लहान मुलांना "जात" संकल्पना कशी सांगाल?

Submitted by सिम्बा on 30 July, 2018 - 03:27

Tr निमित्त झाले मराठा मोर्चाचे.
सकाळी मुलगी शाळेसाठी तयार होत असताना vanवाल्या काकांचा मेसेज आला,
सकाळी स्कुल बसेस, vans काही ठिकाणी अडवल्या आहेत, बरोबर मुले असल्याने आंदोलकांचा सूर समजावण्याचा होता , पण संध्याकाळ पर्यंत वातावरण कसे असेल माहित नाही , त्यामुळे आज van सर्विस बंद राहील.

मग मुलीला शाळेत पाठवायचे कि नाही ? पाठवले तर परत आणायचे कसे या बद्दल आमची चर्चा चालू होती.
साहजिकच शाळा बंद का? कोण vans अडवते आहे वगैरे चौकशी मुलीने केली.
या आधी मराठा मोर्चा बद्दल तिने फोटो किंवा उडत्या बातम्या ऐकल्या होत्या ( शेजारच्या बिल्डिंग मधली अमुक तमुक मावशी मोर्च्याला एन्फिल्ड घेऊन गेली होती स्वरूपाच्या) पण त्यातले गांभीर्य तिला तेव्हा कळले नसेल
आज थेट तिच्या जगण्याशी संबंध आल्याने तिला जास्त शंका होत्या.

आरक्षण म्हणजे काय? कशासाठ? मुळात जात म्हणजे काय??हे विषय सकाळच्या घाईत सांगण्यासारखे नव्हतेच, त्यामुळे संध्याकाळी नीट सांगेन म्हणून वेळ मारून नेली.
संध्याकाळ जवळ येत आहे, आणि तिला उत्तर देणे भाग आहे.

तुम्ही तुमच्या मुलांना "'जात" हि संकल्पना कशी सांगितलीत? किंवा सांगाल.? कि तुम्हाला कधी जाणीवपूर्वक सांगावी लागली नाही.
माझ्या केस मध्ये आम्ही घरात/ मित्र परिवारात कधीही जातीचा उल्लेख केलेला नसताना तिला तिची जात, पोट जातीसकट माहित होती , हा माझ्यासाठी धक्का होता. (वय वर्षे ८-९ )
तिला धर्म संकल्पना सांगताना विशेष त्रास झाला नाही, वेगळ्या देवाची पूजा करणारे लोक, इतपत स्पष्टीकरण तिला तेव्हा (वय वर्षे ५-6) पुरेसे होते. पण एकाच देवाला पुजणारे तरीही वेगळे लोक आणि त्यात मानली जाणारी उतरंड हे तिला कसे समजवावे?

काही टिप्स असतील तर नक्की सांगा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिम्बा , काय मिळालं हा धागा काढुन ? तुम्ही स्वतः कुठे दिसेनासे झालात?>>>>>

मला खरंच हा प्रश्न पडला होता, 25 -30 प्रतिसादात धागा आटपेल असे वाटले होते.
रात्री माझे बोलणे होईपर्यंत "संकल्पना कशी सांगावी" या बद्दलचे काही मोजके प्रतिसाद सोडता "काय सांगावे" आणि " हे सांगणार तर हे पण सांग" हे सांगणारे बरेच प्रतिसाद आले.
आरक्षण आणि एकंदर जात संस्था याबद्दल माझी मते या संस्थळावर पुरेशी स्पष्ट असताना ,सांगायचा कँटेंट काय असावा याबद्दल सूचना देणे म्हणजे गम्मत होती, तिथं पासून धागा गुंतत गेला.

रात्री माझे मुलीशी बोलणे झाले, काय झाले ते मी नंतर लिहितो असे सांगितले , 2 दिवस लिहायला वेळ मिळत नव्हता, पण वाचत होतो, मुलीशी प्रत्यक्षात काय बोलणे झाले हे समजून घ्यायला कोणीच उत्सुक दिसले नाही, मग माझा सुद्धा उत्साह कमी झाला.

असो ....
पण विचारलेल्या प्रश्नाला क्लोजर मिळाले पाहिजे,
दुपारी वेळ मिळेल तसे लिहितो.

जोवर राज्यघटनेने दिलेले आरक्षण म्हणजे नक्की काय हा उलगडा होत नाही तोवर आर्थिक स्थिती आणि आरक्षण याचा संबंध लावणे सोडून द्यावे अशी सभ्य लोकांना विनंती आहे. तुम्हाला आकलनाची अभ्यासाची मर्यादा पडत आहे हे त्यावरुन दिसत आहे.

तथाकथित उच्चवर्णिय समाज नेहमी आरक्षणाची चिंता का वाहत असतो ? आरक्षणांतर्गत आरक्षण असावे, क्रिमी लेयर असावे या मागण्या का करत असतो ? मुळात आरक्षण मिळण्यात या समाजाचा कुठलाही वाटा नाही. जमीन, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि रोजगार हे सगळेच जातीच्या आधारावर नाकारलेले असताना आपण अ‍ॅफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन म्हणून या समाजाला आपले काही तरी दिले पाहीजे, नुकसानभरपाई दिली पाहीजे ही जाणीव ज्यांना होत नाही त्यांना आरक्षणात कुणाचे नुकसान झाले याची का काळजी पडते ?
>> "आपले" म्हणून आमच्यावर दोष का ढकल ता पुन्हा पुन्हा? मी आणि आताचे सगळेच तेव्हा जि वंत होते आणि सर्वांवर अन्याय करत फि रत होते, असं म्हणायचय का? तुम्हाला समाजाला पुढे ने ण्यात इन्ट रेस्ट आहे का ज्याने केले त्याच्या वंशजांना शिक्षाच करण्यात? दुसरे असेल तर मी दगडावर डोके फोडते य असेच म्हणावे लागेल.

पिढीजात शिक्षणाचा फायदा काहींना मिळाला आणि काहींना मिळाला नाही/मिळत नाही, हे खरेच आहे. ते ज्यांना मिळत नाही त्यांना आरक्षण मिळालच पाहिजे हे इथे आणि इतरही ठिकाणी अनेकदा लिहिलय. काही ठिकाणी वाईटपणा घेऊन ही सांगितलय. त्याचा फायदा मिळून त्या सामाजिक परिस्थितीतून बाहेर पडलेली कुटुंबच्या कुटुंब बघितली आहेत. त्यामुळे त्याबद्दल वाद नाहीचे.

अहो भरत, त्या कुठल्याशा बाईंनी ती श्राद्ध स्वैपाकाला आलेल्या बाईची जात बघितली तेव्हा तिच्यावरही टीका केलेलीच. तो तर तद्दन मुर्खपणा वाटलेला. स्वैपाक, चव, स्वच्छ्ता हे मुद्दे असू शकतात. कामात क्वालिटी हा मुद्दा असू शकतो, जात हा मुद्दा कसा असू शकतो ह्यावरून हिरीरीने भांडले देखील आहे.
त्यामुळे एकाच जातीवरून वाद घालतेय ह्या म्हणण्याला काहीच अर्थ नाहिये.
जिथे जे जसे दिसते, त्यावरून लिहिले जाते.

एक साधा मुद्दा आहे, ब्लॅक आणि व्हाईट ह्यांच्या वादात (माझे दोन्ही सहकारी आहेत) - जर आपल्याला मत असू शकतं, जर आपल्याला ज्यूंना झालेल्या त्रासाने त्रास हो ऊ शकतो, तर आपल्या च समाजात ल्या आपल्या शेजार पाजरच्या माणसांना अस्पृष्य म्हणून वागवलेलें , कुठल्याही संवेदनाशील माणसाला कसे त्रासदायक वा टणार नाही? तो विषय निघतो, तेव्हा तशीच चर्चा होते. How can one human treat other human that way!
पण त्याच बरोबर, मी (आजची पिढी) जी गोष्ट केलीच नाही त्याकरता, सतत दुसर्‍या टोकाचा दुस्वास सहन करत रहावा, त्याविषयी बोलू नये, असे आपले मत आहे का?
जज मी बाय माय ओन डीडस.
हा सोशियल नेटवर्किंग चा परिणाम. लांबून वाचले आणि पंक्तीला जेवलो नसलो की माणूस माहित नसतो. गैरसमज (दोन्ही बाजूनी) होत रहातात.
आजच एक शेर वाचला:
दुरिया जब बढी, गलतफहमिया भी बढी गई
फिर तुमने वो भी सुना जो मैने कहाही नही.
(and vice versa)

ज्यांचा आत्मा, पुनर्जन्म ह्या गोष्टींवर वि श्वास आहे, त्या व्यक्तिकरता - आज मी ब्राह्मण आहे, पण गतजन्मी मी दुसरी कुणी होते - आणि पुढच्या जन्मी इतर कुणीतरी असेन, बाई/पुरुष - जात, धर्म हे माझ्या टेंपररी एक्झ्टिस्टन्स मधे माझ्या आ त्म्याच्या विकासासाठी मी धारण केलेले असते. हे जसे माझे, तसेच इतर माणसांचेही - हे कळलेले असते (किंवा ज्यांचा विश्वास नाही, त्यांच्या मते, " वाटत असते").
आणि माझा ह्या सर्वावर वि श्वास आहे, त्यामुळे तुम्ही काहीही अर्थ घ्या माझ्या लि हिण्याचा. माझ्या मनात जे आहे, ते मला आणि माझ्या बरोबर वावरलेल्यांना ठावूक!
श्री स्वामी समर्थ!

{पण त्याच बरोबर, मी (आजची पिढी) जी गोष्ट केलीच नाही त्याकरता, सतत दुसर्‍या टोकाचा दुस्वास सहन करत रहावा, त्याविषयी बोलू नये, असे आपले मत आहे का?
जज मी बाय माय ओन डीडस.}
याबद्दल मी आधी दोनदा लिहिल़य.
शेवटचं लिहितो.
१. तुम्ही करत नसाल तर ते प्रतिसाद अंगाला लावून घ्यायचं कारण काय?
२ .तुम्ही. समस्त ब्राह्मणांच्या वतीने बोलताय का? कोणीही ब्राह्मण अन्य जातींचा द्वेष करत नाही,असा तुमचा दावा आहे का? मी आधीच्या प्रतिसादांत उदाहरणे दिलीत. त्यातल्या एकावर तुम्ही भूमिका माऔडलीत. स्वागत आहे.
पण तसे लोक असतात, हे तुम्हांला आठवलं हे पुरेसं आहे.
{मला कोणत्याही जातीला उद्देशून प्रश्न विचारायचा नव्हता. पण तुम्हीच जात घेऊन उभ्या राहिल्यात.त्यामुळे नाईलाज आहे.
इथे चर्चा आरक्षणाच्या बाजूने आणि विरोधात अशा प्रकारची चालली आहे , असा माझा समज आहे.}

मला कोणत्याही जातीला उद्देशून प्रश्न विचारायचा नव्हता. पण तुम्हीच जात घेऊन उभ्या राहिल्यात.त्यामुळे नाईलाज आहे.
इथे चर्चा आरक्षणाच्या बाजूने आणि विरोधात अशा प्रकारची चालली आहे , असा माझा समज आहे. >> ओ के भरत.
माझा आत्तापर्यंतचा कुठलाही प्रतिसाद तुम्हाला उद्देशून नव्हता. आरारांनी लिहिलेल्या चा रेफरन्स देऊन सुरुवात झालेली. त्यात त सा रेफर न्स आल्याने मांडण्यात आले.

तुम्ही करत नसाल तर ते प्रतिसाद अंगाला लावून घ्यायचं कारण काय? >> हा मुद्दा अतिशय बरोबर आहे. पण असेही लोक असतात आणि त्यांच्यावर आपण अन्याय करु नये हे डोक्यात ठेवा हे ही लक्षात असुद्या!

I have appreciated you for keeping dialogue. Kindly try to understand >> थँक्यू डबा बाटली.

May all of us learn to love, forgive, find inner peace and see the true light!
श्री स्वामी समर्थ!

नानबा, तुम्ही आमच्यासारखे लोक दरी कमी करण्यासाठी काय करू शकतो असं विचारलंत म्हणून -

(१) ह्या धाग्यावर 'आरक्षणाची भीक', 'आरक्षणाच्या कुबड्या' ह्यांसारखे वाक्प्रचार वाचून तुमच्या मनाला काही यातना होतात का? असे शब्दप्रयोग करणे तुम्हाला बरोबर वाटते का? तुम्ही असे शब्दप्रयोग कधी केले आहेत का? हे तुम्हाला चूक वाटत असेल, तर तुम्ही असे शब्दप्रयोग करणार्‍यांना कधी उघड काही बोलला आहात का? असे केल्याने सामाजिक दरी कमी होईल असे तुम्हाला वाटते का?

(२) हजारो वर्षांपासून 'चालते बोलते स्मशान' अशी संभावना समाजव्यवस्थेकडून एका मोठ्या वर्गाची फक्त जन्माच्या आधारावर होणे, ह्यात खरंच काहीतरी सामाजिक अन्याय झाला आहे, आणि जर आपल्याला जळीत प्रकरण अजूनही इतके त्रासदायक वाटत असेल, तर ह्या वर्गाच्या प्रतिनिधींना वरील प्रकाराचा त्रास कितीतरी जास्त झाला असेल, असे तुम्हाला वाटते का? अश्या लोकांनी तो उद्वेग मनातून बाहेर काढला, तर तुम्हाला त्रास होतो का? (आरारांच्या पहिल्या प्रतिसादात, ज्याला तुम्ही 'खालच्या पातळीची भाषा' म्हणालात, मला ह्या व्यवस्थेवरील राग दिसला, कुठल्याही व्यक्तीवर दिसला नाही.) असा त्रास तुम्हाला झाला असेल, तर का झाला, ह्यावर तुम्ही विचार कराल का? (भरत म्हणाले तसे तुम्ही जर डिसक्रिमिनेट करत नसाल, तर तुम्ही अंगाला लावून घ्यायचे कारण काय?) कदाचित ही दरी पर्सिव्ह करण्यात ह्या इंटरप्रीटेशनचा सहभाग असेल का?

(३) "ब्राह्मणांनी ज्ञान स्वतःकडे ठेवले म्हणणार्‍यांनी, वेद, शास्त्रे पुराणे हे खरेच व्यवहारोपयोगी ज्ञान आहे का? ह्याचा विचार करावा. " हे विधान किंवा "चातुर्वण्य ही सिस्टीम आता कॉर्पोरेट्स ने रिप्लेस झाली" हे विधान, अशी विधाने मला अज्ञानमूलक वाटतात. वरदा किंवा पीनी ह्यांच्या प्रतिसादांच्या पार्श्वभूमीवर ("पण तरीही त्यांना केवळ जन्माने श्रेष्ठत्व होते. त्यांचा कुणी पदोपदी अपमान करत नसे. विद्यार्जन करून वरती जाणे हे परंपरागत मुरलेले असते. ते इतर जातींमध्ये गटांमध्ये नव्हते... , "अजूनही जातपात हा भेद किती मानला जातो अगदी शाळेतसुद्धा मुले वेगवेगळी जेवतात. आणि हे चूक आहे असं कोणाला जाणवत नाही. ती त्यांची लाईफस्टाईल आहे, रोजचं जगणं आहे.
पुण्यामुंबईच्या मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटूंबात वाढलेल्या आम्हा दोघींना आपण किती प्रीवीलेज्ड आणि बबलमध्ये आयुष्य जगतो याची पहिल्यांदा जाणीव झाली." ) ह्या वाक्यांचा फेरविचार करता येईल का? अशी विधाने करण्याने सामाजिक दरी वाढेल की कमी होईल?

(४) "प्रत्यक्षात असे कुणी भेटत नाही तरी ऑनलाईन इतका विखार दिसतो! हा कुठून ये तो?" असे तुम्ही म्हणता. तुम्हाला प्रत्यक्षात असे कोणी भेटत नाही, म्हणून असे लोक कोणीच नसतील का? हा तुमच्या जवळच्या सर्कलचा बायस असेल का? तुम्हाला भेटणारी सर्वच माणसे खुल्या दिलाने तुमचच्याशी अश्या वाटण्याबद्दल बोलतील का? तुम्हाला तसे दिसले नसेल, तर वरदा म्हणाल्या तसं बेबी कांबळे किंवा दया पवार किंवा आंबेडकर अश्या लोकांचे अनुभव आहेत. अश्या अनुभवांना आपण गैरलागू कसे करू शकतो? हे अनुभव २-३ पिढ्यांमध्ये पूर्णतः थांबले आहेत, असे तुम्हाला वाटते का? विखार वाटतो म्हणून लगेच आपणही भडकून न जाता ह्या अनुभवांची धार समजून घेतली तर आपण आपल्या परीने सामाजिक दरी कमी करण्याचा प्रयत्न केला, असे तुम्हाला वाटेल का?

हे प्रश्न नानबांसाठी वरकरणी असले, तरी हे प्रश्न एकंदरीतच ह्या धाग्यावर असावेत, असं मला वाटलं. त्यामुळे नानबांशी वैयक्तिक काही नाही. ह्या प्रश्नांवर मीही कधीकाळी विचार केला आहे. मीही कधीकाळी रूढार्थाने विद्यार्थी होतो, पण नशिबाने म्हणा किंवा फुलेबिले वाचल्यामुळे म्हणा, मला असं कधी वाटलं नाही, की आरक्षण वगैरे काही नसावं. उलट शाळेत अश्या वर्गातल्या मुलांशी जवळून संबंध आल्याने असंच वाटत राहिलं, की काहीतरी न्याय असायला हवा. २००७मध्ये आरक्षण जास्त व्यापक करण्याचा निर्णय झाला, तीच माझी कॉलेज अ‍ॅडमिशनची वेळ होती, तेव्हाही कधी असं वाटलं नाही. बरोबरचे मित्र ऑर्कुटवर आरक्षणविरोधी कम्युनिटीजमध्ये होते, तेव्हाही मला वाटायचं, की हा काही माझ्या तोंडचा घास वगैरे काढून घेतलेला नाही, त्यांना त्यांच्या हक्काचा घास मिळतो आहे तर मी स्वतःला का त्रास करून घेऊ? त्यानंतर आयआयटीमध्ये वाढलेल्या सीट्सची संख्या पाहून कळलं, की कोणाच्याच सीट्स कुठेही गेलेल्या नाहीत. माझ्या स्वतःच्या कॉलेजने गेल्या दशकभरात जवळपास तिप्पट वाढलेला इन्टेक पाहिला आहे. त्यामुळे "आरक्षणामुळे माझी सीट गेली" ह्या म्हणण्याला फारसा अर्थ वाटत नाही. जी गेली, ती तुझी सीट कशावरून? तुझं काय नाव होतं का तिच्यावर? असंच विचारावंसं वाटतं.

माझं स्वतःचं म्हणाल, तर माझंही कुटुंब कूळकायदा किंवा जळीत वगैरे प्रकारांमधून वर आलं आहे. तरी माझे विचार वरदासारखेच आहेत. पहिला प्रकार हा सामाजिक न्यायाच्या तत्त्वातून आला असेल, तर त्याबद्दल अजून काही म्हणावंसं मला वाटत नाही. दुसरा प्रकार हा खूपच घृणास्पद होता ह्याबद्दल काही वादच नाही, पण त्याचा आणि हजारो वर्षे समाजव्यवस्थेकडून सर्वमान्य (अगदी शोषितमान्यसुद्धा) पद्धतीने झालेल्या शोषणाचा 'फॉल्स इक्विव्हॅलन्स' मी करणार नाही.

शेवटी एम्पथी महत्त्वाची वाटते. पीनींच्या प्रतिसादातून ती छान दिसते. ती आपण दाखवली, तर आपल्याला समोरच्याकडून ती मिळावी अशी अपेक्षा करणे रास्त वाटते.

एका शेजारणीच्या मुलीच्या वर्गात एका मुलीने शिवाजी महाराजांचे लॉकेट घातलेले. तर दुसरा मुलगा तिच्या अंगावर धावून आला आणि म्हणाला तू ब्राह्मण आहेस, तू शिवाजी महाराजांचे लॉकेट घालू शकत नाहीस. असेच अजून दोन मुलांचे जाती वरून ही भांडण झालेले ऐकले.
>> आई ग. लहान मुलं इतकं विखारी बोलू शकतात हे माहीत नव्हतं. हे ऐकल्यावर खरच त्रास झाला असेल.

नानाबा, आधीच म्हणाल्याप्रमाणे मला काही पोलिटिकली करेक्ट लिहिता येत नाही. पण तुम्हाला किंवा इतर कोणालाही पर्सनली काही म्हणायचं नव्हतं. मी माझे विचार का बदलले ते लिहीत होते.
प्रत्येकाचे अनुभव वेगळे त्यातून घडत जाणारा माणूस वेगळा. आणि ज्याचा त्रास त्यालाच कळतो. तुम्हाला आलेले अनुभव, चीड, उद्वेग तुम्हाला त्रासदायक असणारच. तो खरा नाही किंवा तेवढा महत्वाचा नाही असे कसे म्हणणार.
तरीही तुमच्या प्रतिसादातल्या एका गोष्टीबद्दल लिहून थांबते.
1947-1980 पर्यंतचा काळ वाईटच होता. त्यावेळी घडलेल्या अनेक वाईट सामाजिक घटना, गरिबी, दुष्काळ, युद्ध, लोकांचा जाती, धर्म, कर्मकांडावरचा पगडा, रोगरोई, चाकोरीबद्ध जीवन यामुळे काही सधन लोकं सोडले तर खूप लोकांच्या वाईट आठवणी असतील. इथल्या प्रत्येकाच्या आई वडील आज्जी आजोबांनी अशा कुठल्या कुठल्या कारणाने होरपळलेल्या गेलेल्या अनेक घटना सांगितल्या असतील. माझ्या नातेवाईकांमध्ये कूळ कायद्याने सर्व जमीन गेलेल्या विधवा बाई 4 लग्न न झालेल्या मुलींना घेऊन रस्त्यावर आल्या होत्या.
स्वत:च्या कष्टाने नुकतेच बांधलेले घर जळीतामध्ये गेल्याची घटना माहीत आहे.
माझी आजी तिच्या मुलांना जेवण्यापूर्वी लोटाभरून पाणी प्यायला लावत असे. म्हणजे मुलं कमी जेवतील आणि अन्न महिनाभर पुरेल. तरीही तिची सगळी मुलं शाळेत, तालुक्यात, राज्यात पहिली येऊन स्कॉलरशिपवर शिकली.

तो वाईट काळ मागे पडला. मध्यमवर्गीय आले. बायका नोकरी करायला लागल्या. सामाजिक, आर्थिक स्थैर्यता यायला लागली. पण यानंतरही जो जातीचा उच्च नीच भेद जायला हवा होता तो गेला नाही. आणि मी फक्त त्याबद्दल म्हणत होते.
असो.
तुम्हाला आलेल्या डिस्क्रिमीनेशनचा अनुभव मला (whatspp forwards, facebook posts सोडली तर सुदैवाने अजूनतरी) आला नाही. पण ते खरं नाही असं मी म्हणणार नाही.

फार विषयांतर झाले. इथेच थांबते.
सिम्बा, तुम्ही मुलीला काय सांगितले आणि तिची प्रतिक्रिया काय होती ते लिहा.

पीनी, तुमचे प्रतिसाद चांगले वाटतायत वाचायला, हे खास नमूद करतो. Happy

तुम्हाला आलेल्या डिस्क्रिमीनेशनचा अनुभव मला (whatspp forwards, facebook posts सोडली तर सुदैवाने अजूनतरी) आला नाही. पण ते खरं नाही असं मी म्हणणार नाही. >> हेही खरं आहेच. +१

मी पुन्हा लिहिणार नव्हते, भाचानी नाव घेऊन लिहिल्याने लिहितेय.
भाचा माझे प्रतिसाद नीट वाचलेत, तर वाईट घडलेल्या, घडणार्‍या सगळ्या गोष्टींविरुद्ध मी स्वच्छ लिहिले आहे की! अस्पृश्यता भयानक होती, हे ही लिहिलय. आरक्षण हव च आहे हे ही लिहिलय (इतरही पुर्वीच्या धाग्यांवरही, इथेही. आणि त्याला कुबड्या वगैरे नाव मी तरी दिलेले नाही.)
भाचा, खूप जवळचे, घरगुती संबंध आहेत वेगवेगळ्या लोकांशी. त्यांना तरी कधी माझ्या वागण्यात जात आलेली दिसली नसावी. Happy

पीनी प्रतिसाद आवडला . डिस्क्रिमिनेशनचा अनुभवला ही ऑनलाईनच दिसतो हे मी वर अनेकदा लिहिले आहे. शाळेतला अनुभव आणि काही वैयक्तिक रिवर्स डिस्क्रिमिनेशनचे इतरांकडून ऐकलेले सोडले तर. पण मी कॉर्पोरेट जगातच काम केले असल्याने (मल्टीकल्चर) मला बाकी जगाचा अनुभव नाही असे एखाद्याला वाटले तर तसेही असू शकेल.
शेती करताना मात्र अनेकांनी तुला जातीमुळे त्रास होईल हे सांगितले. पण अजूनतरी तसा अनुभव नाही, त्यामुळे अजूनतरी तसे नसावे असे वाटते.

भाचा आणि इतर मला उद्देशून लिहिलेल्यांना, शाळेतला हा अनुभव तुम्हाला भयानक वाटला का? हे ह्या लेवलला का आणि कसे पोहोचले असावे? हे कसे सुधारता येईल?
मला तरी माझ्या शाळेत असे काही झाल्याचे आठवत नाही!
कॉलेज पर्यंत तर हॉस्टेलाईटस आणि नॉनहॉस्टेलाईटस हाच फरक दिसायचा.

आणि आता खरेच पुरे करते. वैयक्तिक चर्चा करायची असेल तर विपू करा.

एखादा शब्द न थकता असं ख्य वे ळा पुन्हा पुन्हा म्हटल्यावर क सा तो निरर्थक वाटू लागतो , तसे मायबोलीवर हल्ली कुठल्याही धाग्यावर एखादा प्रतिसाद दिला तरी होते (उप प्रतिसाद देऊन देऊन) Happy

आय एफ करतात, दिक्षित डायट करतात तसे माबो डायट कसे करावे ह्यावर कुणीतरी धागा काढा आता.
काहीही वा टलं तरी एकही प्रतिसाद द्याय चा नाही. काम क मी असल, वेळ असला तरी नाही
आवडीचा पदार्थ... आपलं हे विषय असला तरी नाही.
नाही म्हणजे नाही..
जमवायचा प्रयत्न करायला पाहिजे!

अहो नानबा,
त्रागा नका करू. तुम्ही चर्चेची तयारी दर्शवलीत यातच सारं आलं. स्त्रियांच्या प्रश्नावर नाही का पुरूष सहानुभूती दर्शवायला किंवा तळमळीने त्यांच्या बाजूने काहीतरी प्रतिसाद देऊ बघतो. पण मुळात फंडे चुकीचे असतील तर बायका सोडतात का त्याला ? बोचकारून काढतात. तसंच आहे हे. दलितांच्या प्रश्नावर निव्वळ सहानुभूती किंवा कळकळ असून चालत नाही. अज्ञान घातकच. मात्र स्त्रीपुरूष वादात अरे काय त्या लिंगाधारित घाणीच्या चिखलात लोळता असे कुणी म्हणत नाही एव्हढाच काय तो फरक.

आपला देश आहे. आपली राज्यघटना आहे. त्याचं आकलन करायला काय हरकत आहे ? अर्थात देशाशी नाते तुटलेले असल्यास त्याची आवश्यकता नाही. पण मग इथल्या प्रश्नांवर बोलताना काळजी घ्यायला काय हरकत आहे ? विरोधात बोलू नका असे कुणी म्हणत नाही. चुकीच्या बाबी मांडू नयेत.

नानबा,

1 ते फक्त वाईट लोकांबद्दल बोलत आहेत

2 दुसऱ्या बाजूलाही वाईट लोक असू शकतात हे त्यांना मान्य करायचे नाही

3 पहिल्या (ह्या बाजूला पहिली बाजू म्हणताच कशी असा प्रश्न विचारणाऱयांसाठी - प्रतिसाद ज्या बाजूला उद्देशून असतो त्यांना आपोआपच पहिले मानले जाते, त्यात जातीयवाद नाही) बाजूला चांगले लोक असू शकतात हे मान्य करायचे नाहीये

4 त्यांना चर्चा फक्त अन्यायग्रस्त लोकांवर करायची आहे व फक्त चर्चाच करायची आहे , बाकीचे अन्यायग्रस्त नसलेले काय दिवे लावतात व अन्यायग्रस्त लोकांसाठी चर्चेशिवाय काय करता येईल ह्यावर त्यांना बोलायचे नाही. त्या अन्यायग्रस्त लोकांची काळजी फक्त विरोधी सरकारनेच करावी हेही त्यांना म्हणायचे आहे

5 मायबोली स्थळाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरून वरती स्थळावरच आणखी एक गंभीर आरोप झालेला आहे. ह्याला हिंदीत ' जिस थाली मे खाना.....' अशी म्हण उपलब्ध आहे

6 पुण्यातील विविध पेठांची नावे घेऊन त्या बुरख्याखाली थेट धमक्याही आलेल्या आहेत

तेव्हा आता शांत व्हा, इथे जो जे लिहितो त्याचे परिणाम त्याला प्रत्यक्ष आयुष्यात भोगायला लागणार नाहीत अशा प्रकारचे वातावरण आता नाही

हे म्हणणे म्हणजे शेपुटघालुपणा नसून एक सुज्ञ निर्णय आहे

पीनी ह्यांचे संयत प्रतिसाद आवडत आहेत आणि पटत आहेत.

पिण्याच्या पाण्यावरून एक कधीच विस्मृतीत न गेलेली गोष्ट सांगते. तो अनुभव वाचताना मीच लिहिलंय काय वाटून गेलं इतका बर्‍यापैकी सिमिलर आहे. मे महिन्यात चिपळूणला आजोळी गेल्यावर मामेभावंडांबरोबर विन्ध्यवासिनीला पायी पायी जाताना शेतांच्या बांधांवरून जावे लागत असे (३७-३८ वर्षांपुर्वीची गोष्ट आहे). एकदा परतताना उन्हं लागून तहानेने जीव कासाविस झाल्यावर लांबवर एक कुडाचं छोटं घर दिसल्यावर मी तिथे पाणी मिळेल असं म्हणून मळलेली पायवाट सोडून खाली उतरले. सोबत भावंडंही आली. ती खरंतर माहित नसलेल्या ठिकाणी यायला तयार नव्हती. मी उतरल्यावर मागोमाग आली. त्या घराच्या दाराशी गेल्यावर कुणी आहे का ह्याचा अंदाज घेतला हाका मारून. तेव्हा अगदी वरच्या अनुभवात लिहिलंय त्याप्रमाणेच एक खूप म्हातार्‍या पुरेसं वस्त्रं नसलेल्या आजी डोकावल्या. त्या घराला छोटी मातीची ओसरी होती. दारातून पाहिल्यावर आत फारसं सामान दिसत नव्हतंच. त्या बाहेर आल्यावर मी पाणी हवंय म्हटल्यावर त्यांनी खरंच पिणार का विचारलं. मी हो म्हटल्यावर हिंडालियमच्या पेल्यात पाणी आणून ओसरीवर ठेवलं. मी भांड उचलून घटाघटा पिवून भांड त्यांच्या हातात द्यायला पुढे केलं तर बोट दाखवून खाली ठेवायला सांगितलं. मला तेव्हा फारशी समज नसल्याने मी आज्ञाधारकपणे खाली ठेवलं. फक्त जाणवलं की हातात देत होते तर घेतलं का नाही! पण तेव्हा कोकणात विटाळशींना शिवत नसत ते आठवल्यामुळे जास्त विचार केला नाही. म्हातारी विटाळशी नसते हे ही कळत नव्हतं. त्या आजींनी माझा तहानलेला जीव माठातलं पाणी देवून शांत केला त्यामुळे काहितरी वाटून मी क्षणात ओसरीवर उडी मारली आणि पाया पडून त्याच वेगाने खाली उतरून भावंडांबरोबर निघाले परत काटे व कडक झालेल्या ढेकळांना चुकवत चुकवत पुन्हा मळलेल्या पायवाटेच्या दिशेने. बराच वेळ चालत चालत आम्ही घरी आलो. घरी आल्यावर सगळं काही घरी सांगायची सवय असल्याने तहान लागल्याचे व कुठल्यातरी घरात जावून पाणी मागितल्याचे आई, आजी व मामीला सांगितले. आई हं हं करत होती. मामी काहीच बोलली नाही. आजीने विचारले कुठल्याही घरात काय जावून पाणी मागितलस? आता ते तिने आडवाटेच्या अनोळखी घरांत पोरं पोरं जावून पोहोचली म्हणून काळजीने विचारले की कसे ते तिलाच माहीत. दुसरा विचार माझ्या मनाला शिवलाच नसल्याने तेव्हा हा प्रश्न माझ्या मनात तेव्हा आलाच नाही (गाव आणि मुंबईतला फरक). मामेभावाने तिला सांगितले की हिने त्या आजीला नमस्कारही केला. त्यावर कपाळाला हात लावून तिच्या कामाला लागली. मी तिच्या मागे मागे फिरत तिला सांगत राहिल्याचं आठवतंय की अगं जवळ कुठेच पाणी दिसत नव्हतं मग लांबवर ते घर दिसलं म्हणून जावून मागितलं. तहानलेल्यासाठी पाणी पाजणारा देवासारखा असतो ना? म्हणून मी पाया पडले. पण एक नक्की की आई, मामी किंवा आजीनेही जातीचा उल्लेख थेट किंवा आडवळणानेही केला नव्हता. पण आता वाटतंय की त्यांच्यापैकी कुणी तसं केलं असतं तर नक्की मी खूप दुखावले असते कारण देवाने निर्मिलेलं पाणी एका अनोळखी बाईने तिला मी अनोळखी असताना माझ्या उन्हाने चक्कर येवून पडायच्या बेतातल्या अवस्थेत शुद्ध भावनेने देवून मला ताजंतवानं केलं तर ते पाणी किंवा ती बाई निषिद्ध कसं? जातीचा संबंधच काय?

असो. ह्या धाग्याच्या विषयाशी संबंधित ही आठवण नसेलही. पण एका प्रतिसादात पाण्याचं वाचून पुन्हा त्या आजीबद्दल कृतज्ञता दाटून आली आणि लिहिलं.

अश्विनी के,

तुमच्याच सारखे अनंत अनुभव घेतले आहेत

1985 ला गिर्यारोहण सुरू केल्यापासून ते संपूर्ण नोकरीच्या दरम्यान व आजकाल तर जास्तच घेतो आहे हे अनुभव

1985 च्या आधीही घरी काम करणाऱ्या आजींच्या घरी जाऊन त्यांच्या हातचे खाऊन तृप्तही झालो आहे

आजकाल तर फक्त तितकेच करतो हे अलाहिदा

पण म्हणून काय?

जातीयवाद सर्व जातींनी पाळलाही आहे आणि प्रत्येक जातीतील काहींनी केव्हाच त्यागलाही आहे

आरक्षण ही निव्वळ जखमेवरची फुंकर आहे

येथे विषय आहे तो वाद होण्यामागील कारणांचा (अर्थात, धाग्याचा विषय वेगळाच आहे व तो केव्हाच मागे पडला आहे हे बघितल्यावरच हे लिहितो आहे)

येथे विषय आहे , किंबहुना आहेत, ते खालील:

1. आम्हीच (म्हणजे कोणत्याही जातीचे, ह्यात सगळे आले) कसे बरोबर हे ठसवणे

2. दुसरे कसे चूक हे ठसवणे

3. शाब्दिक कुरघोड्या करणे

वगैरे!

सगळ्यांना सगळे माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे की बरे वाईट लोक समाजात असतातच, वाईट लोक काहीवेळा जातीचा उपयोग चुकीच्या कारणासाठी करतात, पूर्वी कोणी कोणाला छळले आहे, आज शहरी भागात जातीयवाद जोपासणे कसे अक्षरशः अशक्य आहे, तरीही काहीजण कसा जोपासतात, ग्रामीण भागातून जातीयवादाची हकालपट्टी करण्यात कोणता राजकीय तोटा आहे, आरक्षण मिळूनही काही घटक कधीच वर का आले नाहीत, आजही घोड्यावर संसार लादून कुत्री, बकरी आणि स्वतःची बालके घेऊन काहीजण वणवण का करत असतात, शहरालगतच्या वस्त्यांमध्ये अजूनही केवळ शाळेत भात खायला मिळतो म्हणून उघड्या नागड्या मुलांना शाळेत पाठवणारे तसे का वागतात, कातकरी लोकांना झोपडीत हातभट्टी लावल्याशिवाय आजूबाजूचे का राहू देत नाहीत, जे श्रीमंत आहेत त्यांना गरीब बनवून आपण श्रीमंत होणे ह्याला का अर्थ नाही, तथाकथित उच्चवर्णीय (!) आजही माजुरडे का आहेत, आरक्षणामुळे जातीयवाद संपणार नाही हे कसे सत्य आहे, लहान मुलांना काय सांगावे ह्याबाबत सामूहिक दृष्टिकोन कसा बनू शकत नाही

हे सगळे सगळ्यांना माहीत असते

आपण संतुलित आहोत किंवा आपण का संतुलित नाही आहोत इतकेच सांगण्यासाठी एखादे व्यासपीठ हवे असते, इतकेच

अश्विनी, पिनी आणी वरदा छान लिहीलत. नानबा तुमची कळकळ मला पूर्ण समजते आहे. मी ही यातुनच गेली आहे. हे जळित प्रकरण म्हणजे काय? ( म. गांधी यांच्या हत्ये नंतर ब्राह्मणांची घरे जाळली गेली ते हेच का? ) आणी जर असेल तर यातुन माझी आजी, आई, मामा वगैरे वाचलेत.

नानबा, तुम्हाला पडणारे प्रश्न मला पण पडतात की हजारो किंवा शतकापूर्वी त्या काळातल्या ब्राह्मणांनी जी पापे केली होती ती आजच्या त्यांच्या पिढ्यांना का म्हणून भोगावी लागत आहेत. आज जग बदलले आहे, मग माणसे का नाही बदलत? परवा पिंपरी चिंचवड मध्ये मोर्चा निघाला, त्यात या शेंडीवाल्यांना जाळुन टाका ही भाषा केली गेली ती का? कोण भडकवतय या सगळ्यांना? सोशल मिडीयाच्या माध्यमातुन एकमेकांविषयी इतका राग का?

वास्तवीक मला मराठे आवडतात, कारण ते लढवय्ये आहेत, शूर आहेत, कष्टकरी आहेत , त्यांच्यात असामान्य एकी आहे. पण मग शिवाजी महाराज त्यांच्या एकट्यांचेच कसे काय? महाराज मराठा होते म्हणून? काहीच कळेनासे झालेय.

लिहीण्यासारखे खूप आहे, पण मनच बधीर झालेय.

जाता जाता. डबा बाटली, तुम्ही खूप छान माहिती देता. काय होतयं की आपण आजवर एकांगी विचार करत असतो, पण जोपर्यंत दुसरा येऊन ती जळमटे झटकुन देत नाही तोपर्यंत त्याच भ्रमात माणुस रहातो. तर एकमेकांवर न रागवता चर्चा चालू ठेऊया, कारण मायबोली हे जागतीक व्यासपीठ आहे, जिथे देशापलीकडले अनूभव घेतलेली माणसे आहेत, जे आपले विचार समजेल अशा पद्धतीने मांडतायत.

इकडे झालेल्या चर्चेच्या तुलनेत आमची चर्चा फरच सपक झाली.
एक तर संध्याकाळी परत येईपर्यंत तिची "ज्ञानलालसा" कमी झाली होती, वर शाळा नेहमीसारखीच झाल्याने बाहेर काही अबनॉर्मल आहे याचा विसर पडलेला.

मग मीच विषय काढला, आज शाळेत या विषयावर काही बोलणे झाले का?टीचर काही बोलल्या का हे विचारले, तसे काही बोलणे झाले नव्हते.
[02/08, 17:36] Simba: पुढे आमचे जे बोलणे झाले त्याचा फक्त सांगाडा देतोय, प्रश्नोत्तर स्वरूपात फार मोठे होईल ते.

काही हजार वर्षांपूर्वी उद्योग आधारित समूहाचे भाग, मग आपल्या धंद्याची गुपिते आपल्याजवळच ठेवण्यासाठी अधिक अधिक क्लोज होत गेलेली कम्युनिट त्याला जात म्हणतात, ब्राह्मण ,सुतार लोहार चांभार ही उदाहरणे, प्रत्येक जातीचे खूप पूर्वी विशिष्ट राहणीमान असायचे (हा जात म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर)
पुढे पुढे देव धर्माच्या जवळ असणाऱ्यांनी स्वतः ला श्रेष्ठ समजणे, आणि त्यांनी दुसऱ्याचे सामाजिक आयुष्य कॉन्ट्रोल करणे (अस्पृश्यता, शिवाशिव etc)
या सगळ्याचा शेकडो वर्षे परिणाम होऊन काही लोकांना शिक्षण मिळाले नाही त्यामुळे ते मागे राहिले,

ही वेळ येईपर्यंत तिचा पेशन्स पूर्णच संपला होता, सो आमचे शिकशान थांबले.

I know, यातल्या सगळ्या गोष्टी बरोबर नाहीत ,काही ओव्हर सिम्प्लिफाय केल्या आहेत तर काहीतला डंख कमी केला आहे,

पण ठीक , या विषयाला तोंड तरी फोडले आहे , पुढच्या वेळी पुढचे सांगीन, इकडचे प्रतिसाद वाचून कसे सांगता येईल याचा आराखडा मनात तयार आहे, i am prepared now Happy

आमचे बोलणे झाले तोपर्यंत टवणे सरांचा प्रतिसाद आला होता, आमचे डिस्कशन ची गाडी बऱ्यापैकी त्या रुळावरून गेली. थँक्स टवणे सर
विशेष आवडलेले प्रतिसाद ,
टवणे सर ,मैत्रेयी, वरदा, रश्मी, पिनी, आरारांचा कुस्ती चा प्रतिसाद, इकडे आवर्जून लिहिल्या बद्दल धन्यवाद, चुकून एखादे नाव राहिले असेल तर प्लिज समजून घ्या, मोबाईल वरून मागची पाने पाहून टाईप करणे अशक्य गोष्ट आहे.

पिनी, अश्विनी यांच्या लिहिन्यावरून एक गोष्ट सांगू शकतो, की आजही (त्यांचे अनुभव काही वर्षा पूर्वीचे आहेत), असे डिस्क्रिमीनेशन होते हे डिस्क्रीमिनेट करणाऱ्या जातीतील लोकांनी पुढे होऊन लोकांना सांगायची गरज आहे , नाहीतर 'आज काल असे काही होत नाही' या समाजात लोक आपल्या बबल मध्ये सुखात राहतील,

नानाबा यांच्या प्रतिसादाला दीर्घ उत्तर लिहावे असे खूप वाटते आहे. पण स्वतः चा धागा स्वतःच विषयापासून दूर नेऊ नये म्हणून आवरतोय.

परत एकदा सर्वांना धन्यवाद.

सिंबा, डबा बाटली धन्यवाद. सिंबा, माझ्या मैत्रिणीने आर्ट्स ला भूगोल विषय घेतला असतांना, तिला दुसरा विषय पण अध्ययनात होता त्याचे नाव History Of Civilization. कदाचीत वरदा यांना तो ऐकुन माहीत असेल. तर त्यात त्यांनी ( संशोधकांनी ) मानव जातीचे ३ वर्ण सांगीतले होते. विशेष म्हणजे त्या इतिहासाचे संशोधन हे पाश्च्यात्त संशोधकांनी केले असल्याने निदान त्यात तरी भेदाला वाव नसावा असे वाटत होते. तर त्यांच्या मते मानव जातीचे ३ वर्ण जे वेगवेगळ्या उपखंडात विभागले गेले, ते खालीप्रमाणे.

१ :- श्वेत वर्ण ज्यात युरोपीअन आणी एशियन

२ :- पीत वर्ण ज्यात जपान, चीन, कोरीयन वगैरे

३ :- श्याम वर्ण ज्यात अफ्रिकन लोक सामिल आहेत असे तीन विभाग केले. आता वास्तवीक पहाता हे शरीराचे भाग व वर्ण होते. पण कालांतराने गोर्‍यांनी स्वतःच्या रंग, हुशारी व धुर्तपणाने जो वर्णभेद केला त्याला इतिहास साक्ष आहे.

या इतिहासाचा भारतातील वर्णाशी संबंध नाही. पण तत्कालीन लोकांनी जी उतरंड मांडली , ती अजून आहे.

सिंबा, तुमच्या आसपास कोणी आर्ट्स वाले टिचर / प्रोफेसर / विद्यार्थी असल्यास त्यांच्याकडे हे पुस्तक आहे का ते बघा. नुसते वाचायला काय हरकत आहे?

अश्विनीने मान्डलेला प्रकार माझ्या समोर घडला ( अर्थातच अश्विनीचे वय कळते नव्हते) - तर माझा प्र चन्ड सन्ताप होईल. Sad
वा चू नही आत तुटले

ह्या घडीला असे घडत असेल तर लाजीर वाणी गोष्ट आहे. its beyond speech.

ह्या घडीला असे घडत असेल तर लाजीर वाणी गोष्ट आहे. its beyond speech.
<<
असे घडते आहे, तेही आज, अन अनेक ठिकाणी. याच देशात. अन हेच, तुमच्याच "हा विखार कुठून येतो?" या २ पाना आधीच्या प्रश्नाचे उत्तर आहे.

***

बाकी चांगली चर्चा झालिये. कदाचित माझा चिडका चष्मा थोडावेळ काढून ठेवल्याने तसं वाटत असावं.

फक्त, आपल्या "समाजा"च्या अस्मिता फुलवून इतर समाजांचा द्वेष करायचा नाही, हे आवर्जून शिकवा.
<<
हे माझेच वरचे म्हणणे पुन्हा डकवून पुन्हा लिहितोय.

परवाच एक बातमी वाचली. "गाडगेबाबांचा पुतळा उभारला नाही तर ठिय्या आंदोलन : परिट समाजाची मागणी"

च्यैला! पह्यिल्यांदा गाडगेबाबा नावाच्या देवाची जात समजली!!

अरे काय लावलंय लोकांनी???

श्या!

हा धागा आला तेव्हा कामात असल्याने वाचनमात्र होतो.
मुलांना काही सांगताना आपणच 'उपदेश देणे' मोड मध्ये न रहाता संवाद साधत पार्श्वभूमी सांगावी आणि मग त्यांना प्रश्न विचारत चर्चा पुढे न्यावी, त्याने खूपच जास्त फायदा होतो असा अनुभव आहे. त्यांच्या डोक्यात प्रश्न सोडून चर्चेची दिशा ठरवावी. ठोस मतं बनण्याला ठोस कारणे मनात तयार झाली तर ती मतं खोलवर जातात. जात वास्तवावर लहान मुलांना समजतील अशी बारकी पुस्तके उपलब्ध असती तर खूप फायदा झाला असता.
स्लेवरी/ वर्णभेद हे अमेरिकेत इयत्ता पहिली पासुन शिकवतात. लहान लहान गोष्टी रुपाने. रोझा पार्क बस मधून जाताना तिने कसा आवाज उठवला आणि मॉंंटगमरीला डॉ. मा.ल्यु.किं.ज्यु. ने काय भाषण केले इत्यादी गोष्टी अशा लहानवयात माहिती झाल्याने समतोल विचार घडायला मदत होईल असं वाटतं.
वर काही लोकांनी जातवास्तव आपोआप माहित होईल तेव्हा होईल असं मत मांडलंय, ते अजिबात पटले नाही. हे आपण पुढाकार घेउन विषय निघाला की योग्य दिशा देउन माहिती करुन दिलं तर अंतिम निकाल चांगला लागेल.
लैंगिक शिक्षण हे ब्लू फिल्म मधुन मिळण्यापेक्षा व्यवस्थित दिलं तर त्यातिल धोके, परिणाम आणि जबाबदारीची जाणिव करुन देता येते तशाच धर्तीवर.

दिडशे प्रतिसाद ..
मुलांना जात समजवायचा किती तो अट्टहास Happy

आरक्षनामुळे तूमच काय नुकसान झाल ते सांगा,९०% पडले ॲडमीशन नाही झाली गुणपत्रीका दाखवा, आरक्षन काय आहे ते पहा नंतर बोला. मंदिरात रामायणापासुन आरक्षन आहे काही तर विचार करा

आज इन्डियन एक्स्प्रेसमध्ये हे पाहिले अन या धाग्याची आठवण आली.
Difficult Conversations With Your Kids
https://indianexpress.com/audio/difficult-conversations-with-your-kids/d...

मी ऐकलेले नाहिये त्यामुळे नेमके काय सांगितले आहे या पॉडकास्टमध्ये ते माहिती नाही.

Pages