अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असे म्हणतात ( म्हणजे वाचले होते कुठेतरी ) की राम आणी सीता सुद्धा त्या काळात १५ ते २० फुटाच्या आसपास उंचीचे होते, खखोराजा.

नेट वर पाहिलेलं की 15 ते 20 फूट उंचीच्या लोकांचे सांगाडे मिळालेत उत्खननात. ख खो दे जा

नेट वर पाहिलेलं की 15 ते 20 फूट उंचीच्या लोकांचे सांगाडे मिळालेत उत्खननात. ख खो दे जा>>> ते जावुदे तु किस्से टाक

मुंजाचाच विषय निघालाय तर आता मी तुम्हाला एक खरीखुरी माझ्याबाबत घडलेली घटना सांगतो. ३-४ दिवसाची सुट्टी काढून मामाने मला त्याच्या गावी कोकणात बोलावलं होतं. साधारण दुपारी एक वाजता तिकडे पोहचलो समोर पाहतोय तर सगळे गावकरी माझीच वाट पाहत उभे होते. मला पाहताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. प्रत्येकजण माझ्याकडे अपेक्षेने पाहत उभा होता, कोणाच्या डोळ्यात पाणी होते तर कोणी हात जोडून उभं होतं. मामाच्या घरी गेल्यावर मामाला हा काय प्रकार आहे म्हणून विचारलं तर तो गंभीर झाला आणि म्हणाला तुला मी मुद्दाम इथे बोलावलंय. गाव संकटात आहे, गावाच्या बाहेर एक चिंचेचं भलं मोठं झाड आहे त्या झाडावर एक मुंजा राहतो त्या मुंजाने गावातल्या माणसांचं जगणं मुश्किल करून ठेवलंय. दर अमावसेला २० कोंबड्या आणि पौर्णिमेला १० बोकड अर्पण करावी लागतात. नाही केल्या तर त्या चिंचेच्या झाडावरून येणारी केबलची वायर तो तोडून टाकतो. त्यामुळे बायकांचे डेली सोप्स आणि बाप्यांचे क्रिकेटचे सामने बंद होतात. अजून जीओचा टॉवर पण आपल्याकडे नाय आला त्यामुळे या अनर्थातून गावाला वाचव आणि गावात सुख समाधान शांती नांदु दे. गाव खरोखरच एका मोठ्या संकटात सापडलं होतं.दैनंदिन गरजेचं साधन नसल्याने बायकांची भांडणं आणि बाप्यांच्या पारावरील गप्पाना ऊत आला होता. एक मात्र चांगली गोष्ट अशी की लोकं एकटे दुकटे बाहेर पडायला घाबरत असल्याने गाव हागणदारीमुक्त झाला होता. तरीसुद्धा गावाला या संकटातून काढणं माझं कर्तव्य होतं. मामा मला म्हणाला उद्या अमावास्या आहे, जर तू मुंज्याला कुस्तीचा आव्हान देऊन हरवलंस तर तो कायमचा निघून जाईल. मी थोडा वेळ विचार केला, आणि मामाला बोललो निश्चिन्त रहा. मी हरवेन उद्या त्या मुंजाला. आता मी कुस्तीच्या तयारीला लागलो, जेमतेम २४ तास माझ्याकडे होते.या २४ तासात सल्लूचा सुलतान आणि आमिरचा दंगल वारंवार पाहून कुस्तीतले सगळे डावपेच व्यवस्थित शिकून घेतले. दुसऱ्या दिवसाची रात्र कधी अली समजलीच नाही. रात्री ठीक बारा वाजता त्या चिंचेच्या झाडाखाली जाऊन मुंजाला कुस्ती खेळायचं आव्हान दिलं. आव्हान दिल्याबरोबर झाडावर सळसळ झली आणि २० ते २५ फुटाचा एक माणूस भेसूर हसत माझ्यासमोर उभा राहिला. आकाशात एक लख्ख वीज चमकली आणि आमच्या कुस्तीला प्रारंभ झाला. सगळे गावकरी माझ्या नावाचा जल्लोष करत होते त्यामुळे माझ्या अंगात चेव आला होता. पहिला डाव आम्ही एकमेकांची ताकद मोजण्यात खर्ची घालवला. नंतर खऱ्या कुस्तीला सुरवात झाली. कधी तो वरचढ ठरायचा तर कधी मी. साधारण १ तास असाच गेला दोघेही थकलो होतो. शेवटी मुंजाने मला पकडायला हाताची कैची मारली ती मी लीलया चुकवली आणि ज्या क्षणाची वाट मी पाहत होतो तो आला. कैची चुकल्यामुळे मुंजा थोडा वळला आणि त्याची कंबर माझ्यासमोर अली. मी क्षणाचाही विलंब न करता सुलतान मधली सल्लूची फिनिशिंग मूव्ह मारली, या डावातून मुंजा सावरू नाही शकला आणि उताणा पडून राहिला. गावकर्यांनी एकच जल्लोष करत मला खांदयावर उचलला आणि शोले मधल्या जय वीरू सारखी माझी वरात काढली. दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी जंगी पार्टी ठेवली होती. सगळी गावकरी मला आशीर्वाद देत होती.मामाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. एका गावाला संकटातून वाचवल्याचं समाधान माझ्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होतं.

बोकलत.... चांगले लिहीलेत..!!

पण बाकी सगळे सिरीयसली लिहीत असताना अशी चेष्टा नको या धाग्यावर..!! खरा अनुभव असेल तरच लिहा.

एक बात बताव ये बिहारी भैय्ये जैसे बंबै दिल्ली जा के वहां की सरदर्द बन जाते है वैसैच ये भूत लोग खाली कोकन मै क्यू जातें है ??? कोकन के बाकी भूत कुछ् बोल्ते क्यु नै. मै बोल्ता लेकीन मै बोलेगा तो बोलेंगे की बोलता है. जय राम की ,जय भूतनाथ की.

कोकन के बाकी भूत कुछ् बोल्ते क्यु नै>>>>भूत हो या आदमी उनका दिल बडा होता है. बम्बई पुने में जगह कम होता है इसिलये लोगों का दिल भी छोटा होता है.

इथे बरेच लोक्स माझ्या मावशीने,आत्याने, मित्राने भूत पाहिलं अशा ऐकीव गोष्टी टाकतात,पण माझ्याकडे अशा अनेक थरारक सत्यकथा आहेत ज्यामध्ये मी भुतांशी दोन हात करून त्यांना लोळवलंय. जसा वेळ मिळेल तसं इथे टाकीन. एकदा अशीच माझी गाठ तळ्यातल्या आग्या वेताळासोबत पडली त्याबद्दल लिहीन नंतर.

<<<पण माझ्याकडे अशा अनेक थरारक सत्यकथा आहेत>>>

तुमी वरचा जो तुमचा "सत्य" अनुभव सांगितलात तितक्या "सत्य" आणि "थरारक" असतील मला वाटते ठेवा त्या तुमच्याकडेच. धाग्याची मजा उडवून मजा घालवू नका.

आम्ही ऐकलेल्या आत्या, काका, मामांच्या गोष्टी निदान खऱ्या वाटतील अश्या तरी असतात. पण तुमच्या शुद्ध फेका आहेत.
आणि त्या वाचण्यात कोणाला इंटरेस्ट असेल असं वाटत नाही.
तरी तुम्हाला तुमची शक्ती चुकीच्या जागेवर खर्च करायचीय तर करा.
आणि तुम्ही एक फेक आयडी आहात हे ही आम्हाला माहीत आहे. असली चिप नावं घेण्यात तुमचा हातखंडा आहे हे मागील तुमच्या 2 आयडी वरून कळलेलं आहेच. असो तुमच्यासाठी ही माझी शेवटची पोस्ट.
बाकी कोणाला हा फालतू आयडी एन्जॉय करायचाय तर करा...

याच्या त्याच्या कडून ऐकीव थापा सांगता तुम्ही ते बरोबर आणि दुसरं कोणी काय लिहिलं कि तो फालतू होतो काय? हे असले फालतू लॉजिक तुमच्याकडेच ठेवलेत तर बरं होईल. पटलं नाय तर सोडून द्या फालतू वगैरे बोलून वैयक्तिक आरोप करायचं काम नाय, व्याजासकट परत करेन सांगून ठेवतोय.

<<<पण माझ्याकडे अशा अनेक थरारक सत्यकथा आहेत>>>
येवु द्या. नेहमी काका मामा च्या मागे दडण्यपेक्षा हे बरे.

बाकीच्या धाग्यांसारखा इथे पण नका रे भांडू.बोकलत तुम्ही पण लिहिलात आत्या मामाच्या गोष्टी सांगतात, तुम्हीपण वैयक्तिक आरोपच केलात ना.आणि अनिष्का योगी खऱ्याच गोष्टी सांगितल्या पाहिजेत असा अट्टाहास कशाला पाहिजे.मनोरंजन म्हणून वाचायच्या आणि द्यायच्या सोडून. चार हजार पेक्षा जास्त पोस्ट झाल्यात या धाग्यावर सगळ्या गोष्टीची पडताळणी करायला गेलो तर भारत भ्रमण करायला लागेल आप्ल्यालाल.

बाकी कोणाला हा फालतू आयडी एन्जॉय करायचाय तर करा...>>>>>याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा, सुरवात यांनी करायची आणि दुसरं कोण काय बोललं कि कशाला राग यायला पाहिजे यांना

कल्पतरू खरं आहे तुमचं म्हणणं. पण इकडे जितके लोक येतात त्यांना काही गूढकथा , भयकथा आवडतात. वरील आय डी जे करतायत ते मुद्दाम केल्यासारखं वाटलं. मी भुताशी लढलो , त्याला हरवलं वगैरे गोष्टींमध्ये मनोरंजन मला तरी वाटलं नाही. हे उगाच उचकवण्याचं काम आहे दुसरं काही नाही. आम्हाला भुतांच्या गोष्टी आवडतात. सो इथे जे ( माझ्यासारखे ) तश्या गोष्टी वाचायला येतात, त्यांचा भ्रमनिरास होतो....
असो च !

अनिश्का, सहमत. सोडून द्या.

बोकलत, धागा 'मनोरंजन'मधे आहे. छान विरंगुळा चाललाय येथे. चालूद्या की. उगाच भांडण नको बुवा. गुढकथा वाचतो, मित्रांच्या कंपुत अशा गप्पा ऐकतो तेव्हा चविने ऐकतोच ना? तसेच वाचा किंवा लिहा. हवे तर छान विनोदी प्रतिसाद द्या. धाग्याची गम्मत वाढवा.

बोकलत, धागा 'मनोरंजन'मधे आहे. छान विरंगुळा चाललाय येथे. चालूद्या की. उगाच भांडण नको बुवा. गुढकथा वाचतो, मित्रांच्या कंपुत अशा गप्पा ऐकतो तेव्हा चविने ऐकतोच ना? तसेच वाचा किंवा लिहा. हवे तर छान विनोदी प्रतिसाद द्या. धाग्याची गम्मत वाढवा. >> + ११११

Pages