या ट्रकमध्ये काय लावू?!!

Submitted by π on 1 September, 2018 - 18:10

पाहताक्षणीच आवडला म्हणून हा ट्रक घेतला होता. पण गेली कित्येक वर्षं नुसता पडून आहे. कारण त्यात कुठला फोटो लावू शकतो तेच कळत नाहीये!
घरातल्या व्यक्तिचा फोटो लावला तर ती ट्रक ड्रायव्हर झाली आहे असं वाटतं!
फुलंपानं, नेचर सीन्स, देखावे याच्यात विसंगत वाटतात.
'बुरी नजर वाले' किंवा हॉर्न ओके प्लीज वगैरे कॉमेडी डायलॉग नकोय!

कृपया या ट्रकची कूस उजवा.

किंवा फोटो फ्रेम म्हणून नाही तर आणखी कशा प्रकारे वापरता येईल?

Truck.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरातल्या व्यक्तिचा फोटो लावला तर ती ट्रक ड्रायव्हर झाली आहे असं वाटतं!
>>>>

मी अगदी याच कारणासाठी स्वतःचा लावला असता. तो देखील ट्रक ड्रायव्हरला साजेसा गेटअप करून काढलेला Happy

अधिक संदर्भासाठी राजाबाबू बघा

जर फिरण्याची आवड असेल, आणि बऱ्याच ठिकाणांना भेटी दिल्या असतील, तर त्याचा कोलाज करून लावू शकाल. त्या त्या ठिकाणातील प्रसिद्ध स्थळाच्या फोटोंचा!
अशाने दोन्ही गोष्टी साधता येतील, एक म्हणजे त्या आठवणी कायम ताज्या असतील, आणि शिवाय एका वाहनावर लावल्याने सृजनाचा आनंदही घेता येईल.
आणि इम्प्रेशन पडेल ते वेगळंच Wink

ऋन्मेषचा मोठ्ठा फोटो लावा.

त्यात खाली शाखा, स्वजो, सई ताम्हणकर त्याच्याकडे कौतुकाने पहात आहेत असे दाखवा.

नेमप्लेट किंवा मुलांच्या खोलीच्या दारावर काही मेसेज लिहुन...... तिथे हाॅर्न ओके प्लीज चालु शकेल ॲक्चुअली.

बऱ्याच ठिकाणांना भेटी दिल्या असतील, तर त्याचा कोलाज करून लावू शकाल. त्या त्या ठिकाणातील प्रसिद्ध स्थळाच्या फोटोंचा! >>> मस्त कल्पना.

आयर्नमॅन, कोलाजची ऐडिया चांगली आहे. ट्रकऐवजी पमपम असती तर नक्कीच छान दिसलं असतं. आणि चार बाय सहा इंचांमध्ये कोलाज बसवायचं म्हणजे जरा लहानच होईल ते.
मापृ , ऋन्मेषचा फोटो आणून द्यायची जबाबदारी घेत असाल तर नक्कीच लावीन! Happy (आणि शाखा, सई एकवेळ ठीक, पण स्वजो!!.... यक्क्क...)

सर्वांचे धन्यवाद.