मोठे पणी मुलं कशी दिसतील ?

Submitted by थॅनोस आपटे on 13 September, 2018 - 14:06

इंटरनेट वर टाईमपास सॉफ्टवेअर्स मधे बराच वेळ घालवला . नवरा आणि बायको दोघांचेही फोटो दिले की त्यांचे होणारे बाळ कसे दिसेल ? बायकोच्या जागी सेलेब्रिटीजचे फोटो टाकून पाहीले. दोघांच्या चेह-यासारखा एक तिसराच चेहरा बनायचा.

अजून एक सापडले त्यात नवरा किंवा बायको, दोघांपैकी एकाचेही चित्र दिले तरी चालायचे (लग्न न झालेल्यांसाठी अत्यंत उपयुक्त). ज्यांचे बाळ ऑलरेडी आहे त्यांचे बाळ मोठे झाल्यावर कसे दिसेल असे एक सॉफ्टवेअर होते. तर बाळाचा आणि बाबाचा / आईचा फोटो देऊन मोठेपणी ते कसे दिसेल असेही एक सॉफ्टवेअर होते.

कुणाला या निकालांचा खरेपणा अनुभवाला आलेला आहे का ? कुणी हे वापरले असेल आणि तसेच झाले असेल किंवा नसेल तर फोटो अपलोड कराल का ? ते शक्य नसेल तर शब्दात सांगितले तरी चालेल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोघांचे फोटो दिले तर असा रिजल्ट येतो. हे नाही जुळणारे. दोन्ही मुले अशी नाहीत.
फक्त आई किंवा वडील असे पहायला हवे.
Screenshot_2018-09-14-09-34-55-920_com.android.browser.png

मूल नसेल तर वरीलप्रमाणे आलेले रिझल्ट घेऊन age progressive software यानंतर वापरावे लागते. वन गो मध्ये नाही येणार. मूल असेल तर सरळ फोटो अपलोड करावा.
वरचे सॉफ्टवेअर वापरून ते मुलांशी जुळते का हे पहायची उत्सुकता होती. नेमके फंडे काय आहेत हे समजत नाही.

असे फोटो गोळा करुन ह्या डेटाबेसचा न्क्की काय उपयोग करतील ??? हा फक्त टाईमपास प्रकार नसावा.

सध्या face recognition technology खूप वाढते आहे.
हे फोटो जमा करून नंतर कसा उपयोग होईल सांगता येत नाही.
स्वतःची आणि कुटुंबाची खाजगी माहिती देताना सांभाळून.

स्वतःचे फोटो नको रे बाबा
आधी अभिषेक ऐश्वर्या चे फोटो टाकून बघेन मुलगी आराध्या सारखी दिसते का.

अनु यांनी सुचवल्याप्रमाणे जे अस्तित्वात आहेत त्यांचे फोटो टाकून चेक केले आणि मॅच झाले नाही तर,
१. एकतर साॅफ्टवेअर ला प्राॅब्लेम आहे
नाहीतर
२. शंका कोणावर घ्यायची का?

हे उत्तर त्या प्रोबॅबिटीच्या धाग्यावर विचारावे का? :विचारात पडलेला बाहूला:

३. सॉफ्टवेअर वाले बावळट आहेत. लोक मुलं असलेल्या प्रसिद्ध जोडप्यांचे फोटो अपलोड करून पडताळा करतील, तेव्हा आपण त्यांच्या मुलांचेही फोटो अपलोड करून ठेऊन ते
जोडप्याच्या फोटोच्या फेसरिडींग वरून वापरावेत एवढं पण त्यांना कळत नाही.

शंका कोणावर घ्यायची का? >>> आई वडीलांपेक्षा मूल वेगळे दिसत असेल तर शंका घ्यावी असे म्हणताय का ? काही आधार आहे का ?

मी आधी दोघांचे , मग एकट्याचे फोटो देऊन मूल कसे दिसेल वाले सॉफ्टवेअर वापरले. नंतर ते मूल मोठे झाल्यावर कसे दिसेल हे पाहिले. एव्हढा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा मित्राने मोबाईल अ‍ॅप्स दाखवले. अक्षरशः सेकंदात रिझल्ट मिळतो. अगदी शंभर टक्के नाही, तरी चेहरेपट्टी वगैरे बरोबर येते (पोलिसांचे स्केचेस नसतात का, त्यावरून गुन्हेगार पकडता येत नाही पण पकडला गेल्यावर अरेच्चा, असा होता होय तो ? असे वाटते तसेच काहीसे ).

पाथफाइंडर मूल आजोबा, आजीवर जातं. अनेकदा काका, मामा, मावशी सारखं दिसतं. त्यामुळं आई किंवा वडीलांसारखेच दिसले पाहीजे हा हट्ट बरा नव्हे. नाहीतर एकाच छापाचे शिक्के बनत राहीले असते ना ?

अहो किरणुद्दिन,
मुल कोणा सारखेच दिसावे, हा माझा अट्टाहास नाही. थोडा विनोद निर्मीतीचा माझा प्रयत्न होता, जो फसला. याउलट धागा भरकटवण्याचे पाप माझ्या माथी येऊ शकते. त्यामुळे येथेच थांबणे योग्य.

@च्रप्स
आत्ता गेल्या काही दिवसात एका आयडीच्या अंगभूत कौशल्याला मी "मान" दिला. त्यावरून माझी त्याच्या कंपूत रवानगी केली गेली आहे.
आता स्वतः ची इमेज सांभाळतो आहे

Lol

कशी निघतील याची जास्त चिंता आहे हो >> Lol

चिंता सोडा. चांगली दिसली तर मालिकेत वगैरे दिसतील. मग कशी का निघेनात..

https://youtu.be/ZSq6SZS7PHQ?t=68

यात दाखवलेला १५ वर्षांचा सुरज नावाचा मुलगा मोठेपणी सिल्वेस्टर स्टॅलोन सारखा दिसणार बघा.