'स्ट्रीट फूड' / रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रीचे नियम व कायदे

Submitted by निल्सन on 31 August, 2018 - 07:42

आपण रस्त्यावर वडापाव, मिसळ, पावभाजी, चायनीज, हल्ली मोमोज वैगरेची गाडी बघतो. अशाप्रकारची एक कल्पना सध्या माझ्या डोक्यात घोळते आहे. जो पदार्थ माझ्या मनात आहे तो गाडीवर विकताना मी ठाण्यामध्ये तरी पाहिला नाही. माझ्या ओळखीत कोणीही हॉटेल व्यवसायात नाही किंवा स्ट्रीट फूड वैगरे विकत नाही त्यामुळे यासाठी कोणते नियम, कायदे आहेत याबद्दल काहीच माहिती नाही. म्हणून तुमच्याकडून थोडी माहिती मिळावी यासाठी हा धागा प्रपंच.

१) गाडी म्हणजे वडापावच्या गाडीसारखी नाही तर ओपन व्हॕन टाइप ज्यात उभे राहून पदार्थ बनविता येईल. यासाठी कोणती गाडी चांगली व त्यात किचन बनविण्यासाठी काय करावे लागेल?
२) खाद्यपदार्थ विक्री परवाना लागेल तसेच आणखी कोणते परवाने आवश्यक असतात?
३) गाळ्याऐवजी गाडी यासाठी की जर एखाद्या एरियात धंदा होत नसेल तर दुसरीकडे गाडी लावता येते का?
४) कमीतकमी किती खर्च येऊ शकतो?

माझ्या मनात असलेला पदार्थ मी इथे न सांगता तुमच्याकडून मदतीची अपेक्षा करतेय त्यामुळे कदाचित तुम्हाला राग येऊ शकतो पण माझ्या डोक्यातील कल्पना प्रत्येक्षात येण्यासाठी बरेच महिने जातील कारण सुरूवात शुन्यातून आहे. म्हणून ठाण्यामध्येतरी गाडीवर हा पदार्थ देणारी मी पहिली असावी हि इच्छा आहे Proud फायनल झाल्यावर मेन्युसंबंधीत सल्ले मागायला इकडेच धागा काढणार बरं Wink

साधी व छोटी सुरवात करुन, रागरंग बघून हळूहळू मोठं बस्तान मांडायची आशा आहे.

तर येऊ द्यात सल्ले, उपाययोजना.

Group content visibility: 
Use group defaults

अभिनन्दन.. Happy
मला ह्यात काही माहित नाही
शुभेच्छा देण्यासठी प्रतिसाद!!

छान डिसीजन.जमल्यास फेसबुक पुणे इट आउट ग्रुप जॉईन कर.त्यावर अश्या फूड गाड्या किंवा रेस्टॉरंट सेटप विकायला असतात कधीकधी.फूड रिव्ह्यूज वगैरे माहिती पण मिळते.
शुभेच्छा

एकुणच बरेचसे परवाने, परवानग्या लागतात.
हे जे वडापाव, पापु, डोसा इतर छोटे विक्रेते एव्हढ्या परवानग्या घेत असतील?

मलाही काही माहिती नाही, पण तुमच्या पुढं7 वाटचालीसाठी खुपसार्या शुभेच्छा☺️

एकुणच बरेचसे परवाने, परवानग्या लागतात.
हे जे वडापाव, पापु, डोसा इतर छोटे विक्रेते एव्हढ्या परवानग्या घेत असतील?>> मला नाही वाटत, फक्त हफ्ता देऊन पावती फाडत असावेत, त्यांचे बरेचदा सगळेच बेभरवशाचे वाटते

गाडिबद्दल :- अशा गाड्या तयार करुन मिळतात फॅब्रिकेटर्स वाल्यांकडे. किंवा ओएल एक्स् वर पण एखादी रिसेल वाली असु शकते. खर्चाच्त्र्या बाबतित चहाचा टपरीसारखा गाडा बनवण्यासाठी किमान एक लाख रु खर्च येतो. त्यावरुन अंदाज बांधा.
Tata ace हा उत्तम पर्याय आहे. बऱ्याच ठिकाणी पाहिल्या आहे.

एकुणच बरेचसे परवाने, परवानग्या लागतात.
हे जे वडापाव, पापु, डोसा इतर छोटे विक्रेते एव्हढ्या परवानग्या घेत असतील?
>>> कसे शक्य आहे. हे बेकायदा चालू असते, मुळात चौकात ठेला उभारायला परवानगी मिळेलच कशी.

आधी सुरु करा... मग परवानग्या काढा. कमीत कमी इन्वेस्टमेंट करुन आधी पदार्थ विका. मेन मार्केट मध्ये नको. आजूबाजूला कुठे तरि जिथे पन्नास शंभर ग्राह्क मिळतील .
तुमच्याकडे आता इन्वेस्टमेंत साठी दहा लाख रुपये असले तरीसुद्धा फर्स्ट टेस्ट द वाटर्स...
परवाने, गाडी विकत घेणे त्याची सजावट आणि इतर खर्च यात दोन तीन लाख रुपये आणि दोन महिने खर्च करण्यापेक्षा एखादी हातगाडी घेऊन लगेच विक्री सुरु करा. रिस्पॉन्स बघा. पैसे जमवा आणि मग त्यतुन चांगली गाडी करा.

तुम्ही तुमच्या स्थानिक whatsapp वै ग्रुप वर तुमच्या मेनूची जाहिरात करून ऑर्डर्स घ्यायला लागा. बाकीच्या गोष्टी होईपर्यंत. आमच्या आणि आजुबाजुच्या सगळ्या colonies मध्ये बायका असे घरगुती आयटम करून विकतात. कचोरी, बटाटेवडे, साबुदाणा वडा, इडली च पीठ, डाळ-बाटी, मासे,starters, केक्स, cupcake अजून बरीच मोठी यादी आहे. सगळ्याच business उत्तम चालतो. दोनशे - दोनशे कचोरी, वडे, 5-5किलो sweets अश्या ऑर्डर्स घरबसल्या मिळतात आणि लोकं घरून pickup करतात. स्वतः चे डबे आणतात, गो ग्रीन मुळे आणि cash payment.

हे पहा. क्रमांक ७ वर रिक्षाचा मस्त वापर केला आहे.
https://www.cheatsheet.com/automobiles/7-vehicles-that-would-make-fantas...

इथे काही कल्पना मिळतील. किंमतीकडे लक्ष देऊन नका. अशा प्रकारचे सगळ्यात जुळते मॉडेल पहा.
https://roaminghunger.com/marketplace/buy-a-food-truck/

हे पण पहा. हे अमेरिकन ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून लिहले आहे. पण काही गोष्टी जगभर सारख्याच आहेत.
https://foodtruckr.com/2014/04/start-food-truck-15b-choose-right-truck-b...

* एकदम उडी मारू नये.
* पाणीपुरी, बदामशेक,भेळपुरी इत्यादी हातगाडीवाले कुठून धंध्याच्या ठिकाणी गाडी किती वाजता आणतात आणि कधी परत जातात हे पाहा.
* एवढा वेळ काढायचा आहे रस्त्यावर. गाडी तिथेच सोडत नाहीत.
*महिनाभर हे केल्यावर मेहनतीची कल्पना येते.
* पुढे साधी हातगाडी भाड्याने घेऊन ताक,सरबत विकून अंदाज घ्यावा. न खपलेला माल किती आणि कसा वाचवायचा हे शिकावं लागेल.
* सुट्ट्यांचा अंदाज आणि गिऱ्हाइकं( फुकटचे हप्तेवाले धरून) किती येतील ओळखणे.
* एवढं जमलं की बेडापार.
* मग कायदेकानू लायसनमध्ये शिरायचं॥
* काल जौनपुरहून आलेला नवखासुद्धा मोक्याच्या जागी गाडी लावू शकतो मुंबईत - फक्त दाम मोजावे लागते.
छनछन सात दरवाजे उघडते.