उपवास स्पेशल : स्पायसी पोटॅटो वेजेस

Submitted by आ.रा.रा. on 27 June, 2018 - 01:33
potato wedges
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ बटाटे
स्पायसेस चॉइसनुसार.

क्रमवार पाककृती: 

दोन मध्यम बटाटे चिरून पाण्यात थोडा वेळ भिजवून मग कोरडे करून घ्यावेत.
त्याला उपवासी लोकांसाठी फक्त जिरं, मीठ, मिरची, कोथिंबीर, लिंबू अन तूप लावावे
अनुपवासी लोकांनी आलं लसूण पेस्ट, धणेपूड, हळद अ‍ॅड करावी, हवे तर तुपाऐवजी तेल.

P1.jpg

एयर फ्रायर सेटिंग्ज :
२०० डिग्री प्रीहिट ३ मिनिटे,
भांड्याला तेल्/तुपाचा ब्रश/स्प्रे लावून त्यात वेजेस टाकून १० मिनिटे
यानंतर बाहेर काढून एकदा हलवून घेणे. हवे असल्यास आवडीचे चीज किसून टाकणे.
पुढील ८ ते १० मिनिटे १६० डिग्रीवर, जसे कडक हवे तशाप्रमाणे

हे मसाला
P2.jpg

अन हे उपवासाचे :
P3.jpg

एन्जॉय!

वाढणी/प्रमाण: 
एकास दोन बटाटे.
माहितीचा स्रोत: 
मी
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults

का हो तुम्हा असे छळकुटे फोटो टाकता! :तोंपासू:

एकटीपुरते करायचे घडतीलसं दिसत नाही. बाकीची मंडळी पथ्यावर असतात किंवा हौशी नसतात/ अतिचिकित्सक असतात!! कोणीतरी करा नि बोलवा मला! Proud

आहाहा काय दिसतायेत, असे उचलून तोंडात टाकावेसे वाटतायेत.

एफ्रा नाहीये. तळलेले बटाटे करते मी पण वरती फक्त तिखट मीठ शिंपडते, नवऱ्याला आवडतं तसं.

आता अशी व्हरायटी करून बघेन, तळून करावं लागणार.

Mave madhe mast potato chips hotat. YouTube var potato wedges MW madhe chya recipes aahet Happy

होतील. बटाटे अर्धवट उकडून घ्या, म्हणजे लवकर होतील. तेल/तूप भरपूर नाही घातलं तर बटाट्याची भाजी होईल मात्र.

आज करून बघितले . टेस्टी लागत आहेत .एअर फ्रायर नसेल तर तेल मात्र जास्त लागतं. त्यामुळे गिल्ट फ्री खायचे असतील तर एफ्रा वगैरे विचार करावा लागेल

IMG_20180912_104310-01~2.jpeg

Lol

>> बटाट्यासोबत गिल्ट फ्री मिळते. Lol
Lol

>> गिल्ट - फ्री असं बटाट्यात काहीच नसतं.
ह्याच्याशी मात्र सहमत नाही.

Pages