अज्ञाताचा गड चढताना

Submitted by अनन्त्_यात्री on 18 August, 2018 - 12:38

अज्ञाताचा गड चढताना अशी पायरी येते
तर्कबुध्दी थकुनिया त्यावरी विश्रांतीस्तव बसते
उठून गड बेलाग लांघण्या पुन्हा कंबर कसते
अनुमानाची निष्कर्षाची कास पकडुनी चढते

जिथे संपते वाट त्या तिथे असे काही लखलखते
त्या तेजातच अज्ञाताचे नवेच दर्शन घडते

Group content visibility: 
Use group defaults

सुरेख !
>>जिथे संपते वाट त्या तिथे असे काही लखलखते
त्या तेजातच अज्ञाताचे नवेच दर्शन होते >>
खरं आहे !
मला वाटते,
"..अज्ञाताचे नवेच दर्शन घडते"
ठिक राहिल. Happy

सुरेखच..... Happy

ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे
जीवेभावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे ||

प्रकाशात चालता चालता चालणेचि विसरावे |
भावातीत स्वभावसहज ध्येयी तन्मय व्हावे ||
.....स्वामी स्वरुपानंद, पावस

धन्यवाद.....

द्वादशांगुला, आभार!
बेलाग = आरोहणास अतिशय कठिण (कडा, गड, किल्ला...)