मुंबई अग्निसंरक्षण दल. एक चांगला अनुभव.

Submitted by अश्विनीमामी on 8 September, 2018 - 09:54

मुंबईच्या सेंट्रल सबर्ब्स मध्ये लाल बहादुर शास्त्री हा एक आर्टेरिअल रूट आहे. दिवस रात्र बिझी अस णारा. इथले अनेक लँड्मार्क वर्षा नुवर्षे प्रसिद्ध झालेले आहेत. मुलुंडातले जाँसन कंपनीची फॅक्ट्री व त्याही पेक्षा तिची बाग अगदी लोकप्रिय आहे. ह्या सिग्नल समोर एक फायर स्टेशन आहे तीन ट्रक कायम गो मोड मध्ये रोड कडे तोंड करून उभे, एक मोठे साधे घड्याळ जे मी जाता येता बघून त्याप्रमाणे आता काय करायचे ते आखत असते. व एक साधे पण सुरेख गणपतीचे देउळ. देउळ आत आहे पण त्याच्या मागच्या बाजूस एक बस स्टॉप आहे तिथे उभे राहणारे व पासरबाय पब्लिक ह्या पा ठच्या गणेशाला पण नमस्कार करतात हे मी रोज बघते. एकदा एक कुत्राचालक कपल से जय जय टू बाप्पा बेबी म्हणताना पण बघितले आहे. ह्या आतल्या मैदानात कुत्रे आणायला परवान गी नाही. इथे पहाटे ह्यांच्या कवायती फिझिकल व्यायाम वगैरे चालतात. बाहेरून फिरताना कमांड र चा आवाज येतो. घरी परत येताना सामान ऑर्डर केलेले डिलिव्हरी घेताना नेहमी वो फायर ब्रिगेड हैना वहांसे टर्न लेलो असे सांगणे असते. मुलुंड सबर्बन लाइफ मध्ये ह्या स्टेशनचा एक अविभाज्य सहभाग आहे.

परवा अचानक ह्या दूर दूरसे प्यारचे एकदम रिलेशन शिप मध्ये रूपांतर झाले. मी सकाळी कुत्र्याला फिरवायला गेलेले. माझ्या अंगात ताप होता. त्यामुळे हे उरकून आता अर्धा तास आराम करून कामाला जावे का रजाच घ्यावी त्या अर्धवट विचारात मी होते. स्वीटी व तिचे दोन स्ट्रे मित्र इथे तिथे मागे बेसमेंट मध्ये फिरत होते. मोकळी जागा आहे व तिथे फिरवायला सोसायटीची परवानगी आहे. अचानक त्यांना एक मांजर गवतात आराम करत होते ते दिसले. ह्यांना बघून ते सुसाट पळले व हे तिच्या मागे....!!! मग बराच वेळ शोधा शोध झाली. डॅशुंड कुत्र्याचे एक आहे प्रचंड हेके खोर. एक करत बसले की तेच पार जीव जाईस्तो थके परेन्त कर णार. मग ते मांजर नाहिसे झाले असले तरी प्रचंड शोधाशोध झाली अचानक एक सलग आवा जात रडके भुंक णे ऐकू आले. मी व एक पोरगा गाडी पुसत होता आम्ही दोघांनी चमकून पाहिले तर दोन मोठी कुत्री सैरभैर फिरत होती व. स्वीटी दिसत नव्हती. Sad

झाले काय मोकळ्या जागेत खूप दिवस आधी ते स्लॅ ब भरताना खाली सपोर्ट लावतात ते पाइप एक मोठी लॉरी भरून आणून टाकले होते. बरोबर पत्रे स्टील ची स्टुले वगैरे. तर स्वीटी बारीक व लांबोळ क्या शरीराची असल्याने ती मांजराच्या शोधात त्या पाइपच्या मोठ्या पाइल मध्ये आत कुठे तरी गेली व मग बाहेर येता येइना. मी दहा मिनिटे प्रयत्न केला शोधायचा आवाज दिला व दिसली तर तिला सांगून सांगून बाहेर आणता येते.

पूर्वी वीनी ने पण असा स्टंट केला होता पण ती बांबूच्या ढिगा खाली अडकलेली. हे पाइ प मला एक पण उचलणे शक्य नव्हते. मग बी ब्लॉक च्या वॉचमनला विचारले तो म्हणे मेन गेटला जा, तिथे दोन तीन माणसे भेटतील त्याना रिक्वेस्ट करा नाहीतर सर ळ फायर ब्रिगेडला बोलवा. आपल्याला ह्या बाबतीत किती कमी अनुभव असतो. फेसबुक व र रेस्क्यू बघतो नाहीतर पेपरात रेस्क्यू, फायर ऑपरेशन्स बघतो व वाचून सोडून देतो. मग सोसाय टीचा केअर टेकर मुलगा आहे त्याला दाखवले मागे आणून !! तो फोन वर बोलत होता मला म्हणे बुलाना पडता १०२ कॉल करो म्हणून चालता झाला. आता काही इलाजच नाही. १०२ नंबर लावला. तो लागला पण पण १०२ हा अ‍ॅम्ब्युलन्स नंबर आहे. ते म्हणे १०१ वर कॉल करा. तो लावला. मग शुद्ध मराठीत काय मदत करू असा प्रश्न आल्यावर केविलवाणे पणे सांगितले आदमी भेजो म्हणून . त्यांनी पण फोन वर समजू त घातली रडू नका म्हणून. .. पण हेल्पलेस वाट्त होते हे खरे...

मग दहा मिनिटात फुल मोठी फायर ट्रक लाइक वी सी इन मुव्हीज आली. चार तगडे बाप्ये तरूण फुल्ली फायर सूट मध्ये व विथ स्पेश ल हेल्मेट्स, एक महिला ऑफिसर व एक मोठे साहेब युनिफॉरम वाले. हे एअर्फोर्स पायलट सारखे दिसत होते. मी त्यांना नमस्कार करून परिस्थिती सांगितली. फोटो दाखवला कुत्र्याचा पेट आहे हे सांगितले. ह्या सर्व टीमला डिस्ट्रेसड व्यक्तींशी कसे बोलायचे वागायचे ते नक्की ट्रेनिन्ग मिळाले आहे. मग त्याम्नी तो गाडिपुश्या मुलगा, अजून एक त्याचा कलीग व दोन त्यांचे जवान मिळून एक एक पाइप उचलायला सुरुवात केली. पण त्यांना फार मेहनत करावी लाग ली नाही. कुत्र्याचे भुंक णे बंद झाले होते..........

मागच्या बाजू ने शेपटी हलवत स्वीटी हजर. सर्वांचे चेहरे उजळले. ....... त्यांनी लगेच परत जायचे चालू केले. कारण कामच झाले होते.
मी साहेबांना काय चार्जेस असतात असा स्टुपीड प्रशन विचारला . त्यांनी काही नाही असे विनम्र पणे सांगून परतीची तयारी केली. मी हात जोडून नमस्कार धन्यवाद करून परत निघाले.

ज्यांची घरे माणसे अग्निच्या संकटात सापडत असतील त्यांचे काय होत असेल हे मी अनुभव ले त्यापेक्षा कितीतरी अवघ ड व भयानक असेल जे व्यक्तिशः जाणव ले. माझी तक्रार खरे तर त्यांच्या साठी चिल्लर टाइपच होती पण मला फुल प्रोफेशनल ट्रीटमेंट मिळाली. व मुंबईचे रक्षक जे पोलीस, सर्विसेस, इमर्जन्सी सर्विस पीपल व फायर ब्रिगे ड ह्यांचा शहराला किती तगडा सपोर्ट आहे त्यांचा बारका डॅशुंड लेव्हल अनु भव मिळाला.

मी कृत ज्ञता म्हणून त्यांना मिठाईचे बॉक्स / फुले/ अत्तर बाटल्या / गणेशो त्सवात डोनेशन द्यावे असा विचार केला पण ते ही कमीच वाट्ते आहे व वर वरचे जेस्चर वाट्ते आहे. आमची कंपनी स णासुधीला पूजेसा ठी वगैरे अत्तर सँपले वाट्तेच नेबरहूड मध्ये . फार आधी पासून त्यात नवे काय.

मुंबई फायर ब्रिगेडला एक सॅल्युट.
ही त्यांची साई ट. आय शुड पे इट फॉरवर्ड. काही वोलेंटिअर ट्रेनिण्ग घेता येते का ते तपासते.
https://en.wikipedia.org/wiki/Mumbai_Fire_Brigade

http://www.mahafireservice.gov.in/Site/Home/Home.Aspx

लक्षात ठेवा १०१ फॉर ट्रक. १०२ फॉर अ अ‍ॅम्ब्युल न्स.

दे सर्व्ह टू सेव्ह . हाउ ट्रू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फायर ब्रिगेडच्या नावांत फक्त "फायर" अस्ल्याने त्यांनी केवळ आगीशी निगडित घटनांकडेच लक्ष पुरवावं असं म्हणणं चूकिचं आहे. सगळ्या आपत्तींना सामोरं जाण्याकरता आवश्यक असणारी हत्यारं आणि ट्रेनिंग त्यांना उपलब्ध केलेली असतात. जगभरातले फायर ब्रिगेडस डिझास्टर मॅनेजमेंट, रेस्क्यु ऑपरेशन्स, सेफ्टि प्रमोशन्स अशा इतर कामगिरीतहि सामिल होत असतात. हे दल सिटी/काउंटी च्या अखत्यारित येत अस्ल्याने (कर भरणार्‍या) प्रत्येक नागरिकाचा त्यांच्या सेवेवर हक्क आहे/असतो. अर्थात फॉल्स अलार्म, सेवेचा दुरुपयोग योग्य त्या दंडास पात्र आहे पण सरसकट प्रत्येक वेळेला सेवेचा मोबदला वसूल करणे किंवा अशा विशिष्ठ कामाकरता एक वेगळं दल स्थापन करणे हा प्रस्ताव व्हाएबल नाहि...

अमा खूप छान , दिलासादायक अनुभव सांगीतलात . अशी वेळ आली तर आपण काय करु शकतो याची कल्पना आली .

Pages