अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरील घटनेनंतर मुलींचा विचार मी सोडून दिला हे सांगायला हवे का ? सांगून आलेल्या पहिल्या स्थळाला होकार दिला आणि मुकाट्याने लग्नं करून प्रेममहाल बांधण्याची स्वप्ने गाडून टाकली. बायको हीच प्रेयसी, बायको हीच मैत्रीण हे ब्रीदवाक्य ठेवले. तिने ठेवले तसे रहावे, दिले ते खावे अशा बाण्याने संसार केला. त्याचा परिणाम म्हणून मग वजन वाढू लागले. माझे मलाच अप्रूप वाटू लागले. ते वाढते वजन काही वर्षातच मग इतके वाढले की लग्नातला सूटही येईना... आता वजन कमी करण्याची निकड भासू लागली.

या दरम्यान अजून एक किस्सा घडला पण तो आता बोटण्याचे त्राण राहीलेले नाहीत.

धागा बंद पडला आहे का? उगीच मेहनत घेतली कि काय!>>>> बंद नाही पडला, दहशत आहे. बोकलतची पोस्ट कधीही येऊ शकते.

आमची बिल्डिंग सहकारी तत्वावर बांधण्यात आलेली, सर्व सभासद एकत्र येऊन ७० च्या दशकात. आमच्या फ्लॅट समोरील फ्लॅट मध्ये राहत असलेले सुद्धा फाउंडर मेम्बर्स पैकीच एक होते. त्या वेळेच्या आर्थिक निकषानुसार ते कुटुंब तसे सुखवस्तू प्रवर्गात मोडणारेच. परंतु त्या सभासदाच्या पत्नीला कळ्या विद्येत गती होती असे म्हणायचे लोक. तिला तसे विधी करताना पहिले होते काही लोकांनी, काहींना तिच्या सोबतचे वाईट अनुभव सुद्धा होते, पण सर्व कुजबुज होती, उघडपणे लोक काही बोलत नसत. पण शेवटी जो दुसर्यांचे वाईट करतो त्याचे स्वतःचे हि भले होत नाही कधी, आणि तिच्या सोबत हि तसेच झाले एकुणात.
हि घटना झाली तो पर्यंत तिचे दोन मोठे मुलगे अकाली व्यसनाच्या आहारी जाऊन निधन झाले होते. एका मुलीने जाळून घेऊन आत्महत्या केली होती, फक्त पतीचं काय म्हणावा तो हार्ट अटॅक ने वारलेला(तसं वय हि झालेला त्याच). पण या बाईंच्या करणीत काही फरक नव्हता, सर्व अविवेकी प्रकार तसेच सुरु होते तिचे. आणि नाही म्हणायला तिचा सर्वात लहान मुलगा तेवढा शिल्लक होता पण तो हि प्रचंड व्यसनाच्या आहारी गेलेला आणि अतिशय कुसंगतीत असलेला, त्याच्या सोबत असलेले सर्व त्याचे मित्र चोर आणि गुंड प्रवृत्तीचे म्हणून पूर्ण विभागात कुविख्यात होते. ते त्याच्या सोबत बिल्डिंग मध्ये यायचे आणि त्याचा इतर सभासदांना हि त्रास व्हायचा. कधी कधी त्याचे मित्र आमच्या बिल्डिंग च्या टेरेस वर झोपायचे.
तर त्या दिवशी हि त्याचे दोन मित्र असेच टेरेस वर झोपले होते आणि नेहमी प्रमाणे दारू प्यालेले हि होते, अचानक रात्री तीन च्या सुमारास त्यातल्या एकाला जाग आली, त्याचा दुसरा मित्र ओरडत होता आणि टेरेस च्या कठड्याच्या दिशेने पळत होता. त्याने धावत जाऊन त्याला पकडले, तर तो रडत ओरडत बोलायला लागला कि, सोड मला.... मला जीव द्यायचाय...... त्या मित्राने त्याला समजावले शांत केले पण तो शांत व्हायला तयार नव्हता, शेवटी त्याने त्याला घेऊन बिल्डिंग सोडली नि आणखी कुठे तरी गेला, तिथे सविस्तर त्या मुलाने त्याच्या सोबत घडलेली हकीकत सांगितली. त्याने सांगितले कि रात्री अचानक मला जाग आली नि मला समोर आमच्या बिल्डिंग मधली ती स्त्री दिसली, तर तो उठला नि तिच्या जवळ गेला आणि विचारला कि इतक्या रात्री तुम्ही इथे काय करताय??(मित्राची आई या उद्देशाने).... तर ती बाई म्हणाली कि मी रोज येते इथे, माझ्या मुलीला भूक लागते ना, तिला खायला द्यायला येते मी... तर त्याने विचारले तुमची मुलगी कोण? .... तेंव्हा त्या स्त्री ने त्याला बोटाने दाखवले, तर टेरेस च्या कठड्या वर एक कावळा वाडी खात बसलेला दिसला. हे बघून त्याची नशा खाडकन उतरली आणि तितक्यातच ती स्त्री विकट हसायला लागली हे पाहून तो इतका घाबरला कि तो टेरेस वरून उडी मारणार होता पण त्याच्या मित्राने त्याला पकडले.. त्यावर कडी हि की त्या दिवशी ती स्त्री मुंबईत नव्हती तर कोकणात तिच्या गावी होती. दुसऱ्या दिवशी हि गोष्ट एक तिऱ्हाईत कडून आणखी एका मुलाला समजली नंतर गावभर झाली. त्या नंतर ते गुंड मित्र कधीच परत आले नाहीत टेरेस वर झोपायला.

स्त्री Lol
ओ स्त्री कल आना Lol

एक दिवस मी आईला आणि शेजारच्या काकूंना एका सापाविषयी बोलताना एकल ज्याला बोटभर लांब केस असतात व त्याचा घमघमाट सुटतो.
मी आई ला विचारलं खरच असा साप असतो का.. तू कधी पहिला आहेस का ..आई म्हणाली मी नाही पहिला पण पाहणारे आहेत बरेच जण.
तेंव्हा तिने मला आमच्याच गल्लीत राहणाऱ्या एका बाईची हकीकत सांगितली.. ती बाई जीवनाला कंटाळली होती.. असतील काही घरगुती प्रॉब्लेम्स..
तेंव्हा शेतात असताना तिथे एक म्हसोबा आहे तिथे ती गेली व रडून म्हणाली मला जगायचं नाही आहे कुठे असशील तिथून ये व मला कडकडून चाव..
ती असे म्हणताच तिला मागून घमघमाट आला चांगला सुवास सुटला होता, मागून एक भला मोठा साप ज्याला बोटभर केस आहेत सळसळ करत आला
त्याला पाहून ती बाई घाबरली व पळत सुटली. घरी आल्यावर ती आठवडाभर तापाने फणफणत होती. मी हा किस्सा माझ्या एका मित्राला सांगितला तेंव्हा त्यानेही तश्या प्रकारचा साप पाहिल्याचे सांगितले.
याबाबत कुणाला अजून काही माहिती आहे का

रमेश, अशा केस असलेल्या सापाला प्रत्यक्ष पाहिले नाही पण तो राखणदार असतो वगैरे, असे आजीकडून ऐकले होते. मी शाळेत असताना आमच्या गावी बागेत खुर्ची टाकून अभ्यासाला बसले होते, तेव्हा मला एक मोठ्ठा साप दिसला होता, नऊ दहा फूट तरी नक्कीच असेल, पारा असतो, तसल्या रंगाचा, त्याच्या अंगावर पडलेल्या सुर्य किरणांमुळे अक्षरशः चमचमत होता, पळत मी आईला बोलवायला घरात गेले, परत बाहेर येऊन बघते तो गायब होता, कुठे गेला ते कळले नाही, व परत कधीच दिसला नाही.

हो इच्छाधारी साप असतात. मी एकदा अंगणात खेळत असताना एक भला मोठा काळा नाग आला. त्याचवेळी एक गारुडी पण पुंगी वाजवत आला, त्या पुंगीचा आवाज ऐकताच तो साप पोटात दुखल्यासारखा गडाबडा लोळायला लागला. मला संशय आला कि हा साप बहुतेक इच्छाधारी असावा. त्यावेळी इच्छाधारी सापांचे दोन चार सिनेमे पण निघाले होते. मी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सापाजवळ धावत गेलो आणि त्याच्या कानात बोटं घातली. तेव्हा तो कुठे शांत झाला. नंतर तो मला नागमणी द्यायला तयार झाला होता पण बोललो नको मी मीठ भाकरी खाऊन सुखी आहे. एवढा किमती मणी तुझ्याजवळच ठेव. मग मला आशीर्वाद देऊन तो निघून गेला.

आणि पांढर्‍या घागर्‍यातली निळे डोळेवाली श्रीदेवी?>>>मी लगेच कान मिटले ना तिचे त्यामुळे ती मानवी देहात रूपांतरित नाही झाली. श्रीदेवी होती कि जितेंद्र समजलं नाही त्यामुळे. Happy

काही वर्षांपूर्वी आमच्याकडे एक इच्छाधारी नागीण आलेली. ती सोनाक्षी सिन्हासारख्या दिसणाऱ्या रीना रॉयसारखी दिसायची.
आणि गारुडी प्रेमनाथसारखा.

च्च च्च! नागमणी हा फक्त नागरावांकडे असतो. नागबैंकडे नसतो.
मग मानवी देहात श्री नसती दिसली तुम्हाला.
मी आजुबाजुला कुठे श्रीदेवी होती का ते विचरलं. जाउद्या.
भरत, यु टू Happy

उगीचच कानात बोटं घातली त्याच्या, त्या गारुड्याने पकडून नेला असता तर पोराचे टुकार अभिनय पाहण्याची शिक्षा नसती मिळाली आपल्याला.

सापाना कान नसतात..☺....,,◆◆असतात
बोकलत सांगतात म्हणजे असतातच
Btw त्या सापाला नाक कान डोळे शिवाय कदाचित बारके बारके हात पाय पण असू शकतात
पण ते आपण पामर लोकांना दिसुच शकत नाहीत त्यासाठी श्री बोकलत यांची सिद्धिप्राप्त तेझ्झ नजरच हवी

@आदू, अगदी खरंय, हिमालयात जाऊन घोर तपश्चार्येच्या जोरावर हे सगळं मिळवलं, बर्फाच्या पावसात एका पायावर हात वर जोडून दिवस रात्र उभा असायचो, फक्त सकाळी दहा वाजता एक आणि संध्याकाळी सहा वाजता एक अशा दोन वडापावच्या जोरावर हे सगळं साध्य केलं.

कितीही प्रतिसाद दिसले तरी या धाग्यावर येणार नाही आता :Angry:>>>>येत जा ओ.माझे अजून थरारक सत्य किस्से येणार आहेत इथून पुढे, पुढचा किस्सा वेताळाच्या पालखीचा टाकणार आहे.पालखीचा सोन्याचा गोंडा पळवला होता मी, पळवला म्हणजे हिस्कावूनच घेतला होता, माझ्याशी दोन हात करायची हिम्मत न्हवती कोणाच्यात, आणि आणल्यावर लपून वैगरे ठेवला न्हवता, तर तो गोंडा मी चक्क माझ्या भाच्याच्या पाळण्याला खेळण्यासाठी टांगला होता, टाप न्हवती कुठल्या भुताची येऊन घेऊन जायची, सविस्तर लिहीनच, सांगायचा मुद्दा हाच कि येत जा या धाग्यावर.

चम्पा, धागा बन्द पाडू इच्छिणार्‍या माणसा न्ची इच्छा पूर्ण क शाला करता?
ईग्नोर

चम्पा, धागा बन्द पाडू इच्छिणार्‍या माणसा न्ची इच्छा पूर्ण क शाला करता?>>>तुम्ही विनाकारण मला या धाग्याचा दुश्मन समजताय. आज लिहायला सुरवात केली आणि पहा गेल्या दोन आठवड्यात जेव्हढ्या पोस्ट न्हवत्या आल्या तेव्हड्या एका दिवसात आल्या. धागा इथून पुढे नेहमी चर्चेत राहील याची खात्री बाळगा. Happy

बोकलत तुम्हाला धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच. तुम्ही पितळ उघडे पाडलेत भम्पक लोकां चे...

Pages