Submitted by अनन्त्_यात्री on 8 September, 2018 - 07:49
तार्यांनी गजबजल्या रात्री
चांदणवर्खी प्रकाशलाटा
शब्दांच्या घनदाट अरण्यी
अर्थाच्या धूसरशा वाटा
त्या लाटांवर
हरपे जाणीव
त्या वाटांवर
अगणित संभव
जाणिवेतुनी
ठिबके नेणीव
संभव सरता
उरे असंभव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
व्वा !
व्वा !
अतिसुंदर ....
अतिसुंदर ....
छान!
छान!
असंभावची वाट साजरी
इकडे कडा तिकडे दरी
काटे पसरले वाटेवरी
भय गोठले जागेवरी
आनंद., दत्तात्रयजी, सदा_भाऊ:
आनंद., दत्तात्रयजी, सदा_भाऊ: आपल्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
शब्दांच्या घनदाट अरण्यी
शब्दांच्या घनदाट अरण्यी
अर्थाच्या धूसरशा वाटा >>>
केवळ सुंदर...
ज्या नोटवर कविता संपते तेही उच्च .....
शशांकजी, प्रतिसादाबद्दल मन
शशांकजी, प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार!