भारतात जगण्यासाठी सर्वात सुंदर शहर पुणे!

Submitted by कृष्णा on 13 August, 2018 - 09:06

नुकतीच बातमी वाचली लोकसत्तावर.

जगण्यासाठी भारतातील सर्वात सुंदर शहर पुणे!

पुणे तेथे काय उणे!!! Happy

पुण्याचे व पुणेकरांचे अभिनंदन! Happy

विशेष म्हणजे नवी मुंबई आणि मुंबई दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर! तर दिल्ली बहोत दूर थेट ६५व्या क्रमांकावर!

https://www.loksatta.com/desh-videsh-news/pune-most-livable-city-new-del...

Group content visibility: 
Use group defaults

तरी बरे धागा सांगलीकराने काढलाय, पुणेकरा ने काढला असता तर मानबा किंवा होसुमीयाघ सारखा पळाला असता. Biggrin

आमचे येथे अनेक वर्षं तुंबलेल्या विषयांच्या वाफेवर चहा बनवणेचे तंत्रज्ञान नाममात्र दरात शिकवले जाईल--- केशवसेठ गुजरातकर(ह.मु- पुणे)

>> Union ministry for housing and urban affairs.

काहीतरी मेजर लोचा आहे या सर्वेक्षणाचा. "इकॉनॉमी अ‍ॅन्ड एम्प्लॉयमेन्ट" मधे अजमेर २ नंबरला तर आमची आर्थिक राजधानी मुंबई ६३ व्या नंबरला Lol

हो .आणि पॉवर सप्लायमध्ये पुणे मुंबई च्या पुढे?
मी काल लिहिलेलं, आयडेंटटिटी आणि कल्चरमध्ये पुण्याचा चौदावा का काहीतरी नंबर आहे.
तरीही जाज्ज्वल्य अभिमान झोपूनच आहे.
बहुतेक कोणीतरी पुण्याला चांगलं म्हणतंय याचा जबरदस्त धक्का बसलेला दिसतोय.
इथले काही प्रतिसाद वाचून पुण्याला सगळ्यात वाइट्ट शहर ठरवलंय असं वाटतंय.
सस्मित , तुम्ही पुणे, मुंबई, ठाणे , नवी मुंबई यांतल्या कुठल्याही शहराच्या रहिवासी नाही, असं वाटतंय.

आजच ई-सकाळ वर पुण्यात ट्राफिक जाम ने कसा कहर केला हे वाचले. पुण्याइतके गैर्सोयिंनी भरलेले, अरुंद गल्लीबोळ रस्ते, फज्जा उडालेली वाहतुक व्यवस्था, अतिक्रमणांनी अधिकच आक्रसलेले रस्ते, थोडाही ट्राफिक सेंस नसलेले आडमुठे लोक्स, औषधालाही न सापडणारी माणुसकी आणि गरज नसताना जिथे-तिथे 'आमचीच लाल' दाखवण्याची व्रुत्ती असलेल्या पुण्याला "भारतात जगण्यासाठी सर्वात सुंदर शहर" करणार्या समितीचे करावे तेवढे कौतुक कमीच..!! <<<<<<<<<<<<<<< ते न्हवं समितीत ते आपले पुण्याचे हे तर न्हवते ना.

पुण्याला पहिला क्रमांक मिळाला तो तिथल्या IT तंत्रज्ञानाच्या भरभराटीमुळे पण आता श्रेय कोण घेतील, दुपारी १ ते चार घोरत पडणारे. नको तेव्हड्या शुद्ध मराठीत बोलून समोरच्याला हाड तुड करणारे. सुमार दर्जाच्या पाट्या नको तिथे लावून स्वतःचाच हसं करून घेणारे. वर्षानुवर्षे ढेकणांच्या खोलीत राहून शेजाऱ्या-पाजार्यांची उणी दुणी काढणारे, आपणच दुसर्यापेक्षा दीडशहाणे असल्याच्या तोऱ्यात लक्ष्मी रोडवरून फिरणारे.

1 ते 4 हे झोपा काढत राहिले आणि याच वेळात देशा विदेशातील परप्रांतियानी येऊन हिंजवडीत कंपन्या बांधल्या. उठल्यावर यांचं फिरणं म्हणजे दगडूशेठ गणपती आणि सारसबाग, कधी साहस करण्याची हुक्की अली तर पर्वती, त्यामुळे हिंजवडीत परप्रांतीय कधी हात पाय पसरवून झोपला याना समजलंच नाही समजलं तेव्हा वेळ निघून गेली होती.

कुणी काही म्हणा पण पुणे चांगले आहे ते आहेच! Happy

तरी बरे धागा सांगलीकराने काढलाय, >>>

मी सांगलीकर नाही हो! नगरी आहे पण पुण्यात पुण्याईने आलो! Wink

पुण्याच्याच बाबतीत एका बाजूला जाज्ज्वल्य अभिमान आणि दुसर्या बाजूला इतका तिरस्कार अशा टोकाच्या भावना का निर्माण होतात हे चिंतनीय आहे Wink
अधलेमधलेही दोन्हीकडे आहेत, पण मुंबईच्या बाबतीत किंवा बंगळूरच्या बाबतीत ( किंवा अजून कुठल्या शहराबाबतीत) अशा दोन टोकाच्या भावना मी तरी नाही पाहिलेल्या.

दुसर्या बाजूला इतका तिरस्कार अशा टोकाच्या भावना का निर्माण होतात हे चिंतनीय आहे Wink>>>

जया अंगी मोठेपण तया यातना कठीण!
ते येणारच ओघाने. Wink

गौरी पटवर्धन यांची एक फिल्म आहे या विषयावर.
वारसा म्हणून पुणे महापालिकेने ज्या वास्तू जाहीर केल्या आहेत त्यातल्या ९०% नारायण, शनिवार, सदाशिव अशा मोजक्या भागात आहेत. या पलिकडे रविवार पेठ, शुक्रवार पेठ, गंज पेठ, घोरपडे पेठ येथेही माणसे त्या काळापासून राहतात. त्यांचाही इतिहास आहे. त्यांची नोंद खुद्द मनपा मधेच नाही. महात्मा फुलेंचा वाडा आणि त्यांनी पहिली शाळा काढलेला वाडा वारसा म्हणून जतन करण्यासाठी हे जेव्हां प्रयत्न झाले तेव्हां ही उदासीनता समोर आली.
बिनसावल्यांचे शहर या त्यांच्या व्हिडीओ फिल्मचा हा विषय आहे. अतिशय प्रभावी आहे.

"जा आपापल्या शहरात, ती मोठी करा, त्यांचा अभिमान बाळगा."
"स्वतःची शहरे पुण्यासारखी करता येण्याचा वकूब किंवा कुवत तर नाहीच"

==> काय एकेक मुक्ताफळे उधळली आहेत. जसे काय नारायण मूर्ती, अझीम प्रेमजी वगैरे यांच्या पेठेतच राहायला होते. एक दिवस दुपारी झोपायचे सोडून गेले हिंजवडीच्या माळावर आणि केली सुरु इन्फोसिस. नाही का? आधी आपण राहतोय त्या पेठा साफ करता येतात का बघा मग कुवतीचे आणि अभिमानाचे बोला. अंगणात एखादा मोर येऊन नाचला ह्याला आपले कर्तृत्व समजणे आणि "बघा आमच्या अंगणात मोर नाचला. आहे किनई आम्ही ग्रेट" असा दिंडोरा पिटणे ह्याला बालीशपणा म्हणतात. सो ग्रो अप इफ यू कॅन.

पुणे शहर हे प्रथम क्रमांकाचे रहाण्यासाठी निवडलेले शहर ठरले ह्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही., त्यामागची कारण हि खूप ठोक किंव्हा साहजिक आहेत . सर्वात मुख्य कारण म्हणजे पाण्याची उपलब्धता जी आता भारतातल्या सर्व मोठया शहरांसाठी मोठी डोकेदुखी आहे ..पुणे हे शहर नशीबवान आहे , दुसरा कारण म्हणजे भोगोलिक , वातावरण, तुलनेने कमी प्रदूषण आणि बऱ्यापैकी हिरवाई .. बागांचे प्रमाण बऱ्यापैकी आहे ..काही नवीन डेव्हलप होणाऱ्या भागात सोडले तर मुंबई किंव्हा तस्तसम मोठ्या शहरं पेक्षा प्रमाण चांगले आहे. तिसरा प्रमुख कारण हे शहर बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी राहण्यासाठी योग्य आहे कि नाही.. आणि त्याचे उत्तर हे नक्कीच हो आहे .. मग ते एडुकेशन असू, जॉब असू किंव्हा उद्योगधंदे असू .. पुण्याचे इन्फ्रा structure वाढले तर अजून हि ह्या शहरामध्ये वाढण्याचा स्कोप बराच आहे, PMRDA मध्ये येणारा परिसर हा मूळ पुण्याच्या ५ पट आहे, म्हणजे अजून एवढे पुणे शहर वाढणार आहे , ते जर नियोजन केलेत तर जागतिक स्थरावर सुद्धा रँकिंग वाढेल यात शंका नाही ..
मूळात हा सर्वे भारतातला आहे जागतिक नाही.. त्यामुळे जागतिक शहरांशी तुलना करणे चुकीचे आहे ..दुसरे पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा खूप वाईट अवस्था आहे काही शहरांची .. रात्रीचे फिरणे विशेषतः डाउनटाउन आणि काही सबअर्बन भागात तर ७ नंतर सुद्धा धोकादायक आहे, पूणय मध्ये रात्री अकरा ला सुद्धा हॉटेल मध्ये एक तासाचा वेटिंग असतो ..न्यूयॉर्क , चिकागो सारख्य शहरात ट्रॅफिक ची अवस्था तर प्रचंड बेकार आहे ..त्या मानणारे हिंजेवाडी परवडली.. ह्या शहरं मध्ये सुद्धा प्रचंड टोल द्यावा लागतो.. प्रॉब्लेम कुठे नाहीत , पण आपले पुणे शहर नक्कीच राहणी जोगे आहे , आणि मराठी माणसाला संधी उपलब्ध आहे ..जे उपयोग करून घेतील त्यांचा फायदा ..नाही तर हातावर हात धरून बसले तर बाहेरून येणार लोंढे पुण्याचे मुंबई करतील हे नक्की..

वावे - अगदी बरोबर!
पुणेकरांना "जाज्वल्य अभिमान " असतो. कुणि पुण्यातले थोडे जरी उणे काढले तरी उफाळून वर उठतात!
ते नाही का - अस्मानीच्या सुलतानीला जवाब देती जिव्हा!
खरे तर अस्मानीच काय, भारतातल्या सुलतानीला फक्त शिवा़जी, संभाजी, राजाराम, ताराबाई यांनी तरवारीने उत्तर दिले - त्यानंतर सुलतानी वगैरे मामुलीच होते. मग उरल्या फक्त जिव्हा! म्हणून इंग्रजांसमोर शरणागति!

इतर शहरातल्या लोकांच्या जिव्हा असे जवाब देण्यात वेळ घालवत नाहीत. पण पुणेकरांना वेगळेच प्रश्न - जाज्वल्य अभिमान, अस्मिता, तत्वाचा प्रश्न वगैरे मोठे शब्द वापरून जिव्हा चालवायच्या - हात दुपारी १२ ते ४ बंद.

यात कोणालाही रस असणार नाही, हे माहीत आहे. म्हणूनच लिहितोय.
निकष , त्यात पुणे, नवी मुंबई आणि मुंबई यांचे क्रमांक, त्या निकषावर पहिलं ठरलेलं गाव्/शहर
गव्हर्नन्स = प्रशासन- ८,१,२३ नवी मुंबई
आयडेंटिटी & कल्चर - १५,१५,२ चंडिगढ
शिक्षण ८,२,३६ फरिदाबाद
आरोग्य ४,३,२३ तिरुचिरापल्ली
सुरक्षितता २५,१३,३५ सागर
इकॉनॉमी & एम्प्लॉयमेंट ७,१६,६३ चंडिगढ
गृहबांधणी आणि सर्वसमावेशकता - २३,३५,६ गाझियाबाद
सार्वजनिक वापराच्या खुल्या जागा ४,१३,१ मुंबई , भोपाळ , भुवनेशवर, वाराणसी , गांधीनगर, नवी दिल्ली
मिक्स्ड लँड युज & कॉम्पॅक्टनेस ४९,२५,१ मुंबई
पॉवर सप्लाय १०,७४,१६ ठाणे
वाहतूक १२,४,८ ठाणे
अ‍ॅश्युअर्ड वॉटर सप्लाय २,७,३ इरोड
सांडपाणी व्यवस्थापन ४,८,७ विजयवाडा
घनकचरा व्यवस्थापन ५,१०,१७ तिरुपती
प्रदूषणात घट २,४८,५४ लुधियाना

Pages