तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

सुबोध काय मस्त दिसत होता आज। पण बोर झाला एपिसोड। इशा फक्त वकील काकांच्याच पाया पडते। त्या मॅडम च्या नाही पडत!

इशा डोळे मिटुन हसुन मान हलवते ते फारच लहान मुलीसारखं आहे.
एखादी शाळेतली, म्हणजे अगदी चौथीतलीच, मुलगी काहीतरी मज्ज्जा आवडल्यावर किंवा
अय्या माझे काका कित्ती भारी वाटुन करेल तशी कृती आहे ती.

कालचा एपि हहपुवा होता. कोणत्या कम्पनीत असा टार्गेट बोर्ड ठेवुन विमाने मारायला सान्गतात!
एखाद्याला निरागस निरागस किती दाखवावे माणसाने.... इशा शाळकरी पोरगी दिसते/ वागते.

सुभा खरोखर अन्घोळ न केल्यासारखा दिसतो.
आजच्या एपिसोडमधे इशाला काहितरी रागवताना दाखवलाय कारमधे बसुन.
ती मायराची असिस्टन्ट असली तरी हाच फिरवतोय सगळिकडे तिला.

Happy
इशा काहीतरी पत्ता विसरली म्हणे... सुबोध इतक्या ज्युनिअर मुलीवर अवलंबून आहे कस्टमर कडे जाताना? स्वतः का घेत नाही लोकेशन वगैरे?
की मायरा नेच छल कपट करुन तिला चुकीचा अ‍ॅड्रेस दिला कोण जाणे!!
ती तर अगदी च शाळकरी पोर..... तिला स्कर्ट ब्लाऊज घालून दोन वेण्या घालून दिल्या तर नववी दहावीतली मुलगी दिसेल...
जॉइनींग बोनस....... Happy पहिल्यांदाच ऐकले बुआ......

काय प्रकार होता नक्की तो >>>>>>>>> दिग्द च्या कल्पनेची विमानं होती ती. सगळ्यांनी उडवली. इशाने त्याचा बोळा केला. Lol
इशाने काहीही केलं तरी छान छानच असणार आहे. टारगेट बोर्ड साठीच्या बाणांच्या जागी कागदे विमानं आणि सगळ्यांनी कागदी विमानं उडवल्यावर इशाबै चा कागदाचा बोळा.
इथे आमचा डायरेक्टर (कंपनीचा) असता तर म्हणाला असता तुम्हाला आहे त्या सोर्स/कंडीशन्समधे काहीच करता येत नाही का? हे आणि हेच (कागदी विमान. बोळा नाही.) आहे. त्यातच टारगेत पुर्ण करायचं आहे.

सुभाच्या मिटीन्ग रुममधे एक आर्चरी टार्गेट बोर्ड लावुन प्रत्येक अन्टेन्डीजच्या समोर न्युजपेपरचा एक तुकडा ठेवलेला असतो त्याचे (आपण शाळेत बनवतो तशी) विमाने बनवुन टार्गेट पॉईन्टला मारायला सान्गतो. त्या आधी 'निरागसपणे' काचेच्या दारातुन डोकावलेल्या इशाला सुभा आत बोलवतो.
तर अपेक्षेप्रमाणे सगळ्यान्चे नेम चुकतात. आणि मायराचे विमान तर आधीच हवेत गटान्गळ्या खात खाली पडते. ते पाहुन इशा हळुच हसते आणि मायरा तिच्याकडे खुनशी नजरेने पाहते. निरागस इशा मान खाली घालते.
सगळ्यान्ची विमाने उडवुन झाल्यावर सुभा अचानकपणे इशाला विमान बनवुन मारण्यास सान्गते. नि. इशा कागदाचा बोळा करुन जीव खाउन मारते आणि नि.पणे तो ही आपोआप लक्ष्यावर धडकतो. मग सुभा तिच्या औट ऑफ द बॉक्स थिन्किन्ग बद्दल कौतुक करुन तिला म्हणतो की विमान बनवाय्ला सान्गितले होते ना? तर नि. ईशा म्हणते, माझ विमान असच्चे!
तरी सगळे म्हणतात की तिने बनवलेले ते विमान नव्हतेच. मग सुभा त्याना समजावतो... कि इतक्या दुरच्या लक्ष्यापर्यन्त पोचायच तर आपल्याला विमान बदलायला पाहिजे नाही का? ती काय म्हणाली, की माझे विमान असेच्चे.
म्हण्जे आपली स्ट्रेटेजी बदलायला पाहिजे. मग एक ऑफीसरीण विचारते, हे सगळ ठिक पण जुन्या मेथड ट्राईड अ‍ॅन्ड टेस्टेड असतात की नाही?"
मग सुभा पुन्हा " दो रुपये भी बडे काम की चिज होती है बाबु' हा डायलॉग फेकुन ह्या मुलीने हे शिकवले आणि त्यामुळे कम्पनीला करोडोचा फायदा झाला असे म्हणतो.
मग मायरा आधी अचानकपणे स्तम्भित होते... मग नाक उडवते. मग सुभा मिटीन्ग रुमच्या बाहेर पडतो... सग्ळे एकेक करुन बाहेर जातात. कुणीकुणीच नि. ईशाचे कौतुक करत नाही. ती एकटीच स्वप्निल डोळ्यान्नी स्वखुशीने हसत बसलेली असते.

नैने सच्ची? Uhoh
:चक्कर येऊन खाली पडलेली बाहुली:

टार्गेट बोर्ड आणि विमाने काय>> हे सगळे इनोदी प्रकार मी पाहिलेच नाही. मी थेट जॉइनिंग बोनस ने देणेकर्‍यांची देणी चुकवणारी इशाच पाहिली !
खरंतर ३०० कोटी वाली राधिका मसाले काय, किंवा आउट ऑफ बॉक्स थिंकिंग वाली इशा काय... चला हवा येऊ द्या पेक्षा ह्या असल्या मालिकाच विनोदी (की हास्यास्पद !) सदरात मोडतात !

<<नैने सच्ची? Uhoh<<
हो ग हो, दक्षे! Proud मिळेल तिथुन हा शिण बघाच.
: चक्कर येउन पडलेल्या बाहुलीच्या तोन्डावर बिसलेरीतले पाणी मारणारी भावली:

निरागस इशा तिला मिटिंगला बोलावलेलं नसताना शेजारच्या घरात डोकाउन बघतात तशी दारातुन मिटींगरूम मधे डोकाउन बघत होती.

<<<निरागस इशा तिला मिटिंगला बोलावलेलं नसताना शेजारच्या घरात डोकाउन बघतात तशी दारातुन मिटींगरूम मधे डोकाउन बघत होती.<< अगदी अगदी!

Pages