अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोल्हापुरात एकटीच राहणारी वृध्द स्ञी माझ्या ओळखीची आहे,तिच्याकडे जाणं व्हायचं.घरात खुप अडगळ साठवलेली. तिथे एक बाहुली (खेळण्यातली) होती. एक डोळा असलेली ती बाहुली पाहून अभद्र वाटलं.मी त्या ताईंना म्हणालो ही कशाला ठेवलीत टाकून द्या. तर त्या म्हणाल्या ती तर माझी मैत्रिण आहे. आणि विचित्र हसल्या. मला कसेसेच झाले.
वुडू बाहुली वरून आठवले.

पण असे असते का कुणाला काही अनुभव ?

>>>>> आमच्या गावी, गाव कसलं छोटी वस्तीच आहे. तिथ एक म्हातारी होती. सगळी वस्ती तिला मामी म्हणायची.

तिच्या आजूबाजूच्या घरात काही गोड्धोड केल कापण्या, करंज्या इ. तर तिच्या घरी हमखास तेच असायचं.
ती काळी जादू करते अशी आमची आजी सांगायची.

अजुन कुणाची गाय गाभण असेल अन हिच त्या गायवाल्यांशी काही वाकडं आलं तर ती मामी गाय उडवायची म्हणजे गाईचा गर्भ पाडायची.

>> काही वाचकवर्ग आहे इथे ज्यांना माझ्या कथा आवडतात त्यांच्यासाठी टाकतो मी कथा.
टाकत राहा. तुमचा खास वाचक वर्ग आहे येथे.

>> जाऊ दे आता तुम्ही सगळे म्हणताय जा तर ही माझी शेवटची पोस्ट या धाग्यावरची.
आता येथे येने नाही. साधा विनोद खपला नाही.

एखाद्या भुताने आपले झाड सोडल्यावर त्या झाडाच्या जवळच्या लोकांनी हुश्श करावे, तसे वाटतेय का मंडळी?
बोकलत, या धाग्यालाच अमानवीय अनुभव दिल्याबद्दल अभिनंदन आणि आभार.

बापरे भुत्याभाऊ अगदी तात्या विंचू आठवला
पण मी ऐकलंय त्या प्रमाणे वुडू हा प्रकार रेकी मधून आला आहे
आपल्या शक्तीने दूरवरच्या लोकांचे आजार बरे करणे या उद्दात हेतूने चालू झालेली हि विद्या काही द्रुष्ट लोकांच्या हाती लागली
व त्यांनी याचा असा गैरवापर केला.

चला इथे यायला हरकत नाही आता. भुत्यभाऊ हा सेम किस्सा तुम्ही या धाग्यावर टाकलाय का अगोदर?? मी वाचलाय आधी हा किस्सा. भयंकर आहे हे सर्व. वुडू डॉल काँजुरिंग मधे पण दाखवली आहे ना

हे झाड म्हणून उपमा दिली जाते त्याबद्दल काही माहिती कोणी सांगेल का ?
पिशाच्च बाधा किंवा झपाटले वगैरे म्हणतो पण झाड़ हां शब्दप्रयोग गावात ऐकायला मिळालेला पण नक्की ते असच का बोलतात ह्याचं विश्लेषण हवय, कोणाला माहिती असल्यास कृपया सांगा.
धन्यवाद Happy

बापरे खतरनाक किस्सा भुत्याभाऊ.
वुडूबद्ल ऐकून माहित होतं, पण आॅनलाइन असलं अभद्र मागवणं म्हणजे हाइट अगदी. चांगलं काहीतरी मागवायचं ना? पण नाही, असतात हा पण असले नमूने. आमच्या एका मित्राला जो स्वतः ला मोठा फोटो ग्राफर समजतो, कसलेही फोटो काढायची सवय आहे. बरं काढले तर त्यातला एक फोटो घरच्या सिस्टमला स्क्रीन सेवर म्हणून टाकला, तेव्हा पासून घरचं वातावरण बिघडलं, मुलगी आजारी पडली, सहज विकेंडला त्याच्या घरी गेले होते, सुदैवाने काॅम्पुटर आॅन होता, अन् तो स्क्रीन सेवर दिसला, हे काय आहे रे म्हणत जवळ जाऊन बघितले व अक्षरशः कपाळावर हात मारून घेतला. रस्त्यावर जर अपघातात कोण वारलं असेल तर चक्राकार आकाराची फुले किंवा माळ वाहातात. (काॅफिनवर सुद्धा असच फुलांचं चक्र वहातात.) त्याचा फोटो होता तो.

@ अनामिका ताई
कुरुक्षेत्रावरील अर्जुनाच्या रथाचा फोटो पाहायला मिळतो तो घरी लावू नये असे म्हणतात कारण तो युद्धाचा फोटो आहे घरात भांडण-तंडे होतात
यात काही सत्यता किंव्हा शात्रीय आधार आहे का

मागे मी सध्या रहात असलेल्या वास्तुत आलेल्या अनुभवांबद्दल लिहिले होते. आधी मी बर्‍याच गोष्टी दुर्लक्ष करत होते पण खुपशा गोष्टी मी इथल्या वास्तव्यात नोट केल्या आहेत, त्या लिहीत आहे. आता मधेच कधी मानवी आकृती स्पष्ट दिसण्याऐवजी एक प्रकाश शलाका इकडून तिकडे जातांना किंवा तिचे मुवमेंट्स दिसतात. नशीब ती माणसे दिसली नाहीत हल्ली. हे कधीही होतं, दिवसा किंवा रात्री, ठराविक वेळ, नाही, माझ्या इच्छा अनिच्छा प्रश्न नाही. ठराविक दिवस, तिथी तेवढं नोट केलं नाहीये. खोल्यांमधुन कमालीचा गारवा असतो, नेहमी नाही पण अधून मधून कारणाशिवाय. फॅन, एसी लावायची गरज पडत नाही. जेवण खराब होत नाही, आदल्या दिवशी बनवलेले, चुकून फ्रीज बाहेर राहिले तरी, अगदी दुध सुद्धा. थोडक्यात वातावरणाचा त्यावर परिणाम होत नाही? विचित्र वाटतय, पण हे होतय. मनात आणलेल्या छोट्या इच्छा, फक्त खाण्यासंबंधीत, मुद्दाम ठरवून नाही, पण समजा अचानक अमूक एक पदार्थ खाण्याची आंतरिक इच्छा झाली, उदा. आंबा, बेसन लाडू, जलेबी जे घरात नाहीये, तेच नेमकं त्या दिवशी कोण ना कोण आणून देणार, आॅफिसमध्ये, घरी किंवा कोठेही . योगायोग दोन चारदा होऊ शकतो, पण दहा बारा वेळी मी नक्कीच योगायोग नाही म्हणू शकत. फक्त वास्तु सोडायची म्हटलं तर गडबड होते, अगदी सात आठ वेळेला विचित्र अनुभव आले, दोनदा दाखवलेल्या जागा अगदीच सुमार होत्या, एकदा एका फ्लॅट मधे पाऊल ठेवताच एवढं मळमळायला लागलं , कधी एकदा बाहेर येते असं झालं. बाहेर आल्यावर बरं वाटलं. दोनदा तर रियल इस्टेटवाला फ्लॅट दाखवायला आलाच नाही. कधी मला दुसरं काम निघालं. एकदा मी बंगला सोडणार आहे असा नुसता उल्लेख केला होता फोनवर, त्तया वास्तूत, त्या दिवशी घरातल्या चार गोष्टी काहीही कारण नसताना अचानक चालेनात, तशा दोन दिवसांत आपोआप परत सुरुही झाल्यात. बाकी काही प्रॉब्लेम नाहीये पण एकदा आत आल्यावर खूप शांत वाटतं अगदी काळ थांबल्यासारखं. कितीही रंग रंगोटी केली तरीही एक उदासवाणी शांतता नक्की आहे. जे काही आहे त्याला मी इथेच रहायला हवय? हे अमिष असू शकतं?
मला माहित आहे, हे वाचून कदाचित माझ्यावर टिकेची झोड उठण्याची शक्यता आहे पण मला येणार्‍या अनुभवांना डोळसपणे पहाण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

@ रमेश, असे फोटो ते जरी देवांचे असले तरी घरात लावणे टाळावे. त्यांमध्ये उग्रता असते व प्रखर वायब्रेशन्स असतात. आपल्याला घरात प्रेम, शांती अपेक्षित असते. युद्धाचे प्रसंग, संहार, रक्तरंजित हिंस्र प्राणी किंवा इतर उग्र देवता यांचे फोटो किंवा मूर्ती नक्की लावू नयेत. समजा, एखाद्या कुटुंबाचीच कुलदेवता एखादी उग्रदेवता असेल, उदा. महाकाली, नरसिंह वगैरे तर अपवाद असतो. तेवढी कुलदेवता म्हणून देवघरात पुजा चालते.

बरोबर आहे किल्ली, लक्ष्मीबरोबर नरसिंह शांत रूपात असतो. थोडक्यात तत्व बॅलन्स ठेवलं जातं.

हे वाचून कदाचित माझ्यावर टिकेची झोड उठण्याची शक्यता आहे >> नाही ऊठणार.... पण हेच बिचार्‍या बोकलत आयडी ने लिहिले असते तर नक्कीच.
पण मला येणार्‍या अनुभवांना डोळसपणे पहाण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. >> डोळसपणा, प्रामाणिकपणा वगैरे नाही हो, कोण लिहिते आहे आणि कुठल्या सुरात लिहिते आहे त्यावरून ठरते टीका करायची की कौतुक तुम्ही निश्चिंत असा.

@ अनामिका - घरात असा वावर असणे मी अनुभवलं आहे आणि तो किस्सा इथे आधी झालाय टाकून. फक्त ती वस्तू कोणासाठी पिंजरा बनू नये एव्हडीच अपेक्षा ....

अनामिका
मडगाव ला जाताना दाट झाडी लागते. तिथे एका घरात रहावे लागले होते. असेच थंडगार वातावरण होते. वास्को द गामा ला मला हेडलॅण्ड सडा येथे अगदी हिलटॉप वर स्युट मिळालेला. रात्री समुद्रावरून हवा यायची. गारेगार. दिवसा वातावरण चांगले होते.
मडगावला मात्र हुडहुडी भरायची. पण गोव्यात फिरताना सगळीकडे दमटपणा जाणवायचा.
केळशीला नवीन हॉटेल झाले आहे. त्याच्या आजूबाजूला पण वाडी आहे. समुद्र ५०० मीटरवर आहे. इथेही थंड आहे.
मला असे म्हणायचे आहे असे काही आहे का आजूबाजूला ?

हो भुत्याभाऊ अगदी. आमचा खड्डा, समुद्र अगदी साडेतीन किलोमीटर लांब आहे हो, घराबाहेर वातावरण एकदम नाॅर्मल असतं, पण एकदा आत प्रवेश केल्यानंतर वातावरणात कमालीचा बदल जाणवतो. आमच्या गावी सुद्धा खूप झाडी आहे, तिथे सुद्धा छान गारवा असतो पण इथे वेगळेपणा जाणवतो.

घराचा व्हरांडा, मुख्य द्वार आणि अजून एखाद दोन खिडक्या पश्चिमेला आहेत का ? समोर आणखी एखादी वास्तू आहे का ? दोन्हीच्या मधे झाडी आहे का ? अशा वास्तूत मी पुण्यात २० वर्षे काढली आहेत. थंड असायचे घर.

आमचा खड्डा, ही वास्तू एक जुना बंगला आहे. अजून घरे, बंगले आहेत गॅप घेऊन पण स्वतंत्र, अंतर राखून. प्रत्येकाला स्वताचं कुंपण आहे. एक काॅलनी टाईप. मजा म्हणजे बंगला अगदी वास्तुशास्त्रानुसार आहे.

अनामिका, हा किस्सा वाचून एका माबोकरणीने (नाव आठवत नाही) लिहिलेल्या किश्श्याची आठवण झाली.तिला आणि तिच्या लहान मुलीला व्यक्ती २-३ वेळेला दिसली होती.घर स्वच्छ ठेवणे आणि रात्री लवकर लाईट काढणे ही अपेक्षा होती त्या भुताची असा काहीतरी किस्सा होता.

Pages