ॐकार स्वरुपा। नित्य निराकारा।
येतसे आकारा। भक्तांलागी॥
शुंडधारी दिव्य। सगुण सुंदर।
रुप मनोहर। वर्णवेना॥
मस्तकी मुगुट। झळके स्वर्णिम।
तेज अनुपम। नेत्रद्वयी॥
शुंड वक्राकार। रुळे दोंदावरी।
चतुर्भुजधारी। भव्य रुप॥
धरी करांमाजि। परशु कमळ।
मोदक निखळ। सत्प्रेमाचा॥
आशीर्वाद हस्त। उभारी प्रेमाने।
तेणे भक्तजने। आनंदली॥
झळकत कटी। रेशमी वसन।
सुवर्ण कंकण। मनगटी॥
पूजिता भक्तिने। ऐसा श्रीगणेश।
अपूर्व संतोष। भाविकांसी॥
नित्य समाधान। देई गजानना।
आणिक वचना। आर्जवचि॥
येतसे शरण। तूजलागी पूर्ण।
भावे लोटांगण। भक्तिप्रेमे॥
(-पुरंदरे शशांक)
श्रावण महिन्यात पावसाने धरलेला जोर कमी होऊन सुखद रिमझिम धारांची बरसात सुरु केलेली असते.
यानंतर भाद्रपदमासात चतुर्थीच्या दिवशी आनंदाची उधळण करत राजाप्रमाणे वाजत गाजत तो येतो.
अमाप आनंदाची खैरात भक्तजनांवर करत आणि सर्वाना सुखद अनुभूतीचा प्रसाद देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे ह्या ही वर्षी तो येतोय.
हो, तोच आपला सर्वांचा लाडका, मूषकवाहन असलेला, लंबोदर, एकदंत, गौरीशंकरसुत गणपतीबाप्पा !!
तर मायबाप भक्तजनहो, बाप्पा येत आहेत हो .....
त्यांचे धूमधडाक्यात स्वागत करूया.
मायबोली गणेशोत्सव संयोजन समितीतर्फे (२०१८) ह्याही वर्षी विविध स्पर्धा आणि भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे..
तर मायबोलीकरांनो, तयार व्हा, सुखाच्या क्षणांसाठी, बाप्पाच्या स्वागतासाठी!!!
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
सुंदर नांदी .... सुंदर श्री
सुंदर नांदी .... सुंदर श्री स्तवन ... मंगलमूर्ती मोरया ...
मस्तच. बाप्पा मोरया!!
मस्तच. बाप्पा मोरया!!
काहीही मदत लागली तर हक्काने सांगा
वा! सुंदर सुरुवात. बॅनर मस्त.
वा! सुंदर सुरुवात. बॅनर मस्त..
शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया!
संयोजक, मस्तपैकी उपक्रम / खेळ येउद्या.
गणपती बाप्पा मोरया! उपक्रमांत
गणपती बाप्पा मोरया! उपक्रमांत सहभागी व्हायला उत्सुक आहे!
सुंदर सजावट आणि ओळीही.
सुंदर सजावट आणि ओळीही.
संयोजक , वाट बघत आहोत. सुरुवात तर एकदम जबरी.
वा मस्तच!! शशांकजी फार सुंदर
वा मस्तच!! शशांकजी फार सुंदर लिहीलय..
शशांकजी, ओव्या मस्त! सुंदर,
शशांकजी, ओव्या मस्त! सुंदर, प्रसन्न सुरुवात!
वा! शशांकजी मस्त प्रसन्न
वा! शशांकजी मस्त प्रसन्न सुरुवात . उत्सवास अनेक शुभेच्छा !!
मोरया
मोरया
संयोजक , संपर्कातून एक मेल
संयोजक , संपर्कातून एक मेल केलाय . कृपया बघून उत्तर देणार का ?
जाई, आम्हाला कोणताही मेल
जाई, आम्हाला कोणताही मेल मिळाला नाहीये. पुन्हा एकदा पाठवाल का ?
संयोजक
संयोजक
पुन्हा मेल पाठवली आहे .
संयोजक, माझा रिप्लाय मिळालाय
संयोजक, माझा रिप्लाय मिळालाय का?
वाआव मस्त!!!!!
वाआव मस्त!!!!!
Pages