निसर्गाच्या गप्पा (भाग ३३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 July, 2018 - 03:13
landscape

अथ श्री आषाढ़ मासारम्भ ..

आषाढ़ महीना सुरु झाला की आपण आता पावसाळा खऱ्या अर्थाने लागला असं म्हणतो. वर्षातील सगळ्यात जास्त वाट बघितला गेलेला हा ऋतु. संपूर्ण निसर्गच जणू वर्षाऋतूच्या आगमनाची तयारी करत असतो, वरुणराजा येणार आणि सगळ्यांना तृप्त करणार या जाणिवेने पुलकित झालेला असतो. धरणी आपल्या कुशीतील अत्तराच्या कुप्या परत एकदा काठोकाठ भरून ठेवते. कोकिळ महाशय आपली उन्हाळी मैफिल आवरून चातकराजासाठी आसन मोकळे करून देतात. आमराया आपली उरलीसुरली फळे सोसाट्याच्या वाऱ्याला दान देऊन टाकतात. मयूर आपला पिसारा पुन्हा पुन्हा झंकारून पाहतो. तर मुंग्याची आपल्या अंड्यांना ऊन दाखवण्याची लगबग सुरु असते. मानवाच्या आनंदाला तर पारावर राहात नाही. आणि अशातच एक दिवस पश्चिम क्षितिजावर काळोख दाटून येतो. विजांचे भालदार- चोपदार वर्दी देतात आणि जणू ढोल ताशांच्या कडकडाटात, वाऱ्यावर स्वार होऊन तो येतो.. हो.. तोच तो.. मान्सून.

त्याच्या आगमनाने साऱ्या सृष्टीवर नवसंजीवनी पसरते. हिरवेगार गालिचे अंथरल्या जातात .

हा ऋतू नवनिर्मितीचा, ऋतू हिरवाईचा, ऋतू पाचूचा, ऋतू तृप्तीचा. आपण हा निर्मितीचा सोहळा दरवर्षी साजरा करतोच करतो. पिढ्यानुपिढ्या लेखकांनी, गायकांनी, कवींनी, चित्रकारांनी एकंदरीतच कलाकारांनी आपापल्या परीने पावसाला व्यक्त केलेच आहे. कधी आपल्या कुंचल्यातून तर कधी शब्दांमधून. एक राजस्थानी लोकगीत आहे. त्यात या 'पावस'काळाचं किती सुंदर वर्णन केला आहे बघा.

सुरंगी रुत आई म्हारे देस, भलेरी रुत आई म्हारे देस
मोटी-मोटी छांटयां ओसरयां ए बदली, तो छांट घड़े के मान, मेवा मिसरी
सुरंगी रुत आई म्हारे देस।
राजस्थान म्हणजे मरूभूमी. तिथल्या रहिवाश्यांसाठी तर पाऊस म्हणजे जणू अमृत वर्षा, प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद. ते म्हणतात..
"माझ्या देशात हा 'सुरंगी' ऋतु आला आहे. माझ्या देशात हा भला ऋतु आला आहे.
अरे ढगांनों तुमच्यातला एक एक थेंब आम्हाला घडाभर दिसतोय.
अरे बघा बघा, माझ्या देशात 'मेवा- मिसरी' (प्रमाणे प्रिय असा) हा 'सुरंगी' ऋतु आला आहे.

पाऊस प्रत्येकासाठी वेगवेगळा ठेवा घेऊन येतो. छोट्यांसाठी आता वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडण्याची मौज असते आणि भोलानाथाला "शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?“ असा निरागस प्रश्नपण विचारला जातो. तरुणाईला गडकिल्ले साद घालतात. शेतकरी नव्या आशेनी पेरणी सुरु करतो. "यंदा पीकपाणी भरपूर होऊ दे" असं साकडं वर्षाराणीकडे घातलं जातं. शहरी नोकरदाराला आपल्याला वेळेत ऑफिस गाठता येईल ना” ही काळजी सतावत असते. प्रेमिकांसाठी "सावन बरसें तरसें दिल" होऊन जातं. तर कोणाला आता धुतलेले कपडे कुठे वाळवू अशी चिंता भेडसावते. जितक्या वृत्ती तितक्याच प्रवृत्ती हेच खरे.

खरंतर आपल्याकडच्या शहरी भागात पाऊस म्हटला कि 'हाल-बेहाल'. गल्लीबोळात चिखल-राडा तर मुख्य रस्ते स्वतःच नाल्यांचे रूप घेतात. पण गुलजार साहेबांची नजर मात्र वेगळेच काही बघते. त्यांची लाडकी 'बारिश' येते तेव्हा काय होते...

बारिश आती है तो मेरे शहर को कुछ हो जाता है..
टिनकि छत, तर्पाल का छज्जा, पीपल, पत्ते, पर्नाला सब बजने लगते है।
तंग गली में जाते जाते,
मेरी साइकल का पहिया पानी की कुल्लियाँ करता है।
बारिशमे कुछ लम्बे हो जाते है कद भी लोगोंके
जितने ऊपर है, उतने ही पैरो के नीचे पानी में
ऊपरवाला तैरता है तो नीचेवाला डूब के चलता है.
खुश्क था तो रस्ते में टिक टिक छतरी टेंक के चलते थे
बारिशमें आकाश पे छतरी तक के टप टप चलते है..

सगळ्यां निसर्ग प्रेमींना नविन भागाच्या खुप खुप शुभेच्छा

वरील मनोगत निसर्गप्रेमी मनिम्याऊ (मृण्मयी) ने लिहिले आहे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२) https://www.maayboli.com/node/63032

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाचूचे झाड एकदा लावल की बी पडून असंख्य रोपे उगवतात. तसेच फांदीही जगते.
सायुकडून प्रेरणा घेऊन मी पण हल्ली टेबलवर फुलांची सजावट करते.

जूईची फुले.

माहेरी काढून आणि गजरे करून हात दुखायचे इतकी निघायची. माझ्या घरी मी आत्ताच लावलय त्यामुळे छोटे आहे. पण लवकरच भरपूर बहरेल.

माझ्या कुंडीत ही वेल आपोआप आली. पाने सुंदर दिसतात म्हणुन ठेउन दिली. आता त्याला फुल आल आहे. आणि शांकलीने त्याच नाव शोधून दिल. वाघपदी. वाघाच्या पावलांसारखी पाने दिसतात.

त्यावर हे सुंदर फुल येत.

हे फुलांचे फोटो नाहीत पण निसर्गाचे आहेत म्हणून येथे टाकतो आहे. हे गावी जाताना काढले आहेत.
शिक्रापुर
alf1.jpg
ओतुर (जुन्नर)
alf2.JPG
ओझर (जुन्नर)
alf.jpg
आणि हा आहे माळशेज (एमटीडीसी)
alf4.jpg
हे माझ्या गावातले
alf8.jpg
सुर्योदय
alf9.jpg

काय सुंदर फोटो आहे जागूताई! पाचू नावाचं झाड असतं हेही आजच कळलं मला. >>>> + १११११

जागुताई सगळे फोटो मस्तच एकदम

पुण्याहून रत्नागीरीला जाताना कराडहून डावीकडे आत वळल्यावर साधारण दिड तासाच्या प्रवासानंतर ही नदी ओलांडली. फार सुरेख दृष्य होते पण थांबायला वेळ नव्हता. त्यामुळे गाडीतुनच मोबाईलने फोटो काढला. कुणाला माहीत आहे का हा स्पॉट, ही नदी. या नदीचा पुल संपला की लगेच उजवीकडे वळालो होतो. टेकडीवर खुप साऱ्या पवनचक्क्या होत्या.

ratnagiri.jpg

ratnagiri2.jpg

rantagiri1.jpg

त्यातलेत्यात कृष्णा आणि कोयना या २ न च नद्या आठवतायत ..
कारण कराड ला या २ नद्या एकमेकींना येऊन मिळतात ते ठिकाण प्रीतिसंगम म्हणून प्रसिद्ध आहे ..
पण ह्या नदीचं पात्र खूप अरुंद वाटतय ..

वरंध घाटातला पाऊस. दुसऱ्या फोटोतल्या माणसाने आम्हाला त्याच्या घरी नेवून कसलीशी पालेभाजी आणि गरम भात खावू घातला होता ओळख नसताना. ती भाजी मी प्रथमच खाल्ली पण खुप चवदार लागली.

varndha1.jpg

varndha2.jpg

निरु मस्त फोटो.

शाली तुमचे फोटोही झक्कास आहेत. मोबाईल कुठला आहे हो?

वाघपदी माझ्याकडेही आलीय.

निरु, फोटो मस्तच आलेत. भारी!

मोबाईल कुठला आहे हो?>>> साधना, सुर्योदयाचा फोटो Canon EOS 60D ने काढलाय. बाकी iPhone 7plus ने काढले आहेत.

धागा निसर्गात अगदी भिजून, रंगून गेलाय. काय सुंदर फोटो आहेत एकेकाचे! जागू, निरू, शाली, खूपच सुंदर, सुंदर, सुंदर, फोटो.
चतुरचा क्लोजप तर अप्रतिम!!!!!!!! प्रत्येकाच वर्णन किती करू असं झालायं. शब्दच कमी पडतात. त्यापेक्षा परत परत पाहून नेत्र सुख घेते. Happy
काही फोटो पहाताच, कोकणात पोहोचले. Happy

कुंभारवाडा, भिगवण येथे उज्जनी धरणाचे बॅकवाॅटर मधले पक्षी...

हा Painted Stork...

IMG-20180505-WA0076.jpg

आणि हा पाठमोरा...
एखाद्या मैदान गाजवून परत माघारी फिरणार्या खेळाडू सारखा..

IMG-20180502-WA0058.jpg

बागेतील ऑरेंज ट्रंपेट (फ्लेम). मराठीत काय म्हणतात माहित नाही.

otv1.jpg

otv2.jpg
फुलांच्या नावांच्या बाबतीत माझा नेहमीच गोंधळ असतो. शंकासुराच्या फुलाला मी इतके दिवस बाळ गुलमोहर म्हणायचो. का ते माहित नाही. या ही फुलांचे मराठी नाव माहित नाही.

शाली दा, या फुलांना मराठी/हिंदीत संक्रांतवेल म्हणतात. संक्रांतीच्या सुमारास याला खूप बहर येतो

Pages