भारतात जगण्यासाठी सर्वात सुंदर शहर पुणे!

Submitted by कृष्णा on 13 August, 2018 - 09:06

नुकतीच बातमी वाचली लोकसत्तावर.

जगण्यासाठी भारतातील सर्वात सुंदर शहर पुणे!

पुणे तेथे काय उणे!!! Happy

पुण्याचे व पुणेकरांचे अभिनंदन! Happy

विशेष म्हणजे नवी मुंबई आणि मुंबई दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर! तर दिल्ली बहोत दूर थेट ६५व्या क्रमांकावर!

https://www.loksatta.com/desh-videsh-news/pune-most-livable-city-new-del...

Group content visibility: 
Use group defaults

एक साधा हिशोब आहे, जे शहर जगण्यासाठी सर्वोत्तम तिथे जागेचे भाव गगनाला भिडतात !

उदाहरणार्थ दक्षिण मुंबईत वन बीचके सव्वा करोडला जात असेल, वाशीला ८० लाखाला, पनवेलला ४० लाखात .. तर उद्या कोणी पनवेल हे मुंबईपेक्षा भारी वा वाशी हे मुंबईपेक्षा भारी आहे असे म्हटलेले हास्यास्पद ठरेल.
कारण जनता ईतकी मुर्ख नसते की जिथे सुखसोयी स्वस्तात मिळत आहेत त्याच्या मागे न लागता यातना भोगायला करोडो खर्च करतील ..

किंबहुना या मुद्द्याच्या अनुषंगाने असे वाटते की कदाचित हा सर्व्हे म्हणजे बिल्डर लोकांचाच एक गेम असेल. अमुक तमुक शहरे जगण्यास सर्वोत्तम आहेत घोषित करा आणि तिथले फ्लॅट चढत्या भावात विका...

बाकी जिथे मी, शाहरूख आणि सचिन तेंडुलकर राहतो ती मुंबई प्रथम क्रमांकावर नाही हे एखाद्या झोपेतल्या माणसाला तरी पटेल का?
पुण्याचे फारसे अनुभव नाहीत, त्यामुळे पुण्यात काय चांगले वाईट याची कल्पना नाही, त्यामुळे पुण्याबाबत नो कॉमेंटस
पण भारतात जगण्यासाठी मुंबईपेक्षा भारी शहर आहे, असू शकते, हा एक अनाकलनीय विनोद आहे . जर भारतातल्या सर्वांना हा पटला तर निदान आमच्या मुंबईतील लोंढे तरी कमी होतील. बघा ट्राय करून, टाका मुंबईला एखाद्या सर्व्हेत थेट तळाच्या क्रमांकावर Happy

"मुंबईतील लोंढे तरी कमी होतील. बघा ट्राय करून"

==> तेच तर केले असू शकेल ना सरकारने. लोंढे वळवण्यासाठी प्रयत्न. पण काय सांगावे. अभिमान वाटून राहिला ना इथे काहीना.

खरं तर राहण्या योग्य शहरे हा किताब आता नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद,सांगली, सातारा,लातूर्,नांदेड, अमरावती(महाराष्ट्र), जळगाव या शहरांना द्यायला हवे.तिथे इंडस्ट्री यायला हव्या.रोजगार वाढायला हवेत.या जागा इंजिनीयरींग कॉलेज काढायला योग्य आहेत आणि आयटी इंडस्ट्री काढायला योग्य नाहीत हा दुटप्पीपणा नको.

मोदीजींची व्हिजन, स्मार्ट सिटीचे स्वप्न आणि देवेंद्रजींचे कष्ट यामुळेच पुणेकर हा दिवस आज पाहू शकले आहेत.

मुंबईचे लोंढे वळवायचेच असल्यास पुण्यालाच का?
माझ्या पुण्याच्या मित्रांकडून नेहमी ऐकतो की तिथेही हल्ली परप्रांतियांचा त्रास आहे.
बाकी अभिमानाचे म्हणाल तर त्यात काही वावगे नाही. प्रत्येकाला आपल्या राहत्या जागेचा असतोच, ते हुमायुन नेचरच आहे. मला स्वत:ला मुंबईकर असल्याचा आहे. प्रत्यक्षात मुंबईला मुंबई बनवण्यात माझे काही कर्तुत्व नाहीये. मुंबईला मानसन्मान तेंडुलकर, गावस्कर, मंगेशकर, आणि खान, बच्चन, ठाकरे आदी लोकांनी मिळवून दिलाय, मी त्यातला कोणीच नाही. तरी मुंबईत जन्म घेतला आणि मुंबईतच राहतो याचा मला उगाचच अभिमान आहे, जसे एखाद्याला आपल्या जातीधर्माचा असतो.

आजच्या दिवशी तरी हे शहर माझं ते शहर तुझं करू नका. आधी भारत माझा, महाराष्ट्र माझा, पुणे माझं, मुंबई माझी मग हळू हळू गाव पातळीपर्यंत तुकडे पाडत जायचं... कुठेतरी कशाची उणीव असणारच आहे ते स्वीकारायचा प्रयत्न करायचा किंवा आपल्याकडून काही सुधारणा करता येईल का ते बघायचं.

अरे किस्ना, सांगली का नाही या सर्वेक्षणात असा धागा काढायचा सोडून काय हे अभिनंदनाचा धागा काढून बसला आहेस तू?
आणि मग तसा धागा काढल्यावर मिरजेतले आयडी "सांगली काय बेक्कारच' म्हणून पोस्ट टाकतील.
प्रांतवाद, प्रांतवाद!!

अस्सल पुणेकर त्यालाच म्हणावे ज्याचा जन्म १९८५ नंतर झालेला असेल तरीही जन्माआधीचे आणि पहिल्या पाच वर्षांच्या नाकळत्या वयातल्या पुण्याच्या आठवणीने काही वर्षांनी तो मान हलवत "पहिले पुणे राहिले नाही" असे म्हणू शकतो..

Pages