नवीन मालिका "तुझं माझं ब्रेकअप"

Submitted by कविता९८ on 31 August, 2017 - 12:21

झी मराठी वर 18 सप्टेंबर पासून रात्री 8.30 वाजता तुझं माझं ब्रेकअप ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Sainkeet Kamat (राखेचामधील अभिराम)and Ketaki Chitale हे मुख्य पात्र आहेत.

Group content visibility: 
Use group defaults

१३ ऑगस्ट पासुन ८.३० वाजता नवी शिरेल येतेय... मग ही शिरेल संपणार आहे का..?? कथानक तर तसे वाटत नाही.. पण आज म्हणे मीराचं लग्न आहे त्या रजनीश सोबत..

Happy ह्या सिरेलच्या भाषेत.. आज मीरेचं व रजनीशरावांचं लग्न आहे.
काहीही... ती खुनशी मेनका, प्रचंड वेडंवाकडं तोंड करीत बोलणारी, बारीक चणीची मीरा , ऑड आऊट फीट मधली आजी, फ्रस्ट्रेटेड समीर, स्मार्ट आणि आता लेखकाच्या मर्जीने व्हिलन झालेला रजनीश.......... सगळीच पात्रं विचित्र!
भरकटलेली कथा, बदलणारे पात्रांचे स्वभाव....

मीरेचं व रजनीशरावांचं लग्न आहे.
काहीही... ती खुनशी मेनका, प्रचंड वेडंवाकडं तोंड करीत बोलणारी, बारीक चणीची मीरा , ऑड आऊट फीट मधली आजी, फ्रस्ट्रेटेड समीर, स्मार्ट आणि आता लेखकाच्या मर्जीने व्हिलन झालेला रजनीश.......... सगळीच पात्रं विचित्र!
भरकटलेली कथा, बदलणारे पात्रांचे स्वभाव.... > खरय . पण तरीही आवडायची मला ही मालिका . अभिनय चांगला होता सर्वांचा. आणि समीर ची आई फार छान आहे दिसायला. त्यातली आत्त्या, मीराची मैत्रीण, मीराची वकील झालेली , तिचा नवरा ही पात्र मात्र गायब केली आहेत.

मागच्या कित्येक एपिसोड मध्ये साधा त्यान्चा संवाद पण नाही दाखवला, आणि आता समीर चे केविलवाणे प्रयत्न बघून कळत नाही आता काय होणार आहे. जसा साखरपुडा दाखवलाच नाही तसं लग्न ही न दाखवता कथानक पुढे जाउन संपेल. खु क खु मधे जशी कळी खुललीच नाही तसं शिर्षकाला जागले हे लोक तर ब्रेक-अप तसच राहील की काय अशी शंका येतेय.

समीर ची आई मत्र बेस्ट वाटली सर्वात..
तिला आनि समीरच्या आजीला एकमेकिंवर कुरघोडी करतान पाहुन जाम मजा येते.
राणे फॅमिलि पण रंग आणते. रजनीश ची अत्ताची आई आज्जिबात वठाली नाही (जुनी आई अचानक क्रिटिकल प्रोजेक्ट रिसोर्स म्हणुन 'ग्रहण' मधे नीरुमाता म्हणुन गेली आणि अजरामर झाली).
मीरेची बहिणाबाई सदान्कदा माहेरिच कशि असते काय माहीत.
राणे फॅमिली म्हणे 'वहिनी पोळी-भाजी केंद्र' चालवतात पण कधी १ गिर्हाईक दिसले नाहि.. नाही म्हणायला कधीकधी ५ स्तील चे डबे फडताळावर दिसतात ठेवलेले.

खरय . पण तरीही आवडायची मला ही मालिका >>> मला पण. म्हणजे रोज बघते मी अगदी मानबा सारखी सोडून नाही दिली बघायची.

त्यातली आत्त्या, मीराची मैत्रीण, मीराची वकील झालेली , तिचा नवरा ही पात्र मात्र गायब केली आहेत. >>> वकील आणि तिच्या नवर्याच तसही आता काय काम आहे>

Pages