सहज सुचलं म्हणून...

Submitted by अभिषेक अरुण गोडबोले on 9 September, 2018 - 00:10

नव्या शहरात येतो ना,तेव्हा पाहुणे असतो आपण त्या शहरासाठी....
अगदी नवखे,नवीन,अनोळखी पाहुणे...आता पाहुण्यांनी म्हणजे आपण लगेच अशी अपेक्षा करू नये कि,आपल्याला लगेच त्यांच्यातलाच एक समजायला लागेल हे शहर...
पाहुण्याला 'घरातलाच ' एक व्हायला वेळ लागतो,तो वेळच मागत असतं ते शहर...
एकदा तो वेळ दिला कि,सामावून घेतं ते शहर तुम्हाला...तुम्ही वेगळे राहातच नाही मग,तुम्ही शहरातले आणि शहर तुमच्यातलंच होऊन जातं !!

माणसं हि अशीच असावीत का ? वेळ देत नाहीयोत का आपण ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरं आहे. आज आपण नाती बनायला वेळच देत नाही. सगळ्यांना सगळ instant, at one click हवे असते. आपण विसरतो माणसाच मन काही निर्जीव मीठ नाही कशातही पटकन विरघळून जायला. तिथे वेळाही द्यावा लागतो आणि भावनिक मेहनतही लागते.
नवीन शहराची कल्पना चांगली वाटली. त्यामुळे मुद्दा वाचकापर्यंत नेमकेपणाने पोचला.