अंतरातले गाणे

Submitted by पुरंदरे शशांक on 27 September, 2018 - 00:45

अंतरातले गाणे

अंतरातले गाणे वेडे
भरभरून येते की ओठी
येवो जावो ऊन—पावसा
झरा वाहतो कडेकपाटी

ग्रीष्मी सुकूनी क्षीण होतसे
पुन्हा कुठूनी तो येतो भरुनी
कळेचना तो उगम तेथीचा
निरखित त्याचे कवतिक दूरुनी

वार्‍यामधूनी गगनामधुनी
देतो घेतो कुठल्या ओळी
रोखू न शकती गतिमानता
फत्तर हो का माती काळी

विहरत जाता गाणे अवघे
समरसून मन जाते बुडूनी
लहरींवर हिंदोळत जाता
गाणे विरते उगम जेथुनी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा!

सृजनाच्या उगमाचे / अन्तर्नादाचे सुन्दर वर्णन !>>>>+१११११११ अगदी अगदी
किति सहज सुन्दर कविता आहे

ग्रीष्मी सुकूनी क्षीण होतसे
पुन्हा कुठूनी तो येतो भरुनी
कळेचना तो उगम तेथीचा
निरखित त्याचे कवतिक दूरुनी>>> अप्रतिम!!

विहरत जाता गाणे अवघे
समरसून मन जाते बुडूनी
लहरींवर हिंदोळत जाता
गाणे विरते उगम जेथुनी>> फारच सुरेख! मस्त!

मस्त