काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालचा भाग पाहिला (का?का?का?) काय ती गवरी Uhoh
शेणाची गवरी कशी थापलेली असते आणि निष्काम कर्मयोगाने भिंतीला चिकटून असते तशीच आहे ती Sad
काल तो शीव जीव ओवाळून टाकल्यासारखा पहात होता तिच्याकडे ही मख्खच Angry

शीव (सायन) सारखं शीव नका हो लिहू....'शिव' असं लिहा आमच्या शिव चं नाव! ...... Happy
आणि पसरणी का रडत होती काल..? मला कळलंच नाही. मी मधेच कुठे तरी गेलेले. बाकी कुणीही इतकं इंटरेस्ट नी पहात नाही त्यामुळे कुणालाच कळलं नव्हतं. पसरणी कडेही मोजक्याच साड्या आहेत. एक ऑरेंज व एक निळ्या फुलाफुलांची. शिव च्या आईच्या साड्या मात्र मस्त आहेत. (कलाकारांनी आपापले कपडे आणायचे असतात का?)

काल तो शिव जीव ओवाळून टाकल्यासारखा पहात होता तिच्याकडे >>>

खरंच, काल तो कातिल नजरेने बघत होता :डोळ्यांत बदाम:

पसरणी कडेही मोजक्याच साड्या आहेत. एक ऑरेंज व एक निळ्या फुलाफुलांची. >> हो नं. ती घरातही त्याच साड्या नेसते आणि ऑफिसात जातानाही त्याच साड्या नेसते. Uhoh

अगदीच फक्तच शिव साठी बघत आहे...

पण बर्याच दिवसानी असा कॉन्फिडंट नायक दाखवला आहे..
नाहितर गैरसमज .. सासु सुना भांडण.. बायको/ प्रेयसी विरुद्ध असणार्या घरातल्यांच ऐकणारा ..
नीशा सारख्या खलनायिकेंकडुन सहज फसणारा .. असेच नायक दाखवतात..

इथे शिव आजिबात घाबरत नाही.. नीट समजुतदार वाटतो..उगाच फसतही नाही..

म्हणुन बघायला बर वाटत

.

काय, अरेरे sad Sad .

मागे कुंकू टिकलीचे चार एपिसोडस बघितले नेटवर, त्यात होत्या त्या.

Pages