रंगीबेरंगी पौष्टिक सलाड - चटपटीत साउथवेस्टर्न सॅलड - मैत्रेयी

Submitted by maitreyee on 18 September, 2018 - 22:46

चटपटीत साउथवेस्टर्न सॅलड

आमच्याकडे सॅलड खायची फ्याशन अज्जिबात नव्हती खरं तर. सॅलड म्हणजे काहीतरी बेचव, गारढोण प्रकार औषध घेतल्यासारखा खाणे ही अ‍ॅटिट्यूड! पण माझ्या आता टीनेजर असलेल्या लेकीने काही वर्षांपासून सॅलड्स आवडीने खायला सुरुवात केल्यावर मी रेसिप्या शोधून प्रयोग करायला सुरुवात केली. मग कुठे लक्षात आले की सॅलड्स पण मस्त चविष्ट करता येतात की! आता जो प्रकार लिहितेय तो मुलीच्या खास आवडीचा. एरवी सॅलडची रेसिपी वगैरे काय लिहायचीय असे वाटले असते पण गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुद्दाम फोटो काढून लिहिली गेली.
या सॅलडला लागणारे ड्रेसिंग पण मी घरीच बनवते.

ड्रेसिंग साठी -
साहित्यः
ऑलिव ऑइल १/४ कप, १ लिंबाचा रस, कोथिंबीर, १ लहान मिर्ची ( किंवा हलापिनो चा लहान तुकडा), लसणाच्या १-२ पाकळ्या, ५-६ मिरी दाणे, १ चमचा मध, एक जरा मोठा चमचा सावर क्रीम किंवा योगर्ट किंवा ग्रीक योगर्ट, चवीपुरते मीठ.
18f82607-54af-4ed2-892a-63bc6a024e14_0.jpg50493c90-5ca2-4b11-a365-c34a1fc0e1ce_0.jpg
कृती :
मिर्ची, कोथिंबीर, लसूण, मिरी हे वाटून घ्या. ही चटणी आणि बाकीचे साहित्य एकत्र करून भरपूर हलवून एकसारखे करा.सुंदर क्रीमी टेक्स्चर चे ड्रेसिंग तयार होईल. लसूण , मिरची आणि कोथिंबीरीमुळे आपल्या देशी जिभेला ही चव एकदम आवडते.
9b8da449-5b5a-4d52-b8cd-453d00d1b682.jpgमुख्य सॅलड:
साहित्य:
रोमेन लेट्युस ची पाने, अवोकाडो, ग्रेप टोमॅटो, रंगीत मिर्च्या, मक्याचे दाणे उकडलेले किंवा भाजलेले, अर्धा कच्चा आंबा (किंवा पाइनॅपल वगैरे कोणतेही ट्रॉपिकल फळ चालेल), बदामाच्या चकत्या.
d7e547a0-2b17-4d3e-857c-3b0fc488721b.jpg
कृती:
भाज्या, फळे आवडीप्रमाणे चिरुन एकत्र करा.
923ba097-ff27-4e82-9a99-b302a6ecf65b_0.jpg
वरून उकडलेले किंवा भाजलेले मक्याचे दाणे, तयार केलेले ड्रेसिंग आणि शेवटी बदामाचे काप घाला. सर्व हलक्या हाताने एकत्र करा. हे सॅलड पौष्टिक आहे हे वेगळे सांगायला नको, अनेक रंगांमुळे आणि टेक्स्चर्स मुळे दिसायलाही सुंदर दिसते. साउथवेस्टर्न असं नाव दिलं कारण अवोकाडो, रंगीत मिरच्या, कॉर्न वगैरे असल्यामुळे. हवं तर मेक्सिकन म्हणा! Happy
या ड्रेसिंग ची चटपटीत चव, अवोकाडोची क्रीमी चव, टोमॅटो आणि फळांच्या तुकड्यांचा आंबटगोडपणा यामुळे हे सॅलड चवीला अतिशय चटपटीत आणि स्वादिष्ट लागते! बघा करून!!
सर्व नीट टॉस केल्यावरचा फोटो:
7d38c278-99f3-409b-8917-3b2678b74fc5.jpg
एरवी मी त्यावर टोर्टिया चिप्स चे तुकडेही घालते कुरकुरीतपणासाठी, पण इथे नियमात बसणार नाही म्हणून घातलेले नाहीत.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान रेसिपी.

चिपोटले मॅरिनेटेड पेक्षा थोडं वेगळं री ड्रमण्ड च्या रेसिपीने सुद्धा अगदी पटकन ग्रिल्ड चिकन करता येतं आणि छान लागतं.
https://thepioneerwoman.com/cooking/chicken-tortilla-soup/
इकडे स्क्रोल करून खाली रेसिपी पहा.

मस्त आहे पाकृ., ड्रेसिंग फार्फार आवडले, नक्की करणार... !
हे सॅलड अतिशय आवडतं, साधारण तशीच चव असणार ह्या रेसिपीची असे वाटतेय. Happy

सुंदर. टेस्टी दिसतंय. ते मिरची कोथिंबीर लसूण मिरी घातलेलं ड्रेसिंग बघून तोंपासु अगदी.

मस्त सलाड, त्यातल्या त्यात ड्रेसिंग ची रेसिपी तर मस्तच..
नक्की करणार ..
टोर्टिया चिप्स चे तुकडेही घालते कुरकुरीतपणासाठी>> हे मी पण घालेल किंवा कधी Croutons पण Happy

करुन बघितले. फक्त घरात स्ट्रॉबेरीज होत्या त्याच वापरल्या अननसाऐवजी. मस्तच लागले. ड्रेसिंगची चव तर भन्नाट आहे. डिपिंग सॉस म्हणून पण वापरता येईल.

अवांतर- राया, तुम्ही पुन्हा मॅकडीत जाल तेव्हा हे ड्रेसिंग करुन घेऊन जा बरोबर आणि सॅलड ऑर्डर केल्यावर ‘मेरे पास ड्रेसिंग है‘ म्हणत भाव खाऊन दाखवा. Wink

कालच हे सलाड करून खाल्लं.. बदाम कापा सोबत थोडे आक्रोड चे तुकडेही टाकले.. फारच आवडलं . .. ड्रेसिंग ने मजा आणली
खाण्याच्या नादात फोटो काढायचा राहून गेला Happy

अभिनंदन..!!
पण मग पहिला क्र. कुणाला मिळाला या कॅटेगिरीत?

मी एक केल सॅलडचा प्रकार करते ऑफिसच्या कॅफेटेरियात खाल्ल्यापासून. बेबी केल, बारीक चिरलेलं ग्रॅनी स्मिथ आणि ब्लॅक बीन्स एवढेच घटक. आवोकाडो साल्सा मिळतो त्यात थोडं ऑऑ, लिंबाचा रस, मीठ-मिरं घालून बनवलेलं ड्रेसिन्ग आणि वरून थोडं किसलेलं पार्म चीज आणि टॉर्टिया स्ट्रिप्स. खूप मस्त लागतं सॅलड.
हे लिहायला आले कारण आज जेवताना एकदम ही रेसिपी आठवली आणि हे ड्रेसिन्ग छानच लागेल या सॅलडसोबत असा साक्षात्कार झाला. आवोकाडो साल्सा असाच क्रिमी, तिखट चटपटीत असतो ना.

Pages