गांधीलमाश्यांचे पोळे झाले आहे, उपाय सुचवा.

Submitted by राहुल बावणकुळे on 5 August, 2018 - 06:43

आम्ही सहा PhD विद्यार्थी 2 BHK फ्लॅटमध्ये राहतो. In particularly, माझ्या राहत्या खोलीच्या बालकनी/गॅलरीच्या एका कोपर्यात 3-4 इंच आकाराचे गांधीलमाश्यांचे पोळे झाले आहे. आमच्याकडे कामाला येणार्या मावशींना पोळ काढायला सांगीतले तर त्यांनी आधी गांधीलमाश्यांना पळवा, नंतरच मी ते काढेल असा सुरक्षीत पवित्रा घेतला. किंबहुना त्यांनीच मला त्या राणी मधमाश्या नसून गांधीलमाश्या आहेत असे सांगितले; नंतर मला त्या अत्यंत जहाल विषारी असल्याचे समजले. तर कुणी गांधीलमाश्या हाकलवण्यासंबंधी उपाय सुचवा, सध्या पोळं 3-4 इंचाचे असल्याने काढणे सोपे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिडी जलईले.. तंबाखूच्या धुराने माश्या पळतात.
(त्यापूर्वी आपल्या तसेच आसपासच्या घरांच्या दारे खिडक्या घट्ट बंद करून घेणे)

हिट मारल्यास गांधील माश्या मारतात. चांगला मजबूत फवारा मारून पटकन खोलीबाहेर जा.

गांधील माशीचा डंख झाल्यास त्याला व्हिनेगर लावल्यास आग कमी होईल. काटा चिमटीत धरून काढू नका, पॉयझन सॅक असते ती चुरडल्यास अधिक विषार इंजेक्ट होईल. २ ४ माशा डसल्याने काही होत नाही. तरी भीती वाटत असेल तर डॉ कडे जा, जाताना मेलेली माशी सोबत न्या, त्यांना नक्की कोणती ते कळेल.

पण इतके काही होत नाही. हिट ने पटकन मरतात. मला ४ ५ वेळा चावल्याही आहेत अन मी मारल्याही आहेत.

आमच्या कारपोर्टला झाले होते तेव्हा पाणि मारुन काढले होते ,पाण्याच्या जोरदार फवार्‍याने पोळ निसटुन पडेल फक्त पाईपने पाणी जोरात आणी एकसारख उडवा ,पाण्याच्या मार्‍याने त्या डिसओरिएन्ट होतात तरी फुल कव्हरअप करा स्वतःला .

धन्यवाद!
सुदैवाने बालकनी/गॅलरीला sliding glass window आहे. मात्र तिच्याच शेजारी माझा बिछाना आहे त्यामुळे माश्यांवर हीट/ फवारा मारून लगेच window बंद करतांना आवाजाने त्या चवताळू नये हीच भीती वाटते.

हे असे धागे पुढे विनोदी धाग्यात रुपांतरीत होऊ शकतात. >>> अगदी ! मी हे २-३ वेळा लिहून खोडले होते. सुतारपक्षी, उंदीर, कुत्र्याला बसमधून की कशातूनतरी नेणे वगैरे आठवले. खरंतर माझे हात सुरसुरतायत पण आधी बिचाऱ्यांच्या गांमा जाऊद्यात.

होय पोळे काढणारे व्यावसायिक लोक असतात. हाउस किपिंग करणार्‍या कंपन्या असतात त्यांना फोन करून पहा.
स्वतः काहीतरी करायला जाऊन धोका पत्करू नका.

ताबडतोब मरतात हो हिट मुळे. काय विंडो बंद करायची गरज नाही. अन पोळ्याच्या साईझ वरून फार तर ७-८ माशा असतील त्यात.

मला वाटते गांधीलमाशीचे पोळे नसते. एकच छोटेसे घरटे असते आणि त्यात बहुधा एकच गांधीलमाशी आणि अंडी असतात. कुंभारीण माशी म्हणजेच गांधीलमाशी का?
ही माशी तितकीशी उपद्रवी नसते बहुधा.

@ हीरा, +१

कुंभारीण माशी म्हणजेच गांधीलमाशी का? >>> होय.

मला वाटते इथे मधमाशी आणि गांधीलमाशी ह्यात काहीतरी गैरसमज झालाय.

इथे पोळ्याचा आणि माश्यांचा (जमल्यास एकच माशी नीट झूम करुन ) असे फोटो टाका म्हणजे नीट माहितगार तज्ञ सल्ला /ल्ले देता येतील Happy तसेच नक्की कोणती माशी ते पण आम्हाला कळेल!

अवांतर : (वाईट बातमी) आमच्या कॉम्प्लेक्स मध्ये मधमाशांचे पोळं काढायचं काम चालले होते. पुर्वसूचना नीट दिली नव्हती का सगळ्यांना पोचली नव्हती नक्की आठवत नाही. संध्याकाळी चालणाऱ्या कॉम्प्लेक्समधल्या वयस्कर माणसावर त्या मधमाशांनी attack केला आणि तो माणूस गेला. कोणाकडे पोळ काढायचं काम चालले असेल तर प्लिज आगाऊ सूचना द्या.

अहो आ रा रा हिट बिट मारायला काय ते डास आहेत का? Uhoh कशाला जीव धोक्यात?
नाहीतर सरळ सोसायटीच्या सिक्युरिटीला गाठा, त्यांना अशी कामं करणारे लोक माहित असतात, किंवा तेच करतात कधी कधी थोडे पैसे घेऊन.
मी पुण्यात असते त्यामुळे मला मुंबईचे काही माहिती नाही.

दक्षिणा,
हिट मुळे अर्थ्रोपोड वर्गातले प्राणी मरतात. खास करून उडणारे.
झुरळे मारण्याचेही हिट असते हे ठाउक आहे ना?

इतक्या कमी माश्यांनी जीव धोक्याबिक्यात येत नाही.

*
कुंभारीण माशी म्हणजेच गांधीलमाशी का? >>> होय.
<<
नाही. कुंभारमाशीचे घरटे मातीचे असते.
वास्प उर्फ गांधिल माशी चे मधमाशीच्या पोळ्यासारखे परंतु त्यात बी'जवॅक्स उर्फ मेण नसते. थोडे चिटिनस कागदासारख्या मटेरियलचे असते. त्याखाली एक देठासारखा भाग असतो. ज्यावर ते भिंतीला वगैरे चिकटलेले असते.



ही माशी चावल्यावर तिथे गांध येते उर्फ छोटी लोकलाइज्ड सूज. जी खाजते. शेकडो माशांनी असा डंख केला तर त्यामुळे अरिदमियाज वगैरे होऊ शकतात. अ‍ॅनाफायलॅक्टीक शॉक उर्फ अ‍ॅलर्जीची जोरद्दार रिअ‍ॅक्शनही येऊ शकते, हे खरे आहे.

असो.

फुकट सल्ला दिलेला आहे. पटला तर करा, नसेल जमत तर सोडून द्या.

कुणीही वाद घालू नका, मला फार भीती वाटते. मी वर दिलेल्या लिंकप्रमाणे माशी आहे. आ.रा.रा. तुम्ही दिलेल्या फोटोप्रमाणे माशी नाही. पोळही मधमाश्यांसारखेच आहे.

लाऊडस्पीकर वर आरारा या आयडीचे बच्चन स्टाईल दिलेले तप्त (:हाहा:) वगैरे अगम्य प्रतिसाद वाचून दाखवा. माशा पळून जातील.

मी वर दिलेल्या लिंकप्रमाणे माशी आहे>> ?? ? म्हणजे माशीनेच धागा काढला आहे माणसांचे आपल्या विरूद्ध असलेले उपाय गुप्तपणे जाणून घ्यायला. ( राहुल, हलके घ्या.)

मधमाश्या आपल्या इकोसीस्टीमचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यांना न मारताही पोळी काढणारे लोक आहेत. आमच्या सोसायटी मधे एकदा त्यांना बोलावलं होतं.
नंबर ८३०८३००००८, 8308300008
amit.godse@beebasket.in

मे महिन्यात खिडकीच्या स्ल्याडिंगवर सुपारीच्या आकाराचे मधमाशांचे पोळे धरले होते, पहिल्यांदा पाहिले तेव्हा छोट्या काठीने उचकटून काढले. माशीने हल्ला केला पण ऑलरेडी खबरदारी घेतली होती हातात लांब केरसुणी होती, तिने तिचा हल्ला परतून लावला, खरेतर ती धारातीर्थी पडली. पण २/३ दिवसानंतर तिथे लिंबूच्या आकाराचे पोळे दिसले (बहुदा डबल मेहनत घेतली असेल ). यावेळी मात्र हि केस नवरोबाकडे दिली. त्यांनी हिट स्प्रे मारला आणि त्या माशीला पळवून लावले आणि ते पोळे जाळून टाकले. आणि अश्याप्रकारे जुलै जाऊन ऑगस्ट उजाडला तरी आमच्याकडे माश्या काही फिरकल्या नाहीत.