नवऱ्याच्या बायकोकडून अपेक्षा

Submitted by कटप्पा on 26 August, 2018 - 22:11

खालीलप्रमाणे -

१. वन्स इन अ व्हाइल सेक्स करता म्हणजे उपकार करता असे समजणे सोडा.

२. आमची आई जे बोलते किंवा वागते त्याच्यात प्रत्येक वेळी इंटरफियर करणे सोडा. आईने आम्हाला जन्म दिला आहे आणि कोणीही तो बॉण्ड तोडू शकत नाही.

३. तुझे आई बाबा आणि माझे आई बाबा यांना सेम ट्रीटमेंट द्यायला शिका.

४.आपली लाईफ स्टाईल दुसर्याशी तुलना करणे सोडा, त्यांनी एखादी गोष्ट घेतली म्हणजे आपण त्यापेक्षा महाग घेणे जरुरी नाही आहे.

५.चीड चीड करणे सोडा.

६.फालतू शॉपिंग करणे सोडा. लुई विटन पर्स घेतल्याने तुम्ही जगात सर्वोत्तम दिसणार नाही आहात.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीमा, मलाही रे चेच एपिसोड्स आठवत होते पण बॉलीवूड मध्ये ह्या विषयाला कोणी हात लावला होता की नाही ते माहित नव्हतं.
विवेक ओबेरॉय चा कुठला म्हणतेस ते माहित नाही.

ओके, धन्यवाद च्रप्स.

च्रप्स नक्की का? तो पिक्चर तर क्राईम थ्रिलर दिसत आहे.

लग्न व्हायचंय की झालंय?

व्हायचं असेल तर धागा योग्य त्या विभागात काढण्याबद्दल हायझेनबेर्गशी सहमत. हा धागा जाहिरात विभागात वधु पाहिजे खाली काढा.

झाले असेल तर आता too late. हे म्हणजे टीव्ही विकत घ्यायचा आणि तो हॉल मध्ये फिट केल्यावर कपडे कसेकाय धुतले जात नाहीत म्हणून टीव्हीला बोल लावायचा असे झालेय. घेतानाच अपेक्षा सांगायला हव्या होत्या. म्हणजे योग्य ते प्रॉडक्ट मिळाले असते.

हायझेनबर्ग +१.
मीही त्यांना हे आधी सुचवलंय की तुमचे धागे कोणाशी तरी बोलायचंय किंवा विरंगुळा या ग्रुपात उघडा. या दोन्ही ग्रुपांचे पत्तेही त्यांना दिलेत.

योग्य सजेशन हायझेनबर्ग आणि भरत.

धागा योग्य समूहात हलवून, वाचनास सर्वांसाठी खुला ठेवण्यास काय आक्षेप असावा कळत नाही.

आणि, सर्वात महत्वाची अपेक्षा -
7) तुमच्या नवर्याबद्दलच्या अपेक्षांत मी कुठे कमी पडतो का, हा विचारही मनात आणायचा नाही व आलाच तर त्याची वाच्यता करायची नाही .
Wink

मी माझ्या स्पाऊसवर १००% खूष आहे, असे म्हणणारी व्यक्ती म्हणजे सशाच्या शिंगाइतकी दुर्मिळ. शेवटी संसारात अ‍ॅडजस्टमेंट हा प्रकार असतोच. आमचेच बघा ना, मस्त चालले आहे. आठवड्यातून दोनदा मी आणि माझी मांजर, आम्ही चांगल्या हॉटेलात जातो, छान जेवण जेवतो, वाईन वगैरे पितो, एखादा सिनेमा बघतो. ती मंगळवारी जाते आणि मी शुक्रवारी जातो. Happy

उ.को., Wink
नात्यात, अगदीं देवाबरोबरचयाही , एकतर्फी अपेक्षा केल्या जातात, तेंव्हा हमखास गोची होतेच ! Wink

अपेक्षाच मांडल्यात. नाही पूर्ण केल्यात तर लगेच कुठे खटला भरणार नाहीयेत.

बाकी तुम्ही बाहुबलीला मारायला नको होतत अशी अपेक्षा तुमच्या बायकोसकट इथल्या सर्व बायकांचीही असू शकेल.

अपेक्षा एकतर्फी नसाव्या, ही देखील एक अगदीच साधी व सरळ अपेक्षाच मांडली आहे व ती इथं पूर्ण होईलच अशीही अपेक्षा न बाळगतां ! Wink

तुमच्या स्वतः च्या आईवडीलांच्या वाऱ्याला उभं राहणं बायकोला outsource न करता स्वतः करुन बघा >>> +११११११

मी नवर्‍याच्या बायकोकडू उपेक्षा अस वाचल. मला काहितरी राधिका - शनाया प्रकरण असून कोतबो आहे अस वाटल. Happy

अपेक्षा खर्‍या आहेत, पार आत पोहोचल्या. पण सेम आहेत निअँडरथल ने केलेल्या भित्तीचित्रात पण अशाच अपेक्षा मिळाल्या होत्या. आणि एक HG Wells नावाचे सदगृहस्थ टाइम ट्रॅव्हल करुन आले त्यांना भविष्यातही हेच मिळालं शेवटी वैतागुन परत आले. (ऑक्सिजनचं नळाकांड घेउन जर तेच भोगायचं असेल तर त्यापेक्षा तोच त्रास परत येउन भोगु नळकांड्याचं ओझं तरी कमी होइल Wink )
Wink

अपेक्षा गर्लफ्रेंडकडून ठेवाव्यात
नाही पुर्ण झाल्या तर बदलता येते
आणि जेव्हा सर्व अपेक्षा पुर्ण होतील वा आता काही अपेक्षा नाहीत अशी फेज येईल तेव्हा जी गर्लफ्रेंड असेल तिच्याशी तात्काळ लग्न करावे.
बायकोकडून अपेक्षा ठेवणे आणि त्या पुर्ण व्हायचीही अपेक्षा ठेवणे म्हणजे आपलेच जीवन खडतर करून घेणे.

..... आणि आपल्याला कुठच्या मैत्रिणीने कधीं कटवलं, तरीही नो प्राॅब्लेम ; तीला तरी तिच्या अपेक्षा पूर्ण करणारा नवरा थोडाच मिळणार आहे ! Wink

मुलं हुशार असतात, ते गर्लफ्रेंडच्या सर्व अपेक्षांना खरे उतरायचा आटोकाट प्रयत्न करतात. मग लग्नानंतर आपण आहोत तसेच वागतात. गर्लफ्रेण्ड बोलते तू लग्नानंतर बदलला आहेस. पण मुळात बदलाचे नाटक लग्नाआधी असते आणि लग्नानंतर मूळ स्वरूप दिसते.

अर्थात जमाना बदलतोय. एकेकाळी गर्लफ्रेण्ड कमावणे सोपे नव्हते. तेव्हा एकदा पटलेली गर्लफ्रेंड गमावणे परवडण्यासारखे नसायचे. तेव्हा हे वर उल्लेखलेले जास्त दिसायचे.

Pages