ऊखाणे एक विरंगुळा

Submitted by नीतु on 23 February, 2012 - 01:24

पूर्वी बायका नवयाचं नाव घेत नसत, तेव्हा लग्नसमारंभात नवीन लग्न झालेल्या मुलींना उखाणे घ्यायला सांगायचे,त्या निमित्ताने त्यांना नवयाच नाव घ्यायला मिळायच. परंतु आज ही लग्नात, मंगळागौरीला हे उखाणे घेतले जातात. एक गमंत म्हणून ह्या सगळयाकडे पहायचं असत. मग काही वयस्कर बायका हे उखाणे या मुलींना सांगतात व त्या ते घेतात. मी काही नवीन उखाणे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, नवीन पीढीतल्या मुली असे उखाणे घेतील.

कम्प्युटरमध्ये घातली नवीन डिस्क
------शी लग्न करण्यान मी घेतली आहे मोठी रिस्क

फेसबुकवर फ्रेण्ड्स केले शंभर
-------च नाव घेते मी आहे त्यांची लव्हर

फेसबुक, मोबाईल शिवाय चैन मला पडेना,
-------च नाव घेते झोप मला येईना.

लग्नाच्या आहेरात आई वडिलांनी
दिला मला black berry चा मोबाईल
-----च नाव घेते आता फेसबुकवर update करीन माझा प्रोफाईल.

तुम्हाला देखील काही सुचत असतील तर जरुर लिहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाव घ्या नाव घ्या, नाव काय घ्यायचं
नाव आहे *****, पण अहोचं म्हणायचं Happy

घर दोघांचं असतं, दोघांनी सावरायच
मी पसरवायच आणि ****नी आवरायचं Happy

दादाने माझ्या लग्नात घर भरणीच्या वेळी घेतलेला अस्स्ल सातारी उखाणा
"सातारा जिल्ह्यात पाटण तालुका, पाटण तालुक्यात किल्लेमोरगिरी माझं गाव
अन आरशात बघुन कुंकु लिहीती दर्शना तिचं नाव"

व्हॉट्स अप फॉरवर्ड

कडु कारलं, तुपात घोळलं , विश्वासरावांना चारल
GROUP ADMIN च नाव घेते ,कटाप्पाने बाहुबलीला का मारल ?

माझ्या नणंदेच्या डोहाळजेवणाच्या वेळी मी घेतलेला उखाणा :
demonetization special

नणंदेच्या डोहाळजेवणात आनंदाला नाही तोटा
कारण -- नी आजच बदलून आणल्यात ५०० आणि हजाराच्या नोटा

IT वाल्या मित्रांसमोर हा घेतला होता :
beautiful are the roses, sweet is the fruit
in --'s life OS I have become root

कडु कारलं, तुपात घोळलं , विश्वासरावांना चारल
GROUP ADMIN च नाव घेते ,कटाप्पाने बाहुबलीला का मारल ?
>> नक्की कोण आहे नवरा.

Pages