Submitted by धनुर्धर on 13 August, 2018 - 00:46
माझ्या आजीच्या कुशीत
होता मायेचा उबारा
तोंडावरतून फिरे
तिचा हात तो कापरा
माझ्या आजीच्या कुशीत
होता स्वप्नांचा गाव
गोष्टीतून तिच्या
भेटे रंक आणि राव
माझ्या आजीच्या कुशीत
चांदोमामाची अंगाई
पेंगुळलेले डोळे
तोंडभरून जांभई
माझ्याआजीच्या कुशीत
नसे कसलीही भिती
तिच्या मायेच्या मिठीत
नीज सुखाने नांदती
माझ्या आजीच्या कुशीत
रात्र होत असे साजरी
ती नाही आज जरी
तिची आठवण उरी...
....धनुर्धर....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वाह! मस्तच!
वाह! मस्तच!
माझ्याआजीच्या कुशीत
नसे कसलीही भिती>> लहानपण आठवले.
छान ... माझ्या गोव्याच्या
छान ... माझ्या गोव्याच्या भूमीत स्टाईल