तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

ईशा निमकर चं घर आधी कुठल्यातरि सिरीयल मधे पाहिल्यासारखं वाटतय पण आठवत नाही.... Sad>>>>>> maaze pati saubhagyavati ?

केड्या लेखक आहे म्हटल्यावर वेगळे काही अपेक्शित नाही... पण सोसतय तोवर सोसावे म्हणतेय.

नवीन Submitted by मी_आर्या on 16 August, 2018 - 16:54>>>>> केड्या दाढ्या सिरीयल मध्ये करोडोच्या गोष्टी करतो, पण कायम दुसर्‍या कडे जाऊन फुकट खातो.

कॉलेजमधला वि.स. येतो त्यानंतरचा सीन टोटल फ्लॉप गेला.
त्याला समोर पाहिल्यावर गडबडायला नक्की होईल, पण कुणी असं स्टेजवर रडायला वगैरे नाही सुरू करणार Uhoh रादर, रडू आलं तरी ते आवरून वेळ मारून नेईल.
तिथे ती साधी, सरळ दाखवायच्या नादात बालीश वाटली Uhoh
वि.स.चं लेक्चर पण बळंच !!

सुलु हो पण mmtz मध्ये अंतर 10 ते 12 वर्षाचं होतं, इथे अफाट अंतर दाखवलं आहे. ती काका म्हणते त्याला इतकं. >>>> क्काय? ती सुभाला ( तिच्या हिरोला) काका म्हणते सिरियलमध्ये? Lol बरोबर आहे म्हणा. जेव्हा मी पहिला प्रोमो बघितला तेव्हा मला ती सुभाची हिरोइन न वाटता त्याची धाकटी बहिण वाटत होती. मला आधी वाटत होत की भावा-बहिणीच्या नात्यावर आधारित असावी हि मालिका Proud

पण अभिनय mmtz वाल्याचा छान होता. ++++११११११

त्या इशाला बघितल्यानन्तर मला रन्गिलाच्या आधीची सलवार कमीज वाली उर्मिला मातोन्डकर आठवली. ती सुद्दा अशीच गोड, गुबगुबीत दिसायची पुर्वी. Happy

ईशा निमकर चं घर आधी कुठल्यातरि सिरीयल मधे पाहिल्यासारखं वाटतय पण आठवत नाही..>>> कॉमन आहे ती बिल्डींग. अरे वेड्या मना पासून बहुतेक सिरीयलमधे तीच असते.

सुलु खरंच. काल एक खूप जूना सिनेमा बघितला. अजय देवगण आणि ऊर्मिलाचा...कानून... ही इशा तशीच वाटते पटकन.

कॉलेज मधला एपिसोड भारी होता..तशी सुबोध भावे सोबत नायिका दुसरी हवी होती कारण सु भा च्या अक्टिंग पुढे नायिकेची अक्टिंग कमजोर पडते..

विसं ची केबिन किती बेगडी आहे.
VFX सरळ सरळ कळतायेत.
परवा तो helicopter मधून उतरतो तेव्हा ही.
पुष्पा बाईंच पात्र विनोदनिर्मितीसाठी आहे वाटतं

VFX सरळ सरळ कळतायेत.
परवा तो helicopter मधून उतरतो तेव्हा ही.>>>>> काल अगदी हेच बोललो आम्ही. कैच्याकै.
पुष्पा बाईंच पात्र>>>>>> ही बाई नायिकेची आई आहे का?

मी काल थोडी पाहिली. अर्धा तासाच्या भागात १५ मिनिट आई बॅकेंत पकवत होती. बाकी वेळेत सुभाच्या हाफिसातले वीएफेक्स, हिरवीण आणि तिच्या वेंधळ्या बाबांची रस्त्यावरुन पळापळ. बरोब्बर ९ वाजता बाबा आईच्या मागे बॅकेंत उभे. थांब पुष्पा थांब Lol

VFX सरळ सरळ कळतायेत.
परवा तो helicopter मधून उतरतो तेव्हा ही.
>>>
हो ना Lol त्यामुळे हेलिकॉप्टरमधून बाहेर आल्यावर वर पंखा गरगरत असतानाही त्याच्या डोक्यावरचा एकही केस जागचा हलतही नाही. Lol

आई, वडील दोघांचीही ओव्हरअ‍ॅक्टिंग आहे. त्यातून ना विनोदनिर्मिती होते, ना काळजाला भिडणारे वगैरे प्रसंग उलगडतात. मला तर ते 'बाळा/बेटा/वेडाबाई' टाकून लिहिलेले प्रेमळ संवाद महान बोअर होतात. Uhoh

एक प्रोमो पाहिला होता. त्यात नायिकेची आई सुभाला फ्रिज रिपेअर करणारा समजून त्याच्याकडून रिपेअरीन्गच काम करुन घेते. हे महाशय सुद्दा कसलीही कटकट न करता इन्टरनेटच्या मदतीने फ्रिज रिपेअर करुन देतात सुद्दा. ती आई म्हणते कशी त्याला, आलास, 'तुझीच वाट पाहत होती माझी मुलगी'. Lol

बरी चाललीय, मानबा, लगीर आणि राणा च्या तुलनेत.
तुमची काय अपेक्षा आहे त्यांनी हॉलिवूड मधून vfx आणावेत का की खरं वाले हेलिकॉप्टर भाड्याने घ्यायला पाहिजे होते.

त्या बिलिअन रुपीज वर्थ असणाऱ्या माणसाची काय मजबुरी असते की तो गप्प गुमान फ्रीज रिपेअर करायला लागायो?

काही का असेना, जेव्हा तो फ्रीज चालू होतो, तेव्हा अनपेक्षित पणे फ्रीज चालू झाल्याचा आंनद दाखविणारा सुबो खूप छान वाटला बघायला,

अन ती पुष्पां किती बोअर, काय ते बँकेत अन रोडवर नाटके तिची. कितीही अडाणी अन गरिबीमुळे गाजलेली जरी म्हणायचे तरी जरा अतीच

मी पहिले दोन बघितले, आता नाही पण गौरी फुले तिथे कशाला गेल्या, नायिकेची आई म्हणून Wink . कट्टीबट्टी मध्ये राजकारणी काकू म्हणून छान वाटायच्या. फार सुंदर केलं होतं तिथे.

गौरी फुले तिथे कशाला गेल्या
>>>> कोरा चेक वटवायला, नुसती स्लिप भरायला १ तास घेतला, कारण नवरा अन पोरगीने येऊन त्यांना अडवायला हवे न. पण त्या वेळकाढू पणामुळे ती मूर्खांच्या पलीकडली वाटत होती

गरीब श्रीमंत पेक्षा एक बेअरिंग छान पकडलं होतं, राजकारणी बाईचं. फार गोड वाटायचं. पूर्वाच्या भाषण लिहून देण्याच्या शैलीवर खुश असायची. परागला सोडवायला धावत आली पोलीसस्टेशनमध्ये. आत्ता ह्या charactorची गरज होती कट्टीबट्टीत. मदत झाली असती दोघांना.

साड्यापण सुरेख असायच्या.

कोरा चेक वटवायला, नुसती स्लिप भरायला १ तास घेतला, कारण नवरा अन पोरगीने येऊन त्यांना अडवायला हवे न. पण त्या वेळकाढू पणामुळे ती मूर्खांच्या पलीकडली वाटत होती >>> अरेरे. मेन रोल म्हणून स्वीकारला की काय. कट्टीबट्टी मध्ये कमी महत्वाचा होता, कारण खूप जण आहेत त्यात पण उलट छान होता तो रोल, ठसा त्यात उमटला असता.

पोलीस चौकीत कधी गेला होता पराग, मी मिसले का ते भाग. कधीची गोष्ट आहे ही. >>> फार जुनी. अनुष्काचा आधीचा bf पिऊन येतो मग भांडणे होतात.

तुमची काय अपेक्षा आहे त्यांनी हॉलिवूड मधून vfx आणावेत का की खरं वाले हेलिकॉप्टर भाड्याने घ्यायला पाहिजे होते.
Submitted by च्रप्स on 18 August, 2018 - 23:15
>>>
काय हरकत आहे? केड्याची एक नायिका आता ३०० कोटी ची मालकीण आहे.
तसेही दुधवाले या किटलीतले दुध (पाणी ) त्या किटलीत करताना आपण नेहमी बघतो.

शिल्पा तुळसकरच्या गळ्यात मंगळसूत्र होते. Happy म्हणजे बायकोच असावी.
Submitted by Nidhii on 15 August, 2018 - 00:04
>>>
एक पुरुष दोन स्त्रिया ही थीम असेल तर आता केड्या शिल्पा तुळसकर कडून मसाले कुटून घेणार का? भैताड ?

इथे नसावं तसं मीन्स शिल्पा बहुतेक पहिली बायको असेल आणि ती या जगात नसावी किंवा दुसऱ्याशी लग्न झालं असावं.

Pages