अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणी कुस्तीचे आव्हान घेणारा प्रोफेशनल असेल तर कळवा. खडकवासला भागातील पैलवान मतेंशी कुस्ती लावून देतो.

चंपा, बोकलत, स्वस्ति, अनिश्का, योगी तुमच्या प्रतिसादाबद्ल धन्यवाद.
आता लिहिताना मजा वाटतेय, पण तेव्हा पोटात भितीने गोळा आला होता. बोकलत ती बाई तीन ते चार मिनिटेच होती. तरीही मला ती चार मिनिटे तासांसारखी वाटली. माझा देव गण आहे. तरिही मला असले प्रकार जाणवतात. कदाचित माझ्या पत्रिकेत काही तरी (कु) योग असावा.

माझा देव गण आहे. तरिही मला असले प्रकार जाणवतात. >>> राक्षस गणला भुतं दिसत नाहीत आणि त्याला त्रास पण देत नाहीत, देवगणाला दिसतात पण त्रास नाही देत आणि मनुष्यगणाला दिसतात आणि त्रास पण देतात. तो चादरीचा प्रकार तुमच्यासोबत घडला म्हणून मला वाटलं मनुष्यगण असावा. पत्रिकेत पण राहू केतू विशिष्ट स्थानी असले की असे त्रास होतात.

भारी...

किस्से आहेत ...पण मराठी टायपिंग करताना दमछाक होतेय..सुरवात प्रश्ना ने ...भुतं मानगुटीवर बसतात असं का म्हणतात? माझ्या अंदाजाने फक्त भारतातच नव्हे इतर देशांमधे सुद्धा असा समज असावा...कुणी shutter (thai movie)पाहीला आहे का? त्यात भुत पुर्ण वेळ लीड अँक्टर च्या मानगुटीवर बसुन असते...कुणाला अधिक माहिती असल्यास शेअर करावे...

भुतं मानगुटीवर बसतात असं का म्हणतात? >>>अत्यंत छान प्रश्न विचारलात, मला तरी असं वाटतंय एखाद्याची मानगूट पकडणे म्हणजे त्या व्यक्तीचा संपूर्ण ताबा घेणे. आपण जेव्हा एखाद्याची मानगूट पकडतो तेव्हा तो व्यक्ती प्रतिकार न करणारा किंवा प्रतिकार करून थकलेला म्हणजेच तोडक्यात असह्य असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला भूतबाधा होते तेव्हा त्यावेळी भूतबाधा झालेली व्यक्तीसुद्धा असह्य, स्वतःवर ताबा नसलेली असते. म्हणून भूत मानगुटीवर बसणे हा वक्प्रचार रूढ झाला असावा.

एवढं सगळं होऊनही मी तीथेच रहात होते. फक्त देवाच्या भरोशावर. मी कोणाचे वाइट केलेले नाही, मग कोण आपले काय वाईट करेल? माझे आई बाबा पण होते,त्यांना कधी काहीही दिसले नाही तिथे. एकदा तर रात्री मी झोपेत असताना जोरात माझ्या कानाजवळ कोणतरी बोलले. तीच बेडची उजवी बाजू, तोच कोपरा, पण फक्त आवाज. पुरूषाचा. Quinine quinine . दोनच दिवसांनी मला मलेरिया झाला. महिन्याभरांने जेव्हा quinine गुगल वर शोधले ते वाचून धक्का बसला, हे औषध खूप पूर्वी म्हणजे सुरवातीला 1940 मधे भारतात मलेरियासाठी वापरत.

boklat.. it seems logical at first glance...while re-rethinking असं जाणवलं की भुत मानगुट धरत नाही तर बसतं...आता इथे मानगुटी वर बसुन प्रतिस्पर्ध्याला निष्प्रभ करण्याचा कुस्तीतला कोणतातरी डांव अभिप्रेत असेल का ते माहीत नाही...पण prima face अंशतः समाधानकारक उत्तर आहे तुमचं...धन्यवाद..

नमस्कार Halloween, भुतांचे सिनेमे, आणि टीव्हीवर भुतांचे सिरियल बघणे सोडून दिले आहे. त्यामुळे काही माहिती नाही.

सहज एक शंका...कारण पायाळू माणसे फक्त अमानविय अनुभवांनाच नाही तर एकुणच अतिंद्रीय अनुभवांना जास्त प्रमणात prone असतात अस समजलं जातं..

>>कुणीतरी माझ्या छातीवर बसून माझा गळा दाबत असल्यासारखं वाटलं. डोळे उघडता येत नव्हते. तोंडातून आवाज निघत नव्हता. मी झोपेत नव्हते हे मला जाणवत होतं. >>>>
मी चिन्मयी....तो sleep paralysis असू शकतो... मी 20's मध्ये असताना खूप वेळा मला असा अनुभव यायचा ... पण नंतर हळूहळू आपोआप बंद झाला

तुळई खाली झोपल्यास मानसिक दबाव वाटूनही अशी छाती/गळा आवळल्याची स्वप्नं पडू शकतात.>>>> हे ऐकलेलं आहे मी पण. कदाचित खूप थकल्यामुळे झालं असेल. Sleep paralysis. पुन्हा अजुनपर्यंत तरी झालेलं नाही.
आणि माझा देव गण आहे म्हटल्यावर जरा धीर आला पण पुन्हा पायाळू आहे म्हणून आलेला धीर गेला की हो... Uhoh Wink Lol

मी कित्येकदा रात्री अपरात्री शेतावर गेलो घरापासून दिड दोन किलोमिटर, तेही नदी ओलांडून. नदीजवळ गावची स्मशान भुमी कित्येकदा तिथे प्रेतांचे दहन सुरु असलेले बघितलयं . शेतावर जायचे म्हणजे रात्री जेवण घरी करून साधारण १०-१०:३० च्या सुमारास सायकलवर जात असे. खळे सुरु असताना म्हणजे ऑक्टोबर नोव्हेम्बर महिना रोज जावे लागे तेंव्हा वय वर्षे १६-१८ च्या दरम्यान असेल माझे. रस्त्याने लाईट नसत. दुतर्फा दाट झाडी त्यात भुतांची आवडती वड, पिंपळ, बाभूळ ही जास्त रस्त्याने जाताना कोल्हे पण दिसत मध्येच सशे पळत पण त्या चांदण्यारात्री शेतात देखिल उघड्या आकाशाखालीच मस्त झोप लागायची गोधडी आणि चवाळ्याच्या उबेत. बाजूलाच शेकोटी छान! मात्र भुते कधी भेटली नाहीत सुदैवाने! Happy

>> sleep paralysis असू शकतो

sleep paralysis वर या धाग्यावर आधी पण चर्चा झाली आहे. मेंदू बहुतांश जागा होतो पण त्याचा स्नायू नियंत्रित करणारा भाग अजून झोपलेलाच असतो असे काहीतरी असते असे वाचले आहे.. भयंकर असतो हा प्रकार.

>> हा धागा डायरेक्ट कसा शोधायचा मायबोली वर मला प्रत्येक वेळी सर्च कराव लागत....

निवडक १० त नोंदवा

व्यत्यय, तुमच्या वैनिला आलेला अनुभव पण भारी आहे. अनिश्का तुम्हाला आलेला लाईटचा अनुभव मलाही आलाय, पण दिवसा आणि संध्याकाळी. बेडरूममधे. दिव्याचे बटन बंद असताना लाईट लागायचा आणि बंद व्हायचा. ते माझ्या घरच्यांनीही पाहिलय . मला वाटलं माझ्या दिवा चालू ठेवण्याचया सवयीमुळे दिवा खराब झाला असावा, किंवा लाईटची गळती होत असावी. म्हणून ईलेकट्रिशनला बोलावले. तर तो बोलला की सगळे ठीक आहे. तो असताना मात्र एकदाही तसे घडले नाही. दुसऱ्या दिवशी परत प्रकार सुरू, परत एकदा त्याला बोलावून घेतले व दिवाच बदलून घेतला. पण पुन्हा दोन दिवसांनी तोच प्रकार. मग वैतागून त्याच्या पाठी लागणे सोडून दिले. काही दिवसांनी आपोआप हा प्रकार बंद झाला. पण मी मात्र आता झोपताना उशीशी एक बॅटरीचा दिवा, माचिस आणि मेणबत्ती ठेवते. रात्री असा प्रकार झाला तर?

( सूचना: लेखक बोकलत आहे त्यामुळे बोकलत हेटर्सनी इथेच थांबावे, नंतर वैयक्तिक हल्ले चढवून धागा भरकटवू नये ही नम्र विनंती.)
ही घटना आमच्या गावात घडली असून १००% खरी आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी. कोकणात मुंबई गोवा महामार्गाला लागून आमचं लहानसं गाव या घटनेने हादरलं होतं. साधारण सन १९७५-८० च्या दरम्यनचा तो कालावधी होता. पावसाळा संपला आणि धुक्याने आपली जाळी विणायला सुरवात केली.अशाच एका मध्यरात्री सगळं गाव गाढ झोपेत असताना त्या स्मशानशांततेला चिरत एक वस्तू कुठूनशी भिरभिरत लक्ष्मी आजीच्या कौलावर पडली. अचानक झालेल्या आवाजाने आजी घाबरली. एव्हड्या रात्री कौलावर काय पडलं असेल याचा अंदाज लावत आणि विचार करत तिचा पुन्हा डोळा लागला. सकाळी उठल्यावर तिने बाजूच्या पोराला कौलांवर चढून काय झालं ते पहायला सांगितलं. एक कौल फुटला होता. कुणीतरी चेष्टा मस्करीत दगड मारला असेल असं वाटून तिने दगड मरणाऱ्याला तिला येणाऱ्या सगळ्या शिव्या दिल्या. त्याच रात्री सेम प्रकार पुन्हा घडला यावेळी ती वस्तू नानाच्या घरावर पडली आणि कौल फुटलं. रोज रात्री हा प्रकार घडायला सुरवात झाली, मध्यरात्री गाव झोपेत असताना आकाशातून कायतरी वस्तू यायची आणि कौल फोडायची. गावकरी या कौलफोडीला वैतागले होते. साधारण दोन आठवडे हाच प्रकार सुरु राहिल्यावर गावकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि रात्रीच्या वेळी गावावर पाळत ठेवायचं मंजूर झालं. तिसऱ्या आठवड्यापासून १० गावकऱ्यांचा ग्रुप रात्री गावावर पाळत ठेवायला लागला पण हा प्रयत्नसुद्धा व्यर्थ गेला. कौलं फुटत राहिली. पण या पाळतीचा एक फायदा असा झाला कि ती कौलं फोडणारी वस्तू काय आहे हे गावकर्यांना समजलं. नदीत ते गोल मोठे गुळगुळीत दगड मिळतात ना त्यातले ते गोटे होते. ज्यांची कौलं फुटली त्या सगळ्यांच्या घराजवळ ते गोटे आढळून आले. पाळत ठेवूनही थांगपत्ता लागत न्हवता आणि त्यात भर म्हणून मिळालेले ते गोटे यामुळे आता गावात उलट सुलट चर्चाना उधाण आलं. काहींच्या मते गावावर कोणीतरी भानामती केली होती, तर कोणी म्हणत होतं हा जो कोणी दगड टाकणारा आहे तो एखादा भूत किवां असामान्य शक्ती असलेला माणूस असावा जो दगड टाकून आपल्याला घाबरवायला पाहतोय.तर कोणी शेतामध्ये दोन लाल डोळे दिसल्याचा दावा करायचा. माणसं दिवसभर याच गोष्टीची चर्चा करायची. शेवटी या सगळ्या प्रकारची एव्हडी भीती गावकऱ्यांच्या मनात बसली की रात्रीच्या पाळतीला गावातली सगळी पुरुष मंडळी पहारा देऊ लागली आणि बायका २०-२५ च्या ग्रुपने एकत्र राहू लागल्या. सगळी पुरुष मंडळी पहारा देऊनही हे दगड पडत राहिले आणि कौलं फुटत राहिली. यात भर म्हणजे नवीन नवीन अफवा उठत राहिल्या, कोणाला एक माणूस दिसायचा जो दगड फेकल्यावर दोन दोन बांध लांब उडी मारायचा. तर कोणाला आकाशातून उडणारा माणूस दिसायचा तर कोणाला नदीच्या पात्रातून वर आलेले दगड गोटे दिसायचे.पण शेवटपर्यंत कोण, कसा, कधी आणि कोठून दगड फेकतोय हे गावकर्यांना समजलंच नाही. काही वर्षांनी हा प्रकार बंद झाला. आजही रात्री लाईट गेला की त्याकाळचे घडलेले प्रसंग तिखट मीठ लावून सांगितले जातात.

अशीच एक हाकामारीची गोष्ट सागितली जायची ८० (७१-८०) च्या दशकात!>>>माणूस पुढे गेल्यावर पाठीमागून मी येऊ ? असं विचारणाऱ्या भुताची गोष्ट का?

Pages