स्वाध्याय बद्दल

Submitted by मेधा on 12 March, 2009 - 12:30

गेल्या वर्षभरात कमीतकमी चार पाच वेळा शनिवारी किंवा रविवारी अनपेक्षित बेल वाजते . दार उघडलं तर चार भारतीय मंडळी उभी . तोंडभर हसून आम्ही स्वाध्यायी आहोत, या भागातल्या भारतीय लोकांशी बोलायला आलोत अशी प्रस्तावना.

दर वेळेस वेगळी पण चार जणं येतात. दोन बुवा, दोन बाया. आपापली नावं सांगतात अन न्यू जर्सीहून आलो म्हणतात. (जर्सी राज्याच्या सगळ्यात जवळच्या भागातनं आमच्या इथे यायला ४०-५० मिनिटं लागतात . )
'आम्ही दर आठवड्याला वेगवेगळ्या भागातल्या भारतीय लोकांकडे जातो. तुमच्या भागात स्वाध्याय चे क्लासेस/ मीटिंग्स' अमक्या ठिकाणी होतात. तिथे मुलांकरता बेबी सीटिंग्ची सोय आहे' वगैरे सांगतात. 'तुम्ही तिथे जावं' असं थेट सांगत नाहीत.
आमचा पत्ता कसा कळला ते सांगत नाहीत. तुमचे फोन नंबर द्या म्हटलं तर देतात.
त्यांना सांगितलं की आम्हाला माहित आहेत क्लासेस कुठे आहेत पण आम्हाला जमणार नाही, आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही तरी नुस्तं हसतात . पण परत चार सहा आठवड्याने दुसरी चार मंडळी हजर.

तुम्हाला कोणाला असा अनुभव आलाय का? माझ्या ओळखीच्या आणखीन दोन जणांकडेही हाच प्रकार चालू आहे. यांची काही डु नॉट कॉल लिस्ट कशी करता येईल ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खर सांगू का? स्वाध्यायच्या लोकांशी कठोरपणे नाही बोलवत मला. अ‍ॅमवेच्या लोकांना मी झापल आहे. मधे मधे तर त्यांनी देवळात हैदोस मांडला होता. अरे, हसून हाय म्हट्ल्यापासून १२० सेकंदात फोन नंबर काय मागता?

पण स्वाध्यायची लोक स्वभावान चांगली असतात. मला भेटलेली तरी. त्यांचा अपमान करण शक्यच होत नाही. हे पुन्हा पुन्हा घरी येण मी पहिल्यांदाच एकत आहे. आपल्याला इंटरेस्ट नाही म्हटल्यावर ते नाही येत. फक्त मोठ्या कार्यक्रमांना मात्र आवर्जून बोलावतात.

लोकांना स्वाध्याय मधून नक्कीच पाहिजे ते मिळत असणार. ते जबरदस्त कमिटेड असतात. नाहीतर लाखोंच फॉलोईंग केवळ लोकांच्या दारावर टपकून होत नाही.

कल्पू

मला या बाबतीत पूर्ण अमेरिकन अ‍ॅप्रोच आवडतो.( नाही तर पूणेरी)

१) दारावर पाटी लावणे: डीस्टर्ब करू नये.
२) चार जबरद्स्त शिव्या घालून हाकलून लावणे ( स्वाध्यायी नव्हे पण इतरांना) त्यात आपला ही राग बाहेर निघून जातो.
३) ट्रेसपासर्स विल बी किल्ड हे स्वच्छ शब्दात सांगणे.
४) माझा उद्धार करण्याची जबाबदारी तुमच्यावर नाही. हे सांगणे.
भारतीय लोकाना पर्सनल स्पेस ही संकल्पना कळत नाही. माझे डूप्ले घर आहे. बेल वाजली की नीट कपडे करा, कुत्रे नीट आवरा करून जिना उतरून खाली जा दार उघडा असे करावे लागते. अर्ध्या लोकाना मी गॅलरीतूनच कटवते.
आमचे हरामखोर मारवाडी शेजारी केन्वाही बेल वाजवतात व काही ही मागतात. परवा तर फुकटान पपी( बाळ कुत्रा) मागितले. का तर बच्चे जिद कर रहे है. हेच रात्री ३ वाजता फटाके / गाडी चा हॉर्न वाजवणारे. आमच्या
घरी सुतार आला तरी येवून कौन आया म्हणणारे. अशाना मी आमचे सासरचे नाव बंदूकवाले खाडिलकर (सांगली) आहे हे सिद्ध करून दाखविते.

कल्पू गैर्समज नसावा. मी पाण्डूरंग शास्त्रींना मुम्बैत वाजपेयींकडून सत्कार केला होता त्या समरंभाचे आयोजन केले होते स्वा. वर वाचने केले आहे. व स्वतः अतिशय मद्त करणारी आहे. पण काही गोष्टी नॉन निगोशिएबल असतात.

हॅ हॅ आता या बी बी चा टीआर पी वाढेल!

अश्विनीमामी,

माझ्या नवर्‍याचि मत तुमच्यापेक्षा वेगळी नाहित आणि मला पटतात. He is a big advocate of paersonal space पण घरी आलेल्या माणसांना हाकलून द्यायला त्याला ही जमत नाही.

<<कल्पू गैर्समज नसावा.>>

माझा गैरसमज व्हायच कारण नाही कारण मी काही स्वध्यायी नाही. भावफेरी ही स्वाध्याय चळवळीत असणार्‍या लोकांना दादांची आज्ञा असणार. त्याची संकल्पना छान आहे पण या जमान्यात त्याच स्वरूप बदलल पाहिजे. माणसांशी connect होण्याकरता आयत्यावेळी त्यांच्या घरी ट्पकायची जरुरी नाही. Its implementation is annoying people.
कल्पू

विजय,

आगंतुकपणे कोणी घरी येणे मला अजिबात आवडत नाही. (आणि तसे कोणाच्या घरी जाणे तर त्याहुनही नाही) पण आता दरवाजात कोणी आले तर त्याना दरवाजा न उघडणे हे मला तेवढेसे पटले नाही.
चुकली तरी शेवटी माणसेच की (काहीना कळत नाही सांगुन..काय करायचे Happy )

असो..या बाफ वरील माझे शेवटचे पोस्ट..

धन्यवाद.

५-६ वर्षापुर्वी माझ्या आई वडिलांकडे NJ ला आले होते. दोनदा तीनदा आले होते. कोणाच्या ओळखीतून आले होते. त्यावेळी मी पण तिथे होते. सर्व माहीती वगैरे देतात. सहा सहा जण आले होते. सगळे मराठीच होते. एका रविवारी आम्ही अगदी झोपेत होतो शनिवारची पार्टी करून, घाईत गडबडीत उठावे लागले. सकाळी ७ वाजता वगैरे येत,दोन्ही वेळेला फोन वगैरे केला न्हव्ता. इथेच ह्या एरीयात आलो मग तुम्ही इथेच रहाता कळले वगैरे बोलणे. पप्पांना गप्पा मारायची आवड म्हणून तासभर गप्पा मारल्या व गेले. मग अचानक बंद झाले. कारण कोणाला वेळ न्हवता तसा त्यांचा स्वधाय ला जायचा.

स्वाध्याय बद्दल माहित नसेल तर उगीच आपल काहिपन मत देउ नका.
"मानसाला मानुस म्हनुन जिवन जगायला लावनारि शिकवन आहे."
मला भेतायच त्याना. माझा इमेल poonamgav@gmail.com
ते जर तुमच्या कदे आले तर माझा इमेल द्या त्याना.
आभारि आहे.

अरे माझ्याकडे पण २-३ आठवड्यांपूर्वी ५-६ बाया आल्या होत्या भरदुपारी मला झोपेतून उठवलं आणि म्हणे ह्या एरियात आलो होतो म्हणून गप्पा मारायला आलो. मी इतकी झोपेत होते की त्यांना सरळ मला झोपायचय सांगून बाय म्हणाले.
टेक्सासातल्या १०० डेग्री उन्हाळ्यात कोण ही सहज कोणत्याही एरियात टळटळीत उन्हाची गप्पा मारायला जातात.
पूर्वी पण २-३ वेळा ह्या बायका आल्या होत्या. मी बाहेर जायचं आहे सांगून टाळलं. हा धागा वाचून मी नक्की कोणाला कटवते आहे ते तरी समजलं.

बाबा स्वाध्याय परिवाराशी बरीच वर्षं संबंधित होते.आमच्या आजूबाजूच्या वस्तीत कोळ्यांसाठी ते सर्व खूप काही उपयोगी उपक्रम राबवायचे.राखी बनवणे, दारू सोडवणे, सामुदायिक लग्न वगैरे."हमसे जो टकरायेगा, स्वाध्यायी बन जायेगा" असं समूहाचं स्लोगन.

असेच बरेच स्वाध्यायी घरी यायचे.त्यांचा त्रास असा काहीच नाही.नम्र वागणं बोलणं, चहा कोफी किंवा काही अश्या भेटीत(या भेटीला कोणती तरी फेरी म्हणतात) घेणं अलाउड नसायचं.बाबांनी काही वर्षांनंतर स्वाध्याय सोडलं.ssy, आसाराम बापू, rss सर्वांची हीच कथा.बहुधा एखाद्या एक्स्ट्रीम समुदायाची तत्त्व जीवनात भिनवायची असतात त्या स्टेज ला बाबा बॅक ऑफ करत असावेत.

स्वाध्याय, श्रीश्री, लँडमार्क फोरम या सगळ्यांपासून लांब राहणे मी प्रिफर करेन. या सर्वांनी पब्लिक ला फायदा झाला आहेच.पण एक जीवनपद्धती म्हणून याने हिप्नॉटाईझ होणे जरा घाबरवणारे ठरेल.
या सगळ्यातून एक एक तत्व घेऊन एखादे कस्टमायझेशन स्वतःसाठी बनवता येईल.

(या भेटीला कोणती तरी फेरी म्हणतात) भावफेरी.

माझ्या मावशीची फुल फॅमिली स्वाध्यायी आहे आणि खूप दिवस मागे लागली तू पण येत जा तिथे जे प्रवचनं होतात. न्यू जर्सीमधेच दर रविवारी.
सततच्या तेच तेच बोलण्याला कंटाळून मी २-४ वेळा गेले पण काही मन रमले नाही.
अजूनही कधी भेटले की तेच तू येत नाहीस, त्यावरून मोठं लेक्चर, उपदेश इ. इ. सगळ्या गप्पा करून गाडी शेवटी स्वाध्याय कडेच वळते.
चिकाटी हा एक गुण फार दिसतो यांच्यात.
एकूणच सुर असा, आम्ही करतो ते सगळ एकदम छान. तुम्ही याच्यात आला नाहीत म्हणजे तुमचे जीवन वाया.

हा धागा आत्ता सापडला,
मजा आली अनेकांची मते वाचून. त्यात मते बनविणारांची चूक नाही, कारण इतर अनेक कल्टस एवढे प्रभावी आहेत की त्यामधे एखादा कल्ट नसलेला चांगला प्रकार असू शकतो यावर विश्वास ठेवणेच कठिण व्हावे.
स्वाध्यायला इतर अनेक कल्ट्सच्या मापाने तोलणारे हे असेच करत आहेत हे तर नक्कीच, पण ज्याची मते त्याच्यापाशी.
मी जे काही पाहिले, ऐकले आहे त्यावर आधारित काही निरिक्षणे (मते ज्याची त्याने बनवावीत)
- स्वाध्यायची कधी कुठे जाहिरात, प्लेक्स, इ. पाहिले आहेत का ? (मी तरी पाहिलेले नाही)
- स्वाध्यायची पुस्तके (चरित्र सोडून) बाहेर कोणत्याही दुकानांमधे मिळतात का ? (मला तरी दिसलेली नाहीत)
- इतर कल्ट्सप्रमाणे गळेपडू आणि पैसे उकळणारे लोक यात आहेत का ? (मला तरी कोणी भेटलेले नाही)
- याला परिवार म्हणतात हे माहिती आहे. ही इतर कल्ट्सप्रमाणे बाऊन्डरीज असलेली संस्था नाही असे ऐकले आहे.
>>एकूणच सुर असा, आम्ही करतो ते सगळ एकदम छान. तुम्ही याच्यात आला नाहीत म्हणजे तुमचे जीवन वाया.
हे असे सूर लावणारे असतील तर तो त्यांच्या वैयक्तिक स्वभावाचा दोष असावा. याचे जनरलायझेशन होऊ शकत नाही.
आठवले यांनी केवळ विचार सांगितले आणि इतर बाबा लोकांप्रमाणे स्वतःचे प्रस्थ स्वतः कधीच माजू दिले नाही असे दिसते.
थोडक्यात काय तर मला इतर कल्ट्सपेक्षा इकडे फ्लेक्सिबिलिटी दिसते, जोर जबरदस्ती नाहीच.

वर्षानुवर्षे स्वाध्यायी असणाऱ्या ज्येष्ठ सहकाऱ्याला जो पोपटासारखी गीता बोलायचा,त्याला एकदा मी काही श्लोकांचा अर्थ विचारला होता तर बिचारा घामाघूम झाला. अनेक सरकारी नोकरांना स्वाध्याय व भ्रष्टाचार सोबतच करताना पाहिले आहे. मला एवढंच म्हणायचं आहे कळपात घेण्यासाठी एवढा आटापिटा का? आठवलेंचा देह झाला चंदनाचा ग्रंथ वाचून गद्‌गद व्हायला झालेले. पण आठवलेंनी जमीन विकायची ठरवली तेव्हा शेवटच्या क्षणी वडीलोपार्जित आहे म्हणून भावाच्या नावावर केली हे खटकले. शेवटी मोह सुटला नाही असेच वाटलं. माझ्यासारख्या लोकांत भाव जागणे शक्य नाही.तेव्हा मला नकोय स्वाध्याय तर माझ्या मताचाही आदर व्हायला हवा ही अपेक्षा.

मला वाटते माणसाची ( म्हणजे सर्वांची नव्हे, पण अ‍ॅव्हरेज ) प्रवृत्तीच असते,
एखादा पांढराशुभ्र पडदा दाखवून विचारले काय दिसते आहे तर लोक त्यावरचे बारीक सारीक डागच दाखवतील. Sad

माझ्या घरी येतात. पाणी पण घेत नाहीत... गप्पा मारतात आणि जातात.. कित्येक वर्षे हे चालू आहे. मला पण गम्मत वाटते. कधीच आमच्या कार्यक्रमाला या असेही सांगत नाहीत... काही वर्षांपूर्वी एक जण आलेला तो 'दूरचा नातेवाईक' निघाला. मला ते निरूपद्रवी वाटतात.. मी त्यांना आरामात घरात घेऊन १५/२० मिनिटे गप्पा मारतो...

हे असे काही लोक आमच्याकडेही एकदा रविवारी आले होते. स्वाध्याय वाले होते की नाही माहीत नाही. कोणत्यातरी धार्मिक्/संस्कार कार्यक्रमाला या सांगत होते. बाकी व्यवस्थित बोलले, गप्पा मारल्या आणि परत गेले. नंतर काहीही फॉलो अप वगैरे नव्हता.

मला स्वाध्याय बद्दल किंवा आठवल्यांबद्दल काहीच माहीत नाही. पण जर त्यांनी काही चांगले केले असेल तर शेवटी जमीन भावाच्या नावावर केली वगैरे सारखी निदान माझ्या त्रोटक माहितीवर क्षुल्लक वाटणारी गोष्ट ही त्यांची लास्टिंग मेमरी कशी होउ शकते असे वाटले. जनरली कोणीही १००% संत होउ शकत नाही.

>>मी त्यांना आरामात घरात घेऊन १५/२० मिनिटे गप्पा मारतो...<< +१

बर्‍याच वर्षांपुर्वि आमच्या कडेहि येउन गेलेले. हल्ली नाहि, बहुतेक चळवळ आता मंदावली असेल. हि मंडळी सिनियर सिटिझन्स या कॅटेगोरीत मोडत असल्याने त्यांना दारावरुनच परतवणं मला तरी पटत नाहि....

महेश जी परिवाराने जो पैसा जमवला त्यावरून शास्री गेल्यानंतर भांडणं झालेली आठवतंय का? ही एक प्रकारची नशा आहे ज्याला चढली त्याला वाटतं इतर का घेत नाही, त्याने कंपनी दिलीच पाहिजे.

मला एका गोष्टीचे अपार कौतुक वाटते, आठवले यांनी स्वतःच्या हयातीत "परिवार" या संकल्पनेचे बाजारीकरण कधीच होऊ दिले नाही. म्हणुनच अजुनही अनेक लोकांना स्वाध्याय, आठवले याबद्दल काहीही माहिती नाहीये.

मी याआधी लिहिले आहेच की त्यांचा विचारांवर ठाम विश्वास होता, माणूस स्वतःच्या विचाराने स्वतः घडला पाहिजे, त्याला कोणी जोरजबरदस्तीने घडवू शकत नाही. म्हणुनच स्व-अध्याय आवश्यक आहे. त्यांनी गीता, वेद, उपनिषदे यातले विचार सोपे करून सांगितले आहेत आणि त्याआधारे भारतीय संस्कृतीच्या चांगल्या गोष्टी आजच्या संदर्भात समजावून सांगितल्या आहेत.

जमीन जर त्यांची स्वतःची असेल तर तीचे काय करायचे हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे.

प्रीत, आपण जे म्हणता (भांडणे) त्या गोष्टींबद्दल कधी फारसे ऐकण्यात वाचण्यात आलेले नाही,
मुळात "परिवाराने पैसा जमवला" हे वाक्यच चुकीचे वाटते, कारण त्यांनी कोणत्याही प्रकारचे आर्थिक साम्राज्य उभारण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. तसा जर केला असता, तर आत्ता जे महान लोक आणि त्यांचे कल्ट दिसत आहेत त्यांचे पितामह ठरले असते.
असो, तर तुम्ही जो "पैसा" म्हणता तो एक दोन मार्गांनी आलेला आहे असे वाटते,
१. त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांचा भाग
२. त्यांचे एक स्वतंत्र प्रकाशन आहे पुस्तकांसाठी, जी बाहेर कुठेच मिळत नाहीत, आणि कोणी कोणाच्या गळ्यात मारत नाही इतर कल्ट्सप्रमाणे. पण तरी ती फुकट नाहीयेत, तर त्याचे जे काही पैसे जमतात ते
एकतर या पैशांसाठी कोणी भांडले असेल असे वाटत नाही, आणि जर भांडले असतील तर तो त्या लोकांचा कोतेपणा आणि करंटेपणा, दुसरे काय

सुचना : मी जे काही ऐकले आहे, पाहिले आहे त्यावर आधारित माझी मते लिहित आहे. त्यामुळे कृपया कोणी याला "प्रचार" मानू नये ही नम्र विनंती.

>>सदगुरु वामन राव पै आणि स्वाध्याय हे वेगवेगळे आहेत ना?
होय वेगळे आहेत. एवढेच नव्हे तर "जयंत आठवले" पण वेगळे आहेत.

पण आठवलेंनी जमीन विकायची ठरवली तेव्हा शेवटच्या क्षणी वडीलोपार्जित आहे म्हणून भावाच्या नावावर केली हे खटकले. शेवटी मोह सुटला नाही असेच वाटलं. >>>>>

जमीन जर वडिलोपार्जित होती तर भावाच्या नावावर केली हे योग्यच केले ना? आठवल्यांना भावाला विश्वासात न घेता वडिलोपार्जित जमीन परस्पर विकायचा हक्क नव्हताच. यांनी करून दिली व भावाने नावावर करून घेतली म्हणजे त्याला इंटरेस्ट होता, केली नसती तर कोर्टातही जाऊ शकला असता.

स्वाध्याय परिवार हे उगीचच गाजावाजा न करता काम करणारे म्हणून ऐकिवात आहे. माझा आजगातायत कधी संबंध आला नाही.

साधनाजी फाएजी तुम्ही पुस्तक वाचावं म्हणजे तुम्हाला संदर्भ लागेल. मुद्दा काय आहे की ज्यांना व्यक्तीस्वातंत्र्य थोडक्यात स्पेस हवी आहे त्यांना इनडायरेक्टली प्रेशराइज करू नका. मी एक पोलिस वाचक आहे त्यामुळे मला जमीनीचं खटकले. sorry for that.

मी फक्त शास्रींना मानतो या माणसाने इतकं सुंदर चिंतनपर साहित्य लिहिलंय की अमृतकुंभच जणू . इतकं विविध धर्मग्रंथ वेद उपनिषदांचा अर्थ समजावून सांगितलंय. बरेच वर्ष तत्वज्ञान मासिक घेत होतो. त्यांच्या तोडीचा विद्वान या शतकात दुसरा नसेलच.

आमच्यात या म्हणायचं नाही तर मग घरोघरी जाऊन साधतात काय? <<< मला वाटतं की सेवेचा तो एक भाग आहे... पु.लंच्या भाषेत सांगायचं तर
'माझा धंदा... ... सद्भाव निर्माण करणे...... '
'म्हणजे सोल एजंसी आहे तुझ्याकडे....'
'एका प्रकारे सोल एजंसीच म्हणायची....' आचार्य बाबा बर्वे... Proud

मग
स्वाध्याय परिवार, सदगुरु वामनराव पै , अनिरुद्ध बापू, जयंत आठवले , नाणीज चे नरेंद्र महाराज, गगनगिरी महाराज आणि इतर असंख्य बाबा - महाराज यांपैकी कुणाला फॉलो करावे?
Uhoh

Pages