँकेट ओढून झोपतो सहसा. ती झालर दुमडल्या जाऊन श्वासाबरोबर वर खाली होत राहते झोपेत. कधी (किंचित डोळे उघडे राहिले म्हणून म्हणा) त्यामुळे मला माझ्या छातीवर नाग हे आणि तो हलतो आहे असे स्वप्न पडते. मग मी कुशीवर वळून त्याला पाडण्याचा प्रयत्न करतो, तेवढ्यात केव्हातरी जाग येते.
१९९५ पासून हे ब्लॅंकेटच्या झालर मुळे होते हे माहीत आहे पण तसच स्वप्न पडत रहातं.

अशा एकंदरीत पडणाऱ्या सापांच्या स्वप्नांचे काय कारण असावे?.

पाफा Happy केक्युलेचे स्वप्न बट क्वाइट ऑबव्हीयस होते. (ब्रेन रुल्स पुस्तक वाचले नसेल तर वाचा.).

सापांचे स्वप्न:
-मनात दडलेली एखादी भीती जी आपण मान्य करत नाही आहात.
-एखादा खूप मोठा बदलाचा निर्णय जो घेण्याबाबत मनात विचार चालू आहे पण अजून घेतला नाही.
-आजूबाजूला असलेल्या शत्रूंची सुप्त जाणीव

(हाहा, लिस्ट बरीच स्विपिंग आहे.यातले काहीतरी नक्की सर्वांना रिलेट होतेच.)

कविता, हो.
मी अनु Happy
आणखी प्रतिसादांच्या प्रतीक्षेत.

सापांचे स्वप्न:
-मनात दडलेली एखादी भीती जी आपण मान्य करत नाही आहात.
-एखादा खूप मोठा बदलाचा निर्णय जो घेण्याबाबत मनात विचार चालू आहे पण अजून घेतला नाही.
-आजूबाजूला असलेल्या शत्रूंची सुप्त जाणीव
(हाहा, लिस्ट बरीच स्विपिंग आहे.यातले काहीतरी नक्की सर्वांना रिलेट होतेच.)
Submitted by mi_anu on 22 September, 2018 - 10:04
@ अनु
तुम्ही अनुदिनी सोबत भविष्याचा काॅलम ही चालवायचा का? Rofl

सापांप्रमाणेच मला लहानपणापासून नेहमी पडणारं स्वप्न म्हणजे माकडांचं. ही काळी तोंडी मोठी हुप्प्या माकडं, ज्यांच्या टोळी नायकाला गावी भड्या म्हणत.
मी खोलीत आहे आणि बाहेर या माकडांची टोळी इकडच्या आणि व्हरांड्यापर्यंत पोचलीय, मी एका बाजूचे दार लावून पळत दुसऱ्या बाजूचे दार लावायला जातो. यात मी कधी यशस्वी होतो, तर कधी नाही. आता माकडं आत शिरली आहेत आणि भड्या केव्हाही एन्ट्री मारणार आहे असे स्वप्न असते.

पाफा, मला स्वतःला साप वाली स्वप्नं खूप पडतात.विषारी साप वालीच.हल्ली तर भीती पण वाटत नाही.
डिस्कव्हरी वर विषारी साप वाले प्रोग्राम बघायला खूप आवडतं.न्यूरो आणि हेमो टॉक्सिन बद्दल माहिती पण मिळवते. ☺️☺️☺️
त्यामुळे साप स्वप्नांचा अर्थ शोधून बरेच वेळा रिलेट होतोय का चेक केले.माझ्या बाबतीत तरी झाला.
बहुतेक साप या प्राण्याबद्दल माणसाला भीतीयुक्त आकर्षण असल्याने अशी स्वप्नं पडतात.

मी खोलीत आहे आणि बाहेर या माकडांची टोळी इकडच्या आणि व्हरांड्यापर्यंत पोचलीय, मी एका बाजूचे दार लावून पळत दुसऱ्या बाजूचे दार लावायला जातो. यात मी कधी यशस्वी होतो, तर कधी नाही. आता माकडं आत शिरली आहेत आणि भड्या केव्हाही एन्ट्री मारणार आहे असे स्वप्न असते.
नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 22 September, 2018 - 13:08
>>>
मानवजी तुमची मनापासून क्षमा मागून लिहायचे धाडस करतोय.
मला तुमचे स्वप्न वाचून जंगल बुक मधील मोगली चा माकडांकडून अपहरणाचा प्रसंग आठवला.

माझ्या वरील दोन्ही स्वप्नांची कारणे, ही माझे लहानपणी केलेले प्रताप आहेत, ज्यामुळे अंतर्मनात कोरली गेलेली अजून असलेली एक अंधुकशी भीती आहे.

सापांचे स्वप्न: आमच्या घरी आसपास, शाळेजवळ साप हे नित्याचेच त्यांची फारशी भीती कुणाला नसे. साप घरात शिरला तरच ती समस्या मानली जाई. साप दिसला की दगड मारणे, ( आणि थोडा मोठा झालो तेव्हा घरात शिरलेला साप मारणे) काही विशेष नसे. तर ही घटना मी दुसरी/ तीसरीत असतानाची आहे. आमच्या शाळेजवळ एक पडकी कोरडी विहीर होती. मधल्या सुट्टीत डबा खाऊन झाला की कधी आम्ही काही खोडकर मुलं मुली या विहिरीत डोकावून पहात असू, मी आणि काही जण विंचू, सरडे दिसले की त्यांना दगड मारत असू. यात मी आणि महिपाल नावाचा एक मित्र आघाडीवर असू.
एकदा मधल्या सुट्टीत विहिरीजवळ गलका सुरू असलेला दिसला. मी धावत गेलो, पाहिले तर एक साप विहिरीत फटी मधून बाहेर येत होता. चांगलाच मोठा होता. महिपाल आधीच दगड मारत होता मी पण सामील झालो. एक दोन दगड त्याला एकाच वेळेस लागले आणि तो नाग होता, तो चवताळून फटीतून बाहेर आला आणि त्याचा मोठा फणा काढला फुत्कारत. आधी वाटत होता त्यापेक्षा बराच मोठा होता तो. विहीर खोल नव्हती, त्याचा फणा कठडया पासून ४-५ फूट खाली असेल, एवढ्या जवळून तो भला मोठा चवताळलेला नाग पाहिला, फार भयानक दृष्य होते ते. आम्ही तिथून लगेच धूम ठोकली.
सगळीच मुले खूपच घाबरलो होतो. नंतर त्यावर चर्चा झाल्या आम्हा मुलांच्या. नाग आहे त्यांनी तुम्हा दोघांना पाहिलंय सोडणार नाही. कुणी म्हणालं त्याचं रक्त पण निघालं आता आमचं खरं नाही वगैरे, खूप खूप चाललं होतं. यात महिपाल जास्तच हादरला. त्या रात्री त्याला ताप भरला.
मला त्या रात्रीच दोन तीनदा स्वप्न पडलं तोच भयानक फणा दिसे अजून अजून जवळ आलेला.
त्यांनतर थोडा मोठ्या झाल्यावर मी काही साप मारले. ज्यांना मारण्याची गरज नाही त्यांना काठीने ढकलून, फेकून घालवले. पण ही स्वप्नांची मालिका मात्र सुरू असते.

त्या स्वप्नांचा विशेष त्रास होत नाही त्यामुळे असेल कदाचित की अंतर्मनातून ती भीती काढून टाकण्याच्या मागे कधी लागलो नाही म्हणून ती अंधुकशी अजून दडून आहे आणि स्वप्न अधून मधून पडत रहाते असे मला वाटते.

एक विचित्र स्वप्न. साधारण दोन वर्षांपूर्वी पडलेलं. कुठलं तरी देवालय, मी रांगेत ऊभी आहे.( खूप वेळा मी वेगवेगळ्या स्वप्नात रांगेत उभी असते). स्टेज सारखं काहीतरी आहे. मी पायर्‍या चढून वर जाते. वर अतिशय मोठं शिवलिंग आहे. ओपन मंदिर छप्पर वगैरे काही नाही. मी नमस्कार करून बघते तो, शिवलिंगाच्या मागून एक तरुण निघाला अचानक, उंच, अतिशय देखणा. गुढग्यापर्यंत नेसलेले पांढरे धोतर व पांढरे पागोटे होते डोक्यावर, पण पागोटे खूपच मोठे होते. राजा राम मोहन राॅय स्टाईल पण मोठ्ठे. त्याने खूप गोड अशी ओळखीची स्माइल दिली व मला जाग आली (अगदी नको असतांना) मात्र आजपर्यंत अशी इतकी देखणी व्यक्ती मला दिसली नाहिये प्रत्यक्षात कधी. Uhoh

अनमिका किती छान अनुभव आहे तुमचा, मला तर अजुनही
- भुतान्च्या हवेलीत मी फसलीये ,
- परीक्षा आहे , अभ्यास झाला नाहीये
- हपिसात माझा production ला code फाटलाय
अशी महा भयानक स्वप्ने पडतात

साप, धरण , वाहत पाणी हे तर नेहमीच आहे

मी स्वप्नात एखाद्यी घटनेत काहीतरी करत असते, अचानक जाग येते आणि स्वप्न अधुर राहत
बर्‍याचदा उशिरा उठल तर अस होत
मग मी परत झोपते आणि ते स्वप्न, ती घटना पुर्ण होते Proud

मी बर्ञाचदा हा अनुभव घेतलाय. स्वप्नात काहीतरी भितीदायक दिसतं आणि मला ओरडायचं असतं जोरात पण घशातून नुसते विचित्र असे आवाज निघतात आणी मला कळत असतं मी ते ओरडण्याचे आवाज काढतेय पण स्वतःला थांबवू शकत नाही>> हे अस पुर्वी होत असे माझ्यासोबत, आता होत नाही.. आपोआप बन्द झाल

Pages