त्या तीरावर

Submitted by सदा_भाऊ on 1 September, 2018 - 09:49

भोग नशिबाचे कोणा न चुकले
कशास हासशी कशास गहीवर
वळूनी पाही त्या तीरावर

साखर गोडी बालपणाची
लाड करी माय पांघरूनी
अल्लड बालक रूसलो फुगलो
असा वाढलो जसा फुलावर

उमेद मोठी तरूण पणाची
उर्मी मनात होती बहरूनी
पडलो उठलो तरी सावरलो
घाव झेलले या वर्मावर

गोडी न्यारी संसाराची
भार्या साथीला मधूर प्रेमातूनी
अपत्य सुंदर त्यातच रमलो
कष्ट उपसले या पैशावर

वेळ आली गृहस्थाश्रमाची
जो तो गुंतला स्वविश्वातूनी
संसारी या पुरता हरवलो
धनसंपदा या नावावर

गंमत आता उतार वयाची
सकल गात्रे जाती विरूनी
काही क्षणांसाठी उरलो
तरीही मोह या जीवावर

वेळ संपली या जन्माची
मिळवले ते जाशी सोडूनी
अजूनी ज्ञानी नाही बनलो
फिरूनी येई अशाच जन्मावर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults