१) मक्याचे कणीस - २ नग
२) उकडलेला बटाटा - २ नग
३) वाफवलेले गाजर - १ वाटी
४) पोहे - १/२ वाटी ( चुरा केलेले )
५) आले आणि लसूण पेस्ट - २ चमचे
६) चाट मसाला - १ चमचा
७) धने पावडर - १ चमचा
८) बारीक चिरलेली कोथिंबीर
९) बारीक चिरलेली हिरवी मिरची - १ चमचा
१०) पातळ केलेली मैदा पेस्ट
११) ब्रेड क्रम - १ वाटी
१२) तेल
१) मक्याचे मिक्सरमधून भरड बारीक करून घ्या.
२) त्यात उकडलेला बटाटा, आले लसूण पेस्ट, चाट मसाला, धने पावडर, गाजर, पोह्याचा चुरा घालून चांगले मिक्स करून घ्या.
( बटाट्यामुळे चांगले बाईंडिंग होते आणि पोह्याचा चुरा मिश्रणाला सुटलेले पाणी शोषून घेतो )
३) मिश्रणाचे गोल पॅटिस किंवा रोल बनवून घ्या. ते बनवताना त्यात एक चीझ क्यूब घाला.
४) ते पॅटिस किंवा रोल मैद्याच्या मिश्रणात बुडवून ब्रेडक्रम मध्ये रोल करा.
५) सगळीकडे ब्रेडक्रम लागले की मग ते पॅटिस किंवा रोल तेलात मध्यम आचेवर खरपूस तळून घ्या.
वरील साहित्य सहा लोकांना पुरेल...
पाकृ छान आहे पण फोटो कुठाय...
पाकृ छान आहे पण फोटो कुठाय......
मोबाईलवरून कसा टाकायचा हे
.
(No subject)
आता करुन बघेन
आता करुन बघेन
फोटो छान आहे.
फोटो छान आहे.
मी करते बरेचदा. अॅडीशनल मटार, बीट घालते.
एका रोल / गोल पॅटीसमधे एक चीझ क्युब खुप होईल.
वाह मस्त पाकृ आहे...
वाह मस्त पाकृ आहे...