आपली माणसं ....

Submitted by यशू वर्तोस्की on 25 January, 2018 - 01:15

काल थोड्या उशीराने घरी जायला निघालो. दिवस मस्त गेला होता बाहेर काळोख पडायला लागला होता . गाड्यांचे हेडलाईटस पेटले . काळेखात गाडी चालवताना थोडं एकटं वाटतं , दिवसा कसं बाहेर दिसणार्या गोष्टींशी तुम्ही कनेक्ट होत असता पण रात्री काळोखात समोरून येणार्या गाड्यांचे हेडलाईटस , पूढच्या गाड्यांचे टेललाईटस आणि रस्त्सावरचं व्हाईट मार्किंग एवढंच दिसतं . त्यामुळे आपोआप गाडीच्या आतलं जग आयसोलेट होतं. कदाचित यामूळेच रात्री उशीरा लाॅंगड्राईव्हला जाणं खूप रोममंटिक मानलं जातं. बाहेरचं काही लक्ष विचलित करत नाही , आपल्या आत एक कोझी वाॅर्म फिलिंग येतं आणि मग दोन माणसं एकमेकांच्या सहवासात पूर्णपणे बूडून जातात . काळाचं भान मागे पडतं.
असो तर ट्रॅफिक पण लागल्यामूळे प्रवास फारच संथ गतीने होत होता. एफ एम लावलं तर गाण्यांपेक्षा मधेमधे फालतू आणि बालिश बडबड करणारे जाॅकिज डोकं पिकवत होते . थोड्या वेळाने डोकं पिकलं म्हणून चक्क मिडवेव्ह म्हणजे विविधभारती मुंबई लावलं . क्या बात है मजा आ गया . चक्क ' माझं शेत माझं शिवार ' हा कार्यक्रम चालू होता . आजच्या भागात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ अकोला ने डेव्हलप केलेली डोमॅस्टिक डाळ मील बद्दल माहीती देत होते . मन लावून ते ऐकलं इतकी सुरेख माहीती शासकिय मदत , सबसिडी , वर्किंग , मेंटेनन्स .. सर्व ऐकून मला पण एखादं मशीन घेउन धंदा सुरू करावा अशी भूरळ पडली.
त्यानंतर प्रश्नोत्तरांचा सेशन होता विषय होता ' कडधान्यावरची किड आणि त्याचे निवारण ' मी उत्कंठेने ऐकत होतो . ट्रॅफिक , लांबलेला प्रवास सगळ्याचा विसर पडला . महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून शेतकर्यांचे फोन्स येत होते आपापल्या अडचणी मांडल्या जात होत्या आणि तज्ञ मंडळी त्याला उत्तरं देत होती . माझा या विषयाशी दूरान्वयाने संबंध नसूनही मला ऐकायला बरं वाटत होतं .
हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे ----- बातम्या देत आहे . आमच्या वेळी सुधा नरवणे असायच्या बातम्या द्यायला. तसंही शासन दरबारी बाॅम्बे च मुंबई व्हायला पंन्नास वर्ष लागली पण माझ्या आठवणीत आॅलईंडिया रेडिओ मात्र पहील्यापासून मुंबईच म्हणत असे .

खरंच नविन नविन खाजगी रेडिओ चॅनल्स येत आहेत. गांण्यांचा नूसता बडीमार होतो आहे . पाचकळपणा आणि बालिश विनोद यावर सगळा जोर आहे. पण यामधे आपला चांगली माहीती ,उत्तम संगीत ,चांगले कार्यक्रम देणारा आणि लोकाभिमूख असणारी विविधभारती हरवून गेली . आपल्या दूरदर्शनचंही असंच झालं . कधीतरी संह्याद्रीच्या पाउलखूणा मधे जूनं रेकाॅर्डिंग पहायला मिळतं . आपल्या माणसांची पुनर्भेट होते मनाचा कोपरा खूप सुखावतो.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बरोबर आहे आपलं मत. अगदी पटलं. हल्ली रेडिओवर टिव्हीवर धिंगाण्याशिवाय काही नसतं. खरंतर माहितीपर कार्यक्रम असायला हवेत.

पाउलखूणामधले कार्यक्रम अगोदर जाहिर करायचे नाहीत हे तत्त्व दूरदर्शनने अजूनही पाळलं आहे. तिथेच मार खाते प्रसारभारती.

जुने आकाशवाणीचे श्रोते अजूनही मोठ्या संख्येने हे कार्यक्रम ऐकतात.
मला अजूनही नभोनाट्य ऐकायला आवडेल. युववाणी , आपली आवड (नवीन रूपातली) रमवतात.
विविध भारती वरही शास्त्रीय / उपशास्त्रीय संगीतावर आधारित चांगले कार्यक्रम असतात.
आकाशवाणी वरील एक सोज्वळपणा , आदरपूर्वक केलेली बातचित, सारे कौटुंबिक वाटते.