अंगूर-आदी सिनेमे - अनेक जुळ्यांची धमाल

Submitted by भोजराज on 3 September, 2018 - 00:15

बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा "अंगूर" पाहिला आणि ह-ह-पु-वा झाली.

देवेन वर्मांचा रश्शीचा भाव करतानाचा सीन म्हणावं किंवा संजीव कुमारांचा "जोकर आ गयाSSS" चं टाईमिंग - सगळंच अफलातून.

सिनेमाच्या सुरुवातीला उत्पल दत्त आणि शम्मीजींचे छान डायलॉग आहेत:
उत्पल दत्त : सच्ची बात बोलूं? मुझे तैराना नहीं आता. इसीलिये पानीमें (जहाजसे) सफ़र करते हुये मुझे डर लागता हैं.
ह्यावर शम्मी यांचा सुरेख जवाब
शम्मीजी : और मैं एक बात बोलू? मुझे उडना नहीं आता. इसीलिये हवामें सफ़र करते हुये डर लागता हैं. Lol Lol

चार जुळ्यांचा हा सिनेमा बहुधा एकमेवाद्वितीय असा असावा. किंवा माझ्या ज्ञानात तरी दुसरा ४ जुळ्यांचा सिनेमा नाही.

नाही म्हणायला अमिताभचा "महान" आठवतो ज्यात अमिताभने ट्रिपल रोल केला होता.

असे आणखी कोणते सिनेमे आहेत ज्यात एका जोडीपेक्षा जास्तं जुळी पात्रं आहेत? भाषेचं बंधन नाही.

हे जाणून घेण्याकरिता हा धागा. ह्या विषयावर पूर्वी चर्चा झाली असल्यास, लिंक द्यावी. मी शोधण्याचा प्रयत्नं केला, पण मला काही सापडलं नाही.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मुळातच डबल रोल म्हणजे फारच फिल्मी आणि कल्पकतेचा अभाव असलेला प्रकार झाला. वर्षानुवर्षे तेच फंडे वापरले जातात.
आपल्याकडे जसे डबल रोल मसाला पट होतात तसे त्या प्रमाणात इंग्लिश वा परदेशी भाषांमध्ये असतात का?

आपल्याकडे जसे डबल रोल मसाला पट होतात तसे त्या प्रमाणात इंग्लिश वा परदेशी भाषांमध्ये असतात का?
>>>>

बरेच आहेत. आता चटकन आठवणारे -

Bowfinger - एडी मर्फी
The Life & Death Of Peter Sellers - जेफ्री रश
The Devil's Double - डॉमनिक कूपर
Cloud Atlas - ह्यू ग्रँट
Face Off - निकोलस केज आणि जॉन ट्रॅव्होल्टा
Adaptation - निकोलस केज

आणि सगळ्यात अफलातून सिनेमा

The Great Dictator - चार्ली चॅप्लीन.

हिंदी सिनेमात डबल रोल्सची हमखास सोय करणारा प्रकार म्हणजे पुनर्जन्मावर आधारीत कथा असलेला सिनेमा. बहुतेकदा हिरो आणि हिरॉईन दोघांचाही पुनर्जन्म घडवून आणण्याची सोय असल्याने दोघांचेही डबल रोल असलेले असे अनेक सिनेमे आलेत.

मधुमती - दिलीप कुमार, वैजयंती माला
मेहबुबा - राजेश खन्ना, हेमा मालिनी
कुदरत - राजेश खन्ना, हेमा मालिनी
मिलन - सुनिल दत्त, नूतन
जनम जनम - ऋषी कपूर आणि कोणीतरी बाई - वर उल्लेख केलेल्या मधुमतीची भयाण कॉपी आहे हा सिनेमा.
हमेशा - काजोल, सैफ अली खान
ओम शांती ओम - शाहरुख खान, दिपीका पदुकोण - मधुमती आणि अनेक सिनेमांची अतिशय रद्दड भेळ.
आणि
फागून - मधुबाला, भारत भूषण (एकाच रोलमधे असह्य असलेल्या या प्राण्याला दोन रोल्समध्ये पाहणं आणि ते देखिल मधुबालाबरोबर म्हणजे नुसता संताप संताप होतो.

पुनर्जन्माचं एक असह्य आणि अतिबटबटीत व्हर्जन म्हणजे दोन भावांचा पुनर्जन्म असलेला करण अर्जुन.

एकाच रोलमधे असह्य असलेल्या या प्राण्याला दोन रोल्समध्ये पाहणं आणि ते देखिल मधुबालाबरोबर म्हणजे नुसता संताप संताप होतो.
>>Lol

ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईटच्या जमान्यापासून आजपर्यंत जवळपास प्रत्येक प्रमुख हिरोने डबल रोल केलेला आहे. अगदी अशोक कुमार (अफसाना), राज कपूर (पापी), देव आनंद (हम दोनो), दिलीप कुमार (बैराग, राम और शाम) इतकंच नव्हे तर एकाच रोलमध्ये असह्य असूनही जानी राज कुमार (कर्मयोगी), भारत भूषण (फागून), राजेंद्र कुमार (गोरा और काला, झुक गया आसमान), जॉय मुखर्जी (हमसाया) यांना देखिल डबल रोल मिळाले पण बलराज सहानीसारख्या कलाकाराला एकाही सिनेमात डबल रोल मिळाला नाही. आताच्या हिरोंपैकी अद्याप डबल रोल न केलेला चटकन आठवलेला कलाकार म्हणजे अक्षय खन्ना.

हिरॉईन्सचा विचार केला तर स्मिता पाटील, जया भादुरी (थँक गॉड!) यांना कधीही डबल रोलमध्ये पाहिल्याच आठवत नाही आणि अमरीश पुरी आणि अमजाद खान यांचेही डबल रोल आठवत नाहीत.

मीना कुमारी - पाकिझामधे आहे ना डबलरोल?
>>>>

अरेच्चा हो! हा सिनेमा कसा काय विसरलो काय माहित?
एडीट करतो.

आणखीन एक आठवणारा सिनेमा म्हणजे देव आनंद - हेमा मालिनीचा जॉनी मेरा नाम. आय एस जोहरचा यात ट्रिपल रोल होता.

रिव्हर्स स्वीप Lol

===
> बेमिसाल माझा बच्चनच्या आवडलेल्या तीन चार मोजक्या सिनेमांपैकी एक आहे. सिनेमा बच्चनमुळे आवडतो की मुखर्जींमुळे ते अजून थोडे संदिग्द्ध आहे, पण ह्या सिनेमातले बच्चनचे काम नक्कीच आवडते. > बच्चनचा आवडलेला सिनेमा म्हणल्यावर मलातर डॉन हा एकच आठवतोय. बेमिसाल पाहिला नाहीय बहुतेक. बाकी २-३ची नावंपण सांगून टाका.

अ‍ॅमी,

मागच्या पानावर पाहा. मी बच्चन, धरम आणि जीतेंद्रच्या डबल रोलवाल्या सिनेमांची सगळी लिस्ट दिली आहे.

सिनेमामध्ये स्टेजवर नाटकामध्ये डबल किंवा अधिक भूमिका साकारण हे जास्त कठीण आहे हे माझे मत आहे. नाटकात प्रेक्षक समोर बसलेले असल्याने डबल रोल साकारताना खूप अ‍ॅलर्ट राहाव लागत असाव. मी पाहिलेल्या नाटकांपैकी प्रशांत दामले (बे दुणे पाच) आणि भरत जाधव (ते गलगले असलेलं एक नाटक ज्यात त्याचे चार रोल्स होते) ही चटकन आठवलेली दोन.

गोविंदा - राणी मुखर्जीचा 'हद कर दी आपने' कुणी पाहिलाय?
यात गोविंदाने, स्वतः, त्याच्या आजी-आजोबांचा, त्याच्या आई-वडिलांचा आणि बहिणीचा सुद्धा रोल केलाय...

श्रीदेवीचा चालबाझ . ज्यात तिचा डबल रोल होता
>>>>>

श्रीदेवीचा लम्हे, खुदा गवाह या सिनेमातही डबल रोल होता.

जुही चावलाचा डबल रोल असलेला सिनेमा आठवतो का कोणाला?

आता धागा नुसत्या एकाच डबल रोलच्या वळणावर गेलाय म्हणून माझे पण चाराणे. (आधी आले नसले तर. मधले काही प्रतिसाद वाचनातून सुटलेत)

राखी -शर्मिली (जुळ्या बहिणी) ; शर्मिला टागोर - मौसम (आई - मुलगी), ममता -सुचित्रा सेन (आई मुलगी), रेखा -काली घटा (जुळ्या बहिणी)

मराठीत फरारी - जयश्री टी - जुळ्या बहिणी.

अंदाज अपना अपनाचा उल्लेख झालाय का? परेश रावल

शर्मिला टागोरचा 'अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरीस' आणि 'तलाश' मध्येही डबल रोल आहे.

अफसाना मध्ये अशोक कुमारचा डबल रोल आहे. याच अफसानाचा पुढे दास्तान नावाने रिमेक झाला ज्यात दिलीप कुमारचा डबल रोल आहे. मजा म्हणजे दिलीप कुमारच्या लहानपणीचा डबल रोल सचिनने (आपले महागुरु हो!) केला आहे.

ग्रेट गॅम्बलरमध्ये अमिताभच्या डबल रोलच्या जोडीला प्रेम चोप्राचाही डबल रोल आहे.

देव आनंदचा डबल रोल असलेला हम दोनो आठवत असेलच (मै जिन्दगी का साथ निभाता चला गया...). त्यानंतर हम दोनो नावाचा आणखीन एक सिनेमा आला आणि यात राजेश खन्नाचा डबल रोल होता. नशिबाने तिसर्‍या हम दोनोमध्ये नाना पाटेकर आणि ऋषी कपूर सिंगल होते Lol

मेरा साया - साधना
वह कौन थी - साधना
अनिल कपूर - किशन कन्हैया

नया दिन नयी रात हा नवरसदर्शन घडवणारा चित्रपट आहे. संजीवकुमारची एकेक भूमिका एकेक रस मांडते. कथानक ग्रेट नसेल. पण संजीवकुमारसाठी पाहण्यासारखा आहे.
मी एकदा पाहिलाय. पुन्हा दिसला, तर पाहीन.

> अॅमी,
मागच्या पानावर पाहा. मी बच्चन, धरम आणि जीतेंद्रच्या डबल रोलवाल्या सिनेमांची सगळी लिस्ट दिली आहे. >
हो. पण हायझेनबर्गने "बेमिसाल माझा बच्चनच्या आवडलेल्या तीन चार मोजक्या सिनेमांपैकी एक आहे." लिहिले आहे म्हणून विचारलं की " बाकी २-३ची नावंपण सांगून टाका."

===
आणि बात एक रात की मधे वहिदाचा डबलरोल होता का की मी गोंधळलेय?

आणि बात एक रात की मधे वहिदाचा डबलरोल होता का की मी गोंधळलेय?
>>>>>>

बात एक रात की मध्ये नव्हता, मन मंदीर मध्ये वहिदाचा डबल रोल होता.

What happened to Monday नावाचा सिनेमा पाहिला. यात एकाच अभिनेत्रीनं सात भूमिका केल्या आहेत.

ज्यांना सायफाय, अ‍ॅक्शन टाईप आवडतात त्यांच्यासाठी आहे. मुळात संकल्पनाच वेगळी आहे. भविष्यकाळात जगात लोकसंख्या खूप वाढलीये आणि त्यावर उपाय म्हणून एक कुटुंब एक मूल हा नियम केला जातो. मग एक सोडून बाकीच्या मुलांना क्रायोस्लीप (दीर्घकाळच्या झोपेत) मध्ये घालण्याचा उपाय करतात. पण एक माणूस त्याच्या मुलीला झालेल्या सात एकसारख्या दिसणार्‍या सातोळ्या मुलींना मोठं करतो .... त्यांची नावं आठवड्याच्या वारावरून ठेवली असतात. रोज नावानुसार एकजण बाहेर जाऊन नोकरी करते आणि संध्याकाळी आजच्या दिवसात काय काय घडलं हे त्या एकत्रित बघतात आणि एकच व्यक्ती असल्यागत वागतात.

पण पुढे काही वेगळं घडू लागतं ... त्याचीच ही गोष्ट. सुरेख आहे सिनेमा आणि ज्या अभिनेत्रीनं (Noomi Rapace) ही सात जणींची भुमिका केलीये ती निव्वळ अप्रतिम आहे.

Noomi Rapace म्हणजे गर्ल विथ ड्रॅगन टॅटू आणि इतर याच सिरीजमधल्या मूव्हीजमधली.

गोविंदा - राणी मुखर्जीचा 'हद कर दी आपने' कुणी पाहिलाय?
यात गोविंदाने, स्वतः, त्याच्या आजी-आजोबांचा, त्याच्या आई-वडिलांचा आणि बहिणीचा सुद्धा रोल केलाय.. >>>> हो, मी पाहिलाय. त्यात आणखी बरेच रोल केले आहेत त्याने, पण ते रुढार्थाने डबल रोल्स नव्हते. जसे की, सरदारजी , विमानातली बाई, चायनीज, अरेबियन, दादा कोन्डके ई. शेवटी राणी मुर्खजी सरदारजी झालेली दाखवलीय.

What happened to Monday >>>> ह्या सिनेमाबद्दल वाचलय लोकसत्तामध्ये. Happy

What happened to Monday नेटफ्लिक्सवर आहे सध्या.

Pages