जेल - भाग पहिला

Submitted by अजय चव्हाण on 9 September, 2018 - 11:38

घुऽऽ... घुऽऽ... घुऽऽ.. घुऽऽ... कानाभोवती घोगंवणार्या डासांच्या आवाजाने ईस्माईलची झोप मोड झाली..
तशी त्याला एकदम अशी गाढ झोप लागली होती अशातला काही भाग नव्हता आणि तसेपण जेलमध्ये कुणाला सुखाची झोप लागतेय पण त्याचा डोळा लागला होता हे खरे..
ईस्माईलने वेळेचा अंदाज घेतला त्याच्या अंदाजाप्रमाणे रात्रीचे 11:30 तर नक्कीच वाजले असतील.. त्याने माठातले थंडगार पाणी प्यायले आणि पडल्या पडल्या तो विचार करू लागला...
त्याला कधी असे स्वप्नातही वाटले नव्हते की, ज्या जेलमध्ये तो आचारी म्हणून काम करत होता त्याच जेलच्या कारावासात त्याला असं निम्मं आयुष्य असं खितपत पडावं लागेल..
कसे घडले हया प्रश्नाचं उत्तर त्याच्या जवळही नव्हत पण एक गोष्ट मात्र पक्की होती की, त्याने असा कोणताच गुन्हा केला नव्हता..
एकेदिवशी रात्री अचानक त्याची शुद्ध हरपली आणि जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्याच्यासमोर जेलरचा मृतदेह पडला होता..
त्याच्या भरदार छातीतून रक्त वाहत होते..बहुतेक त्याला कुणीतरी गोळी झाडली होती आणि ती बंदुक नेमकी त्याच्या हातात होती त्याला कळेनाच नक्की काय घडलय ते..
अचानक सायरनचा आवाज ऐकू येऊ लागला बहुतेक गोळी झाडल्याचा आवाज सगळयांनी ऐकला होता सगळा फोर्स अगदी तयारीनिशी त्याच्यादिशेने त्याला येताना दिसला..
त्याला सरेंडर करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि सगळेच पुरावे त्याच्या विरोधात होते त्यामुळे त्याच्यावरचा गुन्हा कोर्टात बिनविरोध सिद्ध झाला आणि न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तो भोगत होता..

इथपर्यंत ठीक होतं पण निकाल लागल्यानंतर कारागृहात येऊन दोन दिवसही होत नाही तोवर दुसरा आणखी एक खून घडला आणि मागच्यासारखेच ह्याही वेळी नेमकं तेच घडलं..
खुन त्याच्याच कोठडीतल्या कैद्याचा झाला होता...

तसे जेलर आणि त्याचे चांगले संबंध होते त्याचा खुन करून त्याला काहीच हासिल नव्हते.. त्याला कुणीतरी मुद्दाम अडकवत होत ह्या सार्या प्रकरणात पण कोण आणि का?? ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे त्याला शोधायची होती आणि म्हणूनच तो एकटाच त्या छोट्याशा कोठडीत येरझारा घालत होता...
आठ फुटावरच्या उंच खिडकीतून दुरवर लावलेल्या दिव्याचा मंद प्रकाश त्या कोठडीत दबकत शिरत होता..
बहुतेक रात्र अमावस्याची होती....
ईस्माईल सगळं आठवण्याचा प्रयत्न करत होता पण छे त्याला काहीच आठवत नव्हतं...
ईतक्यात बाराचे ठोके पडले आणि ईस्माईल पुन्हा एकदा बेशुद्ध पडला..त्याच्यासाठी जरी तो बेशुद्ध असला तरी त्याच शरीर मात्र बेशुद्ध नव्हतं त्याच शरीर कुणाच्या तरी किंवा कुठल्या दृष्ट शक्तीच्या ताब्यात होतं..
त्या शरीरात प्रवेशलेल्या त्याची गुरगुर वाढली...
तो चित्रविचित्रपणे ओरडू लागला...
तो त्याच्या शरीराला हवे तसे नासवत होता आणि आता तर त्याने किंवा त्या शक्तीने त्याच्या आत्म्यालाच आव्हान केलं होतं..
हळू हळू ईस्माईल कळू लागलं..
त्याचा आत्मा आणि तो द्ष्ट आत्मा/शक्ती भांडत होते..
ईस्माईलचा एक हात गळयाजवळ गेला त्याच्याच हाताने तो गळा दाबत होता आणि त्याचाच दुसर्या हाताने तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता..
त्याला ओरडावसं वाटत होतं पण त्याच्या कंठातून आवाज काही बाहेर काही येत नव्हता.. ती आत्मा/शक्ती त्याला फरफटत नेत होती..जितका तो विरोध करत होता तितक्याच ताकदीने ती आत्मा त्याला मारत होती...एका कोपर्यातून दुसर्या कोपर्यात आपटल्यानंतर त्या आत्माने त्याला धाडकन उभ केलं...
अगदीच फरफटत त्याला जेलच्या दरवाजाजवळ नेलं...
त्याच तोंड कुणीतरी जबरजस्ती उघडू पाहत होतं नव्हे ते उघडलं गेलंही आणि त्या शक्तीने धाडकन त्याला पाठीमागून जोरदार धक्का दिला जेलच्या दरवाज्याची लोखंडी गंज ईस्माईलच्या तोंडात घुसली होती झाडून सगळे दात पडले होते..तोंडातून रक्ताचा पाट वाहत होता आणि त्या घाताने आलेली ती वेदनेची कळ त्याच्या टाळूपर्यंत पोहचली होती पण इतक्यानेही त्या आत्म्याचं समाधान झालं नव्हतं ..त्याने त्याला अजूनच जोरात वर उचलला आणि तसाच धाडकन पाठीमागच्या भिंतीवर आपटले पाठीमागची हाडे मोडण्याचा आवाज आला..
ईस्माईल रडत होता ही वेदना, ह्या जखमा त्याला सहन होत नव्हत्या आणि त्याला ओरडताही येत नव्हत इतकं भयंकर त्याला ह्या पूर्वी कधीच कुणी मारलं नव्हतं..
ईस्माईलच्या शरीराचं झालेलं गाठोडं तसेच त्या भिंतीच्या आडोशाला पडलं होतं त्यातून होणारी हालचालही आता मंदावत चालली होती...त्याला पाणी प्यायच होतं तो तसाच फरफटत कोपर्यात असणार्या माठाकडे सरकत होता जवळ जवळ तो पोहचलाही होता ईतक्यातच त्याने त्याला परत जोरात मागे खेचले आणि वर उचलून छतावर आपटले त्याचं डोकं फुटलं होतं पुर्ण अंग रक्ताने माखलं गेलं.

" कोण आहेस तु?? समोर का येत नाहीस??"असं कसाबसा तो ओरडला आणि तेवढयातच त्याच्या "त्या" अवयवावर कुणीतरी जोराची लाथ मारली आणि एक आकृती त्याला दिसली तिला पाहताच त्याचे डोळे आश्चर्याने आणि भितीने विस्फारले गेले आणि तेच भाव चेहर्यावर घेऊन ईस्माईल अल्लाला प्यारा झाला तसे त्याच्या त्या बेसूर हसण्याचा आवाज सार्या कोठडीत दुमदुमला आणि भिंतीवर सांडलेल्या रक्तावर तो काहीतरी खरडू लागला..

" बदला घेणार... एकालाही नाही सोडणार मी..सगळेच मरणार"

असे लाल शब्द त्या भिंतीवर अंधारातही दिसले आणि एकाकी त्याच तिथे असणार अस्तित्व नाहीसं झालं....

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

MAST...
PAN BHAG KHUPCH LAHAN AHE.

असे लाल शब्द त्या भिंतीवर अंधारातही दिसले आणि एकाकी त्याच तिथे असणार अस्तित्व नाहीसं झालं....

एकाएकी हव ना? ...आणि त्याचं

प्रतिसादाबद्दल सर्वाचे मनापासून धन्यवाद..

उर्मिलाजी तुमच्या विनंतीला मान देऊन टोपणनाव काढून माझं खरं नाव ठेवलं आहे...