अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून एक खटकलेली गोष्ट, वर्षभरापुर्वी एका माणसाला बंगल्यासमोरून जाताना पाहिले तसा म्हाताराच होता. सायकलवरून जात होता, मला सहज खिडकीतून दिसला, त्याचं माझ्याकडे अजिबात लक्ष नव्हतं तोंडावर बावरलेले घाबरलेले भाव. तो सायकलवरून उतरला व घराच्या दिशेने त्याने चक्क हात जोडून नमस्कार केला , व पट्कन गेला सुद्धा मला खूप विचित्र वाटलं हे. परत दोन दिवसांनी फुलझाडांना पाणी घालतांना सकाळी दिसला, मी धावतच गाठलं त्याला व विचारले नमस्कार का केलात म्हणून, तर तू इथे रहातेस? असं एकदम आश्चर्यचकित होऊन विचारलं व काही नाही काही नाही म्हणून सायकलवर बसून वेगाने निघून गेला. त्याला काही माहिती असेल का? परत कधीच दिसला नाही परत.

सोशल मीडीयावर असे विचारू नये. मलाही उत्सुकता निर्माण झालेली आहे. पण अनामिकाची प्रायव्हसी जास्त महत्वाची आहे. जर स्थान लक्षात येणार नसेल तर त्या घराचा फोटो शक्य झाल्यास अपलोड करावा. ( दिशा लिहील्या तर उत्तम )

आमचा खड्डा, प्रीत, भुत्याभाऊ बंगला आमच्या नातेवाईकांचा आहे, त्यामुळे त्यांच्या वास्तुचा पत्ता वा फोटो सोशल करणे प्रशस्त वाटत नाही. हे अनुभव , माझ्या मैत्रिणींनी, नातेवाईक वा ओळखीची माणसे यांनी सुद्धा वाचले असू शकतात, ज्या माझ्याकडे येतात अधूनमधून जरी मुक्कामाला नसल्या तरी. त्यांना जर कळलं तर त्या इथे येणार नाहीत.

बरोबर आहे, सर्वांना उत्सुकता वाटणे साहजिक आहे, तुमच्या जागी मी असते तर मलाही अगदी सेम वाटलं असतं, पण कधी कधी काय असतं ना, अज्ञानातही सुख असतं म्हणतात ते खोटं नाही. विषाची परीक्षा करायचा मोह नको.

माझा या अनुभवावर विश्वास आहे (असे जाणवले असेल ). पण त्यामागे काही शास्त्रीय कारण आहे का हे पाहता आले तर ... एव्हढाच उत्सुकतेचा भाग होता.

आधीचं माहीत नाही, पण मी रहायला आल्यापासनं खूप वेळा पूजा, शांती, अगदी ब्राह्मणाकडून वगैरे झालेले आहे, पारायणे, स्तोत्र पठन ही झालय. मागेही लिहिलय मी याबद्दल.

हो आमचा खड्डा, तुमच्या सर्वांचा हेतू प्रामाणिक आहे, त्या बद्दल शंका नाही कृपया वाइट वाटून घेऊ नये.

वरीस झालं असल त्याला.
मी म्हातारा मानुस. कायतरी काम शोधत हुतो. तवा मला एक भला मनुस भेटला. म्हणला येक बंगला हाय. तुज काम येवढच का तू तिथं जायचं आन बगिच्यात फुलझाडाले पानी घालाचं.

बंगला रिकामा हाय त्यात कोनीबी नसतं.

मी तयार झालो ना भाऊ, महिन्याले पाचशे रुपयाचा सौदा हुता. दुसऱ्याच दिशी मारली टांग सायकलवर आन गेलो बंगल्यावर.

सायकल उभी केली आन बंगल्याकडं पायलं, तं खिडकी मंदी एका बाईचं त्वांड दिसलं राव. ते भलतीकडं पाहत हुती. मंग तिची नजर मायकडं वळत हुती तवा मी दुसरीकडं पायलं, जणू मी तिले पायलंच नाही.
मी घाबरलो हुतो. नमस्कार केला बंगल्याकडं आन लागीच सायकलवर टांग मरूनशान पयालो.

दोन दिस तिकडं फिरकलोच नाय.

मंग मले वाटलं का ब्वा काय भास झाला आसन. मंग परत येकदा गेलो सकायीच. हिम्मत केली आन झाडायले पानी टाकू लागलो. तवा अचानक येक पोरगी आली आन म्हणली
म्हातार बुवा तुमी परवा नमस्कार काऊन केला? मी काय बोलनार एवढ्यात तिचा चेहरा नीट पायला. तो तोच हुता जो दोन दिस पयले खिडकीत दिसला हुता.

लै दांदरली, काय नाय काय नाय म्हनत मी सायकलवर टांग मारली आन जे पयालो, परत गेलोच नाय तिकडं.
म्हनल गेले चुलीत ते पाचशे रुपये, कुठं दुसरं काय काम तं भेटनच.

तवा पासून त्या बंगल्याकडं कधी फिरकलोच नाय.

तर मंडळी राती लई भयान सपान पडलं. एक जोडपे अपत्य व्हावं म्हूण लई कावलं व्हतं. भगत देवरूसी नवस सम्दं झालं पण प्वार काय हुईना. शेवटी टेस्ठ टुबाची आयड्या केली,पण लोचा झाला तीथं काहीतरी हीडीस अभद्र ओंगळवाणं हजर व्हतं. त्यानं त्या ठेस्ट टुबात आपलं सत्व गपचीप मिसळलं.
फुढं त्यायला एकखटी डजनभर पिल्लं झाली. जन्माला आल्याआल्या नवं टेक्नीक शिकून माबोवरच्या धाग्यांना झपाटु लाग्ली ना राव्व.
सपान फास्ठ फारवर्ढ पडेल व्हतं.

ह्या धाग्यावर थोडेसे अवांतर ,

त्याचे झाले असे, गेला आठवडाभर मी हॉस्पिटलमध्ये होते, तब्येत खूप जास्त बिघडली होती, अन त्यासगळ्या मुळे मला सारखे असे वाटत होते की आता काही मी जिवंत बाहेर येत नाही, अन त्यात हा धागा (हा म्हणजे अमानवीय चे सगळेच) अति वाचल्यामुळे , जेव्हा कधी थोडी जागी असायची तेव्हा मी सारखी इकडे तिकडे बघायची, छताकडे बघायचे की मला असे कोणी पूर्वज घ्यायला तर आले नाहीत ना , पण कसले काय, झाली ठीक अन घरी पण सोडले मला☺️

VBतुमची वेळ आली नाही. तुम्हाला अमानवीय ३,४,५,६,७........ वाचायचं आहे अजून.
उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा.

मुंबई - मरिनड्राइव्ह ट्रायडेंट हॉटेल चा १३ मजला हा झाकला गेलाय
हॉटेल मध्ये खिडकीतून पाहिल्यावर दिसणारा अफाट सुंदर अरबी समुद्र आणि संध्याकाळी मावळणारा सूर्य मनाला सुखद अनुभव देतो BUT... ह्याचा परे एकेकाळी एक भयावह वास्तू म्हणून हि त्याला ओळखले जायचे ,मुंबई पोलिसांना सुद्धा confuse करून सोडलेले येथे घडणाऱ्या घटनांनी असे म्हणतात ट्रायडेंट हॉटेल चा १३ मजला हा झपाटलेला आहे ,फक्त हा मजलाच नाही तर ह्याचा खिडक्या दरवाजे हि पूर्ण पाने झाकून टाकले गेलेत, एकेकाळच्या सिरीयल सुसाईड ने उच्छाद मांडल्या पासून १३ floor बंद असतो . हा झपाटलेला आहे असं म्हटले जाते. तर काही देशांमध्ये १३ या अंकाला अपशकुन मानतात.येशू ने शेवटचं जेवण १३ अनुयायां बरोबर केलेला त्या नंतर त्यांना वध स्तंभावर चढवले गेले.
13 ला जीवन आणि मृत्यू मधील दुवा म्हटले जाते .म्हणून कदाचित 13th फ्लोर च्या खिडकीतून त्यांनी उडी मारून आत्महत्या केली असावी . म्हणून मग१३ floor कायमचा बंद करून टाकावा असा डायरेक्टर्स ने निर्णय घेतला. येथे सर्वात आधी एक कपल ने आत्महत्या केली होती . मग त्या रूम मध्ये अनेक कपल्स च्या त्याच प्रकारे आत्महत्या झाल्या. त्यात प्रेमीयुगुल आणि नवविवाहितांचा सुद्धा समावेश आहे असं म्हणतात. त्यामागील tragedy एक रहस्य आहे !!!!

IMG_5502.jpg

लोकांकडून पैसे जमवून साग लागवड,स्ट्रॉबेरी लागवड करून शंभर पटीने पैसा परत करणार असं सांगणाऱ्या कंपन्या निघाल्या होत्या. अशाच एका कंपनीत farm manager म्हणून काम करीत होतो. तर डोळस आडनावाच्या वॉचमनला सगळे गाव वचकुन होतं कारण त्याला जादूटोणा करता येतो असे सगळे बोलत.
मी त्याच्या खनपटीलाच बसलो जादू दाखव म्हणून. सुरुवातीला आढेवेढे घेतले,एकदिवस एक नोट हातात धरून दुसऱ्या हातावर घासली तर नोटाच पडू लागल्या. मग रोजच गोळ्या बिस्कीटं हवेतून काढणं. नजरबंदीचे खेळ हे चालू झालं. हातचलाखी करतोय हे कितीही बारीक लक्ष ठेवले तरी कळत नव्हते. ती जादू खरीच वाटू लागली व त्याला मी खूप जवळचा माणूस बनवला.
मुठ मारण्याचा प्रकार त्याने दाखवला होता. ब्लेडने बोटांना चिरा मारायचा व रक्त लिंबाला लावायचा. टाचण्या टोचलेलं लिंबू क्षणात गायब व्हायचे. लिंबू लपवलं का हे पाहण्यास मी त्याचे खिसे तपासत असे.
मी अक्षरश: त्याच्या आहारी गेलो.काहीही कर पण मला ही जादू शिकव असं त्याच्या मागेच लागलो.
मी साहेब असल्याने त्याला नाही म्हणता येईना. मग मला इंद्रजालचे एक पुस्तक दिले व मंत्र सिद्ध करण्यासाठी सांगितले. त्यासाठी लागणारे भोजपत्र व इतर साहित्य पुण्यातून एका अशा गोष्टी मिळणाऱ्या दुकानातून मिनतवारी करून पैदा केलं. पण काही जादू जमेना. एक दिवस एक घुंगराची काठी,एक काळीबाहुली घेऊन मला एका टेकडीवर सोबत नेले. मला सांगितले तुम्ही मंत्र जपा. माझी विद्या तुमच्या कडे येईल पण माझा जीव जावू शकतो. संध्याकाळ झाली होती पुर्ण सन्नाटा.आम्ही दोघेच होतो. मला जर कमीजास्त झालं तर ही घुंगराची काठी वाजवत शरीरावर ओवाळायची.
मी मंत्र जपताच तो खाली पडला,हातपाय जोरजोराने झाडू लागला तोंडातून रक्त ओकू लागला. मी घाईघाईने काठीचा प्रयोग केला . तशाही परिस्थितीत मला त्याचा संशय होताच म्हणून मी माझा रुमाल त्याला रक्त पुसायला दिला व परत घेतला . रुमवर आल्याआल्या रूमाल नळाखाली धुतला तर लाल कुंकवाचा रंग वाहून गेला. खरोखर रक्त असते तर वाळून घट्ट झाले असते.
मग मी त्याला अल्टीमेटम दिले तेव्हा तो म्हणाला फार कठीण प्रकार आहे तुम्ही करणार नाही,मी म्हणालो माझी काहीही तयारी आहे. म्हणाला विद्या शिकण्यासाठी स्वतःची विष्ठा स्वतःला खावी लागते. हे ऐकल्याबरोबर माझा संताप झाला व तिथल्या तिथं कामावरून हाकलून दिला.
काळी बाहुली म्हणे सख्खी बहीण बाळंतपणात मेली तेव्हा तिच्या पोटातील ओटी काढून बनवली होती.
हातचलाखीच करत होता पण त्या काळात सीसीटिव्ही,क्यामेरे मोबाईल नव्हते.

भुत्याभाऊ , तुमचा किस्सा वाचताना नेमका फोटोला हेंग झाला फोन. फोटो पुढेच सरकेना. चार सेकंदांसाठी लिफ्ट मधे अडकल्यासारखं वाटलं. Uhoh बापरे, डेंजर अनुभव प्रीत, तो माणूस जरी हात चलाखी जरी करत असला ना तरी सुद्धा , आणि समजा ती हातचलाखी नव्हती तर? तुमचा जीव पण धोक्यात आला असता ना? काही अघोरी विद्या हस्तगत करण्यासाठी असे विधी असतात (विष्टा ) वगैरे, मागे मी एक पुस्तक वाचलं होतं, "अघोरी " , लेखक आठवत नाहीत. आठवलं की लिहीन. मिळाल्यास वाचा .

माझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत. नाव मुद्दाम नाही सांगत. तर त्यांना या इंद्रजालामध्ये इंटरेस्ट होता
एक दिवस त्याच्या गावात एक बाळंतीण बाई मेली. बाळंतीण बाई मेल्यावर तिच्या चितेचा कोणतातरी कपडा मंत्रून आणायचा असतो व तो कपडा अमावस्येला काहीतरीं विधी करून स्वतःकडे ठेवला तर त्या बाईचे भूत आपल्या ताब्यात राहते व मग आपण तिच्या कडून आपली कामे करून घेऊ शकतो असा काहीतरी तो प्रयोग होता.
पण अमावस्या बरीच लांब होती तरी असा चान्स परत मिळणार नाही म्हणून त्या गृहस्थाने त्या रात्री जाऊन तो कपडा मिळवला. व घरीं ठेवला
त्यांचे घर म्हणजे दुमजली होते. खाली दोन खोल्यात लहान दोन भाऊ व वरील दोन मध्ये तिसरा भाऊ व हे असे राहत असत. खालील खोलीतून वर जायला एक जिना होता व तोच एक मार्ग होता वरील दोघांना खाली यायला. तर ज्या दिवशी यांनी ते कापडं आणून घरी ठेवले त्या रात्री त्या बाईने यांना घराजवळ येऊन हाक मारली तसे मंत्रमुग्ध अवस्थेत ते झोपेतच चालू लागले. अगदी व्यवस्थित जिना उतरून खाली आले दराची कडी काढली व बाहेर पडले. घरातील इतर लोक्कानी हाका मारल्या पण उत्तर नाही. घरातील लोक्कानी पकडून घरात आणले व जागे केले व विचारले कुठे जात होतास व आवाज दिला तरी उत्तर नाही
त्यांनी काहीतरी सांगून वेळ मारून नेली. दुसऱ्या दिवशी पण तोच प्रकार . परत लोक्कानी पकडून आणला. लोक पण आता सावध झाली
तिसऱ्या दिवशी मात्र लोक्काना न जुमानता ती व्यक्ती झोपेतच खूप लांब पर्यंत म्हणजे तिथे एक चिंचेचे झाड आहे तिथं पर्यंत गेली होती पाच सहा लोक्कानी
धरून आणला . मग या व्यक्तीने जवळच्या लोक्काना सांगितले कि चिंचेच्या झाडाच्या पलीकडे त्या बाईची सत्ता चालू होते तिथे मी पोहचलो असतो तर काही जिवंत राहिलो नसतो. मग त्यानि अमावास्येच्या अगोदरच तो कपडा नदीत विसर्जित केला..

नानबा मी मीच आहे.सांगितलेली गोष्ट १००% सत्य आहे. मला काही शक्ती मिळाल्या आहेत पण मी त्यांचा वापर करत नाही.

जर कुणा निष्पाप जीवाला कुणी दुष्ट व्यक्ती फार त्रास देत असेल. समजा पैसा जमीन हडपणे, लैंगिक अत्याचार, जीवावर उठणे असे करीत असेल तर एक नारळ घ्यायचा व म्हसोबा दैवताला संबंधित व्यक्तीला पाहून घे अशी प्रार्थना करायची व त्या नारळाची शेंडी आपल्या बाजूला ठेऊन नारळ फोडायचा,नारळ तिथेच ठेवायचा. मात्र आपली बाजू सत्य असली पाहिजे नाहीतर परिणाम उलटा होईल.

Bhwaaa Lol Lol Lol

Pages