तीन तासात स्वर्गात ... अर्थात बे एरियातून

Submitted by आल्हाद on 15 October, 2009 - 02:18

गेल्या ३-४ वर्षात मायबोली पासून दूर गेलो होतो .. पण गेल्या आठवडयात काही मायबोलीकरांची भेट झाली आणि परत मायबोलीत प्रवेश झाला ...

काही जुनेच फोटो ... पण सतत नवीन वाटणारे ...

Yosemite National Park

YosemiteEntrance.jpgYosemiteFalls.jpgBridalVeilFalls.jpgCascadeFalls.jpgELCapitanCathedral.jpgHalfDome.jpgHighSierra.jpgNevadaFalls.jpgLowerYosemiteFalls.jpgRoyalArchesHalfDome.jpgUpperYosemiteFalls.jpgVernalFalls.jpgVernalFallsCloseUp.jpgYosemiteValleyBed.jpg

मोठ्या प्रकाशचित्रांसाठी : http://alhad.smugmug.com

-आल्हाद

गुलमोहर: 

-

हाय अल्हाद! वेलकम बॅक!!

नेहेमीप्रमाणे अप्रतीम फोटो आणि स्वर्गच आहे योसेमिटी म्हणजे. मला झब्बु द्यायची प्रचंड सुरसुरी आलीय पण राहु दे आता!

छान आहेत फोटो.
'त्यांच्याकडून' थोडी फोटोला समर्पक गाणी घेऊन टाकलीत तर अजून मजा येईल Happy

सही फोटो. झब्बू द्यायचा मोह होतोय मलाही. बे एरियात राहत असताना योसेमिटीला कितीही वेळा गेलो तरी पुन्हा जावसं वाटायचं. विंटर, समर, स्प्रिंग, चांदण्यारात्री , योसेमिटीचं सौदर्य अप्रतिम दिसतं केवळ!!

सुरेख फोटो! झब्बू देता येईल, पण या फोटोंपुढे अगदीच साधे वाटतील. Happy

योसेमिटी सुंदरच आहे. (हिमालयात ट्रेकिंगला वगैरे गेला असाल तर अशा प्रकारचं निसर्गसौंदर्य बघायला मिळतं.) टिओगा पासमधून जायचं आहे एकदा. आम्ही गेला तेव्हा स्नोमुळे तो बंद होता.

सुरेख !!!!! फ्रेम्स जबरी आहेत.. कॅमेर्‍याची सेटींग्ज मस्त आहेत...

ह्याला म्हणतात खरी फोटोग्राफी.. !!!! खूपच सही... अजून टाकत रहा.. Happy

जबरी फोटोज!
योसेमिटी अजुन झाले नाही.. त्यामुळे आत्ता उठून जावेसे वाटतेय फोटो पाहून!
मोठ्या आकारातले फोटो तर केवळ अप्रतिम आहेत! येऊदेत आता नियमित..

भाग्यश्री

सगळेच फोटो स्वर्गीय आहेत. शेवटचा जास्त आवडला कारण ह्या angle मधून योसिम्ती चा फोटो नव्हता बघितला. इतके पाणी असताना गेला होतास तर half dome चे प्रतिबींब टिपले असशीलच ते पण टाक ना इथे.

खूप सुंदर ठीकाण आहे.....आणि सगळ्या फ़्रेम्स अगदी अव्वल दर्जाच्या वाटल्या.
अगदी भिंतीवर फ़्रेम करून लावाव्यात अशा!

आल्हाद.. मस्तच फोटो..

यसोमटि नॅशनल पार्कची स्वर्गिय सुंदरता फोटोत मस्त पकडली आहेस पण मैत्रेयी म्हणते त्याला अनुमोदन.

तसे अमेरिकतली सगळीच नॅशनल पार्कची ठिकाण नितांत सुंदर आहेत. नुकतीच पि. बी एस. वर... फेमस डॉक्युमेंटरिअन केन बर्न्सची.. अमेरिकन नॅशनल पार्कबद्दलची १२ तासांची डॉक्युमेंटरी.. सहा भागात सादर झाली ... अतिशय सुंदर डॉक्युमेंटरी! तुमची मिस झाली असेल तर पि. बी. एस. स्टेशन्सवर पुनः प्रसारित होणार आहे. ज्यांना ज्यांना निसर्गाची आवड आहे त्यांनी ती पाहायलाच हवी असे माझे मत आहे.

भाग्यश्री.. जरुर भेट दे यसोमटिला... तुला तर किती फोटो काढु आणी किती नको असे होइल तिथे गेल्यावर.

अमेरिकेतील माझ्या आवडीची ५ नॅशनल पार्क्स म्हणजे.. ग्लेशिअर नॅशनल पार्क, यसोमटि नॅशनल पार्क,ग्रँड कॅनिअन नॅशनल पार्क्,यलोस्टोन-ग्रँड टिटॉन नॅशनल पार्क व ब्लु-रिज पार्कवे नॅशनल पार्क. आणि
माँटॅनामधील ग्लेशिअर नॅशनल पार्क पासुन ५-६ तास वर... कॅनडात गेलात... तर बँफ व जॅस्पर नॅशनल पार्क म्हणजे तर कहरच आहेत... प्रत्येक माणसाने आयुष्यात एकदा तरी ही स्वर्गिय ठिकाणे पाहता आली तर जरुर पाहावीत अश्या मताचा मी आहे.

खर म्हणजे आपण अमेरिकेतील नॅशनल पार्क्स या वर एक नविन बीबीच उघडायला पाहीजे.. म्हणजे सगळे तिकडे आपला अनुभव लिहु शकतील व आपले फोटो टाकु शकतील.नेमस्तक... जर तुम्ही हा बीबी वाचत असाल तर..... असा बीबी उघडता आला तर खरच खुप बरे होइल असे मला वाटते.....