मक्याचे कटलेट

Submitted by somu on 1 August, 2018 - 21:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) मक्याचे कणीस - २ नग
२) उकडलेला बटाटा - २ नग
३) वाफवलेले गाजर - १ वाटी
४) पोहे - १/२ वाटी ( चुरा केलेले )
५) आले आणि लसूण पेस्ट - २ चमचे
६) चाट मसाला - १ चमचा
७) धने पावडर - १ चमचा
८) बारीक चिरलेली कोथिंबीर
९) बारीक चिरलेली हिरवी मिरची - १ चमचा
१०) पातळ केलेली मैदा पेस्ट
११) ब्रेड क्रम - १ वाटी
१२) तेल

क्रमवार पाककृती: 

१) मक्याचे मिक्सरमधून भरड बारीक करून घ्या.

२) त्यात उकडलेला बटाटा, आले लसूण पेस्ट, चाट मसाला, धने पावडर, गाजर, पोह्याचा चुरा घालून चांगले मिक्स करून घ्या.
( बटाट्यामुळे चांगले बाईंडिंग होते आणि पोह्याचा चुरा मिश्रणाला सुटलेले पाणी शोषून घेतो )

३) मिश्रणाचे गोल पॅटिस किंवा रोल बनवून घ्या. ते बनवताना त्यात एक चीझ क्यूब घाला.

४) ते पॅटिस किंवा रोल मैद्याच्या मिश्रणात बुडवून ब्रेडक्रम मध्ये रोल करा.

५) सगळीकडे ब्रेडक्रम लागले की मग ते पॅटिस किंवा रोल तेलात मध्यम आचेवर खरपूस तळून घ्या.

वरील साहित्य सहा लोकांना पुरेल...

वाढणी/प्रमाण: 
६ जणांसाठी
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults

फोटो छान आहे.
मी करते बरेचदा. अ‍ॅडीशनल मटार, बीट घालते.
एका रोल / गोल पॅटीसमधे एक चीझ क्युब खुप होईल.