Submitted by सिद्धेश्वर विला... on 5 September, 2018 - 04:13
मास्तर म्हणतात पोरांना
पिरेम लय वाईट
करू नका कधी तुम्ही
जाल सर्व खाईत II
झाडे लावा, गुरे चारा
मायबापासी पोसा
पिरमामध्ये हे शक्य नाय
मग का स्वतःस कोसा ?
पिरेम पिरेम करता करता
बिनपाण्याची झाली
सोन्यासारखी नोकरी जाउनी
घंटा हाती आली II
हाती छडी अन टोपी घेऊनि
सायकलवरूनी येतो
डोक्याला मॉप शॉट लावूनी
घरी परत घ्यायला जातो II
पगारपाणी ना येळेवरती
वाढला भांडणतंटा
छडी घेऊनि फक्त बडवितो मी
शाळेमधली घंटा II
सिद्धेश्वर विलास पाटणकर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तुम्हाला कवितेरिया झालाय का ?
तुम्हाला कवितेरिया झालाय का ????? खूपच कविता पाडून राहिलात, दिवसागणिक एक. इंडेक्स मध्ये कवितेचे टायटल आणि तुमचे नाव वाचून, ओलांडून जातात तसे इंडेक्समधल्या पुढील गोष्टीकडे जाते. पण आज कमेंट टाकण्यासाठी उघडून बघावी लागली.
चांगली आहे कविता. पुढील
चांगली आहे कविता. पुढील लेखनास शुभेच्छा !
अजनबी साहेब , नाही ओ , मला
अजनबी साहेब , नाही ओ , मला कवितेरिया नाही तर कल्पनेरिया झालाय . बोला काय म्हणताय . कुठे उपचार करून मिळतील ? अजून एक नम्र विनंती , ओलांडून जाण्यापेक्षा जरा नजरेखालून घालत जा म्हणतोय मी . आणि विखारी असले तरी चालतील पण प्रतिसाद देत जा .
धन्यवाद च्रप्स साहेब
धन्यवाद च्रप्स साहेब
बकवास आहे
बकवास आहे
धन्यवाद रिया ताई ... बकवास
धन्यवाद रिया ताई ... बकवास वाचल्याबद्दल
छान कविता.
छान कविता.
खूप आवडली, अजून येऊद्या !
धन्यवाद अनिरुध्द साहेब
धन्यवाद अनिरुध्द साहेब
कवी मास्तर आहे का पोर
कवी मास्तर आहे का पोर
अर्थात गुरुजि
अर्थात गुरुजि
गुरजी पोरासनि काय बी शिकुं
गुरजी पोरासनि काय बी शिकुं राहिले की