तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

थोडे फार कथासुत्र कुणी लिहिल का? आणि ब्रेकप संपलं का? Uhoh बहुधा संपलंच असावं. मी चुकून समीर आणि मीरा चं लग्न होताना पाहिलं.. तोच होता का शेवटचा एपिसोड?

ती कुठली हिंदी मालिका त्यात रोनित रॉयचं लग्न त्याच्या मुलीपेक्षा लहान मुलीशी होतं, रसिकाओक जोशी बहीण असते त्याची, कुंकु मधे पण सेम . दोन्हीकडे इतकं खटकलं नाही, इथे मात्र मला तरी फार ऑड वाटतंय. >>>> अगदी अगदी. कुंकु मध्ये सुनील बर्वेच वय ६० वर्ष दाखवल होत, आणि मृण्मयी १८ वर्षाची. तरीही ते कुठे ऑड वाटत नव्हत. पण लोकान्ना हे खटकल होत. फु बाई फु मध्ये कुंकु वर जोक सुद्दा केला होता, 'कुठे आहे तुमच ते म्हातार" Lol
पण सुब त्यात साठीचा न दिसता चाळिशीचा वाटत होता. Happy नटस्रमाट चित्रपटातही हे दोघे नवरा-बायको झाले होत. तिथे तो चक्क जास्तच तरुण दिसत होता.

हिन्दी मध्ये राम कपूर, रोनित रॉय, मोहनीश बहल सारखे मिडल एज्ड कलाकार आपल्यापेक्षा कमी वयाच्या हिरोईन्सबरोबर romantic भुमिका करतात, पण ते बघताना कुठेच खटकत नाही. मराठीत मात्र (काही सिरियल्सचा अपवाद वगळता) आनन्दीआनन्द असतो सगळा.

शिवानी रांगोळे चालली असती इथे.. >>>> ती तर आणखीनच लहान वाटेल.

चाळिशीतले लोक एवढे म्हातारे दिसत नाहीत.. काहीही दाखवतात.. >>>>> +++++१११११ चाळिशीतले पुरुषही Handsome असतात की. सुभाने पोट/वजन कमी आणि केस काळे करायला हवेत.

>>कालच्या भागात काय झाले ?<< निमकर्स पार्टीमधे येतात.. निमकरीण काकु सो मिडल्क्लास वागतात.. मटका आईस्क्रीम च्या काउंटरवर रिकामे मटके मागतात. तिकडे निमकर काका अधाशासारखे जेवण वाढुन घेतात.. त्यांची अजुन फजीती करण्यासाठी भाविका (मानबा तली राधीकाची वयनी) आणि तिच्या चांडाळ मैत्रीणी मायराबाईंच्या सहकार्याने निमकर काकांना कोल्ड ड्रिंक मधुन दारु पाजतात... मग काय काका जे सुटतात काही विचारु नका.. अजुन पलिकडे सुभा ईशाला विचारत असतो कसं वाटतंय वगैरे.. ती सांगते तिचे आई-वदील खुष झाले याचं तिला फार समाधान.. तेढ्यात आमच्या घरची लाईट गेली.. Sad Sad Sad

खरंय डीजे... Biggrin
आपल्याला नाही का झाली सवय.. मानसी, मीरा, स्वानंदी, अंजली बै...इत्यादींची...?

खरंय डीजे... Biggrin
आपल्याला नाही का झाली सवय.. मानसी, मीरा, स्वानंदी, अंजली बै...इत्यादींची...? काय दिली पण पार्टी म्हणजे?

Overacting करतेय आई पहिल्या एपी पासुनच....!

Submitted by रच्ची.. on 22 August, 2018 - 09:14

लेखक केड्या आहे मग त्याचा कडून अजून काय अपेक्षीत असणार. लोवर मिडल क्लास कसे वागतात यासाठी त्याने नीट सर्वे करावा. कारण त्याच्याकडे भारीच डिमांड दिसतेय गरिबी / श्रीमंती वर बेतलेल्या स्टोरीज ची. हा हा हा हा

>>आपल्याला नाही का झाली सवय.. मानसी, मीरा, स्वानंदी, अंजली बै...इत्यादींची...? काय दिली पण पार्टी म्हणजे?<< हेच की ते आपलं रिक्षेतुन कुठल्यतरी रस्त्यावर नेलं आणि एका साध्या हॉटेलात खाउ-पिउ घातलं.. आणि हॉटेल मधुन बाहेर पडताना आपल्या 'ग्रहणा'तला तो प्रियांकाला छळणारा लांब केसवाला लंगडा अचानक फकीराचा मेकअप करुन सरंजामे आणि ईशा च्या समोर येतो.. त्याच्या हातात धूप जळत असतो.. आणि तो एकदम विचित्रपणे सरंजामे ला सांगतो की तुम्हाला या मुलीमुळे खुप काहीतरी पहायला मिळणार आहे... Uhoh

तो एकदम विचित्रपणे सरंजामे ला सांगतो की तुम्हाला या मुलीमुळे खुप काहीतरी पहायला मिळणार आहे... Uhoh>> तो तुफान आयेगा तुफान.. असं काहीतरी म्हणतो ना?? ये बच्ची लायेगी तुफान तुम्हारी जिंदगीमें.. असंच ऐकलं मी.

अवांतर - आयेगा की आएगा?? नक्की कोणता शब्द बरोबर??

तो तुफान आयेगा तुफान.. ये बच्ची लायेगी तुफान तुम्हारी जिंदगीमें.>>>> हे त्या केड्याने मालिका बघून चर्चा करणा-या प्रेक्षकांसाठी लिहीलंय.

किट्टु Lol

Btw हे मागच्या पोस्ट मध्ये लिहायचं होतं पण वेळ नव्हता.
कालच्या भागात मायरा नि झेंडे विकीच्या सिक्युरिटी साठी भारी चिंतित झालेले होते.
पहिल्या भागातच तो सायकलवरुन एकटाच फंक्शनच्या ठिकाणी जायला निघाला. त्याला कोणीही फाॅलो करत नव्हतं. त्याच्या सायकलचा टायर पंक्चर झाला. कोणाशी काॅन्टॅक्ट करायला त्याच्याकडे त्याचा मोबाईलही नव्हता. बरं पैसेही अजिबातच नव्हते. तेव्हा त्याची चिंता या लोकांना अजिबातच वाटली नाही. Uhoh

"खरी गंमत कशात आहे सांगू/माहित्ये?" या वाक्याने जाम पकवलंय! Happy दर दुसर्‍या मिनीटाला म्हणते आहे ती मुलगी हे.

असं वाटतंय हा आता फॉर्मुलाच झालाय.. मध्यमवर्गीय मुलगी (चाळ इ. इ.), श्रीमंत मुलगा (बिन्नेसमन च मोस्टली)

होसुमीयाघ, कादिप आणि आता तुपारे

Pages