ओव्याच्या (ओरेगानो) पानांची भजी

Submitted by मनिम्याऊ on 20 September, 2018 - 14:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. ओव्याची (ओरेगानो) पाने १५- २०
२. बेसन २ मोठे चमचे
३. मिरची पावडर -१ टीस्पून
४. हळद पावडर- १ टीस्पून
५. जीरे पावडर -१ टीस्पून
६. मीठ चवीनुसार
७. दही १ चमचा (ऑपशनल)
८. पाणी - १ लहान वाटी
९. तेल (तळण्यासाठी)

क्रमवार पाककृती: 

ओव्याची पाने स्वच्छ धुवून घ्या.
जिन्नस क्रमांक २ ते ८ एकत्र करून सरबरीत कालवून घ्या.
कढईत तेल तापत ठेवा ते कडकडीत गरम झाले की त्यातलेच १ लहान चमचाभर तेल भज्यांच्या मिश्रणात घाला.
आता ओव्याची पाने मिश्रणात छान घोळून तेलात तळून घ्यावीत.
भजी तयार आहेत.

गरमा गरम असतानाच फडशा पाडावा.

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

या पानांना किंचीत तिखट असा strong फ्लेवर असतो.

माहितीचा स्रोत: 
स्वतः केलेले प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त भजी.

मी मागे कुंडीत ओवा लावलेला, तेव्हा करायचे. आवडतात आमच्याकडे.