करामत - एक लघुकथा

Submitted by अनिंद्य on 13 August, 2018 - 05:27

* * *

दंग्यात लुटल्या गेलेला माल जप्त करण्यासाठी पोलिसांनी छापे मारायला सुरवात केली. लोक घाबरले, लुटीचा माल रात्रीच्या अंधारात घराबाहेर फेकू लागले. काहींनी तर स्वतःचाच माल फेकून दिला, उगाच पोलिसांचे झेंगट नको म्हणून.

* * *

एका माणसाची मात्र पुरती गोची झाली. त्याच्याकडे साखरेच्या दोन गोण्या होत्या, किराणा मालाचे दुकान लुटताना त्याचा हाती तेव्हढेच लागले. रात्रीच्या अंधारात एक गोणी त्याने शेजारच्या विहिरीत कशीबशी ढकलली, पण दुसरी ढकलतांना तोल गेला आणि तोही विहिरीत ! आवाज ऐकून लोक गोळा झाले. दोरखंड टाकून दोन उत्साही वीर विहिरीत उतरले, त्याला बाहेर काढले. पण थोड्याच वेळात शेवटचे आचके देत तो देवाघरी गेला.

* * *

दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांनी विहिरीतून पाणी शेंदले तर ते चवीला अगदी गोड !

* * *

रात्री बघतो तर काय - त्या माणसाच्या कबरीवर दिव्यांची आरास !

* * *

ज्यांनी इथवर वाचलंय त्यांच्यासाठी :-
‘सआदत हसन मंटो’ ह्या अत्यंत प्रिय लेखकाच्या 'करामात' ह्या उर्दू लघुकथेचा मराठीत अनुवाद करण्याचा माझा पहिलाच प्रयत्न. मोजके चार शब्द पदरचे लिहिण्याची आगळीक केली आहे, पण ती मराठीत वाचण्याच्या सुगमतेसाठी.

* * *

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ वावे
@ प्रिया येवले
@ रीया
@ अदिति
@ नँक्स
@ दक्षिणा

उत्साहवर्धनासाठी आभार !

@ शाली,

आभार.

मंटो कथांचे मराठीत आधी भाषांतर झाले असेल तर मला माहित नाही. माझा उर्दू -> मराठी भाषांतराचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

जमतंय असे वाटल्यास / वेळ मिळाल्यास / मूड लागल्यास मंटोंच्या अश्याच १०-१२ आवडत्या लघुकथांचे मराठीत भाषांतर करण्याचे ठरवले आहे.

अनिंद्य

माबोवर एक कथा आहे मन्टो ह्यन्ची (अनुवादित)..
"खोल दो" अस नाव आहे, कुणी केलय हे आठवत नाहीये, मस्त केलय पण पाहा एकदा Happy

आठव्ल.. ही घ्या लिन्कः
हे तर आपले विशाल दादा:
https://www.maayboli.com/node/35073

अनिंद्य, मंटोंच्या लिखाणाबद्दल ऐकले आहे पण कधी वाचले नाही. अजुन असे छान अनुवाद करत रहा मराठी वाचकांसाठी.
पु. ले.शु.

@ किल्ली,

लिंक दिल्याबद्दल आभार !

विशाल कुलकर्णीनी उत्तम केलाय अनुवाद. तिकडे मिपावरही जयंत कुलकर्णी यांनी मंटोंच्या दोनेक कथांचे भाषांतर केले आहे असे दिसले.

मी पुढेमागे आणिक काही कथांचे भाषांतर केलेच तर रिपीट होणार नाही असे बघेन. Happy

अनिंद्य

@ चौकट राजा,

मंटोंचे शब्दसामर्थ्य अचाट आहे, किमान शब्दात कमाल आशय साधण्याची हातोटीही.

... अजुन असे छान अनुवाद करत रहा मराठी वाचकांसाठी.......

प्रयत्न नक्की करिन.

उत्साहवर्धनासाठी आभार _/\_

अनिंद्य

@ जाईजुई
@ अॅमी
@ मंजूताई,

उत्साहवर्धनासाठी आभार !
अनिंद्य